माय पिकनिक स्टोरी

My real experience about my picnic to a near by resort!

संध्याकाळच्या ५.३० चे सुमारास......माझा मोबाईल वाजला ...मनिष कॉलिंग ..." हां बोल रे....किती वाजे  पर्यंत येशील घरी?? "मी विचारलं ...

मनिष: " अगं लेट होतोय मला थोडा ...... तुम्ही  तयार आहात ना...? मी आलो की लगेच निघू "

मी:"ओ. के. ये तू आम्ही तयार आहोत" बाय !

आज शुक्रवार......आम्ही दोघे आणि आमची दोन पिल्लं आज पानशेत जवळ एका रिसॉर्ट ला वीकेंड साठी जायच ठरवलं... मी सगळी तयारी केली होती...कपडे...खाऊ ... औषद. .. खेळणी!

"मुली लहान आहेत अजून, महत्वाच्या लागणाऱ्या गोष्टींची लिस्ट कर..... आणि बॅग भर...." आई ने सांगितल्या प्रमाणे मी सगळी तयारी केली होती......आम्ही तिघी कधी निघायचं याची वाट पाहत होते .....

बाबा येई पर्यंत टीव्ही पाहूया......म्हणून मी आणि मुली टीव्ही पाहत बसलो ......७ वाजुन गेले तरी मनिष घरी आला न्हवता.....भोसरी ते सिंहगड रोड १-१.३० तास जातो संध्याकाळच्या ट्रॅफिक मध्ये ....! तेवढ्यात गॅलरीच् दार जोरात आपटल....बाहेर वादळी वारा सुटला होता....आणि सुरू झाला वीजांचा कडकडाट आणि क्षणात धो- धो पाऊस सुरू झाला!!! ऑक्टोबर  महिना हा ... हस्त नक्षत्र....निरोपाचा पाऊस तो .....पडायला लागला की मात्र ढगफुटी सारखा कोसळायला लागतो...

अनोळखी जागी जायचा आहे....५.३०-६ ल निघायचं ठरलं होतं ..... आता तर अंधार पडला आणि त्यात पाऊस.... जाव की नाही आता रिसॉर्ट ला......माझ्या मनात विचार डोकावून गेला. घरीच ७ वाजून गेले होते....

तेव्हढ्यात बेल  वाजली .मनाली: " आई, बाबा आला असेल ना, जाऊया पिकनिक ला? " मनिष घरी आला "चला,तयार ना तुम्ही, लगेच निघू आपण..."

"अरे...पण तू फ्रेश तरी हो....चहा हवाय का तुला ??" मी विचारलं!

"नको आधीच उशीर झालाय .... लेट्स गो!"

मुली खुश होत्या रिसॉर्ट ला जायच म्हणून.... त्यांच्या काय कल्पना असतील डोक्यात पिकनिक, रिसॉर्ट बद्दल ते त्यांनाच ठाऊक....सगळे  उत्साहात गाडीत बसलो....आणि गूगल मॅप वर लोकेशन टाकलं!

घरा पासून रिसॉर्ट साधारण २ तासा वर आहे ,असा अंदाज होता .पावसा मुळे, "गाडी हळू चालव" ह्या माझ्या सतत ्चा संगण्यामुळे, आम्ही रिसॉर्ट वाल्या ने दिलेल्या  गूगल मॅप लोकेशन ला पोचलो तेव्हा रात्री चे १० वाजले होते.मुलींनी गाडीतच खाऊ खाल्ला....आणि दोघींना पेंग यायला लागली होती.

पोचल्या वर पाहतो तर तिथे रिसॉर्ट नसून एक हॉटेल होतं 'जेवण व नाश्ता मिळेल 'अशी पाटी पाहून मला कळेनाच! ...राहायची सोय असेल असं काही वाटत नव्हतं! " हे काय , असल कसलं हे रिसॉर्ट ?? इथे आपण राहणार आहोत का? घरी जाऊया का परत त्या पेक्षा ! " एका श्वासात मी बोलून गेले!  " हो....थांब जरा उतरून मला बघून तर येऊ दे" मनिष गाडीतून उतरला, आणि त्या हॉटेल जवळ चौकशी करायला गेला. मी गाडीतच बसले होते.... मागच्या सीट वर दोघी मुली शांत झोल्या होत्या आणि पाऊस ही धो धो पडून दमून शांत झाला होता....!

१० मिनिटे झाली तरी अजून मनिष का आला नाही...डोक्यात नको ते विचार एका मागून एक रिंगण घालू लागले....नवीन जागा...बाहेर काळोख ...गाडीत मी आणि दोन लहान मुली....छातीत नुसती धडधड वाढायला लागली होती .मी फोन करायला  मोबाईल काढला....तर मोबाईल ला खूप कमी रेंज होती.... कॅल पण लागत नव्हता...खिडकी चे काचेतून  पाहिलं तर मनिष गाडी जवळ चालत येताना दिसला. माझा जीव भांड्यात पडला!

" काय झालं? " रिसॉर्ट कुठे आहे ? पत्ता चुकला का आपला?" तो गाडीत बसताच माझ्या प्रश्नांचा पाऊस सुरू झाला! " हे हॉटेल ज्यांचं आहे त्यांचाच रिसॉर्ट आहे....रिसॉर्ट म्हणजे दोन रूम आहेत....ज्या पानशेत डाम चा बॅक वॉटर जवळ आहेत....इथून पुढे एक १५-२० मिंटावर ती जागा आहे.नवीनच सुरू केला आहे त्यांनी....तिथे आता आपण जाणार आहोत. "

"काय" मी ओरडलेच! "अजून लांब जायचा इथून...एवढ्या रात्री कुठे शोधत बसणार आपण? २ रूमाच रिसॉर्ट...हे काय आहे नक्की ?? तू बुकिंग करताना नीट चौकशी केली नाहीस का??  रात्रीं चे १०.१५ वाजले आहेत....आणि आता ह्या पुढे आपण शोधत जाणार.....उगाच आलो आपण ...शी!! काय सुचलं आणि आलोय इथे....मला काही बरोबर नाही वाटते.... जायचं का घरी परत ??  जेवलो पण नाही आपण अजून....मुली तर कंटाळून झोपल्य पण...."

"अगं हो मी जेवण सांगितलं आहे ....ते पर्सल देणार आहेत....आणि त्यांचा एक माणूस येतोय आपल्या बरोबर...तो रस्ता दाखवेल. तो तिथेच राहील रिसॉर्ट ला...आपल्याला  काय हवं नको बघायला"

हे सगळं ऐकून मला काही पटत नव्हतं.... मुलीनं प्रमाणे रिसॉर्ट ची मी केलेली कल्पना धुळीत....खरं तर पावसा मुळे चिखलात मिळाली होती.भुकेनी मला काही सुचत ही नव्हत आणि त्यात आम्ही चौघेच रात्री चे वेळेस अनोळखी अंधाऱ्या  जागी येऊन पोचलो होते! रस्त्यावर दिवे सुध्दा नव्हते !

१० मिनिटांनी त्या हॉटेल मधून एक मुलगा आला.साधारण २०-२२ वर्ष वयोगटातील तरुण,हातात जेवणाचे पार्सल घेऊन आला.मी उठून मागच्या सीट वर गेले आणि तो पुढे मनिष जवळ बसला आणि गाडी धावायला लागली..... तो सांगेल त्या दिशेने.

रस्त्यात आमची गाडी सोडली तर दुसरी एक ही गाडी दिसत  नव्हती....समोर लाईट चा उजेड .... पण फक्त आमच्या गाडी चा हेड लाईट चा!....आजूबाजूला पूर्ण अंधार आणि शांतता....कुठे निघालो आहे नक्की....काही कळत नव्हते! माझ्या मनात भीती ची सावली दाट पसरत चालली होती!

" दादा, पुढे उज्वी  कडं घ्या आता....पोचलो बघा आपण" अनिल बोलला....मनिष ने राइट सिग्नल दिला आणि गाडी उजवी कडे वळवली.....डांबरी रस्ता सोडून आमची गाडी मातीच्या कच्या रस्त्याला लागली....प्रचंड पाऊस पडून गेला होता ...त्यामुळे ओल्या मातीत गाडी ची चाक .... जागीच फिरायला लागली होती.हळू हळू पुढे जात होतो.... "देवा, परमेश्वरा...आहेस ना रे....हा कुठे घेऊन जातोय आम्हाला!! मनोमनी मी देवाला साद घातली!

" घ्या बाजूला आणि लावा तिथे गाडी" अनिल च्या ह्या वाक्याने,आता मी मात्र पूर्ती घाबरले होते.

" इथे कुठे आणलस आम्हाला?" मनिष ने विचारल....

"ते बघा आलं आपला रिसॉर्ट..... " तो बोलला.

बारीक मिणमिणत्या दिवा असलेल्या २ रूम दिसू लागल्या. कच्चा रस्ता होता, मध्येच गाडी पार्क कुठे करायची कळेना. थोडी डावीकडे घऊ अन लावू एका बाजूला गाडी....म्हणून पार्किंग साठी मनिष  गाडी पुढे मागे करत होता ...आणि तेवढ्यात जाणवलं गाडीच मगच चाक जागीच फिरत आहे......ते मातीत रुतल, गाडी जगची काही हालेच ना! मी खिडकी बाहेर बघायचा प्रयत्न केला ...पण अंधार आणि फक्त अंधारच होता....." मी खाली उतरून बघू का ? की इथेच लाऊया गाडी ? " मी विचारलं.

गाडीतून मी उतरले आणि पाहते तर डाव्या बाजूला मोठा खड्डा दिसत होता....अंधारात किती खोल खड्डा आहे ते कळत नवहतं... एका विजेचा खांबा जवळ गाडी उभी होती  ....तिथे चिक्खल असल्या मुळे चाक रुतून बसले होते.

" मनिष, आपण मुलींना गाडीतून बाहेर काढू......तू पण बाहेर ये आधी "...  गाडी होती तिथेच ठेवली आणि मुलींना कडेवर घेऊन आम्ही गाडीतून बाहेर काढले. गाडी जवळून पाहत होतो तेव्हा कळल खड्डा मोठा आहे......पण नीट दिसत नव्हतं.... जरा जरी अंदाज चुकला असता,तर....??

विचार करूनच धडकी भरली!

अनिल ने एक रूम उघडली आणि  आमचं समान आणि जेवण आणून दिलं.रूम मध्ये डबल बेड वर दोघींना झोपवलं आणि आम्ही दोघे जेवायला बसलो.रात्रीचे  ११ वाजुन गेले होते. मी हात धुवायला बाथरूम मध्ये गेले,बाथरूम चा खिडकी ची काच फुटली होती....गार हवेची झुळुक आत येत होती....आणि त्याच बरोबर आत येताना दिसला  एक मोठ्ठा नाकतोडा!

मी हात तोंड नं धुताच पळत बाहेर आले ..." मनिष, बाथरूम मध्ये तो किडा आलाय बघ. . मार त्याला आधी...."

"बाथरूम मध्ये काय अगं इथे बेड वर बघ.... चिलट आणि डास पण आहेत, दोघी मुलींना डास खूप चावलेत!

"छे! काय हे कुठे आलोय आपण, कसली ही असली पिकनिक....आपण घरीच बरे होतो! तू कसलं हे रिसॉर्ट शोधलस ...आधी नीट चौकशी करायची ना तू.... " मी वैतागून बोलले!

"मला काय माहीत हे असा असले ...." एवढं बोलून मनिष ने बाथरूम कडे पळ काढला....  कारण थांबला असता तर माझी कटकट काही संंपली नसती ह्याची त्याला खात्री होती!

"गेला का रे नाकतोडा ??""

नाही"

"मला जायच आहे बाथरूम ला...."

"जा ...तो किडा काय करणारे तुला"

"मला त्याची भिती वाटते"

नाकतोडा काहीं जायचं नाव घेई ना  ... आणि त्याला घाबरून मी ही बाथरूम मध्ये जाईन!

खरं तर इतक्या दिवसांनी आम्ही बाहेर पडलो होतो .....जरा रूटीन पासून वेगळा प्लॅन केला होता हा वीकेंड, पण एकंदरीत वातावरण आणि जागा दोन्ही काही योग्य वाटत नव्हत्! आम्ही दोघे टीव्ही पाहत गप्पा मारत बसलो होतो... पण डासाना मात्र ते बघवे ना....त्यांना मेजवानी होती आज.मुलींची पण डास चावात असल्याने चळवळ चालू झाली.... बॅगेतून ओडोमास लावलं तेव्हा थोडा बर वाटलं ... दिवस भर ऑफिस आणि संध्यकाळी ड्रायवहिंग मुळे दमून मनिष ला बोलता बोलता झोप लागली.. !

आता मात्र,रातकिडे, डास,नाकतोडा आणि मी आम्हीच फक्त जागे....बाकी सगळ्यांना छान झोप लागली होती.रूम मध्ये बारीक दिवा मी चालूच ठेवला होता. खिडकी बाहेर पाहण्या चां माझा प्रयत्न व्यर्थ होता.... दिसत काहीच नव्हता... १०० मीटर वर आमची गाडी लाईटच्या खांबाला टेकून उभी होती. आपण कुठे आहोत....आणि बाहेरच दृष्या आहे तरी काय! मी बेड वर येऊन आडवी झाले....पापण्या मिटत होत्या...पण झोप लागत नवती....भीती काही मनातून जाईना .....उगाच आलो आपण....काय गरज होती का यायची ...हेच विचार मनात!

पहाटे चे ३ वाजुन गेले तरी मला झोप लागेना....बाहेरून मध्येच कसले तरी आवाज यायला लागले.....प्राण्याचे  बहुदा....जंगलात आहोत की काय आपण ....असा मला संशय यायला लागला....कसलं आलाय रिसॉर्ट...आम्हाला कुठे  डांबून ठेवलं आहे....कसली फस्वे गिरी आहे ....हेच आपलं मनात येत होत!

मनिष आणि मुली  मात्र शांत निवांत झोपले होते....

मी मोबाईल काढून पाहिला ..४.३० वाजले होते... बॅटरी डेड व्हायला आली होती ...माझी आणि मोबाईल दोघांची! फोन ला रेंज नव्हतीच! आपण किडनाप वगैर झालोय का ?? असा वाटायला लागलं होतं....फार पण हिंदी पिक्चर पाहू नये हेच खरं!

ह्या विचारात कधी झोप लागली कळलं नाही....

" आई...आई ग.....भूक लागली..." छोट्या मनाली ने आवाज दिला....मला चटकन जाग आली.... पहाट झाली होती. मी बॅग मधून रवा लाडू काढून तिला दिला....आणि खिडकीबाहेर पाहिले तर काय.....स्वप्नात पहावं अस नयन रम्य दृष्य....समोर खळखळणारी नदी....नदीच्या मागे छाती ताणून उभे डोंगर.... पक्ष्यांची किलबिल... पावसा मुळे स्वच्छ झालेलं आभाळ अता सोनेरी सूर्य प्रकाशाने उजळून निघाले होते....

सस्पेन्स चित्रपटात विलन नाहीच...आणि क्लायमॅक्स आपल्या मनासारखं झाला असं मला वाटू लागलं होतं!

आम्ही फ्रेश होऊन चहा घेतला ...पण रात्र भर झोप न झाल्यानं माझ डोकं मात्र जड झालं होतं! किती ही छान निसर्ग रम्य परिसर असला तरी आता इथून निघाव असं मी हट्ट केला!

मुलींना वाटलं निघायची तयारी चालु आहे....ती दुसऱ्या पिकनिक ला जायला. आम्हीं रूम मधून बाहेर पडत असताना अनिल आला...." दादा, गाडीचे चाक रुतून बसला आहे....लाईटी चा खांबाला खेटून उभी आहे गाडी!"

" झालं आता !! " निघाव तर तेही शक्य नाही.....नक्की कुठला मुहूर्त काढून आम्ही इथे आलोय. ..आणि पुढे काय काय वाढून ठेवलं आहे अजून ते एक गूढ होत ! आम्ही गाडी जवळ गेलो ...गाडी एका खांबाला चिटकून उभी होती ...आणि शेजारी जो अंधारात खड्डा वाटत होता. ...ते शेत होतं...साधारण १५-२० फूट खोल जमीन ...आणि तिथे शेत होत.

मी ,मुली आणि अनिल एका बाजूला उभे राहून पाहत होते... मनिष ची चांगलीच कसरत चालली होती. अनिल मधे मधे सूचना देत होता..."घ्या पुढे....सावकाश घ्यां....ज्यादा कडल ला नका घालू" क्षणभर वाटलं गाडी निघाली नाही तर काय. . आता जायचं कस घरी??? इथे ना फोन ला नीट रेंज ...कसा कोणाला मदतीला बोलवायचं??

तासा भराच्या प्रयत्ना ला यश काहीं आले नाही.....अनिल ने रिसॉर्ट च्या स्टोअर रूम मधून एक मोठी रस्सी आणली....गाडीच्या फ्रंट बुंपर ला बांधली....आणि रस्सीखेच चा खेळ सुरू झाला....मानिष गाडी चा फर्स्ट गिअर टाकून रेज करत होता....आणि पुढून अनिल त्याच्या परीने जीव एकवटुन पूर्ण तकात लावून रस्सीे चा दोर खेचत होता....त्याची ही धडपड पाहून मी मनातल्या मनात त्याची माफी अन आभार दोन्ही मानत होतें! काल त्या अनोळखी मुला विषयी वाटणारा अविश्वास आणि आज मदतीला धाऊन येणारा मित्र.

" ताई , तुम्हाला येते का चालवता गाडी?" अनिल ने मला विचारले.....

म्हटल " हो"

" मंग घाय तुम्ही गाडी हातात.... मी आणि दादा रश्शी खेचतो. ....बघा निघेल का नाय गाडी "

मी गाडीत बसले ... स्टार्ट केली आणि फर्स्ट गिअर वर गाडी पुढे घ्याय चा प्र यत्न केला.... मी रेज केली की बाहेर दोघे त्याच वेळेस पूर्ण ताकत लावून रस्सीे खेचत होतें! रोमँटिक वीकेंड चा आमच्या प्लॅन ने धाडसी अडवेनचर ट्रीप चे रुप धारण केले होते!

आता मात्र आमच्या सगळ्यांची ताकत संपत चालली होती. ..१-२ इंचं पण गाडी हलत नवती. चिखला मुळे, २००० किलो वजनाची ही मोठी गाडी जमिनीला जणू आलिंगन देऊन उभी होती.....

"आपण कॅल लागतोय का बघुया का? " क्रेन बोलवून घेऊया आणि गाडी उचलून काढतील ते क्रेन वाले" मी सुचवलं

मनिष :"एकदा मी बघतो प्रयत्न करून....तू बघ दोर खेचं"

मी: ओके!

आम्ही सगळ्यानी  ( मी मनिष आणि अनिल ) देवाचे स्मरण करून पूर्ण ताकत आणि इच्छा शक्ती लाऊन प्रयत्न केल ...आणि अखेर गाडी चे रुतलेले चाक निघाले....आणि गाडी जगची हल्ली!!!

गणपती बाप्पा ....मोरया ! "आम्ही तिघांनी एका सुरात आवाज दिला!!

दोर खेचून खेचून अनिल चे हाथ पूर्ण पणे सोलवटून गेले होते! स्वतःची पर्वा न करता त्याने  रस्सी हातातून निसटू दिली नाही ...जीव तोडून तो दोर खेचत राहिला ....

एका बाजूला खेळत असलेल्या गुंजन वा मनाली दुरून सगळं पहात होत्या. दोघी धावत माझ्या जवळ आल्या.खुश होऊन गुंजन म्हणाली...." आई काय मज्जा आली ग पिकनिक ला"

मला काय बोलावे कळेना ....! पण मुलींनी मात्र त्यांची रिसॉर्ट पिकनिक एन्जॉय केली असं कळलं!

गाडी बाजूला घेऊन चारी चाकं स्वच्छ पाण्याने धुतली....

गाडीत बाग्ज टाकल्या...आणि गाडी निघाली घराच्या दिशेने....!

जो रस्ता काल रात्री अंधारा मुळे मला अनोळखी ..भीती दायक वाटत होतं ...तोच आता निसर्ग सौंदर्ययाने नटलेला परिसर मी डोळ्यात साठवून आठवणीत घेऊन जात होते.

रिसॉर्ट वाल्यांच्या हॉटेल वर आम्ही पोहोचलो.....अनिल चे मनपूर्वक आभार मानले....(मानावे तेवढे कमीच होते)...त्याला बक्षीस देऊन त्याच कौतुक केलं आणि आम्ही  त्याचा निरोप घेतला...!

मी :" हॅलो ...हां आई....अग आम्हीं जेवायला तुझ्या  घरी येतोय ....पोचू १-१.३० तासात"

आई :" तुम्ही आत्ताचं निघालात रिसॉर्ट वरून?? संध्याकाळी येणार होता ना? "

मी: "हो निघालो...घरी आले की सांगते तुला" बाय!

निळसर आकाश, प्रखर सूर्यप्रकाशाने रात्रीच्या भीतीचे सावट दूर केले. माझ्या रोमँटिक (?) विकेंडचे क्षण आठवत, भरधाव वेगानं मागे पळणाऱ्या झाडांकडे पहात माझा घराच्या दिशेने प्रवास सुरू झाला ...

© तेजल मनिष ताम्हणे

#mytravelexperience