Jan 23, 2021
स्पर्धा

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 26

Read Later
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 26

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 26

सकाळी ऑफिसला निघाल्यावरही अमेय शांतच होता,चंचलने ठरवले, संध्याकाळी याबद्दल मी त्याच्याशी बोलेल.

संध्याकाळी अमेयने चंचलला पिकअप केले ,चंचल त्याला म्हणाली,चल जरा वेळ आपण आपल्या नेहमीच्या बागेत जाऊन बसू

अमेय- आज अचानक काय बागेत जायची आठवण झाली

चंचल-अरे असचं,नेतोस ना

अमेय- जशी आपली आज्ञा राणी सरकार ,तसही मालक सांगेल तिथं ड्राईवर ने गाडी नेली पाहिजे नाही का?

चंचल- हो तसं ही माझा ड्राईवर माझ्या शब्दा बाहेर नाही

तितक्यात ज्या बागेत कधी कधी ते जाऊन बसत ,तसं अमेयने गाडी पार्क केली,दोघेही आत जाऊन त्यांच्या नेहमीच्या जागी बसले.

चंचल-आता मला सांग ,तू रात्री पासून टेन्शन मध्ये का आहे ?

अमेय- कुठे काय,काही नाही

चंचल-मी काय तुझ्या सारखी मनकवडी नाही ,पण काल पासून तुझा मूड चांगला नाही, हे तर समजले ,आता काय झालं सांगशील का,तू काही सांगितलं तर आपण काहितरी मार्ग काढू

अमेय-खरचं काही नाही ,असचं

चंचल-किती भाव खाणार आहे ,मला एकच भाऊ आहे रे

अमेय-तुला काय गंमत सुचत आहे

चंचल-तू काहितरी कारणाने हसावं ,तर तू आपला माझ्यावरच चिडतोय,ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं,चल जावू

अमेय-नाही ,बस ,सांगतो,पण तुला कसं सांगू ते कळत नाही,तू सगळ्यांसाठी एवढं करते आणि मी साधी तुझी एक इच्छा पूर्ण नाही करु शकत 

चंचल-मी तर आनंदात आहे आणि माझी कोणती अशी इच्छा आहे की ,तू पूर्ण नाही करू शकत,मला नाही आठवत,तू सांगितल तर बरं होईल 

अमेय- अगं तू नाही का ,त्या दिवशी बोलली होती की, आपण लग्नाच्या वाढदिवसाला दोन तीन दिवस बाहेर जाऊ, अगं पण तुला तर माहितच आहे की ,घरात किती खर्च झालाय ,आपल्या लग्नानंतर आणि दोन तीन दिवस बाहेर जायचे म्हटलं तरी कमीत कमी पंधरा ,वीस हजार रुपये हवेत ,आता माझ्याकडे नाही आणि मला बाबांकडून मागायला बरं नाही वाटत.

चंचल-अरे एवढ्या क्षुल्लक कारणाच तू एवढे कशाला टेन्शन घेतो ,प्लान 2पण तयार आहे माझ्याकडे,आपण लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अलिबागला बीच वर जाऊ शकतो आणि सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ,मग तर ठिक आहे ना.

आता त्याचा चेहरा लगेच खुलतो .

अमेय-मला वाटलं ,नाही म्हटलो ,तर तुला राग येईल 

चंचल-असं काही नाही रे, तू माझ्या बरोबर आहेस हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,मग आता खुश ना आणि इथून पुढे असं काही वाटतं असेल तर बोलून दाखवत जा ,मी अंतर्ज्ञानी नाही आहे .

अमेय-बरं झालं, तू इथे आणलस ,मनावरच्ं ओझं कमी झालं,चलो फिर इस बात पे पाणी पुरी हो जाये.

चंचल-हो जाये 

असं म्हणत,ते त्यांच्या नेहमीच्या पाणी पुरी वाल्याकडे जातात आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊन घरी जातात.

----------------------------------------------------

ताई आणि चंचलचं नातं अगदी बहिणीसारखं असतं,त्या प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगायच्या. अमेयला फिरायला जाण्याचे टेन्शन आले होते,हेही सांगितले . ताईला असं वाटलं किती समजून घेते ,आपणच काहितरी करुया. ताई विचार करत असते ,काय करता येईल आणि अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना येते ,ती दोन्ही बहिणींना फोन करून आपला प्लान सांगते ,आता लग्नाच्या वाढदिवसाला फक्त एकच आठवडा राहिला होता ,आईंना फोन येतो,सगळे जावई आणि लेकी रविवारी सहजच भेटायला येणार आहे.

