हसा चकटफू ... जादूचे बॉल्स !

This is an Anecdote about how parenting can get really tricky! वाचताना नक्की पडणार सगळ्या आयांच्या डोक्याला आठ्या पण गालात हसू !!

साधारण दोन एक वर्षाचा असेल. स्वयंपाक घरात आला. मी तिकडेच काम करत होते. फ्रिजच दार काही कारणाने उघड होत. फ्रिजच्या दरवाज्यात त्याला पांढरे बॉल्स एका लायनीत मांडून ठेवलेले दिसले. छोटे डोळे चमकले आणि एक बॉल उचलला. चिमुकल्या हातातून बॉल निसटला, "फटॅक.." चिमुकले डोळे विस्फारून बघतच बसले, बॉल उसळून वर नाही आला. पण फुटला. आतून थोडा जेल आणि अजून एक पिवळा सॉफ्ट बॉल बाहेर पडला. अरे हे तर जादूचं आहे काहीतरी . छोट्या छोट्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये हसू उमटले. अजुन दोन तीन दिसतायत वरती. अजून एक "फटॅक.." अरे परत तसच झालं, एक अजून "फटॅक" पुन्हा तेच. मी फक्त २-३ फुटांवरून हे सगळं बघत होते.मी पुरती गोंधळून गेले. छोटूच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार आश्चर्य बघू कि त्याला अजुन पसारा करण्यापासून थांबवू आणि मौल्यवान अंडी वाचवू. खरं सांगते सगळं नीट समजायला आणि त्यावर action घ्यायला तीस एक सेकंद लागली. तिथपर्यंत ३-४ अंडी फुटली होती

त्या ३० सेकंदात केलेला पसारा आवरण्यात माझा कमीतकमी अर्धा तास तरी गेला हे वेगळ नकोच सांगायला !