रहस्यमय हवेली (भाग -१०)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-१०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सोनिया पुढे गेली आणि तिच्या मागून सुशांत! 

"या सोनिया मॅडम! तुमचं agreement तयार आहे... याची एक कॉपी मी रणजित कुमार ना पाठवली आहे.... ते सुद्धा थोड्यावेळात इथे येतील तेव्हा लगेच सह्या करून टाका... ते येई पर्यंत सगळं नीट वाचून घ्या! काही दुरुस्ती किंवा काही समजलं नाही तर विचारा..." वकील म्हणाले. 

"ओके... सर, याची अजून एक कॉपी आहे का? म्हणजे हा पण वाचेल... हा असिस्टंट म्हणून माझ्या हाताखाली काम करणार आहे तर याला सुद्धा सगळे नियम माहीत पाहिजेत ना..." सोनिया म्हणाली. 

"हो! सॉफ्ट copy आहे मी लगेच प्रिंट काढून देतो..." वकील म्हणाले आणि लगेच प्रिंट काढून सुशांत ला दिली. 

दोघं agreement वाचत होते... पण, तिथेच वकील आणि त्यांची असिस्टंट असल्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं! सोनिया कसं सुशांत ला सगळं सांगता येईल याचा विचार करत होती... 

"तुम्हाला काही चहा, कॉफी, थंड?" वकिलांनी विचारलं. 

"नाही काही नको..." सोनिया म्हणाली. 

"ओके.. काही लागलं तर स्विटी ला सांगा... मी जरा दुसरं एक काम आहे ते करून येतोच!" वकील म्हणाले आणि ते बाहेर गेले. 

एवढ्यात सोनिया ला काहीतरी सुचलं... तिने पेन स्टँड मध्ये असलेली पेन्सिल घेतली आणि पेन्सिल ठेवून एक एक ओळ वाचायला सुरुवात केली... नक्कीच सोनिया काहीतरी सांगणार आहे हे सुशांत च्या लक्षात आलं! तिचं झाल्यावर तिने सुशांत ला नजरेने खुणावलं पण, तिथे स्विटी असल्यामुळे काही करता येत नव्हतं! अचानक सुशांत ने काहीतरी विचार केला आणि म्हणाला; "मॅडम! माझं डोकं एकदम जड झालंय... मी नेमकी माझी गोळी आणायला विसरलो! इथे कुठे मेडिकल असेल तर ही गोळी मला आणून देऊ शकता का प्लीज?" सुशांत ने स्विटी ला एक गोळी च रिकामं पाकीट देत विचारलं. 

"ओके... डोन्ट वरी... तुम्ही थांबा मी सांगते..." असं म्हणून स्विटी ते पाकीट घेऊन बाहेर गेली... 

ती बाहेर गेलेली पाहून लगेच दोघांनी agreement बदलले... आणि सुशांत मुद्दाम टेबल वर डोकं ठेवून झोपला. तोवर स्विटी आलीच! 

"सर! सर! हे घ्या तुमची गोळी आणि पाणी..." स्विटी त्याच्या हातात गोळी देत म्हणाली. 

त्याने गोळी खाल्ली.... आणि दोन मिनिटं डोळे बंद करून बसला... 

"काय रे आता बरं वाटतंय ना? काय झालं अचानक?" सोनिया ने विचारलं. 

"हो बरं आहे... मला होतो कधीकधी त्रास बारीक अक्षरं वाचली की... आणि मग जोवर गोळी खात नाही तोवर डोकं जड होतं आणि थोड्यावेळाने चक्कर येते..." सुशांत म्हणाला. 

"थांबा सर मी मोठ्या फॉन्ट मध्ये तुम्हाला प्रिंट काढून देते..." स्विटी म्हणाली. 

"नाही नको... उगाच कागद का वाया घालवता.... त्या पेक्षा मी भिंग असेल तर द्या..." सुशांत म्हणाला. 

स्विटी ने वकिलांच्या ड्रॉवर मधून त्याला भिंग काढून दिलं! सुशांत ने भिंग घेऊन ते agreement वाचायला सुरुवात केली.... सोनिया ने पेन्सिल ने काही अक्षारांखली पुसटसे बिंदू काढले होते... जे सुशांत ला साध्या डोळ्यांनी वाचायला त्रास होत होता म्हणून त्याने भिंग मिळवण्यासाठी ही शक्कल लढवली. सगळं वाचून झाल्यावर त्यातून दोन शब्द तयार होत होते... त्याने सोनिया कडे पाहिलं.... तिने मानेने हो म्हणलं आणि तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. सुशांत ने तिला नजरेनेच धीर दिला आणि शांत राहायला सांगितलं. तिने खाली मान घालून च त्यावर सह्या केल्या आणि हळूच डोळे पुसले. तोपर्यंत वकील सुद्धा आलेच! त्यांच्या बरोबर रणजित कुमार सुद्धा होता... त्याने सुद्धा सह्या केल्या आणि हवेलीच्या किल्ल्या सोनिया ला दिल्या. 

"हवेलीची साफ सफाई आणि बाकी कामासाठी आम्ही गोपाळ काकांना तिथे ठेवतोय... काहीही काम असेल तर त्यांना सांगत जा... तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांची ओळख आहे ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन सुद्धा करतील म्हणून..." रणजित कुमार म्हणाला. 

"चालेल! त्यांची आम्हाला मदतच होईल..." सोनिया म्हणाली. 

रणजित कुमार आणि सोनिया वकिलांना थँक्यू म्हणाले आणि बाहेर पडले. पुन्हा त्याच रीक्षेत बसले आणि त्याला हवेलीत घेऊन जायला सांगितलं. 
*************************
दुसरीकडे नियती आणि केतकी ची सगळी कामं झाली होती आणि लवकरच दोघी कॅफे मध्ये जाणार होत्या! आज केलेल्या सगळ्या कामाचे रिपोर्ट्स तयार करून त्यांच्या सिनियर्स ना देऊन दोघी बाहेर पडल्या. कॅफे मध्ये येऊन थोडं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर केतकी ने च विषयाला सुरुवात केली! 

"तू दुपारी जो सोनिया मॅडम चा विषय काढलास तो पुन्हा तिथे काढू नकोस हा! तुला जे काही विचारायचे आहे ते मला विचार पण बाहेर आल्यावर... तिथल्या कोणाला समजलं नाही पाहिजे आपण सोनिया मॅडम बद्दल बोलतो ते..." केतकी म्हणाली. 

"ओके... यापुढे नाही होणार असं! पण, असं काय घडलं आहे? सोनिया मॅडम ने काही चुकीचं केलं आहे का?" नियती ने विचारलं. 

"अगं नाही.... उलट त्या बरोबर च होत्या! त्यांनी स्वतः हा जॉब सोडला असं सगळे सांगत असले ना तरी तसं काही नाहीये.... त्यांना काढून टाकलं इथून..." केतकी म्हणाली. 

"का? काय झालं होतं?" नियती ने विचारलं. 

"रवींद्र सर याला कारण झाले! त्यांच्यामुळे त्या बिचाऱ्या सोनिया त्यांचा जॉब गमावून बसल्या." केतकी म्हणाली. 

"कोण रवींद्र सर? आज दिवसभरात मी नाव सुद्धा नाही ऐकलं." नियती म्हणाली. 

"यापुढे सुद्धा ऐकणार नाहीस.... त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि आता ते कुठे असतात काय करतात कोणाला काही माहीत नाही..." केतकी म्हणाली. 

नियती लक्ष देऊन ऐकत होती.... केतकी ने दोन मिनिटं पॉज घेतला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली; "रवींद्र सर कसलातरी रिसर्च करत होते, त्यांची असिस्टंट म्हणून सोनिया मॅडम काम करत होत्या! काय प्रोजेक्ट होता हे फक्त त्या दोघांनाच माहीत... जवळ जवळ सगळं काम होत आलं होतं! त्या रिसर्च मध्ये खूप त्रुटी होत्या आणि नंतर काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असता म्हणून सोनिया ने त्यांना यापुढे मदत करणार नाही असं सांगितलं! त्या रवींद्र सरांच्या हे काही पचनी पडलं नाही त्यांनी त्यांच्या सगळ्या पॉवर वापरून सोनिया मॅडम ना इथून काढून टाकलं! त्याच्या काही दिवसांनी ते स्वतः राजीनामा देऊन गेले..." केतकी म्हणाली. 

"पण मग कोणी सोनिया मॅडम ना पुन्हा का नाही बोलावलं? त्यांचा तर यात काही दोष नव्हता ना मग काय झालं?" नियती ने विचारलं.

"खरं सांगायचं तर सोनिया मॅडम शी मी बोलले या विषयावर! त्यांना सांगितलं होतं तुम्ही परत या आता रवींद्र सर इथे नाहीयेत! या रिसर्च सेंटर ला तुमची गरज आहे... पण, त्या म्हणाल्या आता त्या येऊ शकणार नाहीत! त्यांचं काहीतरी पर्सनल कारण आहे आणि त्या मुंबई सोडून चालल्या आहेत...." केतकी म्हणाली. 

"त्या गेल्या होत्या का खरचं मुंबई सोडून? पुन्हा आल्यात का?" नियती ने विचारलं. 

"अगं खरंच ते नाही माहीत! मी त्यांना पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न सुद्धा केला होता पण, काही संपर्क नाही झाला... कदाचित गेल्या असतील...." केतकी म्हणाली. 

"ओके...." नियती म्हणाली. 

"बरं ऐक मी तुला एवढं सगळं सांगितलं आहे हे कोणाला कळू देऊ नकोस हा... रवींद्र सर इथे नसले तरी त्यांना काय माहित नाही पण, सगळ्या बातम्या जातात... त्यांच्या विरोधात आजवर ज्यांनी पावलं उचलली ते सगळे अक्षरशः वेडे झाले आहेत! त्यांना आपण एवढ्या मोठ्या रिसर्च सेंटर मध्ये काम करायचो आपली समाजात पत होती हे सुद्धा आठवत नाही..." केतकी म्हणाली. 

"म्हणजे?" नियती ला काही न समजल्यामुळे तिने विचारलं. 

"आत्ता आता बास... घरी जायला पुन्हा उशीर होईल... सांगते सगळं नंतर... एकाच दिवशी तुला ताण नको..." केतकी म्हणाली. 

"अरे खरचं खूप उशीर झालाय आधीच! सॉरी हा माझ्यामुळे आज तुझा खूप वेळ गेला...." नियती म्हणाली. 

"त्यात काय ग! मैत्रीण आहेस ना माझी... तू इथे काम करणार तर तुला सगळं माहीत पाहिजेच!" केतकी म्हणाली. 

दोघी घरी जायला निघाल्या. 
**************************
दुसरीकडे सुशांत आणि सोनिया हवेलीच्या बाहेर आले होते.... संध्याकाळच्या वेळेस हवेली अजूनच सुंदर आणि भव्य दिसत होती.... 

"मस्त आहे हवेली मॅडम! इथे काय रिसर्च करायचा आहे आपल्याला?" सुशांत ने विचारलं.

"कळेल सगळं! चल तुझी गोपाळ काकांशी ओळख करून देते म्हणजे तू इथे कामाला लागू शकतोस..." सोनिया म्हणाली. 

दोघं दारापाशी आले.... भव्य दारावरची बेल वाजवुन दोघं बाहेर उभे होते... गोपाळ काकांनी दार उघडलं.... दोघं आत गेले... सोनिया ने सुशांत ची गोपाळ काकांशी दिनेश तिचा असिस्टंट म्हणून ओळख करून दिली... त्याला संपूर्ण हवेली दाखवली आणि नंतर ते पुन्हा घरी जायला निघाले. 

"मॅडम मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग माझ्या घरी जातो..." सुशांत मुद्दाम रिक्षेत बसल्यावर म्हणाला. 

"सहाब! मॅडम को छोडने के बाद में छोडता हू ना आपको... आप दुसरा रिक्षा का इंताजार करेंगे तो लेट हो जाएग ना" रिक्षावाला म्हणाला. 

"अरे नही! थँक्यू आपने इतना कहा! पर में उधर से पास ही रेहता हु चलके जाऊंगा! उतनी कसरत होती है ना..." सुशांत म्हणाला. 

"ओके साहाब!" रिक्षा वाला म्हणाला. 

सुशांत मुद्दाम सतत हवेली आणि रिसर्च बद्दल सोनिया शी बोलत बसला होता... त्याचं रिक्षा वाल्यावर सुद्धा लक्ष होतंच!  

क्रमशः...... 
*************************
डॉ. विजय, नियती आणि सुशांत त्यांचं काम चोख करतायत! सुयश सरांच्या टीम ची परीक्षा आता झाली असेल ते सगळे सुद्धा आता या केस मध्ये जॉईन होतील.... पण, तोपर्यंत सुशांत ला सोनिया ने agreement मधून काय सांगितलं असेल? केतकी ला अजून काय सांगायचं असेल पाहूया पुढच्या भागात.... 

🎭 Series Post

View all