फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 5

Romantic date in natural beauty of Farm

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 5

असं म्हणतात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा माणसाची खरी ओळख पटते,अमेयने तो टप्पा ही पार केला.

आता वातावरण थोडे वेगळेच असल्याने लग्न साध्या पध्दतीने आणि त्याच तारखेला होणार होते, कारण सगळं बुक करून झालं होतं. सगळं असं झाल्यामुळे ज्यानी त्यानी आपली खरेदी करायची असं ठरलं आणि ते योग्यच होतं. अमेय आणि चंचल वीडियो कॉल्स वरून एकमेकांशी बोलत होते,चंचलची काय कंडीशन असेल ,हे तो समजू शकत होता पण वेळ कुणासाठी थांबत नाही हेही समजून सांगत होता ,आपल्या बोलण्यातून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता आणि तीही आता सावरली होती. लग्न गावी होते ,काही निवडक लोकांना पत्रिका  वाटायला अमेय आणि त्याचे आईवडील स्वतः जाणार होते. अमेयच्या आईबाबांबरोबरही चंचलचे कधी कधी बोलणे होत असे. त्याने आईबाबांना सांगितले होते,तिला काही सांगू नका,तिला सरप्राईज द्यायचे आहे,तेही मुलाच्या आनंदात आनंदी होते. गावी जायचा दिवस आला ,अमेयनी तिला फोनवर सांगितलं,मी उद्या डायरेक्ट संध्याकाळी फोन करेल,ऑफिसच्या कामासाठी जाणार आहे ,वेळ नाही मिळणार,तिला बिचारीला खरे वाटले. त्याने तिच्या भावाला फोन करून काहीतरी सांगितलं ,तोही तिकडून ओके बोलला.

काय सरप्राईज देणार होता तिला.

------------------------------------------

त्याने जाता जाता वाटेत त्याच्या आईबाबांना त्यांच्या गावी सोडले ,त्यांना सांगितले मी संध्याकाळी येतो . तिथून निघताना त्याने तिच्या भावाला मंगेशला फोन करून विचारले ,झाली का तयारी .

मंगेश- हो जिजू 

अमेय-मी तिथे पोहोचल्यावर फोन करतो

मंगेश- चालेल,मी ताईला काहीच सांगितल नाही

मंगेश घरी पोहोचतो.

चंचल-अरे कुठे होतास ,किती वेळ वाट पाहायची तुझी,चल आपण थोडं सामान घेऊन येऊ

मंगेश-अर्जंट आहे का काही,नंतर गेलो तर नाही चालणार का

त्याच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडतो 

मंगेश-आवर जरा छान ड्रेस घाल ,व्यवस्थित आवर ,जाऊन येऊ

चंचल-मी तर व्यवस्थितच राहाते,बघ ग आई काय म्हणतोय 

आई- मी तुमच्या दोघांच्यात पडणार नाही,असे भांडता आणि लगेच एकत्र ही होता

अमेय काही वस्तू घेतो आणि शेतात जातो,त्याने सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली होती,तो ते पाहून खूष होतो.

इकडे मंगेश आईला अमेय आल्याची कल्पना देतो आणि सरप्राईज बद्दल पण सांगतो,ताईला तिकडे घेऊन चाललोय ह्याची ही कल्पना देतो ,असं सांगायला जिजुंनी सांगितलं हेही सांगतो.

आई-पाहुण्याला लईच हौस आहे,आमच्या वेळेला तर असं काही नव्हतं 

मंगेश-बदलत्या काळाबरोबर आपणही बदललं पाहिजे आणि म्हणतच असशील तर तुला सगळी तयारी करून देतो ,तुम्ही पण एन्जॉय करा

आई लाजतच-तुझं आपलं काहीही ,आता काय वय राहिलं का आमचं ते करायचं

मंगेश-बरं ते नंतर बघू ,आधी त्यांच मार्गी लावून येतो

चंचल मंगेशच्या गाडीवर बसते ,तो गाडी शेताकडे घेतो .

चंचल-आपण गावात जाणार होतो

मंगेश- अगं दोडक्याला पाणी लावलय, तेवढं बारं देतो मग जाऊ , चालेल ना 

चंचल-हो चालेल

----------------------------------------------

मंगेश झाडाखाली गाडी उभी करतो ,तिला सांगतो मी ह्या ओळीतून चाललोय ,आलोच पाच मिनीटात.

तो दोडक्याचा बाग असतो त्यामूळे वेली सगळीकडे पसरलेल्या असतात ,इकडून तिकडे जास्त काही दिसत नसतं.

मंगेश जाऊन दहा मिनिटं झाली तरी आला नव्हता ,त्याने तिला रस्ता मात्र दाखवला होता ,तो जाऊन अमेयला सांगतो ,ती माझी वाट पाहून मला बघायला इकडेच येईल,बेस्ट लक ,मी जातो ,उगीच कशाला कबाब में हड्डी असं म्हणून डोळा मारत निघून जातो.

चंचल वाट पाहून त्या ओळीतून जायला लागते ,थोडं पुढे गेल्यावर तिला फुलांचा गालिचा दिसतो ,ती त्यावरून चालायला लागल्यावर गाणं लागतं,

बहारों फुल बरसाओं ,मेरा मेहबूब आया है

तिला काही समजत नाही ,की काय चाललंय 

ती थोडीशी पुढे जाते ,तर तिला अमेय गुलाबाची फूलं हातात घेऊन उभा असलेला दिसतो,ती त्याला खूप दिवसांनी पाहत असते  , त्यामुळे ती पटकन पुढे जाते .तो तिच्या हातात गुलाबाची फुले देतो आणि दुस-या हातावर किस करत फिल्मी स्टाईलमधे खाली वाकून म्हणतो- At your service madam.

ती हलकेच हसते , तो तिचा हात त्याच्या हातात घेण्यासाठी पुढे करतो ,ती पण तिचा हात देते ,पुढे जाऊन तो खुर्ची मागे घेऊन तिला बसायला लावतो,ती सगळं पाहून आश्चर्यचकीत होते. 

चंचल-अच्छा,असा प्लान होता तर,पण हे सगळं कधी केलं,मी तर विचारच करु शकत नाही की अशीही डेट होऊ शकते

अमेय-मग कसं वाटल्ं सरप्राईज

चंचल सगळीकडे बघत -वनराईत छान हॉटेल बनवलं आहे,खूप चालेल.

अमेय- अगदी बरोबर आहे, सगळेच आपल्या बायकांना घेऊन महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जातात ,मी म्हटलं आपण वेगळं काहीतरी करु ,जे आपल्या बजेट मध्ये आणि वेगळे काही तरी केलं म्हणून पोरगी खिशामध्ये ,अरे वा यमक जुळले 

चंचल - वा वा ,क्या बात है 

चंचल सगळी अरेंजमेंट डोळ्यात साठवून घेत होती,तिने असं कधी पाहीलं नव्हतं, राऊंड आकाराच्या टेबल वर छानसा कपडा टाकला होता ,त्यावर दोन ग्लास ,दोन प्लेट,एक छोटीशी फुलदाणी त्यात दोन तीन गुलाबाची फुलं,त्या टेबल खाली मोठं रेड कार्पेट,टेबलच्या चार बाजुला चार खांबांना ओढणीचे डेकोरेशन ,आजू बाजूनी दोडक्याची वेल,वेलींच छत,एक वेगळीच संकल्पना त्यामूळे त्याची रौनक अजूनच वाढली होती.

चंचल-एकट्याने केलं सगळं 

अमेय-मंगेशच्या मदतीने ,कसं करायचं ते मी सांगितलं ,कसं छान वाटतय ना निसर्गाच्या सानिध्यात

चंचल- हो ना ,मी तर कधीच असं काही होईल असा विचार केला नव्हता

अमेय - बरं ते जाऊ दे ,आपण आता डेटवर आलेले आहोत,काय खाणार,कोणतं कोलड्रिंक पिणार

चंचल- जे असेल ते ,इथे काय चॉइस देताय 

अमेय-आहे ना ,तुम्ही बोला तर ,बंदा आपकी खिदमत में हाजीर है

चंचल-फँटा 

अमेय जाऊन फँटा घेऊन येतो आणि दोन ग्लास मध्ये भरतो.

अमेय एका डिशमध्ये ढोकळा आणि दुस-या डिशमध्ये आणलेले गरम गरम समोसे ठेवतो.

चंचल एकटक अमेय कडे पाहत असते ,तो तिच्या कडे पाहतो,तशी तिची चोरी पकडली जाते आणि ती लाजते .

तो गाणं म्हणायला सुरवात करतो,

मेरे रश्के कमर तुने पहली नजर,

नजर से मिलाई तो मजा आ गया

-------------------------------------------

ती तिथून उठायचा प्रयत्न करते ,तर तो तिचा हात धरून खाली बसवतो आणि मोबाईल मध्ये गाणं लावतो

तुझमें रब दिखता है,यारा मैं क्या करूँ 

मग तो तिला उठ्वतो आणि एक हात हातात आणि दुसरा कमरेवर ठेवून नाचायला लागतात, दोघंही एकमेकांच्या डोळ्यांत स्वत:ला हरवून जातात ,गाणं संपतं तरी त्यांच्या किती तरी वेळ लक्षातच येत नाही.

अमेय- अरे हे थंड होईल,बस ना 

चंचल आणि तो लग्नाच्या तयारीच्या गप्पा मारत ढोकळा आणि समोसा संपवतात.

अमेय- अजून एक सर प्राईज आहे 

चंचल-तुझे सर प्राईज कधी संपणार आहे 

अमेय-तुला कंटाळा आला का ,म्हणजे मी एकटाच एक्साइटेड आहे ,तू नाही का,तसं असेल तर जाऊ दे

चंचल त्याच्या जवळ जात -तसं काही नाही रे ,मला खूप छान आणि स्पेशल वाटतयं असं म्हणून ती त्याच्या गालावर किस करून पटकन बाजूला होते जसं काही झालच्ं नाही

अमेयला पण पट्कन काय झालं ते कळत नाही ,कळाल्यानंतर तो तिच्या जवळ जाणार तर ती टेबल भोवती पळत राहते ,त्याला चिडवत असते ,पकड म्हणून ,तोही इरेला पेटून तिला पकडतो ,दोघही थकलेले असतात तर खालीच कार्पेट वर एकमेकांच्या डोक्याला डोक लावून बसतात.

अमेय-पकडलं की नाही 

चंचल- हम्म ,काय सर प्राईज

अमेय-आता मी नाही जा

चंचल-बरं ठीक आहे ,राहू दे

अमेय-तू ना इतर बायकां सारखी हट्ट नाही करत

चंचल-अजून बायको नाही झाले ना , झाल्यावर करेन हट्ट

अमेय- हो का

चचल- हो ना

अमेय खिशातून एक छोटसं गिफ्ट काढतो ,तिच्या हातात ठेवून तिला विचारतो- ह्या दोडक्याच्या बागेने , शेत जसं हिरवं गार केलं आहे,तसचं तुझ्या प्रेमाने आपल्या संसाराची बाग फुलवशील ना आणि माझी आयुष्यभर साथ देशील ना

चंचल- हो , तू पण माझ्या मनाचा विचार करशील ना आणि समजून घेशील ना

अमेय- हो ,गिफ्ट आवडलं का बघ ना 

चंचल गिफ्ट उघडते आणि म्हणते,खूप सुंदर कानातले आहे

अमेय- सध्या तरी मी असेच गिफ्ट देऊ शकतो ,पण तुझी साथ मिळाली तर आपण सगळी स्वप्ने साकार करू 

चंचल- तुम्ही मला नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त दिलय, गिफ्ट किती रुपयांचं आहे त्यापेक्षा ते किती प्रेमाने दिलय्ं हे जास्त महत्त्वाच,प्रेमाला मोल नसतं 

अमेय- मी खरच खूप भाग्यवान आहे की तू मला इतकं समजून घेते

चंचल- परंतु या गोष्टीचा  गैर फ़ायदा घेतलेला मला आवडणार नाही

अमेय- जशी आपली आज्ञा मैडम

तशी ती लाजते .

चंचल-उशीर झालाय,जाऊया का घरी आपण 

अमेय-तसं घरी मंगेशनी सांगितल असेल त्यामुळे काळजी करू नकोस,पण निघूयात मलाही घरी जायचयं ,पण एक विचारायचं राहिलं,कसं वाटल सरप्राईज

चंचल- अतिसुंदर ,  कल्पना खरचं खूप छान होती ,थोडक्यात हटके होती

अमेय- लाइक मी असं म्हणत डोळे मिचकावतो 

तसं तिला खूप हसायला येतं आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रु येतात ,ज्यांना अमेय बोटावर घेतो ,दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघांच्या मनात गाण चालू असतं,

आँखो ही आँखो में इशारा हो गया ,

बैठे बैठे जीने का सहारा मिल गया 


क्रमश:

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all