
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 14
गेमझोनला जाऊन ते वेगवेगळे गेम खेळतात ,रिंग टाकायच्या गेममध्ये अमेय तिला छोटा टेडीबिअर जिंकून देतो ,तशी ती खुश होते ,तिथे जवळच इलेक्ट्रीक dashing कारचा गेम असतो ,दोघेही एकमेकांना चांगलीच धडक देत गेम एन्जॉय करतात.ती त्याला विचारते ,घरी पोहोचल्याचा फोन केला होता का , तो बोलतो- हो पोहोचल्यावरच केला होता.
तिकडून ते बोटींगसाठी जातात ,पण ते बंद झालेले असते आणि पावसाचे वातावरण झालेले असते ,तर ते परत फार्म हाऊस वर येतात ,आता अमेय त्यांच्या रूमच्या ऐवजी दुस-या रूममध्ये नेतो ,तिला सांगतो मी बैग घेऊन आलो,आपल्याला रूम चेंज करायला सांगितली आहे.
तो तिच्यासाठी एक गिफ्ट आणि मेकअपची पर्स आणतो ,तिच्या हातात देतो आणि बोलतो ,रेडी हो
चंचल-यात काय आहे
अमेय -तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट,तू आता हेच घाल
चंचल- अरे वा
ती लहान मुलासारखं त्याच्या हातातून घेते आणि खोलते
चंचल-खुपच सुंदर,पण हे कधी घेतलं
अमेय-दिप्तीला ड्रेस घेतला त्या दिवशी,चल आता आवर पटकन ,मी ही रेडी होतो,असं म्हणत तो जातो.
चंचल मनातल्या मनात विचार करत म्हणते,सगळं सामान नाही आणलं म्हणजे नककीच काहितरी सरप्राईज ,कळेलच थोड्या वेळात काय आहे ते असं म्हणत गुणगुणत तयार होते
प्यार दिवाना होता है,मस्ताना होता है,
हर खुशी से,हर गम से बेगाना होता है
थोड्या वेळाने अमेय येतो ,रेड कलरच टी शर्ट आणि जीन्स घातलेली असते ,एकदम हँडसम दिसत होता.
चंचल-एकदम हँडसम हं,काय सरप्राईज आहे
अमेय-कळेलच तुला ,पण तू पण ह्या ड्रेस मध्ये एकदम फटाका दिसत आहे,माझा थोडा तरी विचार कर
चंचल- हे सगळं तुझ्यासाठी तर आहे आणि माझ्याकडेही एक सरप्राईज आहे
अमेय-अरे वा,कधी मिळणार
चंचल- वेळ आल्यावर
अमेय-आणि वेळ कधी येणार
चंचल-लवकरच
अमेय- मी वाट पाहत आहे ,बरं चल,निघुया
चंचल- पण कुठे
अमेय-तुझा माझ्यावर विश्वास आहे ना
चंचल-हो आहे
अमेय-मग चल तर
अमेय तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि तिचा हात पकडून घेऊन जातो.
रूममध्ये गेल्यावर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि बोलतो - Welcome in my life ,as a wife
it's my promise, we will enjoy our life
upto the end of our life.
ती समोर पाहून थक्कच होते ,पुढच्या भिंतीवर गुलाबाच्या पाकळ्यांच हार्ट बनवलं होतं,आणि त्यात तिचा फोटो होता .
बेडच्या बाजुला टीपॉय वर फुलांचा छान हार्टशेप होता आणि त्यावर केक होता , टिपॉयच्या दोन बाजूला भारतीय बैठक ठेवली होती आणि कँडल लाईट डिनरची व्यवस्था केली होती.
मच्छरदाणीच्या भोवती फुलांच्या माळा सोडल्या होत्या आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या ,ते सारं पाहून ती लाजली .
अमेय गुढग्यावर बसत तिच्याकडे गुलाबाच्ं फुल देत ,
आपकी इसी अदा पे तो हम फिदा है.इसी बात पे अर्ज करता हूँ
अमेय - मैं शायर तो नहीं , मगर ये हँसी,जबसे देखा ,मैने तुझको ,शायरी आ गई
चंचल-वाह ,वाह ,क्या बात है ,इसी बात पे हम भी कुछ अर्ज करना चाहेंगे अगर आपकी इजाजत है तो
अमेय-हमारी क्या हिम्मत की हम आपको नहीं बोले
चंचल-ये श्याम मस्तानी ,मदहोश किये जाय,
मुझे डोर कोई खिंचे,तेरी और लिये जाय
असं म्हणून ती त्याच्या छाती वर आपलं डोकं ठेवते.
तसं अमेय खिशातून रिमोट काढतो आणि गाणं लावतो
ये मेरे हमसफर,एक जरा इंतजार,
सुन सदाई दे रही है,मंजिल प्यार की
पूर्ण गाणं संपत आणि दुसरं लागत
हमको हमींसे चुरा लो,दिल में कहीं तुम छुपा लो
तसं इतक्या वेळ चंचल तसंच डोकं ठेवून दोघेही जाग्यावरच डान्स करत होते ,हे गाणं लागताच चंचल बाजुला होऊन त्याच्या डोळ्यांत पाहते ,तसं तो भिंतीवर लावलेल्या हार्टकडे बोट दाखवतो ,ती लाजते आणि त्याला मिठी मारते .
---------------------------------------------------
तसं तो तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो ,केक कट करायचा आहे ,चला .
दोघेही टिपॉय जवळ येतात ,दोघे मिळून केक कट करतात ,एकमेकांना भरवतात ,अमेय थोडासा केक तिच्या नाकाला लावतो ,तीही चिडून लावते ,अमेय तिच्या नाकाचा केक जिभेने चाटतो, तसं तीही करते मग काय ओठ थोडेच थांबणार ,तेही त्यांच काम करुन घेतात. चंचल त्याच्या अशा वागण्याने मोहरून जाते,कारण तिने असा कधीच विचार केला नव्हता की असं काही होईल,तिच्या सगळ्या मैत्रिणींनी सांगितले होते,ते फक्त पिक्चर मध्ये असते ,प्रत्यक्षात असं काही होत नाही ,त्यामुळे जास्त अपेक्षा ठेऊ नको . पण इथे मात्र तिला एखाद्या चित्रपटाची हीरोइन आणि अमेय हिरो असे वाटत होते,ती तिच्या विचारात मग्न असते ,तर अमेय तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत विचारतो-काय झालं,खुश आहेस ना ,मग डोळ्यांत पाणी का
चंचल-आनंदाश्रू
मग तो ते बोटावर टिपत म्हणतो ,मग हे खाली नाही पडले पाहिजे.
तसं ती त्याच्या कडे पाहुन हसते आणि त्याला लाडाने मारत बोलते ,तुझं आपलं काहीतरीच .
अमेय-चला राणी सरकार भूक नाही लागली का
चंचल -हो ,पण अशीच येऊ का
अमेय - काय झालं छान गाऊन आहे आणि रेड कलर तुझ्यावर एकदम छान दिसतोय आणि आपण दोघेच आहोत .
चंचल-ठिक आहे चल
असं म्हणून दोघे जेवायला जातात ,तिच्या आवडीचं सगळं जेवण असतं,तशी ती अमेय कडे पाहत हसते
चंचल- बरीच माहिती गोळा केली आहे माझ्याबद्दल,खबरी कोण आहे
अमेय-ओळख पाहू
चंचल- मंगेश
अमेय-नाही ,दिप्ती,मग आता तुला मला काहितरी द्यावे लागेल
चंचल-अरे हो ,देणार पण रूम मध्ये गेल्यावर
दोघे जेवत असतात ,जेवण करत असतानाच पाऊस येतो,तसं तिच्या चेह-याचा रंग बदलतो,ते पाहून,
अमेय-काय ग काय झालं
चंचल-काही नाही
अमेय-नक्की का
चंचल-पावसात भिजायची इच्छा होत आहे
अमेय-मग काय त्यात ,चल भिजू ,नेकी और पुछ पुछ
चंचल-मला वाटलं तुम्हाला आवडत नसेल
तोपर्यंत अमेय तिचा हात धरून शेडच्या बाहेर येऊन उभा राहतो ,तसं ती पावसात गिरक्या घेत असते आणि मनात दोघांच्याही गाणं चालू असतं,
अमेय-भिगी भिगी रातों में,मीठी मीठी बातों में,
ऐसी बरसातों में ,कैसा लगता है
चंचल-ऐसा लगता है,तुम बनके बादल,
मेरे बदन को ,भिगो के छेड रहे हो
थोड्या वेळाने चंचल शेडमध्ये येते आणि तिला हुडहुडी भरली आहे,हे पाहून अमेय पण शेडमध्ये येतो आणि बोलतो ,चल जाऊ रूमवर.
दोघेही रूमवर जातात ,तसं अमेय तिला बोलतो ,तू चेंज करुन ये ,तुला जास्त थंडी वाजत आहे.
चंचल दुसरा गाऊन घेऊन चेंज करायला जातो ,जो खास तिने अमेयला सरप्राईज देण्यासाठी तिच्या मैत्रिणी बरोबर जाऊन खास या दिवसासाठी घेतला होता.
गाऊन नेटेड होता आणि त्यावर शिफोनचा छान श्रग होता , त्यामूळे व्हल्गर वाटत नव्हता.
ती फ्रेश होऊन येइस्तोवर अमेय तिथल्या माणसाला शेकोटी पेटवून द्यायला लावतो.शेकोटी वर हात धरून तो शेकत असतो ,तसं बाथरुमचा दरवाजा उघडल्याचा आवाज होतो म्हणून तो मागे वळून पाहतो ,तर पाहतच राहतो ,चंचल मात्र त्याला असं पाहून लाजून चूर चूर होते ,तसा तो तिच्याकडे जायला लागतो,तसं तिचं ऋदय जोरजोरात धडकायला लागतं.
तो तिच्याजवळ जाऊन गालावर किस करतो आणि म्हणतो आलोच ,तोपर्यंत तू जरा स्वत:ला गरम कर ,तशी ती लाजते.
तो त्यावर बोलतो -अगं म्हणजे शेकोटी जवळ जाऊन बस ,नाही तर सर्दी व्हायची आणि मला बोलणी ऐकावी लागतील.
तसं ती मानेनेच हो म्हणते.
ती तिथे जाऊन बसते.
-------------------------------------------------
ती शेकोटी समोर बसल्या बसल्या विचार करत असते ,ह्याला आपल्या मनात काय चाललय हे लगेच समजतं, कितीही प्रयत्न केला तरी त्याला समजतं ,हेच का प्रेम आहे ,ती लग्न ठरल्यापासूनच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ,ते सर्व आठवून एकटीच गालातल्या गालात हसत असते ,अमेय बाहेर येतो ,तिच्याकडे बघतच राहतो ,त्या गाऊनमध्ये ती खूपच छान दिसत होती ,त्यात तिचे ते ओले केस आणि गालातल्या गालात हसत होती ,हे तिच्या सौंदर्यात भर टाकत होते ,आता तो तिच्या पासून दूर राहू शकत नव्हता आणि तिच्या वागण्यातुनही हेच जाणवत होते की,तीही तेवढीच आतुर आहे. तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि तिचे निरिक्षण करत असतो, तिचं त्याच्याकडे लक्ष जातं,तसं ती विचारते -कधी आलास
अमेय-तू गालातल्या गालात हसत होती तेव्हा
चंचल-हे घे तुझ्यासाठी गिफ्ट
अमेय-वॉव,छान आहे ब्रेसलेट ,पण इतकं महाग घ्यायची काय गरज होती
चंचल-अरे चांदीचे तर आहे ,मला सूनमुखाला मिळालेल्या पैशातून घेतलं,आवडलं का तुला
अमेय-हो ,छान आहे,मला असचं हवं होतं,तुझा खबरी कोण
चंचल-ओळख पाहू
अमेय-ताई ना
चंचल-बरोबर ओळखलं,तुला सगळचं कसं कळतं
अमेय-मघाच बाकी आहे लक्षात आहे ना
तिचे जे केस तोंडावर आले होते ,ते बाजुला करत तो तिच्या कपाळापासून सुरुवात करुन ओठांवर आपलं बोट आणून ठेवते ,तीही डोळे बंद करून ते क्षण जगत असते , दोघेही जवळ येतात ,ओठांवर ओठ टेकतात ,दोघांचा श्वास वरखाली होऊ लागतो ,दोघेही मीलनासाठी आतुर झालेले असतात,तो तिला उचलून बेडवर नेतो,तो तिला फ़ुलवत जातो आणि ती फुलत जाते व त्याला स्वत:हून समर्पित होते, आज ख-या
अर्थाने दोघेही परिपूर्ण झालेले असतात ,एकमेकांत बेधूंद होऊन धुंद झालेले असतात,पहाट कधी होते ,तेही त्यांना कळत नाही,आता तृप्त होऊन एकमेकांच्या कुशीत विसावले असतात.
सकाळी जरा उशिराच जाग येते, चंचल ऊठून आंघोळीला जाते,आंघोळ करताना रात्रीचे क्षण आठवून लाजत असते .
आंघोळ करून बाहेर आल्यावर ती अमेयला उठवायला जाते ,तसं तो तिला जवळ ओढत म्हणतो,झोप ना जरा वेळ,तसं ती म्हणते ,मला भूक लागली आहे,उठा लवकर ,चावटपणा कमी करा .
अमेय -आता तुम्हाला भूक लागली म्हटल्या वर उठलं तर पाहिजे पण माझी सकाळ गोड कर ना
चंचल त्याच्या गालावर किस करते आणि म्हणते ,चला उठा आता.
अमेय-This is not fair
चंचल-Everything is Fair in Love and War
अमेय-समजलं आता तुम्ही लक्षात ठेवा,अजून तीन दिवस आहेत माझ्याकडं
असं म्हणत आंघोळीला जातो.
पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदी रहा आणि अभिप्राय देत राहा.
क्रमश:
रुपाली थोरात