फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 15
अमेयचं आवरल्यावर दोघे मिळून नाष्टा करायला जातात , नाष्टा केल्यावर ते एक दोन धबधबे बघायला जातात ,पाऊस पडल्यामुळे चालू झाले आहे ,असं तिथे देखभाल करणारा माणूस सांगतो. चंचल जीन्स टॉप घालते ,अमेयने थ्री फोर्थ आणि टी शर्ट घातला होता. धबधबा लांबून खूपच सुंदर दिसत होता,जसं जसं जवळ जाईल ,तसा धबधब्याचा आवाज यायला लागला,तिथे अजून दोन तीन जोडपी होती , जरावेळ पाण्यात पाय टाकून,दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसतात,तसं चंचल अचानक अमेयच्या अंगावर पाणी उडविते.अमेय तरी कुठे माघार घेणा-यातला होता ,तोही तिला भिजवतो.आता दोघेही धबधब्याखाली जाऊन उभे राहतात .
एकमेकांना धबधब्याखाली ओढत होते ,एकमेकांना जो स्पर्श होत होता ,त्यातून मोहरत होते ,एकमेकांना चिडवत होते,आता बराच वेळ झाला होता ,भिजल्यामुळे चंचलची सगळी केस भिजली होती,तोही पूर्ण ओलाचिंब झाला होता .
दोघं एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत बाहेर येतात ,टॉवेल बरोबर आणला होता त्याने दोघेही केस पुसतात ,गाडीत बसून हॉटेलवर यायला निघतात ,गाडी झाडांमधून चाललेली असते,कोणी नाही आहे असं पाहून तो गाडी थांबवतो आणि तिच्याकडे खट्याळ नजरेने पाहतो ,तसं दोघांचे ओठ एकमेकांमध्ये गुंततात,त्यांना आजूबाजूचे काहीही भान नसते , तृप्ती झाल्यावर ते वेगळे होतात, तसं चंचलचा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता की ,ती असंही वागू शकते,दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, दोघांचा स्वतःच्या वागण्यावर बिलकूल कंट्रोल राहिला नव्हता ,लग्नानंतरच्या काही दिवस सगळ्यांची अशीच तर कंडीशन असते.
हॉटेल मध्ये आल्यावर तिथला माणूस सांगतो ,जेवण तयार आहे.
अमेय- हो ,आलोच आम्ही
दोघेही जाऊन चेंज करून आल्यावर जेवणाचा आस्वाद घेतात. जेवण झाल्यावर रूममध्ये जातात ,तसं चंचल म्हणते,रूमवरच आराम करूया .
अमेय- चालेल ,असं म्हणतं तो तिच्या जवळ जात म्हणतो,
आप की आँखो में कुछ,महके हुए से राज है,
आपसे भी खुबसूरत,आपके अंदाज है
तसं तीही स्वत:ला त्याच्या स्वाधीन करते.
------------------------------------------------------
दुस-या दिवशी संध्याकाळी ,
चंचल-तू ड्रिंक्स नाही घेत का
अमेय- घेतो कधीतरी आणि तीही बिअर
चंचल-सॉफ़्ट ड्रिंक ,माझ्या तर मैत्रिणी पण घ्यायच्या ,कधी कधी तर वाईन पण घ्यायच्या ,मलाही आग्रह करायच्या
अमेय-तू कधी घेतली की नाही मग
चंचल-एकदा टेस्ट करावी अशी इच्छा होती,पण आईबाबांना कळालं तर काय म्हणतील याचा विचार करून नाही घेतली
अमेय-तू घेणार असशील तर मी घेईन
चंचल-पण घरी कळलं तर काय म्हणतील
अमेय-अगं इथे तू आणि मीच आहे ,दुसरं कुणी नाही,मी तर घरी सांगणार नाही ,तू तुझं बघ आणि मला सांग ,एक सांगू का तू मला कंपनी दिली तर मला आवडेल
चंचल-फिर हो जाये ,ख्वाईश पुरी
ती असं सांगताच तो स्वत:साठी बिअर आणि तिच्या साठी वाईन घेऊन येतो ,पहिले स्टार्टर्स रूम मध्येच द्यायला सांगतो ,जेवण एक तासाने घेऊन या असं सांगतो ,रूममध्ये छान असं कँडल डेकोरेशन करतो ,संथ म्युझिक चालू करतो ,एकदम हॉटेलात बार मध्ये असतं तसं फिल येतं.दोन ग्लास मागवून घेतले आणि एका प्लेटमध्ये चकना ठेवला ,ती त्याची धडपड पाहून हसत असते.
अमेय-काय हसते मदत करायची सोडून
चंचल- मी पाहतेय माझ्या राजकुमाराला
अमेय-आता राजा आहे आणि तूही राजकुमारी नाही राणी आहेस ,असं म्हणत गालावर अचानक किस करतो ,तशी ती थोड्या वेळासाठी ब्लँक होते.
तसे तो म्हणतो,टेक युवर सीट मैडम
चंचल-थैंक्स म्हणत बसते
तो दोन ग्लास भरतो,एकात बिअर आणि एकात वाईन
दोघेही चिअर्स करतात आणि प्यायला लागतात ,अमेयला सवय असल्याने तो शांततेत घेतो ,चंचलला टेस्ट वेगळीच लागते म्हणून ती पटकन संपवते ,तसं अमेय बोलतो ,अगं जरा आरामात.
चंचल-अरे वेगळीच लागते
अमेय-तुला सवय नाही ना म्हणून,अजून देऊ का थोडी
चंचल- हं ,तो ओततो तसं ती तो ग्लासही गडप करते
तो तिच्याकडे पाहतच राहिला,ती बोलते ,अजून थोडी
तसं तो आता अर्धा ग्लासच भरतो ,ती तोही संपवते .
आता तिला थोडी चढते ,तसं ती ऊभं रहायचा प्रयत्न करत जागेवर उभी राहते आणि अमेयला म्हणते ,डान्स करु या .
छान गाणं लाव,तसं तो म्हणतो-अग खाली बस
चंचल-तुला नाही करायचा का ,मला करायचा आहे
अमेय-हो लावतो
चंचल- जरा छान लाव
तर तो गाणं लावतो ,लैला मैं लैला ,कैसी मैं लैला ,हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला
ती गाण्यावर बेधुंद होऊन नाचत असते ,तिच हे रूप त्याने पहिल्यांदाच पाहिलेल असतं,मनातल्या मनात म्हणतो,खरचं फटाका आहे.पुढचं गाणं असत ,आजा आजा मैं हूँ प्यार तेरा,वल्ला वल्ला इकरार तेरा, दोघेही डान्स करत असतात ,तितक्यात दार वाजतं ,तसं चंचल म्हणते ,ए कोण ,एहसान फरामोश है ,जो हमें डिस्टर्ब कर रहा है.
अमेयच्या लक्षात येतं,जेवण आलं असेल
अमेय - ओ मेरी झांसी की राणी ,इथेच बस आणि काही बोलू नको ,जेवण आलय्ं असं म्हणत तो तिला तोंडावर बोट ठेवून दाखवतो.
चंचलही तोंडावर बोट ठेवते,ते पाहून त्याला हसायला येतं
तो दरवाजा उघडतो आणि त्याला सांगतो ,ठेव तिथे
तो जेवण ठेवत असतो ,तेव्हा चंचल कडे पाहून त्यालाही हसायला येतं .ते पाहून अमेयला ओशाळल्या सारखं वाटत होतं,तसं त्याला रीलाक्स करण्यासाठी म्हणतो,चालू द्या तुमचं ,
नवीन आहात म्हणून,काही दिवसांनी तूम्हाला तोंडावर बोट ठेवाव लागेल,अनुभवाचे बोल आहे.
असं म्हणत तो जातो आणि सांगतो ,प्लेट सकाळी नेईन.
तो गेल्यावर अमेय प्लेट घेतो ,जेवण वाढतो ,तिला खाली बसवतो ,तर ती म्हणते ,डान्स करायचा आहे,सगळा मूड खराब केला त्याने.
अमेय-जेवण झाल्यावर करु ,नाहीतर जेवण थंड होईल.
तसं ती शहाण्या मुलासारखं ऐकते ,ती एक घास घेते पण तो नीट तोंडात नाही जात ,अमेय तिला खुणावतो की,मी भरवतो , तसं ती शांत बसते ,अमेय एक घास तिला आणि एक घास स्वत: खात असतो.
चंचल- I Love You
अमेय-I Love You too
जेवण झाल्यावर तो गाणं लावतो ,तर गाणं लागतं,दो दिल मिल रहे है ,मगर चुपके चुपके ,दोघेही हातात हात घेऊन आणि एक हात एकमेकांच्या कमरेत टाकत एकमेकांच्या डोळ्यांत पाहत कपल डान्स करतात ,मग अमेय तिला हळूच उचलून घेत बेडवर ठेवतो ,तसं चंचल पुढाकार घेत त्याच चुंबन घेते ,आज तो तिच एक वेगळच बोल्ड रुप पाहतो ,ही सगळी वाईनची कमाल ,असं म्हणत तो मनातल्या मनात तृप्त होत ,शेवटी एकमेकांच्या बाहुपाशात झोकून देतात.
दुस-या दिवशी सकाळी तिचं डोक जड झालेलं असतं,ती उठायचा प्रयत्न करते ,तर तो परत तिला कुशीत घेतो आणि म्हणतो ,आपकी ये अदा हमको पसंद आ गयी ,तसं रात्रीचे तिचे पराक्रम आठवून ती लाजते ,तसं तो म्हणतो ,सकाळ गोड करा ,तसं ती गालावर किस करुन आंघोळीला पळते.
दोन तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येतात ,एलिफंट हेड पॉइंटला जातात ,तर तिथल निसर्ग सौंदर्य खूप छान होतं ,पण अमेयच्ं लक्ष मात्र चंचल वर होतं आणि तो गाणं गुणगुणत होता,
तेरे चेहरे से नजर नहीं हटती,नजारे हम क्या देखे,
तुझे मिलके भी प्यास नहीं घटती, नजारे हम क्या देखे.
तसं चंचल - दिल ने ये कहा है दिल से,मोहब्बत हो गयी है तुमसे.
लग्न झाल्यानंतर,रोमँटीक वातावरणात ही गाणी आठवणारच्ं ना .
जाता जाता ते एका जुन्या महाबळेश्वर मधील शंकराच्या मंदिरात जातात ,मनोभावे पूजा करतात .
चंचलने तर पावसात भिजत आणि तेही रस्त्यावर उभं राहून पहिल्यांदाच चहाचा आस्वाद टपरीवर त्याच्याबरोबर घेतला . रस्त्यावर असणा-या ज्यूस सेंटर मध्ये स्ट्रॉबेरी ज्यूसचा आनंद लुटतात,जी ताजी ताजी शेजारच्या मळ्यातल्या स्ट्रॉबेरी पासून बनवलेली असतात. अशा अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या , की ज्या करायच्या होत्या पण आई वडिलांच्या धाकामुळे करु शकली नव्हती,आता काय दोघे राजा राणी आणि राजाही हट्ट पुरवणारा असल्यावर काय पाहायचे.
एका दिवशी टेबल लैंडला जातात,तिथे घोड्यावर बसतात ,छान एन्जॉय करतात ,महाबळेश्वर मधील खूप सा-या आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवून त्यांचा घरी निघायचा दिवस उजाडतो , गाडी मुंबईला परत निघते ,जाता जाता माप्रो गार्डनला जातात ,तिथे सैंडविच आणि वेगवेगळ्या ड्रिंकचा आस्वाद घेतात, घरी नेण्यासाठी जाम आणि काही सिरप घेतात आणि परत आपल्या घरट्याकडे पावले वळतात.
--------------------------------------------------
आता पर्यंतचे सगळे दिवस कसे स्वप्नवत गेले होते,आता ख-या आयुष्याला सुरुवात होणार होती ,त्यात खरी कसोटी लागणार होती की ,खरचं ते एकमेकांवर प्रेम करतात की नाही ,कारण असं म्हणतात,अर्धांगिनी म्हणजे नुसती आनंदातच बरोबर नाही तर ,येणा-या दु:खांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पतीच्या पाठी खंबीरपणे उभी राहते.
ते घरी पोहोचतात ,तसं आईबाबा विचारतात-प्रवास कसा झाला
अमेय -छान झाला
आई-तुम्ही दोघे तोंड हाटापाय धुवून या ,तोवर मी चहा ठेवते
चंचल-आई ,मी ठेवते ,बसा तुम्ही
आई-अगं तुम्ही आताच दमून आलात ,मी ठेवते ,आता काय कामे करायचीच आहेत ,ती काय कुणाला चुकलीत का
असं म्हणून त्या चहा करायला ठेवतात.
मग चौघे मिळून चहा घेतात.
अमेय दुस-या दिवशी ऑफिसला जाणार असतो .
काय होतं पुढे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा, आनंदात रहा ,अभिप्राय देत रहा.
रोज एक भाग पोस्ट करणे हा प्रामाणिक प्रयत्न असतो.
क्रमशः
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा