फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 16

Marriages are made in heaven

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 16

स्वप्नाच्या दुनियेतून आता ते सत्यात आले होते,आता तोच छोटा रूम,त्यात वरचा माळा म्हणजे त्यांचा बेडरूम,कसं ऐडजस्ट करेल ती. पण म्हणतात ना ,माणूस पाण्यात पडला की पोहायला शिकतोच, तसचं चंचलचही झालं.

आता ती बांगड्या घालत नव्हती, कडी घालत होती आणि तिने मनाची तयारी ही केली होती की, मला आता परिस्थितीशी जुळवून घ्यायचं आहे,शेवटी कसं असतं ना ,घर हे माणसांनी बहरते,नुसत्या भिंतींनी नाही बनत. तिचे सासू सासरे तिला मुलगी मानत होते ,तिची नणंद तिला बहीणीसारखी जीव लावत होती ,नवरा खूप काळजी घेत होता ,अजून काय हवं आयुष्यात आणि पैसे काय हो ,कधीपण मिळवता येतात कष्ट करून आणि ती तयारी तिची होती. अमेयलाच थोडसं असं वाटत होत की,ती ह्या रूममध्ये तिला कम्फर्टेबल नाही वाटतं,

म्हणून आज ऑफिसमधून आल्यावर त्याने आईबाबांशी बोलायचं ठरवलं, रात्री जेवल्यानंतर त्याने विषय काढला,तुम्ही दोघे बोलत होतात ना ,आपण 1 बीएचके भाड्याने घेणार होतो ना, काय झालं

बाबा-बरं झालं बोललास ,मी पण म्हणणारच होतो की ,रूम शोध ,पण जवळच्या जवळ बघ ,म्हणजे भाजीचा धंदा लावायला बरं 

अमेय-बरं बाबा ,मी माझ्या एक दोन मित्रांना सांगून ठेवतो,रूम बघायला

बाबा-चालेल 

असं म्हणून अमेय वर झोपायला जातो ,चंचलही किचन मधलं उरकून वर झोपायला जाते .

अमेय- बरं होईल आपल्या बजेट मध्ये 1बीएचके भाड्याने मिळाला तर ,तुला इथं अवघडल्यासारखं वाटतं हे मी समजू शकतो,महाबळेश्वरला असताना कशी झ-यासारखी वाहत होती, मी मिस करतो खूप तुझं ते रूप 

चंचल-असं काही नाही ,हळू हळू सवय लावत आहे ,मिळेल तुम्हाला तुमचा झरा ,थोडासा वेळ लागेल , आताही मी खूशच आहे ,सगळे माझी किती काळजी घेतात.

ती त्याच्या हातावर डोकं ठेवते आणि त्याच्या कुशीत शिरते.

अमेय मनातल्या मनात विचार करतो,किती समजून घेते ही मला.

-------------------------------------------------

दहा पंधरा दिवसांत ते चार पाच रूम पाहतात ,पण एकही रूम बजेटमध्ये बसत नाही,अमेयने लग्नासाठी लोन घेतलं होतं ,त्याचा हप्ताही जात होता,त्यामुळे रूम भाड्याने घेणं शक्य होत नव्हतं,ही सगळी परिस्थिती सगळ्यांच्या बोलण्यातून तिला समजली होती. रात्री झोपायला गेल्यावर 

चंचल-मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं 

अमेय-बोल ना ,काही हवयं का तुला

चंचल-सगळं आहे माझ्याकडे, मी काय म्हणत होते,मी पुण्याला जॉब करत होतेच ना ,इथे पण पाहू का

अमेय- तुझी इच्छा असेल ,तसं कर ,मला काही प्रोब्लेम नाही 

चंचल-पण मला इथलं काही माहित नाही

अमेय- मी एम्प्लोयमेंट न्यूज पेपर आणून देतो,त्यातूनच अप्लाई कर  आणि ताई येत जाईल तुझ्याबरोबर ,समजा कुठला कॉल आला तर.

चंचल खुश होत म्हणते थैंक यू ऐण्ड लव्ह यू.

अमेय- मग राणी सरकार खुश का ,मग आम्हांलाही खुश करा की,असं म्हणत अमेय चंचलला जवळ ओढतो,तशी तीही त्याच्या कुशीत विरघळून जाते .

दुस-या दिवशी सकाळी अमेय तिला एम्प्लोयमेंट न्यूज पेपर आणून देतो,ती तिच्या शिक्षणाप्रमाणे जॉब शोधते,त्यानुसार अर्ज पाठवून दिले,त्यातून दोन तीन महिन्यात तीन चार ठिकाणी इंटरव्हयूला गेली ,पण यश मिळाले नाही ,प्रत्येक ठिकाणी बैंकिंग मधला कंप्यूटर कोर्स केलेला नसल्यामुळे रिजेक्ट केलं होतं ,म्हणून अमेय तिला बोलतो ,तू पहिला कोर्स कर आणि नंतर जॉब शोध ,कारण प्रत्येक ठिकाणी तिला त्याच बद्दल विचारण्यात आले होते. तिलाही ते पटले ,मग तिने तीन महिन्यांचा कोर्स केला,ती सगळं मन लावून शिकली. कोर्स करता करता तिने घरातलंही शिकून घेतले.

-----------------------------------------------------

असचं जेवण बनवायला शिकत असताना तिच्याकडून चूक झाली ,तसं आई तिला म्हणाल्या,इतक्या वेळा शिकवलं तरी अजून जमत नाही,शिकवताना लक्ष कुठे होतं.

ते ऐकून चंचलला वाईट वाटलं,तिचा मूड त्यादिवशी चांगला नव्हता.

संध्याकाळी अमेय आल्यावर आईने त्याला इशारा करून सांगितलं की,आज मूड बरोबर नाही ,बाहेर घेऊन जा जरा.

अमेय-चल आपण कुठे तरी बाहेर जाऊन येऊ

चंचल-जातो ना आपण रविवारी ,मग आज काय विशेष 

अमेय-जास्त लांब नाही,गार्डन मध्ये जाऊ ,जेवायच्या वेळेत परत येऊ.

चंचल ड्रेस घालून तयार होते व दोघे गार्डन मध्ये जातात.

गार्डन मध्ये जाऊन एका बेंचवर बसतात ,चंचल नेहमीसारखं बोलत नव्हती.

अमेय-काय झालय्ं आमच्या राणी सरकारला ,आज मूड चांगला नाही वाटतं 

चंचल-काही नाही रे,असचं

अमेय- असं कसं काही नाही,तुझा चेहराच सांगतो सगळं,तू माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाहीस.

चंचल- तुला सगळचं रे कसं कळतं

अमेय-आता कळालच्ं आहे तर सांगशील का

चंचल दुपारी जे झालं ते सांगते आणि बोलते आतापर्यंत मला कधीही आई एवढ्या बोलल्या नव्हत्या ,त्यामुळे मला खूप वाईट वाटतयं.

अमेय-मला तर तुम्हां बायकांच काही कळत नाही,आईने तुला बाहेर घेऊन जायला सांगितल का तर तुझा मूड ठिक नाही  आणि तू आई रागावली म्हणून तुला वाईट वाटतंय 

चंचल-खरचं आईंनी सांगितलं

अमेय-हो ग,आईची माया अशीच असते ,तुझी आई तुला रागावली तर तुला वाईट वाटायचं का ,नाही ना ,मग तू आईला नुसतच्ं आई म्हणतेस पण दर्जा मात्र देऊ शकली नाहीस,तू या गोष्टीचा नीट विचार कर ,मग तुला पटेल.

चंचल-तुम्ही म्हणताय ना ते पटतय मला ,माझं खरचं चुकलं, इथून पुढे असं नाही होणार.

अमेय-पटलं ना तुला मग झालं तर ,चल आता माझी बायको छान हसणार आहे,हसली ,हसली 

तशी चंचल पटकन हसते,अमेय बोलतो-That's like my good wife.

दोघे तिथून निघतात ,तसं अमेय तिला बोलतो ,चल आइस्क्रीम खाऊ .

चंचल- अरे जेवण नाही झालं अजून,त्यापेक्षा आपण फैमिली पैक घरी घेऊन जाऊ,सगळे मिळून खाऊ

हे ऐकून अमेयला खूप बरं वाटलं.

घरी गेल्या गेल्या चंचलने पटकन जेवायला घेतलं आणि सगळं असं करत होती की,जसं काही झालचं नाही.

नंतर सगळ्यांनी मिळून हसत खेळत आइस्क्रीम खाल्लं,परत घरातलं वातावरण छान झालेलं पाहून सगळ्यांनाच बरं वाटतं.

पुढे काय काय गमती जमती होतात हे समजण्यासाठी वाचत रहा,हसत रहा ,आनंदी रहा आणि अभिप्राय देत रहा.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all