आईच माझी वैरी

Sometimes neglect others to live happily

आईच माझी वैरी

मितालीने खूप ट्रिटमेंट घेतल्यानंतर आठ वर्षांनी तिची कूस भरली होती,ती आणि रोहित दोघे खूप खुश होते,रोहित मितालीची खूप काळजी घेत असतो . मितालीच्या सासूबाई तिच्याकडेच राहायला होत्या ,त्यांना चालायला त्रास व्हायचा ,मग भिंतीला धरून चालायच्या. मितालीला बेड रेस्ट सांगितल्यामुळे ती घरीच असते , सातव्या महिन्यात हौसेने डोहाळे जेवण घालतात ,आता नववा महिना सुरु झाला होता.

डॉक्टर कडून चेक अप करून आले होते ,बाळाची वाढ व्यवस्थित आहे आणि आता काय करायचे तुम्ही सांगा,त्या दोघांना कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती ,म्हणून त्यांनी सिझरचा डिसीजन घेतला , सकाळी जाताना मिताली एकदम व्यवस्थित होती,संध्याकाळी रोहित घरी पोहोचला ,तर तिला खूप सूज आली होती ,बिपी वाढला होता ,त्याने तसचं जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेलं,तर डॉक्टरांनी सांगितले,तुमच्या गायनॉकॉलॉजिस्ट बरोबर बोलून घ्या .

डॉक्टरांशी बोलल्यावर ते बोलले ,लगेच घेऊन या.

रोहित-एवढा बिपी हाय कसा झाला ,तू कसला विचार करत आहेस का 

मिताली-काही नाही रे,डॉक्टर काय म्हणाले

रोहित-आताच ऐडमिट व्हायला सांगितले ,उद्या सकाळी लवकर सीझर करतील.

मिताली-अरे हा गाऊन अडकला आहे ,मदत कर ना

रोहित कात्री आणतो ,आणि गाऊन कापतो ,जो सैल गाऊन असेल तो घाल 

मिताली -हो रे बाबा 

रोहित - वृषालीला बरोबर घेऊन जाऊ ,ती थांबेल तुझ्या जवळ ,फोन करून सांग तिला,रेडी राहायला 

मिताली वृषालीला(मावशीची मुलगी) फोन करून सांगते,डिलीव्हरी साठी कधीही जायला लागू शकते ,म्हणून बैग रेडी करून ठेवली होती,ती रोहितनी घेतली,वृषालीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले ,रूम मध्ये सोडल्यावर ,म्हणाला ,मी उद्या सकाळी लवकर येतो ,आई पण एकटीच घरी आहे,

पोहोचल्यावर फोन करतो आणि गुड नाईट बोलून जातो.

दुस-या दिवशी सकाळी सिजर होते,कन्या रत्नाची प्राप्ती होते ,वृषाली जिजुंकडे पाहत असते ,तो खूप आनंदी असतो ,हे पाहून वृषालीला बरे वाटते,कारण रात्री तिला मिताली कडून तिच्या काळजीचे कारण समजले होते.

सगळ्यांना पेढे आणून तो देतो ,मिताली आणि बाळाला रूम मध्ये शिफ्ट करतात ,तो मितालीला हसत कॉंग्रेजुलेशन करतो ,तेव्हा तिच्या जीवात जीव येतो.

सगळे भेटून जातात ,डॉक्टर येऊन सांगतात ,त्यांना आराम करु द्या ,आता वृषाली आणि तिच रूममध्ये असते,रोहित जरा बाहेर जाऊन येतो असं सांगतो.

वृषाली-तू उगाच एवढी टेन्शन घेत होती ,जिजू किती खुश आहेत बघ 

मिताली-अगं त्या मला बोललेल्या की ,मुलगा झाला तर ठिक ,नाहीतर बघ तुझं काय होत ते ,बरं विचार नाही करायचा म्हटलं तरी त्या सारख्या माझ्या नजरेसमोर ,मग कसा विचार येणार नाही ,बरं ते जाऊ दे,तू आशाला फोन करून विचार त्यांना जेवायला दिलं का ?

वृषाली फोनवर बोलून येते आणि सांगते ,हो दिलं ,तर तुझ्या सासूबाई तिला म्हणाल्या, असं कसं मुलगी झाली ,तिने जेवण दिलं आणि काही न बोलता निघून आली.

तितक्यात मितालीची छोटी नणंद बेला आली,तिने यांच बोलणं ऐकलं होतं,ती म्हणाली ,अगं ती स्वत:च्या लेकीला बोलू शकते , तू तर तिची सून आहेस ,मग ती तुला काय सोडणार ,तू तिचं काही मनावर घेऊ नकोस,आम्ही सगळे आनंदी आहोत.

मिताली-म्हणजे मला नाही समजलं ताई,तुम्ही काय म्हणताय

बेला - अगं मला पहिली सानु झाली ,परत दुस-यांदा गरोदर राहिले ,तर आई भेटायला आली की म्हणायची,मुलगाच होईल बघ.दुसरी डिलीव्हरी असल्यामुळे सासूबाई डिलीव्हरी करायला आल्या होत्या ,पोटात दुखायला लागलं,तसं मला हॉस्पिटल मध्ये भरती केले,दुसरी मुलगी झाली ,माझे मिस्टर आणि त्यांची आई तरी सगळं माझं प्रेमाने करत होते. आईला गावी डिलीव्हरीचा निरोप कळाल्यानंतर मला भेटायला हॉस्पिटल मध्येच आली,आल्या आल्या तिने जोर जोरात रडायला सुरुवात केली आणि म्हणत होती,बेला अशी कशी मुलगीच झाली ग्ं तुला ,तिला असं वागताना पाहून ,माझ्या सासुबाईंना कळतच नव्हतं की  अचानक असं काय झालं , सगळी लोक  आमच्याकडे पाहत होती .

सासूबाई-अहो देव देईल,ते पदरात घ्यायचं,रडता कशाला ,उलट तुम्ही तिला आधार दिला पाहिजे आणि आम्हाला काही दू:ख झाले नाही,मग तुम्ही का रड़ताय.

बेला-आई तुला असा तमाशा करायचा असेल ना इथे ,तर तू जाऊ शकतेस.

आई-अगं मी वैरी आहे का तुझी ,मुलगा नको का एक ,वंशाचा दिवा म्हणून 

सासूबाई-मुलगा काय आणि मुलगी काय ,दोन्ही घर सोडून जातात,आता तुमचच बघा ना तीन मुलं आणि तीन मुली,मुलींची लग्न करून दिली आणि मुलं कामानिमित्त शहरात राहतात ,तीन मुलं असूनही ,तुम्ही गावाला एकट्याच राहता ना शेवटी 

आई-ते सगळं बरोबर आहे ,पण एक तरी मुलगा हवा ,माझे हातपाय धडधाकट आहेत म्हणून मी राहते गावाला ,जेव्हा ताकत राहणार नाही ,तेव्हा पोरं करतीलच की सगळं.

बेला-अगं त्या माझ्या सासूबाई असून मला धीर देत आहेत आणि तू जे चालवलं आहेस ,त्यावरून मला असं वाटत्ं ,आई असूनही तू माझी वैरी आहेस ,असं वाटतंय या क्षणाला,तू एक आई असून,तू दुस-या बाईला असं कसं बोलू शकते .

आता समजलं तुला मी असं का बोलली ते ,ती तिच्या स्वत:च्या मुलीच मन दुखवू शकते तर तू तर तिची सून आहेस ,तिच्याकडे दुर्लक्ष कर ,तरचंं, तू आई झाल्याचा आनंद मिळवू शकशील ,मला वाटल्ं इतक्या दिवसात बदलली असेल ,पण ते म्हणतात ना,जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ,तसं आहे ,यावर एकच उपाय दुर्लक्ष करणे. 

तितक्यात रोहित येतो ,काय चाललीत एवढी नणंद भावजयीची खलबत्ं 

बेला-काही नाही रे,सुखी राहण्याचा मंत्र दिला तिला

रोहित-खरचं गरज आहे तिला ,काल तर खूप बिपी हाय झाला होता 

बेला-आता नाही होणार ,हो ना मिताली

मिताली-तुम्ही सगळे माझ्या पाठीशी एवढे भक्कमपणे उभे आहात ,तर कसा हाय होईल,बघुच त्याला

बेला-अशी हसताना छान दिसतस,अशीच हसत रहा

तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नावा सहित शेअर करू शकता,हसत रहा,वाचत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात