Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 19

Don't take benefit of anyone's soft nature ,think about that person also

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 19

आता चंचलचा कोर्स पूर्ण झाला होता ,जिथून तिने कोर्स केला,तिथुनच एका कंपनीत इंटरव्हयूसाठी कॉल आला होता आणि तिथे तिचं सिलेक्शनही झाले आता रोजची धावपळ आणि दगदग सुरु झाली. तरी सकाळी आई दोघांचे डबे करायच्या,चंचल उठून आवरून दोघांचे डबे भरायची ,कपडे मशीनला लावायची ,चहा नाष्टा होईपर्यंत ऑफिसची वेळ व्हायची. अमेय तिला बाईक वर सोडवायचा आणि मग स्वत: ऑफिसला जायचा ,येताना ही तो तिला ऑफिसमधून पिकअप करायचा,संध्याकाळी आल्यावर ते फ्रेश होइस्तोवर ,आई चहा ठेवायच्या ,दोघे चहा प्यायचे ,अमेय कलेक्शनला जायचा आणि चंचल संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायची,सगळं उरकता उरकता झोपायला अकरा वाजायचे. रविवारी सुट्टी असली की ,चंचल आणि अमेय दहा वाजता उठायचे ,मग नाष्टा दहा वाजता ,जेवण व्हायला पण तीन वाजायचे , मग एखादी झोप , उठल्यानंतर चहा पिऊन नंतर दोघे कुठंतरी बाहेर मित्रांबरोबर फिरुन यायचे ,असं त्यांच रविवारच रूटीन होतं. आई बाबाही त्यांच्या आनंदात आनंद मानायचे. ऑफिसच्या सगळया मैत्रिणीही तिला म्हणायच्या ,नशीबवान आहेस ,इतकी चांगली सासू मिळाली ,डबा सुध्दा हातात बनवून देते नाहीतर आमच्या सासवा ,आमचा डबा तर आम्हाला करावा लागतोच ,वर घरच्यांचे जेवणही आम्हालाच बनवून यावे लागते ,घरी गेल्यावर चहा तर सोडुनच द्या ,पाणीही कुणी विचारत नाही ,उलट घरी पोहोचल्यावर ,किती उशीर झाला,चहा ठेव पटकन,असं सांगितल जातं.

पण जेव्हापासून चंचल ऑफिसला जायला लागली ,अमेयच्या आईवर कामाचा लोड पडत होता,त्या बोलत नव्हत्या पण त्यांची तब्ब्येत त्यांना साथ देत नव्हती,त्यांची अधून मधून पाठ दुखायची कारण पहिल्या पासून काम करून त्या भाजीच्या धंद्यावरही बसायच्या,लग्न झाल्या पासून सारखं काम काम आणि काम,सून आली तरी काम करावंच लागत होतं आणि त्या काही स्वत:हून सांगणा-यातल्या नव्हत्या, पण एक दिवस त्यांना उठताही येईना,उठल्या तरी चक्कर येत होती ,ताई येवून दवाखान्यात घेऊन गेली ,डॉक्टरांनी काही टेस्ट आणि पाठीचा एक्स रे काढायला सांगितला .

डॉक्टरांनी त्यांना दिनक्रम विचारला,त्यांनी भली मोठी यादी सांगितली,डॉक्टर म्हणाले ,तुम्ही दुस-यांसाठी इतकं करता ,पण स्वत:साठी काहिच करत नाही.

आई-मला नाही समजलं ,मी जेवते ,वेळेत नाष्टा करते 

डॉक्टर-पण यातून शरीराचा व्यायाम नाही होत

आई-सगळी कामं करते ,म्हणजे व्यायाम होतोच की

डॉक्टर-तसं नसतं,व्यायाम हा सकाळी केलेला कधीही चांगला असतो आणि घरातली काम केल्याने शारीरिक कष्ट जास्त होत नाही ,भलेही तुम्ही अर्धा तास चाललात तरी चालेल,पण पटापट की ज्यामुळे अंगातून घाम निघाला पाहिजे.पण सध्या आरामच करा ,जास्त वाकू नका कारण वाकल्यावरच तुम्हाला चक्कर येते ना 

आई-पण सुनबाई कामाला जाते 

डॉक्टर-वाकून करायची कामे तिला करायला सांगा आणि उद्या रिपोर्ट घेऊन दाखवायला या ,मग बघू काय ते, आता ह्या दोन दिवसाच्या गोळ्या दिल्यात त्या घ्या सध्या.

आई-बर ,चालेल उद्या रिपोर्ट घेऊन संध्याकाळी येतो ,मग मुलगा बरोबर येईल 

डॉक्टर-हो चालेल ना 

असं म्हणून सांगितलेल्या टेस्ट साठी रक्त देतात आणि एक्स रे काढतात,एक्सरेचा रिपोर्ट त्याच दिवशी मिळणार असतो,ब्लड टेस्ट चे रिपोर्ट मात्र दुस-या दिवशी मिळणार असतात.

--------------------------------------------------------------------

ताई-तरी मी तुला सांगत असते ,तिला थोडसं लवकर ऊठून आवरून जायला सांगत जा ,तुम्ही सगळ्यांनी तिला लाडवून ठेवलं आहे ,आता बस दुखणं काढत 

आई-अग मी कसं बोलणार ,तिचं तिला नको का कळायला,म्हणूनच उद्या अमेयला घेऊन जाते ,म्हणजे तोच सांगेल तिला,मी करु लागते ,तर मी करेल म्हणून ती मला गृहितच धरते.

ताई-अगं तू तिला आपली मुलगी मानतेस ,पण तू आम्हालाही काम सांगायची ,तशीच तू तिलाही सांगू शकते नाही का

आई-अगं मागे एकदा मी असचं काहीतरी बोलले ,तर तिला राग आला होता ,मग अमेय बाहेर फिरायला घेऊन गेला,त्याने काय सांगितले माहित नाही ,पण आल्यावर जसं काही झालच्ं नाही असं बोलत होती आणि आइसक्रीम पण आणलेली सगळ्यांसाठी , त्या दोघांमध्ये माझ्यामुळे प्रोब्लेम नको एवढीच माझी इच्छा आहे.

ताई-जाऊ दे ,तुला कितीही सांगितलं तरी तू काय सासू सारखी वागू शकत नाही ,हे सगळे त्याचेच परिणाम आहे ,माझी सासू बघ ,आल्यावर काही सुध्दा काम करत नाही ,सगळं हातात द्यावं लागतं 

आई-अगं पण तू घरी असते,तिला ऑफिस मध्येही काम पडतच असेल ना ,दमत असेल ग ती ,मुद्दामून नसेल करत ती

ताई-आपली मामी पण तर जॉब करते ,पण आजीच सगळं करून जॉब करते ,शिवाय नेहमीच हसतमुख चंचल थोडी लवकर उठली ,तर ती ही थोडं जास्त आवरून जाऊ शकते,जाऊ दे ,मी आपलं चांगलं सांगितल 

आई-शिकेल ग हळू हळू,अजून नवीनच आहे 

ताई-मी उगाच तुला सांगत बसले , तुमच्या दोघींच्या मध्ये मी नाही पडणार ,असही तुम्ही लगेच एक व्हाल ,तुमच्या मधे पडून मी कशाला वाईट होऊ

आई-हो आमच आम्ही बघून घेवू 

ताई-शेवटी मी परकीच नाही का 

आई-तुला जे समजायचं ते समज

----------------------------------------------------------------

दुस-या दिवशी संध्याकाळी अमेय आणि आई रिपोर्ट घेऊन जातात .

डॉक्टर- रिपोर्ट आणि एक्स रे दोन्ही आणले का?

अमेय- हो  ,असं म्हणून रिपोर्ट डॉक्टरला देतो

डॉक्टर - ह्यांना विटामिन D3 ,कालशियम आणि आयर्न चा प्रोब्लेम आहे,त्याच्या दोन महिन्याच्या गोळ्या देतो 

अमेय- हा प्रोब्लेम कशामुळे होतो

डॉक्टर-शक्यतो हा प्रोब्लेम सगळयाच बायकांना असतो ,सकाळच्या कोवळ्या उन्हात विटामिन D3 मिळते,पण त्या वेळी या घरातल्या कामात व्यस्त असतात आणि स्वत:पेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात.

अमेय-एक्सरे बद्दल काय

डॉक्टर-यांना स्पोंडेलिसीसचा त्रास आहे ,मानेला पट्टा लावायला देतो आणि आराम करा जरा एखादा महिना आणि इथून पुढे खाली वाकून करायची कामे बंद करा,काही व्यायाम दाखवतील सिस्टर करुन ते रोज दिवसातून दोन वेळा करायचे .

अमेय-आरामाच्ं तुम्हीच हिला सांगा ,किती वेळा सांगितल,पण हिची आपली तक तक चालूच असते 

डॉक्टर-काय म्हणतोय ,अमेय ,आता तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली,तर तुम्हाला नंतर सगळ्याच गोष्टींसाठी दुस-यांवर अवलंबून राहावे लागेल,मग बघा तुम्ही काय करायचं ते,तुम्ही बसा आता बाहेर

आई बाहेर जाऊन बसतात

डॉक्टर-हे बघ अमेय ,तुझी मिसेस जॉब करते का ,त्या म्हणत होत्या,मग तिला मदत करावी लागते,त्यांना आता कपडे धुणे,लादी पुसणे ही काम नाही चालणार . भांडी घासली की हातावर जोर दिला जातो आणि आता तर त्यांच्या हाताला मुंग्या येत आहे ,त्यामूळे निदान एखादा महिना तरी नको ,उभे राहून जेवण वगैरे बनवणं ठिक आहे, पण जास्त वेळ शक्यतो ऊभंही राहू नका देऊ.

अमेय-चालेल ,घेऊ आम्ही काळजी

अमेय बाहेर येऊन पैसे देतो .

आई-काय म्हणत होते रे डॉक्टर 

अमेय-काही नाही ,इथून पुढे धुणं,भांडी आणि लादी करण बंद,चंचल करत  जाईल ,मी सांगतो तिला ,नाहीतर ऑपरेशन करावं लागेल.

अमेयला माहित होतं,असं सांगितल्याशिवाय आई शांत बसणार नाही.

काय होईल पुढे चंचल सगळ्यांच मन जिंकू शकेल की घरात खूप मोठं वादळ येईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदी रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.