फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 27
आई- चंचल ,अगं मी तुला बोलले होते ना,मला तुझ्याशी बोलायचं आहे
चंचल-हो आई,काय झालं
आई-अगं काल त्या शेजारच्या काकू आल्या होत्या ,त्या म्हणत होत्या ,त्यांच्या बहिणीच्या मुलीने लग्न झाल्यावर लगेच मूल नको म्हणून गोळ्या घेतल्या आणि आता मूल हवयं,तर मूल होतच नाही,आज कालच्या तुम्ही मुली मोठ्यांचा विचारच घेत नाही,निदान डॉक्टरच्या सल्ल्याने तरी घ्यायच्या होत्या ना , आता मारतीये डॉक्टर कडे फे-या, तू नाही ना ग,काही गोळ्या वगैरे घेत.
चंचल-नाही ओ आई आणि आम्ही असं काही प्लानिंग पण नाही आमचं काही
आई- मला ही तेच वाटतं होतं ,पण एकदा खात्री करावी म्हणून विचारलं,तुला राग नाही ना आला
चंचल-नाही ओ आई,तुम्ही हे सगळं आमच्या काळजी पोटे तर विचारलं,त्यात कसला आलाय राग आणि आपल्या ताई पण जी ट्रिटमेंट घेत आहे ,ते ही दिसतं त्यामुळे तुमची काळजी करणं समजू शकते.
आई- छोट्या मामीलाही आठ वर्षांनी मुलगी झाली आणि माझी आई होती ,पण तिने त्या गोष्टी वरून तिला खूप त्रास दिला ,तरीही तिने आई जेव्हा बेड वर होती तेव्हा सगळं केलं , त्याच पुण्याईने झाली मुलगी ,म्हणावं लागेल ,तुला अशा काही दिव्यातून जायला लागायला नको म्हणून दुसरं काय ,तसं मी काही माझ्या आई सारखी नाही वागणार ,कारण मामीला झालेला त्रास मी स्वत: पाहिला आहे.
चंचल- त्यांच्या कडे पाहून असं वाटत नाही,किती खुश राहतात ना त्या,त्या दिवशी पण ताईंची ट्रिटमेंट फेल झाली होती म्हणून नाराज होत्या ,मामी त्यांच्याशी आणि भाऊजींशी अर्धा तास काय बोलल्या माहित नाही ,त्या नंतर दोघेही खूप खूश झाले होते.
आई- हो,ती पुढच्यास असं काही समजावते की, पुढचा एकदम शांत होऊन जातो ,तिच्याकडे ती एक छान कला आहे
चंचल- आई ,ताई आता IVF ची ट्रिटमेंट घेणार आहे ना ,त्यात पहिले तीन महिने बेड रेस्ट घ्यायला सांगतात ,भावजींना आपण त्यांना इकडेच सोडायला सांगू
आई- हो मामीही तेच म्हणत होती की,अशा काळात माणूस टेन्शन फ्री असलं पाहिजे,तिथेही तिची घेतात सगळे काळजी , पण दोन्ही जावा काम करतात आणि आपण बसायचं हे तिला बरं नाही वाटत आणि मग स्वत:च विचार करत बसते की,त्या माझ्या बद्दल काय विचार करत असतील,इकडे आली म्हणजे निदान तिच्या डोक्यात हे विचार तरी येणार नाही.
चंचल-चालेल ना आई,आपण दोघी मिळून करत जाऊ सगळं.
आई- अमेयलाच सांगते ,जावई बापूशी बोलायला
चंचल- माझं मन सांगतय,या वेळेला ट्रिटमेंट नक्की यशस्वी होईल.
----------------------------------------------------------
अमेय भावजींशी बोलून ट्रिटमेंट नंतर इकडे पाठवा ,असे सांगतो ,यावेळी तिचे सासरचे लोकही हो म्हणतात ,ट्रिटमेंट नंतरचा पहिला रिपोर्ट पॉजिटिव येतो ,तरी डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेली असते , चंचल आणि आई दोघी मिळून तिची चांगली काळजी घेत असतात. तिलाही इथे तिकडच्या पेक्षा बरं वाटतं असतं आणि ट्रिटमेंट यशस्वी झाली याचाही आनंद होतो ,पाच महिने ती इकडेच राहते , ह्या वर्षी ती असताना अमेयचा वाढदिवस आणि संक्रांत जी करायची राहून गेली होती चंचलची दोन्ही एकत्र साजरे करतात,आईंनी मामींना दागिने आणायला सांगितले असतात ,ते चंचलसाठीही सरप्राईज होतं ,तिला आईंनी सांगितल होतं,मागच्या वर्षी घेतलेली काळी साडी घाल,मामी आल्यावर तिला हलव्याचे दागिने घालतात ,खूपच छान दिसत होती ,बाजुच्या सात बायकांना बोलावून हळदी कुंकू लावून कुंकवाच्या डब्या वाण म्हणून द्यायला सांगतात ,चंचलला खूप छान वाटते . त्यांची चाळ बैठ्या खोल्यांची असते ,आता महानगरपालिकेने वर बांधायला परमिशन दिलेली असते ,म्हणून चाळीतले सगळे मिळून रुम बांधायला देणार असतात ,अमेयच्या बाबांना वयामुळे लोन मिळत नसते ,मग ते अमेयच्या नावावर रूम करतात ,अमेयला त्याच्या ऑफिस मधून लोन मिळते,आता रुमच्ं काम दोन महिन्यात सुरु होणार असतं,भाड्याने रूम बघायचं काम सुरु होते.
--------------------------------------------------------
या सगळ्यात दोन महिने कसे जातात ,ते कळत नाही,आता रूम भाड्याने घेताना वन बीएचके भाड्याने घेतात ,कारण आता ताईला पण डिलीव्हरी साठी इकडे आणायचे ठरते.
सगळं सामान नवीन रुम मध्ये शिफ्ट करतात ,आता ताईच्या अंगाला सूज आलेली असल्यामूळे आणि बिपी मधून मधून वाढत असल्याने तिच्या घरचे बोलतात ,तिला इकडेच राहू द्या , डिलीव्हरी झाल्यावर घेऊन जा. भावजींना असं वाटत असतं की,डिलीव्हरीचं बील त्यांच्याकडे नेलं तर घेणार नाही,उगीच कशाला त्यांना त्रास ,आधीच त्यांचा घराच्या कामासाठी आणि भाड्याने रूम घेण्यात बरेच पैसे खर्च झालेले असतात आणि आता एवढ्यात चंचलची ही ट्रिटमेंट सुरु केली आहे ,हे त्यांना ताईकडून कळलेले असते ,ते स्वत: त्यातून गेले होते म्हणून त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असते .
थोडसं त्यांच्या या निर्णयामुळे,अमेयच्या आई बाबांना थोडसं हायसं वाटतं आणि एवढा चांगला जावई पदरात टाकला,त्या बद्दल देवाचे आभार मानतात.
चंचलची ट्रिटमेंट यशस्वी होते की ,दसरा काही चमत्कार होतो ,हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.
क्रमशः
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा