रहस्यमय हवेली (भाग -११)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-११)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुशांत आणि सोनिया तिच्या घरा बाहेर आले.. दोघं रिक्षेतून उतरले... सोनिया ने रिक्षावाल्याला पैसे दिले... तो ज्या पद्धतीने सोनियकडे बघत होता ते बघून सुशांत ला लक्षात आलंच होतं हा नक्कीच सोनिया वर दबाव टाकणारा माणूस आहे... ती पैसे देई पर्यंत याने हळूच रिक्षेचा नंबर नोट करून घेतला आणि त्या रिक्षा चालकाचा फोटो सुद्धा काढला! 

"चला मॅडम! मी निघतो... उद्या सकाळी हवेलीत जाऊन तयारी ला लागेन... तुम्हाला मी सगळी मदत नक्की करेन..." सुशांत तिला डोळ्याने आश्र्वस्थ करत म्हणाला.

सोनिया ला नक्की तो कोणत्या मदती बद्दल बोलतोय हे समजलं होतं! त्यामुळे अचानक तिला खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं! आता ती एकदम निश्चिंत होती... सुयश सरंच्या हातात हेल्प लिहून दिलेली चिठ्ठी खरचं कामी आली होती म्हणून आज तिला बरं वाटत होतं! 

"ओके.... ऑल द बेस्ट.." सोनिया स्मित करत म्हणाली. 

सुशांत तिथून निघाला.... थोड्याच अंतरावर त्याने त्याची बाईक ठेवली होती ती घेऊन तो घरी गेला! तोवर नियती सुद्धा घरी आलेली होती. 

"काय मग कसा गेला दिवस?" नियतीने त्याला पाणी देत विचारलं. 

"छान! बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत! काही गोष्टी लवकरच समजतील...." सुशांत म्हणाला.

"ओके... मला पण काही गोष्टी समजल्या आहेत! बाबांचा फोन आला होता, सुयश सर आणि बाकी सगळे उद्या पासून सी.आय.डी. ब्यूरो जॉईन करणार आहेत! आता आपलं काम अजून सोपं होईल..." नियती म्हणाली. 

"अरे वाह! चला आता बऱ्याच दिवसांनी सगळे भेटतील सुद्धा! चल आता जेवून घेऊया! जेवता जेवता बोलू..." सुशांत म्हणाला. 

"हो! मी पानं घेते तू ये फ्रेश होऊन..." नियती म्हणाली. 

सुशांत त्याचं आवरून आला तोवर नियती ने जेवणाची सगळी तयारी केली... दोघांनी दिवस भरात काय काय घडलं हे एकमेकांना सांगितलं! 

"आपल्याला उद्या लवकर जाऊन सुयश सर आणि बाकी टीम ला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांना या केस बद्दल सगळे डिटेल्स पण द्यायचे आहेत आणि मग पुन्हा आपल्या या प्लॅन प्रमाणे काम सुरू होईल...." नियती म्हणाली. 

"हम्म.. आपली सगळी टीम एकदा एकत्र आली की काही नाही वाटणार... तोपर्यंत त्या रवींद्र बद्दल जरा अजून माहिती काढावी लागेल... नक्की असा कोणता रिसर्च तो करत होता हे शोधायला च हवं!" सुशांत म्हणाला. 

"हो! केतकी अजून काहीतरी सांगणार आहे बघू त्यातून काही हाती लागतं का...." नियती म्हणाली. 

"बघ एक महत्वाचं सांगायचं राहिलं! तुला ते चित्र दिलं होतं बघ सोनिया ने ज्यात हात दगडाखाली आहेत असा काहीसा आपण अर्थ काढला होता त्याचं खरं कारण आज समजलं! हे बघ...." सुशांत ने नियती ला ते  agreement दाखवलं. 

"हे काय आहे?" नियती ला न समजल्यामुळे तिने विचारलं.

"भिंग घेऊन बघ... समजेल..." सुशांत म्हणाला. 

तिने ते agreement नीट बघितलं! तिला पण आता या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे लक्षात आलं! लवकरात लवकर आता ही केस कशी सुटेल या चिंतेत दोघं होते... पण, आता उद्या पासून सुयश सर आणि टीम येणार म्हणून काळजी जरा कमी झाली होती...

"चल आता झोपायला जाऊ... उगाच जास्त ताण नको घेऊस... उद्या तुला पुन्हा त्या रिसर्च सेंटर मध्ये जायचं आहे ना.... तिथे कोणाला संशय येऊ देऊ नकोस तू कोण आहेस ते..." सुशांत म्हणाला. 

"हो..." नियती म्हणाली. 

दोघांनी मिळून बाकी सगळी कामं आवरली आणि झोपायला गेले... झोपायच्या आधी सुशांत ने आर. टी. ओ. मध्ये असणाऱ्या त्याच्या मित्राला त्या रीक्षेचा नंबर पाठवला आणि त्याचे सगळे डिटेल्स पाठवायला सांगितले. 
*************************
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच डॉ. विजय, नियती आणि सुशांत सी.आय.डी. ब्यूरो मध्ये गेले.... सगळी टीम येण्या आधी छान सगळं सजवून ठेवलं आणि त्यांच्या स्वागताची तयारी केली. थोड्याच वेळात टीम आली.... 

"सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि स्वागत....." नियती सुयश सर आणि बाकी सर्वांना पुष्पगुच्छ देत म्हणाली. 

"थँक्यू!... आणि हे आम्हा सर्वांकडून तुम्हाला..." सुयश सर सुद्धा तिघांना पुष्पगुच्छ देत म्हणाले. 

"का सर?" नियतीने विचारलं. 

" बिच्छु गँग ला पकडायला तुम्ही सुद्धा मोलाची साथ दिली आहे म्हणून...." सुयश सर म्हणाले.

बऱ्याच दिवसांनी सगळ्यांची भेट झाल्यामुळे ब्यूरो मधलं वातावरण अगदी आनंदी होतं! सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदनाचा कार्यक्रम झाल्यावर सुयश सरांनी सोनियाच्या केस बद्दल बोलायला सुरुवात केली.

"तर! नियती, डॉ. विजय तुम्हाला ज्या केस बद्दल मी सांगून गेलो होतो त्याची प्रगती कुठवर आली आहे? म्हणजे त्यापुढे आपण सुरू करू..." 

नियती, डॉ. विजय आणि सुशांत ने जे काही आत्ता पर्यंत घडलं ते सगळं सांगितलं! 

"ओके.... आता सुशांत तुझ्या बरोबर सतत अभिषेक राहिल! गोपाळ काकांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि हवेलीत तू कामात व्यस्त असताना त्याची तुला मदत होईल..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर! आणि हे काल हवेली च agreement आलं ते...." सुशांत त्यांना agreement देत म्हणाला. 

"सर, यातून सोनिया मॅडम नी मला सांगितलं, कोणीतरी त्यांच्या मुलीचं अपहरण केलं आहे! ती कुठे आहे हे नक्की माहित नाही... तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोनिया मॅडम कडून ते काम करून घेतायत...." सुशांत पुढे म्हणाला. 

"ओके... तिला आपण शोधूच! तू सोनिया कडून मुलीचा फोटो आणि अजून काही माहिती मिळते का बघ.... आणि तिचं अपहरण करून त्या लोकांना सोनिया कडून काय साध्य करून घ्यायचं आहे काही माहिती मिळाली का?" सुयश सरांनी विचारलं. 

"नाही... एवढं नीट बोलणं झालच नाहीये... सतत त्यांच्यावर कोणी ना कोणी नजर ठेवून असतंच!" सुशांत म्हणाला. 

"ठीक आहे.... तू सोनिया च्या मुलीची माहिती काढ पुढचं काम विक्रम करेल..." सुयश सर म्हणाले. 

"ईशा, सोनाली! तुम्ही दोघी रवींद्र बद्दल माहिती काढा... आणि नियती तू रिसर्च सेंटर मध्ये नीट लक्ष ठेव त्या रवींद्र ला सगळं कुठून आणि कसं समजतं कोण तिथे त्याचा चमचा आहे हे बघ..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर! आम्ही आता येतो... संध्याकाळी सगळे डिटेल्स शेअर करूच!" सुशांत म्हणाला. 

नियती आणि सुशांत त्यांच्या कामाला गेले... सुशांत बरोबर अभिषेक सुद्धा गेला. 
***********************
सुशांत आणि अभिषेक हवेली बाहेर आले... सुशांत च खोटं नाव दिनेश आहे हे सुद्धा त्याने आधीच सांगून ठेवलं.... गोपाळ काकांनी दार उघडलं.. 

"हे कोण?" गोपाळ काकांनी विचारलं. 

"हा रामा... मी काही केमिकल्स रिसर्च मध्ये वापरणार तेव्हा त्यांची सफाई कशी करायची, त्याची विल्हेवाट कशी लावायची हे तुम्हाला समजणार नाही म्हणून याला आणलं आहे..." सुशांत म्हणाला. 

"बरं बरं! या..." गोपाळ काका म्हणाले. 

दोघं आत गेले.... सोनिया ने त्याला एक खोली रिसर्च साठी तयार करून ठेवायला सांगितली होती... तिनेच त्याला काय काय लागेल याची यादी सुद्धा दिली होती... त्या खोलीची स्वच्छता गोपाळ काकांनी करून ठेवली होती... सुशांत आत गेला आणि अभिषेक ने त्याला नजरेने च काहीतरी खुणावले. 

"काका! मला बाकी हवेली दाखवाल? सरांना काही वस्तू तपासायच्या आहेत त्या इथे आणून देतो.." अभिषेक म्हणाला. 

गोपाळ काकांबरोबर तो गेला... महाराणी कुसुमारंगिनि यांच्या काही जुन्या पेट्या, दागिने आणि हत्यारे तो घेऊन आला... सुशांत ने सगळं नीट मांडून ठेवलं! 

"काका, मी काही समान आणायला जातोय... रामा आहे इथेच... येताना मी सोनिया मॅडम ना घेऊन येतो... त्या आल्यावर आमचं काम सुरू होईल...." सुशांत म्हणाला. 

गोपाळ काकांनी बरं म्हणलं.... तो गेल्यावर अभिषेक सगळी हवेली बघत होता... हवेली बघता बघता तो त्या विशिष्ट तलवारी जवळ आला... ती तो हातात घेणार एवढ्यात गोपाळ काकांनी बघितलं! 

"त्याला हात नका लावू...." गोपाळ काका एकदम ओरडले.

अभिषेक एकदम दचकला! आणि मागे वळला..

"का? सरांना रिसर्च करायचा असेल च की यावर..." अभिषेक म्हणाला. 

"नाही नाही... ते तुमच्या त्या मॅडम आल्यावर बघू.... याला आत्ता हात लावू नका..." गोपाळ काका म्हणाले. 

अभिषेक ने जास्त काही न बोलता विषय तिथेच टाळला आणि गोपाळ काकांची माहिती, हवेलीची माहिती, महाराणी कुसुमारंगिनिंची माहिती सगळं विचारून घेतलं! 
*************************
इथे सुशांत तोपर्यंत सोनिया ने जी काही यादी दिली होती त्या प्रमाणे सगळं सामान घेऊन तिच्या कडे आला.... 

"मॅडम! तुम्ही जी तयारी करायला सांगितली होती ती सगळी झाली आहे... आपण हवेलीत जाऊया?" सुशांत ने विचारलं. 

दोघं हवेलीत जायला निघाले... पुन्हा तीच रिक्षा आणि तोच रिक्षा वाला! आता तर सुशांतचा संशय खत्रित बदलला होता... त्याच्या मित्राने त्याला डिटेल्स पाठवायची च तो वाट बघत होता... एवढ्यात त्याला मेसेज आला... ते सगळे डिटेल्स त्याने निनाद ला पाठवले आणि सोनिया ला मुलीबद्दल विचारण्यासाठी मेसेज टाईप केला... सोनिया ने ते हळूच बघितलं होतं! तिने तिच्या मोबाईल वॉलपेपर वर मुलीचा फोटो ठेवला होता तो त्याला दाखवला! तो फोटो बघून आता सुशांत ला फार वाईट वाटत होतं! कोणी इतकं क्रूर कसं होऊ शकतं यामुळे त्याचा संताप होत होता पण, शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता! ते दोघं हवेलीत पोहोचले. हवेलीत त्या रिसर्च च्या खोलीत गेल्यावर सुशांत ने सोनिया कडून तिच्या मुलीचा फोटो आणि बाकी डिटेल्स घेऊन विक्रम ला पाठवले. जेमतेम १० ते १२ वर्षांची ती मुलगी आणि त्यात अपंग! सोनिया पुन्हा इमोशनल झाली होती. सुशांत ने सुयश सर आणि बाकी सगळे मिळून तिला काहीही होऊ देणार नाही म्हणून धीर दिला आणि तिला बोलतं केलं! 

"मला माहित नाही हे सगळं माझ्याकडून कोण करून घेतय! त्याचा काय हेतू आहे हे सुद्धा माहीत नाही.... मला रवींद्र सरांवर संशय आहे पण, त्यांना मागच्या सहा ते सात महिन्यांपासून कोणी पाहिलं सुद्धा नाहीये... माझ्या मुलीसाठी मी हे करतेय..." सोनिया ने रडत रडत सगळं सांगितलं. 

"तुम्ही नका काळजी करू... तुम्हाला नक्की काय काम सांगितलं आहे? हवेलीत काय रिसर्च करायला सांगितला आहे त्याने?" सुशांत ने विचारलं. 

"अजून तरी काही सांगितलं नाही... पण, काय काम करायचं याचा मेसेज येईल ते करायचं असं सांगितलं होतं! आज पासून हवेलीत जाऊन रहा एवढं काल मला सांगण्यात आलं!" सोनिया म्हणाली. 

एवढ्यात खोलीचं दार वाजलं! अभिषेक आला होता... तो आत आल्यावर त्याने सुशांत ला तलवारी बद्दल जे घडलं होतं ते सांगितलं! 

"हो! हो! मला आधीच एक धमकी सुद्धा दिली आहे... हवेलीत त्या तलवारी ला हात सुद्धा लावायचा नाही..." सोनिया एकदम म्हणाली. 

"नक्कीच काहीतरी गडबड आहे..... रामा तू गोपाळ काकांना घेऊन कुठेतरी जा... आम्ही ती तलवार बघतो..." सुशांत म्हणाला. 

अभिषेक गोपाळ काकांना अंगण आणि बाकी परिसर दाखवा असं सांगून बाहेर घेऊन आला.. तोवर सोनिया ने ती तलवार घेतली... काहीतरी टेस्ट केल्या आणि तिला आश्चर्य वाटलं! 

"मॅडम काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर चे भाव अचानक बदलले..." सुशांत ने विचारलं. 

"मला एकदा खात्री करावी लागेल... तुला  कसही करून ही तलवार बाहेर नेता येईल?" सोनिया ने विचारलं. 

"हो मी करेन काहीतरी..." सुशांत म्हणाला. 

"ठीक आहे! मला तुझा मोबाईल दे! मी माझ्या जुन्या मैत्रिणीला फोन करते... ती या कामात खूप चांगली आहे... ती तिच्या तोंडून जेव्हा मला सांगेल तेव्हाच मला खात्री पटेल..." सोनिया म्हणाली. 

क्रमशः.....
*************************
सोनिया ने कोणाला फोन केला असेल? तिची मुलगी सुखरूप असेल का? रवींद्र जर हे करत नसेल तर कोण करत असेल? की रवींद्र पुन्हा आलाय? पाहुया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. 

सोनिया ने जिला फोन केला आहे तिला तुम्ही सगळे ओळखता... तुमची आवडती नायिका आहे ती! कोण असेल याचा विचार नक्की करा... पुढच्या भागात तुम्हाला दोन कथांचा संगम पाहायला मिळेल... 

🎭 Series Post

View all