फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 18
चंचल चार पाच दिवसांनी मुंबईला येते, परत रोजच रूटीन सुरू होतं , आता संक्रांत जवळ आलेली असते,आई चंचलला म्हणतात ,आता संक्रांत जवळ आली आहे ,माझी खुप हौस आहे की,तुला काळी साडी घालून त्यावर हलव्याचे दागिने घालून लूट करायची आहे, कधी एकदा संक्रांत येते ,असं झालय मला.
पण जे ठरवतो ते होतंच असं नाही ना , संक्रांतीच्या आधी जाऊन काळ्या कलरची साडी घेऊन आल्या ,त्यावर ब्लाऊज शिवायला टाकला ,पण नियतीला काहितरी वेगळंच मान्य होतं,चंचलची मावशी संक्रांतीच्या आधी दोन दिवस आजारपणामुळे देवाघरी गेली,त्यामुळे अचानक सगळ्यांना गावी जावे लागले,कसली संक्रांत आणि कसलं काय,सगळी हौस तशीच राहून गेली ,चंचलला समजावता समजावता सगळ्यांच्या नाकी नऊ आले, त्यात तिचीही चूक नव्हती कारण आधी मामा आणि आता मावशी पूर्ण कोलमडून गेली होती ती ,तिला सावरायला घरातल्या सगळ्यांनीच खूप मदत केली,त्यातच अमेयचा वाढदिवस आला ,दरवर्षी त्याचा सगळा मित्र परिवार यायचा आणि वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करायचे ,पण चंचलची अवस्था पाहून त्याने वाढदिवस साजरा करायचा नाही असं त्याने ठरवलं.आईलाही सांगितल की ,या वर्षी नको साजरा करुया. तो असं बोलला ,पण आईच्या डोक्यात विचार आला ,एकदा चंचलशी बोलून बघावं, तेवढीच तयार झाली तर सगळ्यांबरोबर तिलाही बरं वाटेल आणि या सगळ्यातून थोडी बाहेर येईल.
आई दुपारी जेवताना विषय काढते.
आई- अमेयचा वाढदिवस आहे चार दिवसांनी
चंचल- हो ना मी विसरलेच होते
आई-पण या वर्षी तो साजरा करायचा नाही म्हणत आहे
चंचल-का बरं
आई -अगं तुझ्या मावशीच असं झालं,म्हणून त्याला बरं नाही वाटतं,साजरा करायला
चंचल-लग्नानंतरचा त्यांचा पहिला वाढदिवस आहे,आपण त्यांना सरप्राईज देऊ ,त्यांना काही सांगू नका यातलं ,आई तुम्ही सांगाना कसा करायचे तुम्ही या आधी त्यांचा वाढदिवस
आई-त्याचे सगळे मित्र केक घेऊन यायचे आणि बाहेरून किंवा घरीच मी जेवण बनवायची .
चंचल- यावेळी पण सगळ्या मित्रांना बोलवू,पण त्यांना सरप्राईज देऊ,बाबा तुमच्या कडे असतील ना त्यांच्या मित्रांचे नंबर म्हणजे त्यांना कॉल करता येईल.
बाबा-हो आहे माझ्याकडे मी देईल तुला
आई-तुला आज किती दिवसांनी असं आनंदित बघत आहोत
चंचल-माझं ही चुकलंच थोडं,आई पण त्या दिवशी सांगत होती,ह्यातून बाहेर ये आणि घराकडे लक्ष दे ,तुम्ही सांभाळून घेता म्हणून ठिक आहे ,दुसरीकडे कुठे असते तर माझी अशी काळजी घ्यायच्या ऐवजी मलाच सुनावले असते
आई-नाही ग,आम्ही तुझ्या भावना समजू शकतो,पण तुला असं बघून आमचा जीव पिळवटून निघतो ,तुम्ही खुश तर आम्ही खुश.
----------------------------------------------------
अमेयच्या सगळ्या मित्रांना अमेय सॉरी बोलून या वर्षी पार्टी नाही असे सांगतो ,इकडे चंचल सगळ्या मित्रांना फोन करून पार्टीच निमंत्रण देते आणि त्या बरोबर हेही सांगते ,सरप्राईज पार्टी आहे असही सांगते ,बाबांना बरोबर घेऊन जेवणाची ऑर्डर देते ,छानसा हार्ट शेप मधला केक ऑर्डर करते ,त्याच्या साठी एक सरप्राईज गिफ्ट घेते ,त्याचं पैकिंग खूप छान करते.
वाढदिवसाचा दिवस उजाडतो ,चंचल अमेयला रात्री बारा वाजताच विश करते ,तसा अमेय खुश होतो.सकाळी नेहमी प्रमाणे तो आई बाबांच्या पाया पडतो ,ते त्याला विश करतात.
अमेय-आपण सगळे संध्याकाळी हॉटेल मध्ये जेवायला जाऊ
बाबा-हो जाऊ ना,आज किती वाजता येशील
अमेय- निघालो की फोन करतो ,त्या नुसार आवरून ठेवा
बाबा-हो चालेल ना
आज अमेयच्या आवडीचा नाष्टा असतो ,ते पाहून अमेय खुश होतो,दुपारच्या डब्यालाही त्याच्या आवडीची भाजी दिलेली असते,दुपारी जेवताना त्याचे मित्र त्याची मस्करी करत जेवत असतात.
मित्र-लग्न झालं तर तू आम्हाला विसरलास हं
अमेय-सांगितल ना वाढदिवस का नाही करत त्याचं कारण,तरीही तू असं बोलतोस,मी आतापर्यंत कधी पार्टी द्यायला नाही म्हटलो का,प्लीज समजून घ्या ना यार
मित्र-हो रे,असच पिडत होतो तुला,मग आज काय प्लान
अमेय-जाऊ बाहेर फैमिली सोबत,अजून काय
मित्र-एन्जॉय कर
अमेय-हो
संध्याकाळी अमेय ऑफिस सुटल्यानंतर घरी यायला निघतो,त्याला कुणाला बोलावलं नाही म्हणून चुकल्या सारखं वाटत असतं,पहिल्यांदा वाढदिवस असा साजरा करतोय याचं वाईट वाटतं असतं ,उलट लग्ना नंतरचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा त्याने विचार केला होता , त्यानिमीत्ताने सगळ्या मित्रांच्या बायकां बरोबर चंचलची ओळख करून देता येईल,घरी चाललेला असतो ,तितक्यात त्याचा मित्र श्री त्याला भेटतो ,तो त्याला वाढदिवसाचे विश करतो आणि घरी चल ,बोलतो . जवळच घर असल्याने आणि लंगोटी यार असल्याने तो जातो,श्री त्याला शर्ट गिफ्ट करतो आणि आग्रह करून चेंज करायला लावतो. श्री आणि श्रीची बायकोला तयार झालेले पाहुन विचारतो,कुठे बाहेर निघालात का?
श्री-हो आम्ही पण चाललोय बाहेर जेवायला
अमेय-चला मग आमच्या बरोबर,आधी घरी जाऊ आणि मग एकत्रच जाऊ
श्री आणि त्याची बायको अमेय बरोबर जातात
-----------------------------------------------------
तो त्यांच्या घराच्या गल्लीत येतो ,तर सगळीकडे अंधार असतो आणि त्याला कळत नसतं,सगळीकडे लाइट आहे ,मग इथलीच कशी गेली. अमेय श्रीला बोलतो-लाईट सगळीकडे आहे आमच्याच गल्लीत कशी गेली कोणास ठाऊक,असं म्हणत घराकडे जातो ,पाहतो तर घराला कुलूप
अमेय-आता सगळे कुलूप लावून कुठे गेले ,मी आलो काकींकडून चावी घेऊन
तो चावी आणायला काकींकडे जात असतो ,तर समोर एक पडदा लावलेला असतो त्यावर त्याचा आणि चंचलचा फोटो असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं,हैप्पी बर्थडे माय लव्ह,ते पाहताच त्याच्या डोळ्यांत एक चमक येते,तितक्यात त्याला चंचलचा आवाज येतो -
आप हमारे जिंदगी में आये,बहार आ गयी,
आपकी साँसों से हमारी साँसे मिली तो,राहत मिल गयी ,
आपने हमारा दिल चुरा लिया तो, आपके प्यार में पगली बन गयी,
आपकी हर अदा देख के ,मैं आपकी बीबी बन गयी.
हैप्पी बर्थडे माय लव्हींग ऐण्ड केअरिंग हजबंड
ती असे बोलताच सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज येतो आणि सगळे एक सुरात बोलत असतात ,हैप्पी बर्थडे टू यू अमेय ,लाईटस् सगळ्या चालू होतात.
अमेय पाहतच राहिला,सगळया चौकाला बलुन्सनी सजवलं होतंं ,त्याचे सगळे मित्र आप आपल्या बायकां बरोबर आले होते,आई बाबा ,तिन्ही बहिणींची फैमिली ,मंगेश ,चंचलची मावशी चाळीतले सगळे जण होते. एक छान टेबल होता ज्यावर केक ठेवला होता ,टेबललाही छान डेकोरेशन केले होते ,हे पाहून अमेय भारावून गेला , तो टेबलच्या दिशेने जायला निघाला ,त्याच्या पायाखाली फुलांचा गालीचा होता ,तो टेबलजवळ आला ,आई बाबांच्या पाया पडला , मग केक कटिंग झाले , आता सगळ्यांसाठी काही गेम होते ,ते खेळायला सुरुवात केली,
संगीत खुर्ची आणि सगळयात शेवटी कपल डान्स त्यासाठी सगळी रोमँटीक गाणी सिलेक्ट केली होती ,सगळ्यांनी गोल केलेला आणि प्रत्येक कपल आत येऊन थोड्या वेळासाठी येऊन डान्स करत होते आणि बाकी सगळे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते,अगदी आईबाबांनी आणि चाळीतल्या बाकीच्या प्रौढ मंडळींनाही डान्स करायला लावला ,तो पर्यंत अमेयच्या ताईने एका बाजुला बुफे डिनर लावून घेतले ,जेवण लावताच लहान मुले आणि वृद्ध मंडळींनी जेवायला घेतले.
बाकी तरुण मंडळी आता सगळे एकत्र डान्स करत होते.
आता बाकी सगळ्यांनी जेवायला घेतले ,जेवण झाल्यावर अमेयचे मित्र जवळ येऊन त्याला विश करत होते,चंचलच कौतुक करत होते आणि प्रत्येक जण आपापल्या घरी जात होते . आता फक्त घरातली मंडळी आणि श्रीच जेवायचा राहिला होता ,सगळ्यांनी ताटे वाढून घेतली.जेवताना अमेय श्रीला म्हणाला-तुला माहित होतं ना सगळं
श्री-हो ,पण छान सरप्राईज मिळालं ना तुला
अमेय-आता पर्यंतचा सगळयात मेमरेबल बर्थडे,थैंक्स यार
श्री-ही सगळी वहिनींची आयडिया ,त्यांना थैंक्स म्हण
तितक्यात तिथे मंगेश येतो आणि अमेयच्या हातात पॉकेट देत बोलतो ,हैप्पी बर्थडे जिजू,कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज
अमेय- छान होतं ,पण ह्याची काय गरज आहे
मंगेश-असं कसं लग्नानंतरचा तुमचा पहिला वाढदिवस,म्हणून आई बाबांनी मुद्दाम पाठवलं मला
अमेय-थैंक्स आल्याबद्दल
मंगेश- थैंक्स वगैरे काय ,चला मी मावशीकडे जातो
अमेय-अरे इकडचं रहा ना ,उद्या सकाळी जा मावशीकडे
मंगेश-रात्री उशिराच्या गाडीने जाणार आहे ,विकी सोडेल मला
अमेय-अरे मी सोडेल की
मंगेश-आता तुम्ही दमला असाल,उगीच कशाला त्रास
अमेय-अरे,त्यात त्रास कसला
विकी-जिजू अहो सोडेल मी त्याला ,तुम्ही नका टेन्शन घेऊ
अमेय-बरं बाबा ,पण सकाळी पोहोचल्यावर फोन कर
मंगेश-हो नक्की
चंचलला आणि सगळ्यांना बाय करून ते जातात.
ताई -अगं चंचल तू तुझं गिफ्ट दे ना
चंचल-हो देते ,घरात चला आता
अमेय विचार करत असतो काय गिफ्ट असेल.
सगळे घरात जातात ,चंचल एक मोठा बॉक्स त्याच्या हातात देते.
अमेय-बाप रे काय आहे एवढं त्यात
चंचल-उघडून पाहा
श्रीला वीडियो शूट करायला सांगते
अमेय रैपर काढतो ,बॉक्स उघडतो ,त्यात काही चॉकलेट असतात ,तो परत बॉक्स उघडतो ,परत बॉक्स ,असे एकात एक सात बॉक्स असतात ,जेव्हा अमेय उघडत असतो,तेव्हा सगळे एन्जॉय करत असतात ,सगळे चिअर अप करत असतात ,आठव्यांदा बॉक्स उघडतो,तर त्यात गाडीत ठेवायचा गणपती असतो .
अमेय-मला घ्यायचाच होता,थैंक्स ,छान आहे.
जरा वेळ सगळयांच्या गप्पा रंगतात ,उशीर झालेला असतो,
ताई आणि जिजू त्यांच्या घरी जातात.त्यांच्या घरी झोपायला दोघी बहिणींची फैमिली जाते .
आई-चंचल तू पण खूप दमली आहेस सकाळ पासून,तुम्ही ही जाऊन झोपा
चंचल-बरं आई
अमेय याच गोष्टीची वाट पाहत होता,वर गेल्यावर दोघेही ड्रेस चेंज करतात .
चंचल-आवडलं का सर प्राईज
अमेय-हो खूप छान होतं आणि तू एक्सप्रेस केलेल्या फीलिंग खूप छान होत्या,पण हे सगळं कसं केलं
चंचल-आई बाबांच्या मदतीने ,जेव्हा आई बोलल्या की ,तुम्ही यावर्षी बर्थडे साजरा करणार नाही ,तेव्हा मला असं वाटलं की,मी तुमचा विचारच करत नाही,इतकी सेल्फीश मी कशी असू शकते आणि मग सगळं प्लान केलं ,तुम्हांला काय वाटल्ं सरप्राईज काय तुम्हीच प्लान करु शकता का ,म्हणून हा गोड धक्का
अमेय-जेव्हा चाळीत लाईट नाही हे कळालं आणि आपला फोटो आणि त्या वरचे विशेस बघितल्या ,तेव्हा मला दोन मिनीट स्वप्नच वाटल्ं ,एक गोड धक्काच होता
चंचल- चला म्हणजे,इतकं सगळं केलेल सार्थकी लागलं
अमेय-थैंक्स वाइफी ,लव्ह यू
चंचल-आता हे काय
अमेय-माझ्या बायकोच लाडाच नाव,अजून काही नाही का,अजून एक गोड धक्का द्या की
चंचल-तुमचं आपलं काहीतरीच
असं म्हणत त्याच्या मिठीत विसावली .
पुढे काय होतं हे पाहायला वाचत रहा,हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय देत रहा.
क्रमश:
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा