नसानसांत भिनलेल्या
कर्तव्यांनी...
हृदयातील तळागाळात
साचलेल्या
कटू-गोड आठवणींनी...
सळसळत्या हाताने
रंगीत रंगीत शाईने
कधी हळूहळू तर
कधी न थांबता त्या
रित्या कागदावर
भिन्न भिन्न भावनांचे
भाव घेऊन उमटते...
अशी ती लेखणी
सांगून जाते,
शहारून जाते मनाला
प्रत्येक कविता माझी जखमी...!!
- कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे