Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 23

Marriage function brings all relatives together

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 23

सगळे लग्न घरी येतात, अमेयच्या आईला दोघींकडे बघून जाणवतं की ,या रडल्यात पण त्या सगळ्यांसमोर काही बोलत नाही ,बाकीचे पाहुणे गेलेले असतात ,आता घरातलेच सगळे असतात, सगळे जेवायला बसतात,  पण जेवणात कुणाचही लक्ष नसतं,प्रत्येकाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते,प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहत होते , सगळ्यांचा मूड नसतो. नंतर ताई घरी काय झाले ,ते आईला सांगतात ,त्यावर आई त्यांनाच म्हणतात ,इथून पुढे कुणाचही जबाबदारीच काम करायचं नाही आणि देवाला प्रार्थना करतात की, मदत कर आणि सामान मिळू दे. 

संध्याकाळी मामांनी ज्या मित्राला रिक्षाचा नंबर दिला होता,त्यांना त्याचा फोन नंबर आणि घराचा पत्ता मिळाला होता,मग काय अमेय ,चंचल,ताई आणि मामांची फैमिली सगळेच निघाले,त्या पत्त्यावर पोहोचले , तर त्यांनी सांगितल की, गाडी त्यांनी शिफ्ट वर चालवायला दिली आहे ,मी फोन करून विचारतो ,कुठे आहे.

ते फोन करून विचारतात ,तो सांगतो ,भाडं घेऊन आलो आहे ,मला दोन तास लागतील यायला ,ते ठिक आहे म्हणून फोन ठेवतात,त्याला काय झालं आहे, ते मुद्दाम नाही सांगत ,नाही तर तो सावध झाला असता , इकडे मामी मुद्दाम त्या लोकांसमोर मामांच्या मित्राचं खूपच कौतुक करत होत्या ,त्यांच्यामुळे मिळालं,पण असं करून अमेय ,चंचल आणि ताईला दुखवत होत्या,ते त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करत,त्यांना त्यांचे सामान मिळायला पाहिजे ,यासाठी प्रार्थना करत होते ,त्यांनी जर रिक्षाचा नंबर कैमरातून काढला नसता ,तर रिक्षा वाल्याचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला नसता.

आता तो आल्यावर तोच रिक्षावाला आहे का ,तो ओळख दाखवेल का ,रिक्षात काही राहिलं होतं,हे कबूल करेल का , कारण तोही एक प्रश्न पडला होता.

-----------------------------------------------------------

रिक्षावाला चावी घेऊन मालकाला द्यायला आला,तसं ताई म्हणाली ,हो हेच होते

त्याने ही ओळख दाखवली की,या माझ्या रिक्षातून दुपारी गेल्या होत्या.

मालक-अरे यांची पिशवी राहिली चुकून रिक्षात मागे ,आहे का

रिक्षावाला -मला मिळाली ,पण ती चार वाजल्याच्या सुमाराला मिळाली ,ती यांचीच होती हे कसं ठरवणार,काय होतं त्यात

ताई -त्यात तीन चार साड्या ,दोन टॉप आणि  पाच ब्लाऊज होते ,शिवाय त्यात माझी पर्स पण होती

रिक्षावाला-साड्यांचे कलर आणि पर्सचा कलर सांगा

ताई-पर्स लाल रंगाची ,एक साडी मोरपंखी,एक पिवळी,एक निळी आणि एक विटकरी रंगाची होती.

रिक्षावाला -आहे तुमचं सामान ,थांबा घेऊन येतो ,सामान बरोबर व्यक्तीला मिळालं म्हणजे बरं नाही का 

रिक्षावाला पिशव्या घेऊन येतो ,ते सगळं पाहून मामींचा चेहरा खुलतो त्या पेक्षा जास्त चंचल आणि ताई खूष असतात , कारण चूक त्यांची होती आणि ती सुधारण्यात त्यांना यश मिळाले होते,पण यातून ताईने धडाच घेतला होता की, इथून पुढे कुणाचीही कामांची जबाबदारी घ्यायची नाही . मामांनी पाचशे रुपये काढून त्यांच्या मित्राला दिले ,ते बाहेर गेल्यावर अमेयने रिक्षा ड्रायव्हरला 500रुपये दिले आणि प्रामाणिकपणे सामान परत दिल्याबद्दल आभारही मानले आणि बोलला ,तुम्ही आज आम्हांला खूप मोठ्या संकटातून वाचवले .मामा ,मामी त्यांच्या घरी गेले ,अमेय परत लग्न घरी गेला ,अमेयच्या आईच्या डोक्यावरचे टेन्शन कमी झाले होते,पण अशा परिस्थितीत मामी जे  वागल्या त्यामुळे मन मात्र खट्टू झाले होते ,पण सगळया  वस्तू व्यवस्थित मिळाल्या होत्या हे एक समाधान होते, अमेय,चंचल आणि ताईच्या दुपार पासूनच्या धावपळीचे चीज झाले. दुस-या दिवशी अमेय,ताई आणि चंचल तिघेही मेडिकलवाल्याचे जाऊन आभार मानून आले आणि एक पेढ्याचा बॉक्सही देऊन आले.

-----------------------------------------------------

दुस-या दिवशी मेहंदी आणि संगीत होतं ,त्या दिवशीही लग्न घरी जेवण होतं ,त्यांनीही जेवणाची ऑर्डर दिली होती आणि बुफे सिस्टीम होती की,जेणे करून सगळ्या बायकांना मजा करता आली पाहिजे ,चार पाच मुलींना बोलावलं होतं सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायला आणि ड्रेस कोड होता,लॉन्ग कुर्ता किंवा लॉन्ग गाऊन,ज्याला ज्यात कम्फर्टेबल वाटेल तसं,दुपारी जेवणानंतर मेहंदी काढायला सुरुवात केली होती,आठ वाजता संगीत सुरु करणार होते ,त्याआधी नवरीने छान फुलांचे दागिने घातले आणि मेहंदीचं फोटो सेशन झालं,आता सगळे डान्स करण्याच्या तयारीत होते.

पहिली सुरुवात झाली नवरीच्या डान्सने ,तिने बाबा मैं तेरी मलिका ,या गाण्यावर डान्स केला.

नंतर जॉब करणा-या मामी आणि त्यांच्या मुलीने देवा श्रीगणेशा आणि अजून दोन तीन गाण्यांचे फ्युजन होते त्यावर डान्स केला. नंतर चंचल ,नवरीची बहिण आणि मावस वहिनी यांनी 

मेहंदी है रचनेवाली ,हाथों में गहरी लाली,

कहीं सखिया कहीं कलिया ,हाथों में खिलनेवाली, 

या गाण्यावर डान्स केला आणि नंतर नवरीलाही मध्ये घेतलं डान्स करायला.

मग सगळे जोडीनी उभे राहिले ,सगळे म्हणजे मोठ्या जोडी पासून लहान म्हणजे सगळ्यात शेवटी अमेय आणि चंचल,मग सगळ्यांनी एका मागून एक राम्प वॉक केला ,खूप मजा येत होती ,सगळे एकमेकांना प्रोत्साहन देत होते,चंचल तर असं सगळं पहिल्यांदाच पाहत होती,चंचल आणि अमेय छान चालत आले , पुढे आल्यावर अमेय गुडघ्यावर बसला आणि चंचलला गुलाबाचे फुल दिले ,तिला सगळ्यां समोर खूपच लाजल्या सारखं वाटत होतं,  नंतरही अमेयच्या बहिणींनी तिला चिडवण्याची एकही संधी सोडली नाही.

नंतर सगळे मिळून हसत खेळत जेवता जेवता गप्पा मारत जेवले आणि प्रत्येक जण आपापल्या घरी गेले,अमेयच्या आई तिथेच राहणार होत्या,लग्न होईपर्यंत.

दुस-या दिवशी रुख्वद भरायचा होता  आणि पुरुषांची लग्नाची मिटींग होती ,त्याच दिवशी मामा , मामींचा(नवरीच्या आई वडिलांचा) लग्नाचा वाढदिवस होता ,रिसेप्शनची डान्सची शेवटची प्रक्टिस होती,त्यामुळे आजही घर भरलेले होते,आजही जेवण ऑर्डर केले होते ,केक ऑर्डर केला होता, डान्सची प्रक्टिस झाल्यावर केक कटिंग झालं,पहिले सगळे पुरुष मंडळी डान्स करत होते,नंतर ज्या जोड्या होत्या , त्यांना मध्ये घेऊन सगळे डान्स करत होते , अमेय आणि चंचलच नवीन लग्न झालेले असल्यामुळे ते सगळ्यांचे टारगेट होते,

आता एक एक जण बाजुला बसायला लागले.

आता जेवणाच्या पंगती पडल्या,सगळ्या मुलींनी चंचलला मदत केली,मग सगळ्या बायका जेवल्या आणि परत जे ते आपापल्या घरी गेले.लग्नाला अजुन एक दिवस बाकी होता , पण सगळ्यांना त्या दिवशी आराम मिळावा म्हणून त्या दिवशी कोणताच कार्यक्रम ठेवला नव्हता.

----------------------------------------------------------

लग्नाचा दिवस उजाडतो ,हॉलमध्ये चंचल ,अमेय आणि ताई नऊ वाजता पोहोचतात , हळदीसाठी सगळ्यांनीच नववारी घातलेली असते ,अगदी नवरदेवाकडच्यांनीही नववारी घातलेली असते.

नवरदेव आला ,तसं सगळेच त्याच्या स्वागताला तयार होते , पुरुषांनी सगळ्यांनी धोतर ,सदरा आणि टोपी घातली होती , त्यामुळे तिथलं वातावरण खूप उत्साहवर्धक झाले होते. वाजंत्री वाजवत होते ,त्या तालावर औक्षण झालं सगळ्या 

व-हाडी मंडळीना आणि सगळे हॉल मध्ये पोहोचले ,हॉलचे डेकोरेशन अवर्णनीय होते .दरवाजापासून नवर देवाच्या रूमपर्यंत सगळ्यांना वाजतगाजत नेले. आता सगळेच नाश्ता करून घेतात,नवरदेवाने हळदीसाठी पांढरा सदरा आणि पायजमा घातला होता ,नवरीने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर फुलांचे दागिने ,ती अप्रतिम दिसत होती.हळदीच्या अगोदरचे फोटो सेशन झाल्यावर दोघांना पाटावर बसवून हळद लावली,पहिली नवरदेवाला आणि नंतर नवरीला आणि मग काय सगळीकडे एकमेकांना लावण्याचा गोंधळ,चंचलला तर तिच्या सगळ्या नंणंदानी हळदीने भरवून टाकले ,अमेय हे पाहून हसत होता ,तर भावजी लोकांनी त्यालाही भरवले,आता चंचल हसत होती. आता लग्न एक वाजता होते ,दुपारी फक्त सगळ्या नातेवाईंकांंना आणि ओळखीतल्या लोकांना आमंत्रित केले होते,त्यामुळे सगळ्यांशी व्यवस्थित बोलता येत होते,चंचलचे आईवडील लग्नाला आले होते ,तिला तिच्या आई वडिलांना बघून छान वाटलं , त्यांनाही तिला लग्न असं एन्जॉय करताना पाहून बरं वाटलं आणि आपली मुलगी या सगळयांमध्ये किती खुश आहे हे पण स्वत: पाहिलं.

दुपारी चंचलने शालू नेसला होता आणि अमेयने शेरवानी घातली होती, दोघांचा जोडा छान दिसत होता , अमेय तिची सगळ्या नातेवाईकांशी ओळख करून देत होता. चंचल सगळ्यांशी आपुलकीने बोलत होती ,हे पाहून अमेयचे आई बाबा खूश होते. लग्न लागल्यावर चंचल आईवडीलांना जेवायला घेऊन गेली , नंतर ती त्यांना स्टेजवर घेऊन गेली , त्यांनी गिफ्ट दिलं आणि नवरा नवरी ,नंतर मामा ,मामी आणि अमेयच्या आईबाबांची भेट घेऊन परत गावी जाण्यासाठी निघाले ,अमेय आणि ती बसस्टँडवर त्यांना सोडवून परत आले, आता सगळे घरचे जेवायला बसत होते ,ते दोघेही त्याच पंगतीला बसले,नवरा नवरीने एकमेकांना घास भरवला ,तर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग मामींनी सांगितल इथं सगळ्या जोड्या एकमेकांशेजारी बसल्या आहेत ,तर प्रत्येकाने आपल्या साथीदाराला भरवा आणि नात्यात नाविन्य आणा,बघूया आपण कोण किती लाजतय,सुरुवात केली नवरदेवाच्या आईवडीलांकडून,मग मोठे मामा मामी,दोन्ही मामा मामी,मावशी काका,आत्या मामा,भाऊ वहिनी ,सगळ्यात शेवटी अमेय चंचल,त्यांना तर नवीन असल्याने नावही घ्यायला लावले ,जेवायला जवळ जवळ पस्तीस पदार्थ होते ,त्यानंतर दहा प्रकारचे आइस्क्रीम,जेवल्यानंतर संगीतचा व्हिडिओ आणि प्रिवेडिंग शूटिंगचे फोटो स्क्रीनवर लावले होते ,नातेवाईक मंडळी सगळी गेली होती ,आता सगळे घरातलेच होते ,आता संध्याकाळच्ं रिसेप्शन सात वाजता होतं , म्हणून सगळे आरामात गप्पा मारत बसले ,चंचल आणि ताई घरी गेल्या , तयार व्हायला त्यांच्या जवळच्या पार्लरवाली कडे ,दोघींनी छान हेअरस्टाईल,सगळं मेचिंग आणि चनिया चोली ,अमेयने पण संध्याकाळी ब्लेझर घातले होते ,आई आणि बाबा पण एकदम टकाटक ,सगळे तर अमेयच्या आईला म्हणत होते,सूनबाई आल्यापासून सगळं मेचिंग घालते ,आता ती आणून देते तर घातलं पाहिजे.

