Sep 28, 2020
स्पर्धा

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 3

Read Later
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 3

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 3

 

चंचल आणि अमेयचे लग्न ठरले ,दोघांनाही एकमेकांकडून अपेक्षा होत्या . चंचल पुण्याला गेल्यावर तिच्या मैत्रिणींना तिने साखरपुडा झाल्याचे सांगितले,तिने त्यांना फोटो दाखवले तर सगळ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि म्हणाल्या,आपल्या सगळ्यांमधे हिने पहिली बाजी मारली,चंचल पार्टी पाहिजे . चंचल-हो देते ,कधी जावूया शनिवारी की रविवारी 

सगळ्या-तू म्हणशील तेव्हा ,आता दिलीस तरी येऊ

चंचल- शनिवारी जाऊ

सगळ्या- चालेल,पण वेळेवर बदलू नको म्हणजे झालं

चंचल- मी कशाला बदलेल

रेखा-काय सांगाव तुझे ते तुला भेटायला आले तर

चंचल-येणार असेल तर फोन करून सांगतील की

रेखा -लग्न जमलं तर लगेच अहो जाहो ,मला तर नावानी बोलायला आवडेल.

चंचल- अरेंज मॅरेज असलं की असं असतं,तू लव्ह मॅरेज कर म्हणजे नावाने हाक मारशील

रेखा- तुझ्या म्हणण्याचा मी नक्की विचार करेल,असेही एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण पूर्ण आयुष्य कसं अर्पण करु शकतो,जसं तू केलं 

चंचल- मी त्याला पाहिल्यावर नाही म्हणू शकले नाही ,माहित नाही का,काही तरी जन्माच्या गाठी असतील असं काही ,विश्वास नव्हता आधी पण आता असं वाटतं असू शकते 

रेखा-ओय ,होय ,क्या बात है ,लग्न जमलं तर ही कंडीशन,पुढे जाऊन काय होणार

चंचल-चल ,तुझं आपलं काहितरीच असं म्हणून लाजते

 

----------------------------------------

 

रोज दोघेही फोनवर बोलत असतात ,दिवसभरात दोघांनी काय काय केलं ते सांगत असतात,रोज दिवसातून दोनदा तरी बोलणे व्हायचे. तो तिला असचं विचारतो ,शनिवारी सुट्टी असते का?

चंचल- नाही ,हाफ डे असतो, असं का विचारतोस 

अमेय-नाही सहजच विचारलं,सुट्टी आहे तर गावाला जाणार आहेस का?

चंचल- नाही ,मैत्रिणींना पार्टी द्यायची आहे 

अमेय- कशाबद्दल ,आम्हाला नाही का 

चंचल- लग्न  जमल्याबद्दल , ये ना मग 

अमेय-नाही गं,असचं बोललो,तू एन्जॉय कर मैत्रिणींसोबत,मला तुझा ऑफिसचा पत्ता पाठवशील,एक कुरियर पाठवायचं आहे 

चंचल-असं काय पाठवायचं आहे 

अमेय-मेरा दिल

चंचल- काही पण 

अमेय-काही पण नाही ,सरप्राईज आहे ,नाही सांगणार

चंचल- ओके ,पाठवते

पत्ता त्याच्या फोनवर येतो तसा तो खुश होतो.

काय चाललेलं असतं त्याच्या मनात

 

--------------------------------------

 

ती शनिवारी सकाळी ऑफिसमध्ये पोहोचते.

तिच्या नावाने कुरियर येतं,तिला रिसेप्शनला बोलावतात.

नेहा- तुझं कुरियर आलय्ं 

चंचल- हम्म ,सांगितल मला म्हणून तर कलेक्ट करायला आली

नेहा-पहिल्यांदाच असं ऑफिसमध्ये आलय

चंचल-मग काय 

नेहा- चहाची पार्टी पाहिजे सगळ्यांना ऑफिसमध्ये तरचं मिळेल 

चंचल- पार्टी कशाबद्दल 

नेहा- रिलेशन मध्ये असल्याबद्दल,कारण त्यावर लिहिलय, फ्रॉम युवर लव्ह

चंचल- अगं रिलेशन म्हणजे घरच्यांनी लग्न ठरवलय

नेहा- ओह , मग तर नाष्टा पण पाहिजे

चंचल- कुरियर देते ना

नेहा- हो देते ना,खूपच घाई झालीय 

ती कुरियर घेते आणि तिच्या टेबलवर जाऊन बसते ,कुणाच लक्ष नाही पाहून फ्रॉम युवर लव्ह वरून अलगद हात फिरवत ठेवून देते.

थोड्या वेळाने पर्स घेऊन बाथरुम मध्ये जाते ,खोलते तर त्यात छान अनारकली ड्रेस असतो आणि एक चिठ्ठी पण असते,त्यावर लिहिलेलं असतं,ऑफिस मधून निघताना हा ड्रेस घालून पार्टीला जा,छान दिसेल,आवडला का?

ती लगेच फोन लावते

अमेय-मग आवडला का ड्रेस

चंचल- हो ,छान आहे 

अमेय -ऑफिसमधून निघताना घाल ,मला पाहायचय तुला त्या ड्रेस मध्ये

चंचल- तू कसं पाहणार

अमेय-फोनवर 

अमेय चुकून बोलला होता ,तो जीभ चावून म्हणतो,फोटो पाठव ना

चंचल ऑफिस मधून निघताना  ड्रेस घालते आणि निघते ,नेहा तिला हटकते ,कुरियर का ,चंचल लाजून हसते.

ती ऑफिसमधून बाहेर पडताना अमेय पाहतो आणि तिच्याकडे पाहतच्ं राहतो , इकडे चंचलच्या मनात आले ,अमेय जर प्रत्यक्षात या ड्रेस मध्ये मला बघू शकला असता तर छान वाटले असते.

पाहते तर काय ,समोर अमेय उभा होता ,तिला वाटते ,तिला भास होतो आहे कारण आता ती त्याचा विचार करत होती,ती तशीच पुढे जाणार ,तर अमेय हाक मारतो,मग ती थांबते आणि स्वत:ला चिमटा काढते.

अमेय- तुला सरप्राईज द्यायच होतं,म्हणून नाही सांगितलं 

चंचल मनातल्या मनात विचार करते ,याला माझ्या मनातले सगळे कसं कळत 

अमेय-काही बोललीस का तू

चंचल-अं,काही नाही

अमेय- चल जावुया का,तुझ्या मैत्रिणी वाट पहात असतील

चंचल-म्हणजे तू पण येणार आहे का ,नाही तर मी त्यांना सांगते नंतर जाऊ

अमेय-पार्टी कशाची

चंचल- लग्न जमल्याची

अमेय- कुणाचं लग्न

चंचल लाजतच- आपल्या दोघांच 

अमेय- मग पार्टी दोघं मिळून देऊ ,मलाही आवडेल तुझ्या मैत्रिणींना भेटायला

चंचल-काय बोललास 

अमेय- काही नाही,बस

चंचल-गाडी कुठून आणली ,गाडीवर आलात की काय

अमेय- नाही ग,मित्राची आहे ,बस पटकन 

चंचलला प्रश्न पडतो की कशी बसू

अमेय-काय विचार करतेस ,तुला जसं कम्फर्टेबल  वाटतं तसं बस

ती दोन्ही कडे पाय टाकून बसते, ते निघतात ,स्पीड ब्रेकर येतो तसं ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते ,तो मागं वळून पाहतो आणि गालातल्या गालात हसतो.दोघांच्याही मनात गाणं चालू असतं,आँखो ही आँखो में इशारा हो गया..

 

--------------------------------------

 

तिच्या सगळ्या मैत्रिणी तिची वाट पाहत असतात ,ती गाडी वरून खाली उतरते .

 रेखा -  कोण आहे ,तू तर कुणाच्या गाडीवर सहजासहजी बसायला तयार होत नाही ,कौन है वो खुशनसीब . 

कारण अमेयने हेलमेट घातलेल्ं असतं तर कोण आहे ते समजत नाही. अमेय डोक्यावरच हेलमेट काढतो,तर त्या बघतच राहतात.

अमेय-वो खुशनसीब मैं हूं 

तो असं बोलल्यावर ती त्याच्या कडे पाहतच राहते.

रेखा-अय्या ,जिजू तुम्ही ,सरप्राईज हं ,होणा-या बायकोला इंप्रेस करताय का ?

अमेय- मग तुम्हांला करु का?

रेखा लाजतच -काहीही काय

अमेय - अहो मग तिलाच इंप्रेस करणार ना ,आता अर्धांगिनी आहे ती माझी

चंचल- अजून लग्न व्हायचयं

अमेय-मी कुठं म्हटलं झालय्ं ,पण माझ्या मनानी तर मानलयं,तुझं काय ते तुझं तू बघ बाबा 

चंचल यावर काहिच बोलली नाही 

अमेय-चला आता सगळ्या आमच्या लग्नाची पार्टी देतो सगळ्यांना

तसे सगळे आत जाऊन टेबलवर बसतात ,चंचलच्या शेजारी तो बसतो.

अमेय-काय खाणार सांगा पाहू 

सगळ्या- तुम्ही जे मागवाल ते

रेखा- चंचल,सकाळी तू वेगळा ड्रेस घातला होता ना

चंचल अमेय कडे पाहते.

रेखा-फर्स्ट गिफ्ट बाय फियांसी,स्पेशल,आय लाइक युवर वे ऑफ रोमान्स 

अमेय- येस आय एम,पण आमच्या मैडमला आवडलं का

आणि तो चंचल कडे पाहतो ,ती फक्त लाजते

अमेय-आपकी यही अदा पे तो हम घायल है

अमेय ऑर्डर देतो , चंचल सगळ्यांशी ओळख करून देते .

सगळ्या जणी मिळून त्यांची खेचत होत्या, अमेय मात्र एन्जॉय करत सगळ्यांच्या तोडीस तोड उत्तरे देत होता. तितक्यात जेवण आले ,सगळ्यांनी हसत ,गप्पा मारत जेवण केले.

वेटर बील घेऊन आला ,अमेयने त्याच्या हातातून बील घेतले.

चंचल-मी देते ,असही मी त्यांना पार्टी देणार हे आधीच ठरलं होतं 

अमेय- आता आपण दोघे एकच आहोत,तू दिले काय किंवा मी दिले काय ,देतो मी राहू दे

रेखा-देऊ दे त्यांना ,नंतर आम्हाला थोडी भेटणार त्यांच्याकडून पार्टी

अमेय-असं काही नाही,लग्न झाल्यावर मुंबईला या परत देईल 

सगळ्या- तुम्ही एवढे आग्रहाने बोलवत आहात तर नक्की येऊ

बील देऊन सगळे बाहेर येतात.

अमेय- आता मी माझ्या होणा-या बायकोला घेऊन जाऊ शकतो का ,संध्याकाळी परत तुमच्या सुपूर्त करतो 

सगळ्या-हो ,आम्ही काय बोलणार ,होणा-या बायकोला विचारा

अमेय- जायचं ना चंचल

चंचल-भेटू संध्याकाळी,चला येते

सगळ्या-बघा किती घाई झालीय तुमच्या मैडमला

अमेय हसतो-चला बसा

चंचल सगळ्यांना बाय करत गाडीवर बसते .

----------------------------------------

 

मग ते सारसबागेत जातात ,गणपतीचे दर्शन घेऊन,तिथल्या तळ्याच्या शेजारी बसतात .

चंचल-मला वाटल्ं तुम्हांला सगळ्यां सोबत जेवायला नाही आवडणार

अमेय- अगं त्यात न आवडण्यासारखं काय आहे ,माझाही मित्र परिवार आहे आणि मी असाच आहे ,मी तुलाही लग्न झाल्यावर बदल असं नाही सांगणार 

चंचल- मी करू शकेल ना सगळं व्यवस्थित लग्नानंतर,मला स्वयंपाक नाही येत अजून व्यवस्थित 

अमेय-नको काळजी करू,आई शिकवेल आणि अजूनही वेळ आहे त्यात जेवढ्ं जमेल तेवढं शिकून घे, असेही आई म्हणते की आईच्या पोटातून कुणी शिकून येत नाही

चंचल- माझी आईही तेच सांगत होती जॉब सोड आणि गावाला येऊन राहा ,स्वयंपाक शिकून घे ,बघू काय होतं ते

अमेय-तुला जे पटेल ते कर,पण आपल्याला असं भेटता येणार नाही

चंचल- म्हणजे आपण भेटण्याकरता जॉब नको सोडू असं म्हणायचं का

अमेय-नाही ,आता लग्नाला थोडे दिवस राहिलेत,तर त्यांनाही वाटत असेल की तू त्यांच्या बरोबर राहावं आणि माझं म्हणशील तर माझी इच्छा होती की, डेटवर जावं आतापर्यंत कुणी नव्हतं,आता तू माझ्या आयुष्यात आलीस तर आज ती इच्छा पूर्ण केली,असेही लग्नाच्या खरेदी साठी भेटूच ना

चंचल त्याच्या कडे पाहातच असते ,त्याच तिच्याकडे लक्ष जात तसं चोरी पकडली गेल्यामुळे ती लाजते.

अमेय - तू माझ्याकडे बिनधास्त बघू शकते 

अमेय तिचा हात हातात घेऊन तिला विचारतो- तू अशीच मला आयुष्यभर साथ देशील ना

चंचल मानेनेच हो बोलते

अमेय- मला तू बोललेल जास्त आवडेल 

चंचल-मी देईन पण तू माझा अर्ध्यावर हात नाही सोडणार ना

अमेय- कधीच नाही 

हातात हात घालून ते किती तरी वेळ काही न बोलता तसेच बसून राहतात.

चंचल-पाच वाजले ,तुम्हांला परत जायचयं ना 

अमेय-तुम्ही नाही तू , चल मी तुला सोडतो ,मित्राला बस स्टॉपवरच बोलावतो 

असं म्हणून तो तिला सोडतो आणि मित्राला फोन करून स्टॉपवरच बोलावतो .

त्याचा मित्र येतो ,विचारतो-कशी झाली डेट,तुझ्याकडे बघून तरी असं वाटतं की छान झाली.

अमेय-हम्म

बस येते ,अमेय बसमध्ये बसत मित्राला बाय करतो.

 

क्रमशः  

 

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat