मी अशी मी तशी

मी अशी मी तशी
काय करावे या स्त्री मनाला ?कुणी ना कुणी सतत ऐकवतच असते अशी कशी ही? किती बदलली आहे आता. पण या बदलामागचे कारण जाणून घ्यायला कुणाला स्वारस्य आहे का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. डिजिटल च्या जमान्यात सतत व्यवस्थित असायला या भावनेमुळे सतत कितीतरी जनांच्या भावनांचा कोंडमारा होतोय. बरं भावनांच्या गाठी इतक्या घट्ट होत चालल्या आहेत की उलगडायलाच तयार नाहीत. कारण आताच्या युगात कायम आपण परफेक्ट असावे असे वाटणे. हा भावनांचा पसारा दिवसेंदिवस आवरणे कठीण झाल्याने मनाला बुरशी चढत चालली आहे. आता कधी अशी असणारी मी प्रत्येकासाठी वेगवेगळी असते मग काय होते मी अशी मी तशी ??