सात वाजता नवरीने लॉन्ग गाऊन त्यावर टियारा,कानातले डायमंड स्टड,हातात डायमंड बंगलस ,एकदम परी वाटत होती आणि नवरदेवाने ब्लेझर घातले होते,सगळ्या पुरुषांनी ब्लेझर घातले होते आणि बायकांनी चनिया चोली ,काहींनी लॉन्ग गाऊन,काहींनी वर्कची साडी असे वेग वेगळे प्रकार घातले होते.

नवरा नवरी दारात उभे राहिले सगळे त्यांच्या पुढे उभे राहिले ,सगळे पुढे नाचत नाचत त्यांना स्टेजजवळ घेऊन गेले ,त्यांना पुढच्या ओळीत बसवले ,मग चंचल,मामी,अमेयच्या तीन बहिणी आणि वहिनी यांनी लंडन ठुमकदा आणि गल्लन गुडिया या दोन गाण्यांवर डान्स केला ,त्यानंतर मामांच्या नऊ वर्षाच्या मुलीने टुकूर टुकूर,कान्हा सो जा जरा ,देवा श्रीगणेशा,तेरी आँखियों का ये काजल वर डान्स केला ,मग नवरा नवरी स्टेजवर आले , या रिसेप्शनला सगळे ऑफिसची लोकं होती , नवरा नवरीचे आई बाबा चांगल्या पोस्टवर असल्यामुळे सगळे चांगल्या पोस्ट वरची आणि ऑफिस मधून सगळे सहकारी आले होते ,सगळे शिस्तीत लाइन लावून स्टेजवर भेटायला जात होते ,खाली जे बसले होते किंवा आल्या आल्या सगळ्यांना बसल्या जागेवर ज्यूस आणि स्टार्टर वेटर देत होते. जेवणात चाळीस ते पन्नास वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ होते , शिवाय फ्रूट सलाड ,आइस्क्रीम वेगळं,पाहुणे कमी झाले तसं घरातल्या सगळ्यांनी जेवून घेतलं,आता हॉलमध्ये सगळी आवरा आवर सुरु झाली,नवरीच्या बोळवणीचा क्षण येऊन ठेपला,मामांना दोन मुली , एकीचं लग्न झालं होतं आणि आता दुसरीच,त्यामुळे आता घर त्यांना खायला उठणार होतं ,मामी तर खूपच रडत होत्या आणि मामा रडत नव्हते ,पण जेव्हा तिला ते साखर द्यायला लागले ,तेव्हा त्यांचा बांध फुटला,नवरी पण खूप रडत होती ,कसं बसं समजावत तिला गाडीत बसवलं आणि सगळे मामांच्या घरी गेले ,त्यांना व मामींना समजावलं ,अमेयच्या आई नवरी बरोबर गेल्या ,त्या आता दोन दिवसांनी पूजा झाल्यावर येणार होत्या ,अशा प्रकारे चंचलच सासरचं पहिलं लग्न जोरात पार पडलं.

पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.