फुलले रे क्षण माझे फुलले रे- भाग 2
चंचल आणि अमेय दोघेही मध्यम वर्गीय कुटंबातील,चंचल पुण्याला जॉब करत होती, अकाउंट्समध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आणि अमेय एका बँकेत अकौंटट म्हणून कामाला होता.
अमेयला तीन बहीणी,तिघींची लग्न झाली होती, तो एकटाच असल्याने तिघी बहिणींचा लाडका होता. तो आईवडिलांसोबत चाळीत रो हाऊस मध्ये राहत होता आणि अजून एक रूम होता तो भाड्याने दिला. आईवडीलांनी भाजीचा धंदा करून,तिन्ही मुलींची शिक्षण आणि लग्न करून दिली होती. त्याला त्यांच्या कष्टांची पूर्ण जाणीव होती ,त्यांच कुटुंब वारकरी संप्रदायातील होतं त्यांच्या बरोबर चंचलच्या मामांचे नेहमी उठणे ,बसणे होते ,अमेयचे आईवडील स्वभावाने खूप प्रेमळ आहे,हे तो ओळखून होता आणि त्यांच्या घरी तो अमेयला ही एकदा दोनदा भेटला होता ,त्याला त्याचा स्वभाव खूप आवडला होता.
------------------------------
चंचल-हॅलो, मामा कसा आहेस
मामा - मी छान आहे,तू कशी आहे आणि आज मामाची आठवण कशी झाली
चंचल-काय रे ,मी नेहमी फोन करते,तरी असं बोलतो
मामा-अगं गंमत केली ,बोल ना
चंचल-अरे मी दोन दिवसांसाठी मुंबईला येतीय,माझी परिक्षा आहे रविवारी, रविवारी राहिल आणि सोमवारी परत पुण्याला,फक्त सोमवारी सुट्टी मिळाली नाहीतर अजून राहिले असते
मामा-कसली परीक्षा आहे
चंचल-बँकेची ,जॉब मुळे जास्त वेळ नाही मिळत अभ्यासाला पण प्रयत्न तर केले पाहिजे ना
मामा- मला तुझी ही गोष्ट नेहमी आवडते ,नेहमी प्रयत्न करत असते
चंचल- तुम्हीच तर सांगता ना प्रयत्नांती परमेश्वर
मामा-तू काय बोलायला ऐकणार आहेस का मला ,ये मी घेवून जाईल तुला परिक्षेला ,काळजी करू नकोस
चंचल- तू आहेस म्हणून तर काही काळजी नाही
मामा - निघालीस की फोन कर ,मी तुला घ्यायला येईल
चंचल- अरे मी येईल,सवय आहे मला
मामा -चल मग भेटू आपण
फोन ठेवून दिल्यावर मामाच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरू लागली, तो चंचलच्या आईला फोन करुन काहीतरी बोलतो आणि फोन ठेवण्या आधी म्हणतो ,मग तुम्हीही या सगळे.
--------------------------------------
चंचल मामाच्या घरी पोहोचते ,दुस-या दिवशी सकाळी दादरला परीक्षेसाठी जायचे म्हणून ती थोडसं मामाच्या मुलीं सोबत खेळून अभ्यासाला बसते.
दुस-या दिवशी पेपरवरून आल्यावर आईवडील,चुलते यांना सगळ्यांना पाहून आश्चर्यचकीत होते.
चंचल-तुम्ही सगळे अचानक
आई-तुझा पेपर होता म्हणून काही बोललो नाही
चंचल-कश्याबद्द्ल
आई -संध्याकाळी तुला पाहायला पाहुणे येणार आहे
चंचल- काय करतो मुलगा
मामा सगळं सविस्तर तिला सांगतात- मी त्यांना जवळून पाहिले आहे आणि माझं त्यांच्या घरी नेहमी येणं जाणं ही असतं,आपल्या सारखीच साधी माणसं आहे आणि विशेष म्हणजे वारकरी सांप्रदायातली आहे,बघून तर घे ,तू हो म्हटल्या शिवाय आम्ही पुढे जाणार नाही.
अचानक आलेल्या या स्थळामुळे ती थोडीशी विचलित झाली होती आणि थोडं टेन्शन आलं होतं.
-----------------------------------
मामाही चाळीतच रो हाऊस मध्ये राहत असतो ,असं स्वत:च घरं मुंबई सारख्या शहरात म्हणजे खूप काही.
मुलाकडचे 3.00 वाजता येणार होते ,त्यामुळे मामा मामीची भाचीसाठी धावपळ चालू होती,मामाने शेजारच्या एका रूममध्ये पाहुण्यांची बसायची व्यवस्था केली होती.
आले एकदाचे पाहुणे ,मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
मग म्हणाले -मुलीला बोलवा
चंचल चहा घेऊन आली ,सगळ्यांना चहा दिला आणि तिला तिथे बसायला सांगितले,तिची सगळ्यां सोबत ओळख करून दिली,अमेयच्या मामांनी काही जुजबी प्रश्न विचारले.
त्यानंतर सगळ्यांचे या गोष्टीवर एकमत झाले की,मुलाला आणि मुलीला स्वतंत्र बोलायला द्या. तिला आणि त्याला एका रूममध्ये दोघांनाच बसवण्यात आले.
सगळ्यां समोर तिने त्याला नीट पाहिले नव्हते ,ती बसलेली असताना त्याने जेव्हा एण्ट्री मारली,तेव्हा तिने पाहिले की ,एक सुदृढ मुलगा ,थोडासा सावळा पण चेहरा एकदम फ्रेश,तो येवून तिच्या समोर बसल्यावर दोन मिनीट दोघेही शांत होते.
सुरवात कुणी करायची आणि दोघेही एकत्रच बोलायला लागले,तसे एकमेकांशी हसले .
अमेय-लेडीज फर्स्ट
चंचल-तुम्हाला कशा प्रकारची मुलगी हवीय
अमेय-मला बायको हवी आहे,बायको असल्याशिवाय मुलगी कशी होईल
तिला यावर काय बोलावं ते सुचेना
अमेय वातावरण हलकं करण्यासाठी-गंमत केली, माझ्या आइवडीलांनी आता पर्यंत भरपूर कष्ट केले आहेत,मी एकटाच आहे त्यामूळे त्यांच्याशी मिळून मिसळून राहणारी,तसं आमच्या घरात फ्री वातावरण आहे,माझ्या सगळ्या बहीणी ड्रेस वैगेरे घालतात आणि तुला जॉब करायचा असेल तर तोही करु शकते, आमची काहीच हरकत नाही.
अमेय- तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या लाईफ पार्टनर बद्दल
चंचल- ज्या आहेत ,त्या तुम्ही सांगितल्या नुसार पूर्ण होत आहे ,त्यात अजून एक गोष्ट की,त्याने मला समजून घ्यावे आणि चुकले तर समजून सांगावे.
अमेय- समजून तर दोघांनीही एकमेकांना घेतले पाहिजे आणि विश्वासही असला पाहिजे
चंचलला तो जे बोलत होता ते ऐकत राहावे असे वाटत होते
अमेय-सगळे वाट पाहत असतील ,मी जातो आणि अजून एक गोष्ट तुमचा कोणताही निर्णय मला मान्य असेल.
आणि तो बाहेर निघून गेला.
चंचलला तिच्या मामांनी विचारले,तिने होकार दिला,अमेयने आधीच होकार कळवला होता.
ते दोघे बोलत असताना मोठ्या मंडळींनी निर्णय घेतला होता की,जर पसंती असेल तर,लगेच गंधाचा कार्यक्रम उरकून टाकू.लग्न साध्या पध्दतीने स्वतंत्र करून द्यायचं असं ठरलं आणि बाकी त्यांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती.
लगेच सगळ्या गोष्टींची पुर्तता करण्यात आली आणि गंधाचा कार्यक्रम पार पडला , चंचल आणि अमेय दोघांनी एकमेकांना पेढा भरवला.
गावाकडच्या सगळ्यांना अमेयच्या घरी बोलावले आणि ते सगळे निघाले तितक्यात अमेयच्या छोट्या मामीने चंचलचा नंबर घेतला आणि डोळा मारत म्हणाली ,तुमच्या ह्यांच्या साठी,तशी चंचल लाजली ,मग तिच्या मामीने तिचा नंबर दिला.
---------------------------------
सगळे गेल्यावर परत एकदा सगळ्यांनी चंचलला विचारलं की ,नक्की पसंत आहे ना ,तशी ती लाजली तर सगळे समजायचं ते समजून गेले.
रात्री झोपताना,चंचल त्याच्या बद्दल विचार करत होती,सकाळी आपल्या आयुष्यात कोणीही नव्हतं,अचानक त्याला पाहीलं आणि असं वाटलं की हाच तो मी ज्याच्या शोधात होते. तितक्यात मेसेजची रिंग वाजते,ती पाहते तर त्याचाच मेसेज असतो .
अमेय-हाय ,छान दिसत होतीस ,सगळ्यां समोर सांगता नाही आलं
चंचल- थैंक्स
अमेय- सगळं घाईत आणि अचानक झालं,काही हरकत नाही,लग्नाला अजून तीन महिने आहेत ,त्यात एकमेकांना भेटून समजून घेता येईल,एकमेकांच्या आवडी निवडी कळतील,हो ना
चंचल- हम्म
अमेय- आपण पती पत्नीच्या नात्यात जाण्या आधी आपण एकमेकांचे मित्र होऊ ,म्हणजे आपल्या नात्यात मोकळेपणा येईल
चंचल-हम्म
अमेय-तू काही तरी बोल ना
चंचल- काय बोलू ,मला जे बोलायच असतं ते तुम्हीच बोलून मोकळे होतात मग मी काय बोलणार
अमेय- फोटो पाठवतो आजच्या कार्यक्रमाचे असं म्हणून तो फोटो पाठवतो आणि गुड नाईट लिहितो.
चंचल त्याला छान आहे असा रिप्लाय पाठवून गुड नाईटचा मेसेजही टाकते.
दोघेही एकमेकांना ऑनलाईन दिसत असतात ,कारण दोघेही फोटो पाहत असतात, दोघेही एकमेकांचा विचार करत भविष्याची स्वप्ने पाहत निद्रेच्या स्वाधीन होतात . दोघांच्याही चेह-यावर समाधान आणि हास्य असते.
क्रमश:
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा