मन माझे वेडे झाले....

First feeling of love

मन माझे वेडे झाले
तुम्हाला पाहता पाहता 
मी प्रेम तुमच्यावर केले
तुम्हाला न सांगता

मोकळ्या केसांना माझ्या
जेव्हा तुम्ही सावरता
व्याकूळ होतो जीव माझा
मनाला आवरता आवरता

स्पर्श तुमचा मला हवा 
म्हणून करते साज नवा
 मन बावरुन जाते
जेव्हा तुम्हाला मिठीत घेते

अंगावरती उठतो शहारा 
पाहूनी तुमच्या नयनांचा ईशारा
मनात उठतात हवीशी स्पंदने
जेव्हा घेता तुम्ही चुंबन

मन माझे वेडे झाले
तुुम्हाला पाहता पाहता मी
प्रेम तुमच्यावर केले
तुम्हाला न सांगता