रविवारी दुपारी सगळे येणार ,म्हणून चंचल आणि आई सर्व जेवण बनवून घेतात ,म्हणजे आल्यावर सगळ्यांशी जरा गप्पा मारता येतील ,सगळे येतात ,जेवणं होतात ,गप्पा होतात ,चार वाजता सगळ्यांसाठी चंचल चहा ठेवते ,चहा घेतल्यावर सगळे चंचलला बाहेर बोलावतात ,अमेय तिथेच सगळ्यांसोबत बसलेला असतो , मोठे  भावजी चंचलला विचारतात ,मग वाढदिवसाला कुठे फिरायला जाणार आहात .

चंचल-अजून ठरलं नाही

छोटे भावजी- हे घ्या मग

चंचल-काय आहे त्यात

अमेय हो म्हणतो,मग चंचल घेते आणि उघडून पाहते

 छोटे भावजी-हो हैद्राबादचे तिकिट आहे ,तुम्हा दोघांसाठी आणि राहायचं टेन्शन घेऊ नका,आम्ही इकडे शिफ्ट झालोय,पण फ्लैट अजून रिकामा नाही केला ,सगळं सामानही आहे ,फक्त येताना आधी जसं होतं ,तसं ठेवून या ,मी तिथल्या मालकाला फोन करून सांगतो ,ते कुणाकडून तरी स्वच्छ करून घेतील , तुम्ही आरामात रहा आणि तिथे एक ओळखीच्या मित्राची गाडी सांगतो ,तो ड्राईवर तिथल्ं सगळं तुम्हाला फिरवून आणेल.

अमेय-अहो जिजू,गाडी कशाला आम्ही करु ऐडजस्ट 

दोन नंबर भावजी- असं कसं नाही ,ती काळजी मी आणि मोठे भावजी मिळून घेणार आहोत ,हो ना भावजी 

मोठे भावजी- साले साहेब तुम्ही असं का म्हणत आहे हे माहित आहे आम्हाला त्याची तरतूद आमच्या दोघांकडून असं म्हणत ते एक पाकिट अमेयला देतात.

बाबा-आता तुम्ही सगळे एवढं करत आहात ,तर आम्ही तरी का मागे राहू ,ते आईला म्हणतात ,हे पाकिट दे त्यांना .

तसं आई बाबांच्या हातातलं पाकिट घेऊन चंचल कडे देतात.

चंचलचे डोळे भरून येतात,तसं सगळे म्हणतात ,आता जायची तयारी करा

चंचल डोळे पुसत हो म्हणते - पण हे सगळं झालं कसं,मी तर अमेयला सांगितलं होतं की,आपण अलिबागला जाऊ

दोन नंबर ताई- ही सगळी ताईची आयडीया ,पण तुम्ही दोघे खुश आहात ना 

अमेय-मी तर खुश आहे,कारण माझ्या बायकोची इच्छा पूर्ण होणार आहे ,तिचं मला माहित नाही

चंचल-हे सगळं पाहून मला या क्षणाला खरं सांगू का, फिरायला जायला मिळणार ,यापेक्षा तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आहात आणि तुम्ही सगळे माझा एवढा विचार करता ,ही गोष्ट माझ्यासाठी जास्त सुखावह आहे,असेच तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद आमच्यावर असू द्या.

सगळे एकत्रच म्हणतात -तथास्तु 

आणि सगळे हसतात ,तशी चंचलही हसायला लागते.

------------------------------------------------------------

चंचल आणि अमेय जाण्याचा दिवस उजाडतो,दोघेही तयार असतात ,आई अमेयला सांगते ,चंचलची आणि तुझी काळजी घे,रोज एक तरी फोन करत जा.शेवटी ट्रेन मध्ये बसून प्रवासाला सुरुवात होते,तेथे सकाळी  पोहोचल्यावर भावजींनी घरी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली असते ,घरी जातात ,घर साफ करून घेतलेले असते ,बेड मधून अंथरुण आणि पांघरुण काढतात ,चंचल एक चादर बेड वर अंथरते ,तितक्यात घरमालक चहा आणून देतात ,अमेय म्हणतो ,आम्ही बाहेर जाऊन घेतला असता ,घरमालक म्हणतात,असं कसं,अतिथी देवो भव. इथे जवळ दोन रेस्टॉरंट आहे ,तिथे जेवण चांगले मिळते,असं म्हणून ते निघून जातात ,अमेय घरी फोन करून , व्यवस्थित पोहोचलो असे सांगतो.

ड्राईवर सांगून जातो की ,मी एक वाजता घ्यायला येतो,तो आल्यावर सलारजंग मुजियमला घेऊन जातो ,तिथे सगळ्या पुराणकाळातील वस्तूंचा संग्रह होता,त्या नंतर तो त्यांना हुसैन सागर तलावला नेतो ,तो कृत्रीम तलाव भारतातील एका मोठ्या तलावापैकी म्हणून गणला जातो ,त्या तलावाच्या मध्ये मोठी बुध्दांची मुर्ती आहे ,जिच्ं उदघाटन दलाई लामा यांच्या हस्ते झालं,ही दोन स्थळ करता करता आठ वाजतात ,तो त्यांना घराजवळच्या एका रेस्टॉरंट मध्ये सोडतो आणि सांगतो ,उद्या सकाळी आठ वाजता तयार राहा ,उद्या आपण रामोजी फिल्म सिटीला जाणार आहोत ,असं सांगून जातो ,दोघेही जेवतात आणि रूमवर जायला निघतात,अमेय मनात विचार करत असतो,अशा फिरण्याच्या गडबडीत मी तिच्यासाठी काहिच सरप्राइज प्लान करु शकणार नाही.

आजची त्यांची रात्र मात्र एकमेकांच्या मिठीत छान जाते , कारण इथे आजुबाजूला कोणी आहे ,याची भिती नसते ,दोघे आझाद पंछी गगन में उड रहे थे,त्यामुळे सकाळी त्यांना सव्वा सातला जाग येते ,चंचल उठायचा प्रयत्न करते,तर अमेय तिला जवळ ओढतो ,तसं ती म्हणते,हैप्पी अनिवरसरी,अरे आठ वाजता ड्राईवर येणार आहे,तसं तो तिला सोडतो ,ती आंघोळीला गेलीय ,हे पाहून तो घरमालकांकडे जातो आणि त्यांना पैसे देऊन काही वस्तू आणायला सांगतो ,ते स्वभावाने चांगले असतात ,ते लगेच तयार होतात आणि रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण देतात ,तसं तो संकोचत नाही म्हणतो,तसं ते डोळा मारत त्याला म्हणतात,जेवणाची तयारी करायला चंचलला पाठवून दे,म्हणजे तुला तुझं काम करायला वेळ मिळेल.

अमेय-काका ,यू आर ग्रेट आणि तुमच्या मदती बद्दल आभारी

घरमालक-बसं काय,काका पण म्हणतो आणि आभार प्रदर्शन करून परकं करतोस 

अमेय-चला ,मी येतो ,आज रामोजी फिल्म सिटी

इकडे चंचल आंघोळी वरून येते ,अमेय दिसत नाही म्हणून , शोधतच्ं असते तर अमेय आत येताना दिसतो.

चंचल-अरे कुठे गेलेलास 

अमेय-अगं काकांनी बोलावलं होतं,संध्याकाळी आपल्याला जेवायला बोलावलं आहे 

चंचल-छान आहेत दोघं ,पण संध्याकाळी येताना त्यांच्या साठी काहितरी स्वीट घ्यायची आठवण ठेव ,असं रिकाम्या हाताने जायला बरं नाही वाटतं आणि आवर रे पटकन.

अमेय -हा गेलो आणि हा आलो 

दहा मिनिटातच तो रेडी होतो ,चंचलही रेडीच असते,ड्राईवरचा फोन येतो ,तसे ते दोघे कुलूप लावून खाली जातात. रामोजी फिल्म सीटीला गेल्यावर पूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही,तिथे खुप सारे पिक्चरचे सेट उभे केले होते,तेथे फोटो सेशनही भरपूर केले ,सहा वाजता ते बाहेर आले ,ड्राईवर वाट पाहातच होता ,त्याने त्यांना घरी सोडले,येता येता एक स्वीट बॉक्सही घेतला होता. रूमवर गेल्यावर चंचल फ्रेश होते ,तसा अमेय म्हणतो, तू काकूंना मदत करायला जा ,तशी ती हो म्हणते आणि जाते ,ती गेल्यावर काका येतात आणि सगळ्या वस्तू त्याला देतात , लवकर आवरून ये जेवायला. अमेय सगळीकडे बलुन्स लावतो बेडवर फुलं पसरवून ठेवतो,रूम मध्ये सगळीकडे मेणबत्त्या ठेवतो आणि जेवायला जातो , जेवण झाल्यावर चंचल काकूंना आवरू लागत असते ,तोवर तो येऊन मेणबत्त्या पेटवतो,लाईटस् ऑफ़ करतो. चंचल येते लाईटस ऑफ असतात ,पण मेणबत्त्या लावल्यामुळे खूप छान वाटत असत ,ती थोडसं पाहत पुढे येते आणि अमेय हाक मारते ,ती आता फैन खाली उभी असते ,अमेय फैन चालू करतो,सगळया फुलांच्या  पाकळ्या तिच्या अंगावर पडतात.

तसं ती एकदम मोहरुन जाते ,तसा अमेय तिच्या समोर  गुलाबाच फूल घेऊन ऊभं राहतो आणि बोलतो ,आय लव्ह यू.

तसं ती सुध्दा,लव्ह यू टू म्हणते ,दोघे एकमेकांना मिठी मारतात, तसं ती म्हणते ,थांब मी फ्रेश होऊन येते.

अमेय-चालेल 

ती जाते ,मस्त शॉवर वॉश घेते आणि बाहेर येते ,तर अमेय तिला पाहातच राहतो ,तिने फक्त गुढग्या पर्यंत बाथरोब घातला होता ,केस ओले होते ,त्याचं पाणी चेह-यावर होतं ,आज तो तिचं हे वेगळेच रूप पाहत होता ,तो त्याला रोखू नाही शकला आणि दोघे एकमेकांत विलीन झाले , सकाळी चंचल त्याचा हात बाजूला करून उठायचा प्रयत्न करत होती ,तर तो तिला आपल्या जवळ खेचत ,तिच्या गालवर किस करतो आणि कानात बोलतो ,तुझी अशी वेग वेगळी रूपे पाहण्यासाठी वर्षातून एकदा तरी दोन दिवस तरी फिरायला जायचेच .

चंचल-चल,चावट कुठला ,आता ऊठू दे ,नंतरच नंतर बघू

असं म्हणत ती उठते,आवरते ,तोही आवरतो,त्या दिवशी ते नेहरु चिडीयाघर ,चांद महल आणि नंतर गोलकोंडा किल्ला पाहायला जातात ,किल्ल्यात रात्री लाईट आणि साउंड शो पाहून ते घरी येतात.

आज त्यांचा हैदराबाद मधला शेवटचा दिवस असतो ,ते बिर्ला मंदिर आणि नंतर चार मिनारला जातात ,चंचल तिथे सगळ्यां साठी लाखेच्या बांगड्या घेते ,घरी येऊन निघण्याची तयारी करतात ,घरातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवतात , घरमालकांना भेटून त्यांचे आभार मानतात ,तुम्ही मुंबईला या असं निमंत्रण देतात आणि आपल्या बरोबर खूप सा-या आठवणी घेऊन त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

घरी आल्यावर सगळ्यां साठी काही ना काही आणले होते ,ते देतात ,जास्त महाग नव्हते ,पण आठवण म्हणून प्रेमाने आणलेले, लग्नाचा पहिला वाढदिवस तर सगळ्यां मुळे छान साजरा होतो,त्यातून एनर्जी घेऊन पुढील दिवस आनंदात जात असतात ,सहा महिने कसे निघून जातात कळत नाही,एक दिवस आई चंचलला म्हणतात ,मला तुझ्याशी महत्त्वाच बोलायच्ं आहे ,काय बोलायचं असेल त्यांना चंचलशी हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

 

क्रमशः 

रुपाली थोरात 

 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat