फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 20
अमेय आणि आई दोघे घरी आले ,बाबा आणि चंचल त्यांचीच वाट पाहत होते
बाबा-काय म्हणाले डॉक्टर
अमेय-एक महिना आराम करायला सांगितला आहे,खाली वाकून करायची कामे आता इथून पुढे करायची नाही,काही व्यायाम दिवसातून दोनदा करायला सांगितले आहे आणि गोळ्या दिल्यात सध्या दोन महिन्यासाठी,मग परत बोलावले आहे.
बाबा-मग आता कसं व्हायचं रे
चंचल-बाबा मी लवकर ऊठून करुन जात जाईन,नका काळजी करु
बाबा-पण तुला या सगळया गोष्टिंची सवय नाही आहे
चंचल-हो बाबा ,पण आता आईंना त्रास होतो आहे तर केलं पाहिजे ना
बाबा-हवं तर,एखादी बाई ठेवू
चंचल-माझा पगार अजून काही एवढा नाही ,की आपण बाई ठेवू ,होईल मला सवय ,सुरुवातीला थोडा त्रास सहन करावाच लागेल.
आई-चला आता जेवण करुन घेऊ ,मग ठरवा कसं आणि काय करायचं
चंचल- हो ,घेते मी जेवायला
सगळे मिळून जेवतात ,चंचल किचन आवरते आणि झोपायला जाते.
अमेय-आवरलं का
चंचल- हो ,जमेल का रे मला सगळं
अमेय-हो ग,जमेल आणि मीही मला जमेल तशी मदत करत जाईल
चंचल- सकाळी साडे पाचचा गजर लावते,म्हणजे आवरेल.
----------------------------------------------------
चंचल सकाळी साडेपाचलाच ऊठून खाली येते,आईंच्या लक्षात आलं की,ती खाली आली आहे,त्या पण उठतात ,तशी ती त्यांना म्हणते, आई तुम्ही झोपा मी करते अहो सगळं
आई -मी भाजी टाकते ,तोवर तू पीठ मळून घे,तुला सवय नाही, मी हवं तर मानेचा पट्टा लावते.
चंचल-अहो खरचं मी करते ,आज नाही जमलं तर उद्या मदत करा ,मला प्रयत्न तर करु द्या.
आई-ठिक आहे ,कर
मनातल्या मनात तुझा कामाचा स्पीड कमी आहे ,हे माहित आहे मला,पण तुला चान्स ही द्यायला हवा ही गोष्ट तेवढीच खरी आहे.
ती पीठ मळून घेते ,भाजी फोडणीला देते ,नाश्त्याची तयारी करुन ठेवते . चपात्या करते ,आता नाश्ता करते , लादी पुसून घेते,सगळी कपडे आधीच भिजत घातलेली असतात ,तोवर अमेय आंघोळ करून येतो ,मग चंचल कपडे धुते आणि आंघोळ करून ऑफिसची कपडे घालून तयार होते ,डबे भरायचे राहिलेले असतात,हे आईंच्या लक्षात येते,त्या ऊठून डबे भरतात आणि पुढे आणून दोघांच्या बॉगांमध्ये ठेवून देतात,
या सगळयात नेहमी पेक्षा अर्धा तास वेळ झालेला असतो .
अमेय-आवर उशीर होतोय मला
चंचल-हो ,मलाही झालाय ,उद्या अर्धा तास अजून लवकर उठत जाईन,कपडे सुकत घालायचे राहिले
आई-अगं राहू दे,ताई आली तर मी तिला सांगते किंवा बाबा भाजीच्ं दुकान बंद करुन आल्यावर सुकत घालतील,उशीर होतोय तुम्हाला
अमेय-हो ,चालेल ,चल पटकन
चंचल- चला
आई-सावकाश चालव रे गाडी,उशीर झाला तर होऊ दे
अमेय -हो
थोड्या वेळाने ताई येते ,अरे वा ,आज तुझं काम लवकर आवरलं
आई-हो ,चंचल करून गेली सगळं,तेवढे कपडे राहिलेत सुकत घालायचे ,घाल ग तेवढे,उशीर झाला होता म्हणून मीच म्हटलं राहू दे,ताईला सांगते ,म्हटली उद्या अर्धा तास लवकर उठेल
ताई-तिचा कामचा स्पीड तसा कमी आहे,पण जाऊ दे स्वत:हून प्रयत्न तर करत आहे.
आई-मी तुला बोलली ना,ती तशी मनाने चांगली आहे,काल तिला काही बोलायच्या आधीच ती म्हणाली,मी आवरून जात जाईन,मी आज मदत करायला लागले तर म्हणाली ,मला प्रयत्न करु द्या,त्यात उशीर झाला तर नाश्ता पण नाही केला ,तशीच गेली ऑफिसला कारण अमेयला पण उशीर होत होता,काय माहित काही खाते की नाही ,तशीच कामाला सुरुवात करते.
चंचल ऑफिस मध्ये पोहोचली तर ,तिला पाहून तिची ऑफिस मधली मैत्रीण रेखाला ती आज दमल्या सारखी वाटली .
रेखा- चंचल सगळं ठीक आहे ना ,दमल्यासारखी वाटतेय
चंचल-हो ,सगळं ठिक आहे
रेखा-नाही, तुला आज उशीर झाला ना म्हणून विचारलं
चंचल-अगं आईंची तब्ब्येत बरी नाही ,त्यांना बेड रेस्ट घ्यायला सांगितली आहे ,मग सगळी कामे करावी लागली तर उशीर झाला
रेखा- होणारच ना ,तुला एवढया कामांची सवय नाही ना ,असं अचानक करायला लागल्या वर त्रास होणारच,पण हळू हळू होईल सवय
चंचल- पण आज मला कळालं आईंवर किती काम पडायचं , तरी त्या कधी काही बोलल्या नाही ,आता त्यांना माझी गरज आहे तर मी करुच शकते ,थोडा त्रास होईल सवय नाही म्हणून
रेखा-मला तुझ्या कडून हिच अपेक्षा होती ,त्यांनी इतके दिवस केले ,आता त्यांच्यासाठी तू हे सगळं करत आहे ,हे पाहून बरं वाटलं,एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलच्ं पाहिजे आणि यातूनच नाती फुलत जातात.
चंचल-थैंक्स रेखा फॉर सपोर्टींग मी
रेखा- तुला कधी काही वाटल्ं तर नक्की शेअर करत जा
-------------------------------------------------------
झोप पूर्ण न झाल्यामुळे आज चंचलला दुपारी ऑफिस मध्ये झोपही येत होती,मग तिने एक कॉफी घेतली आणि परत कामाला सुरुवात केली.
संध्याकाळी अमेय आणि चंचल घरी पोहोचले ,आईंनी चहा आधीच ठेवला होता,त्यांना माहित होतं ,आल्यावर चंचलने त्यांना चहा नसता ठेवू दिला म्हणून त्यांनी आधीच ठेवला होता.
दोघे तोंड हातपाय धुऊन येतात ,त्या त्यांना चहा देतात.
चंचल-आई मी चहा केला असता
आई - अगं तू पण दमल्यासारखी होते आणि डॉक्टरांनी खाली वाकून काम नाही करायला सांगितलं आणि चहा करायला असा किती वेळ लागतो,आज तर तुझी धावपळ पाहिली मी
चंचल-पण आई मला आज कळलं की ,तुमच्यावर किती काम पडायचं
आई-तुला या गोष्टीची जाणीव झाली, यात सगळं आलं,तू कपडे,लादी,भांडे ,चपात्या करणे ही कामे तू करत जा ,मला जसं जमेल तसं भाजी निवडणे,भाजी करणे,डबे भरणे ही काम मी करत जाईन आणि सगळ्यांनीच जी कपडे धुवायची आहे ती रात्रीच टाकत जा ,शक्यतो बाहेर वापरायची कपडे,सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी धुवत जा ,जसं तुला आवडेल तसं,तू नको जास्त टेन्शन घेऊ,साडे पाचला उठली तरी आवरेल आणि आज तू नाश्ता करून नव्हती गेली ,तो करायला ही वेळ मिळेल आणि तुम्ही दोघांनी आपापली ताटं ,नाश्त्याच्या डिश किंवा चहाचे कप बेसिन मध्ये स्वत: नेऊन ठेवायचं म्हणजे सगळी काम वेळेत होतील.
अमेय-जशी आज्ञा आई सरकार ,सुनेवर करायची वेळ आली तर लगेच नियमांमध्ये बदल झाले
तसं चंचल हसायला लागली.
आई- हे मी खूप आधी करायला हवं होतं खरं तर,चुकलच माझं,तुम्हांला सगळ्यांना सगळया गोष्टी वेळेवर देताना मी पूर्ण स्वत:ला झोकून दिले,त्यामुळे माझ्या शरीराची ही अवस्था झाली आहे,मी आज दिवस भर विचार केला ,तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली ,प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हेच होतं ,असं माझ्या चंचलच्या बाबतीत घडू नये म्हणून आता तुम्ही दोघांनी निदान आपापल्या वस्तू आणि खाल्ल्यानंतरची भांडी उचलून बेसिन मध्ये ठेवली तर बरं होईल.
अमेय-तू म्हणते ते मलाही पटतं ,मी पण भांडी वगैरे घासायला, आठवडयातून एकदा फैन आणि फर्नीचर पुसायला मदत करत जाईल,आमच्या ऑफिस मध्ये कांबळे काका आहे ,ते त्यांच्या बायकोला मदत करतात तर सगळे त्यांना बायकोच्या ताटाखालचं मांजर बोलतात ,पण त्या दिवशी ते बोललेले ,ते आज मला पटलं की,बायकांना काम करु न लागणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे तर पुरुषी अहंकार आहे ,त्याउलट बायकांना जमेल तेवढी मदत करणे म्हणजेच खरा पुरुषार्थ आहे.
आई-अरे बरोबरच बोलले ते ,बायकोला मदत केली की , आजुबाजुचा समाज असचं बोलतो ,पण आपण ठरवायचं असतं की आपण काय करायचं
चंचल-आई तुम्ही दोन्ही बाजूने विचार करता ना ही गोष्ट मला खरचं खूप आवडते ,मला खरचं टेन्शन आलं होतं की,मी कसं सगळं करणार ,आता ते तुम्ही कमी केलं आहे आणि मी पण तुम्हाला कोणत्याच तक्रारी साठी वाव देणार नाही
आई-चंचल माणूस आहे म्हणजे चुका होणारच ,पण झालेल्या चुका स्वीकारत माफी मागणं आणि पुन्हा तशी चूक घडू न देणे या गोष्टी आपल्या हातात असतात.
दुस-या दिवशी सकाळी आईंनी सांगितल्याप्रमाणे कामे वेळेत उरकली आणि चंचलही नाश्ता करून वेळेत ऑफिसला पोहोचली.
रेखा-आज मैडम वेळेत,अर्धा तास आधी उठली का
चंचल-नाही गं, मग तिने तिला काल घरी गेल्यावर काय झाले ते सांगितल
रेखा-कधी कधी हेवा वाटतो तुझा ,छान सासर मिळालं आहे तुला ,सगळ्यांना नेहमी जप ,ते जसे तुझी काळजी घेतात ,तशी तूही त्यांची घे
चंचल टेबलाला हात लावत म्हणते-ट्च वुड सगळं नेहमी असचं चांगल राहू दे.
असं म्हणून दोघी आपापल्या कामाला लागतात.
-------------------------------------------------------
घरी गेल्यावर आई सांगतात अमेयच्या मोठ्या मामाच्या मुलीच लग्न जमलं आहे आणि साखरपुडा याच रविवारी आहे .
अमेयची एक मामी जॉब करत असते तिचा चंचलला फोन येतो.
मामी-चंचल आपण सगळयाजणी मिळून एक फ्युजन बसवू , साखरपुडयासाठी सगळ्यांना एक सरप्राईज देऊ ,येशील ना तू शनिवारी ऑफिस सुटल्यानंतर प्रक्टिसला ,आम्हीच येऊ सगळे तुमच्या घरी चालेल ना
चंचल-मी आईंना विचारून सांगते
मामी-अगं माझं बोलणं झालय त्यांच्याशी
चंचल-चालेल मग
मामी -भेटू मग शनिवारी
सगळे म्हणजे अमेयच्या मामाच्या मुली,मावशीच्या मुली ,एक मावशी ,आई ,ताई ,सगळया जणी मिळून छान प्रक्टीस करतात , काय घालायचं ते सगळ्याजणी मिळून ठरवतात आणि जे ते आपापल्या घरी जातं,दुस-या दिवशी संध्याकाळी पाच वाजता हॉलमध्ये पोहोचायचं होतं.
पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.
क्रमश:
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा