फुलले रे क्षण माझे फुलले रे अंतिम-भाग 28
चंचलने तिच्या घरातील सगळ्या लोकांच्या मनात तिची जागा निर्माण केली, आता नवीन घरात त्यांना स्वतंत्र बेडरूम होती, तीन चार महिने झाले होते,ट्रिटमेंट सुरू करून,पण ट्रिटमेंटला यश काही मिळत नव्हते ,दोघेही थोडे टेन्शन मध्ये आलेले ,एक दिवस छोट्या मामी आल्या ,त्यांनी चंचलला समजावून सांगितले ,बाई म्हणजे काही मशीन नसते ,की टाकलं आणि मूल बाहेर आलं ,त्यासाठी तुम्ही दोघांनी प्रसन्न रहा ,ट्रिटमेंट घेताना टेन्शन नाही घ्यायचे.दोघांच्याही ही गोष्ट लक्षात आली की,ट्रिटमेंट घेताना पैसे खर्च होत आहे ,होईल ना ट्रिटमेंट यशस्वी, हे विचार त्यांच्या मनात चालू असायचे, सगळं ऐकून त्यांना हलकं वाटत होतं.
-------------------------------------------------------------
ताईंना आता नववा महिना सुरु झाला होता,बाळाची वाढ व्यवस्थित झाली होती ,परंतु बिपीचा त्रास असल्याने डॉक्टरांनी सीझर करावे लागेल असं सांगितलं होतं,सिझरच्या एक दिवस आधी त्यांच्या घरच्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला,तीन मामी ,मावशी आणि अमेयच्या घरच्यांना आमंत्रण होते ,ताईची डोहाळे जेवणाची खूप हौस होती,कारण चार पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण त्यांच्या जीवनात आला होता ,तो दोघांनाही भरभरून जगायचा होता,त्यांनी तिथल्या जवळ्च्या बायकांसाठी नाश्ता आणि जे पाहुणे होते , त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती,चंचल आणि अमेयच्या आईने मिळून सगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, फुलांची वाढी, धनुष्यबाण,परडी हे सगळंच आवडीने घेतलं होतं ,तिथे गेल्यावर एका टी पॉय वर सगळं छान मांडलं होतं,त्यांच्या घरच्यांनी डेकोरेशन छान केलं होतं,ताईंनी तर ते फुलांचे दागिने घातले होते,त्यामुळे एक वेगळाच ग्लो चेह-यावर आला होता.
फोटो सेशन त्यांच्या जवळ्च्या बागेत जाऊन करून आले होते.
आता ओटी भरणाला सुरुवात झाली ,पहिली अमेयच्या आईने चंचलला ओटी भरायला सांगितली ,मग सासरच्या लोकांनी भरली ,नंतर आलेल्या सगळ्या बायकांनी, त्यानंतर दोन वाट्या घेतल्या ,पेढा की बर्फी , तीनही वेळा पेढा निघाला ,सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता चंचल ,आई,दोन ताई आणि मामी सगळ्यांनी मिळून डान्स केला.
जन्म बाईचा बाईचा खूप घाई चा
एक आई चा आईचा एक ताई चा
बाहुली हो ती खेळ खेळाया
जाहली मोठी मोहरे काया
घम घमे सारा, गंध जाई चा
जन्म बाईचा बाईचा खूप घाई चा
एक आई चा आईचा एक ताई चा
आलीस सासुरा - सासुरा , ओलांडून उंबरा..
गं आलीस सासुरा - सासुरा,संसाराची घडी नीट - नेटकी ,
बसव नेमकी ,करून जादू प्रेमाची.. चाहूल देई कुणी,
सुखाच्या क्षणी,उमलते मनी,फुले ही वात्सल्याची..
सांभाळुनीया सारे,बंध नात्यांचे...
थोडी - थोडी कसरत तारेवरची,लाडकी सून मी ह्या घरची..
राणी मी राजाची , चाहूल इवल्या स्वप्नांची..जणू लेक मी लाडाची,
ह्यात चंचलने सुनेची भुमिका छान केली.
सगळे चंचलला म्हणत होते की,आता तू नंबर लाव ,तशी ती लाजली,अमेयच्या आई म्हणाल्या ,हो लावणार आहे ,पण देवाच्या मनात आल्याशिवाय काय आहे ,सगळ्या गोष्टी थोडी आपल्या हातात असतात,चंचलला आईंनी तिची बाजू घेतली म्हणून बरं वाटतं होतं.
तितक्यात मागून कुणीतरी म्हटलं-यात देव काय करणार ,जे काही करायचं ते त्या दोघांनी करायचं.
अमेयच्या आई काहितरी बोलणार ,तितक्यात ताईंची जाव म्हणाली-अगं,म्हणजे आम्हाला तुझी पण अशीच हौस करता येईल ना ,उगीच विषय वाढायला नको,म्हणून त्या मध्येच बोलल्या.
त्यानंतर ताईंच्या जावांनी डान्स केला
चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा……२
भोवतालची बस तिला काव हव ते पुसा तिचे डोहाळे पूरवा, हो हो डोहाळे पूरवा
ग कुणीतरी, ग पारुताई,
ग कुणीतरी येणार येणार ग…..२
पाहुणा घरी येणार येणार ग, घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..२
पाहुणा घरी येणार येणार ग
इवलस नाजूक पाउल बाई, हळूच आतून चाहूल देई….२
गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला…….२
हो चाला, हो चाला साजीव होणार ग, ग चाला साजीव होणार ग,
ग कुणीतरी येणार येणार ग…..२
पाहुणा घरी येणार येणार ग
होणार जे ते कसा दिसेल ग, मुलगा असे तो की मुलगी असेल ग…..२
कोणी असो तो किंवा ती,फरक तुला सांग पडतो किती……२
शेवटी आई तू, अग आई तू होणार ग, शेवटी आई तू होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..३
पाहुणा घरी येणार येणार ग, घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..२
पाहुणा घरी येणार येणार ग
मग ताई आणि भावजींनी डान्स केला ,सगळे त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते.
आई तू बाबा मी
होणार गं कुणी येणार गं
आजी तू आबा मी
होणार गं कुणी येणार गं
मग सगळ्यांची जेवणं झाली आणि जे ते आपापल्या घरी गेले.
दुस-या दिवशी सकाळी ऐडमिट झाल्यावर,ताईला मुलगी झाली ,लक्ष्मी आली असं म्हणत सगळ्यांनी तिचं स्वागत केलं ,आई ताईबरोबरच होत्या ,चार दिवसांनी घरी सोडलं,तर ताईंना डायरेक्ट अमेयच्या घरी म्हणजे माहेरी आणलं,पाचीला ताईच्या घरचे सगळे आले ,पाची झाली ,आता लहान मूल घरात असल्याने कामात आणि बाळात वेळ कसा निघून गेला ते कोणालाही कळलं नाही,त्यातच लॉक डाऊन सुरु झालं ,अमेय बँकेत असल्याने त्याला दुपारपर्यंत आठवड्यातून दोनदा जावं लागतं होतं आणि चंचलला घरी लैपटॉप दिला ,त्यावर ती घरून काम करत होती ,करोनामुळे ट्रिटमेंट घेणं बंद झालं होतं.
---------------------------------------------------------------
ताईंची छोटी आता सहा महिन्यांची झाली होती,करोना अजुनही होता ,तरी त्यांचे घरचे येवून त्यांना घेऊन गेले. आता चंचलही ऑफिसला जायला लागली होती, कोणत्याही ट्रिटमेंट विना चंचलला आता आई होण्याची जी चाहूल लागली होती,त्याला तिच्या भाचीचा पायगुण किंवा भाचीच करता करता जे वात्सल्य निर्माण झाले त्याचा परिणाम असेल ,जाऊ दे ना काही असले तरी गोड मात्र छान झाला ,म्हणून तर तिचे मन गुणगुणत होते, फुलले रे क्षण माझे फुलले रे.
समाप्त.
वाचकांशी संवाद: ही कथा एका मध्यम वर्गीय कुटुंबाची होती ,सत्यकथेवर आधारीत आहे,नाती छोट्या छोट्या गोष्टींमधून कशी फुलत जातात ,मध्यम वर्गीय जे असेल त्यात आनंद कसे साजरा करतात ,जे आहे त्यात समाधानाने कसे राहतात आणि जर एकमेकांना सांभाळून घेतले ,तर कोणत्याही अडचणींवर एकोप्याने मात करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.आजकाल सासू सुनेला मुलीसारखी समजून घेण्याचा प्रयत्न करते,पण काही सुना मनात हेच धरून बसतात की,सासू सासू असते ,ती आई होऊ शकत नाही हा गैरसमज निर्माण करून नवीन घरात लग्नानंतर गृह प्रवेश केल्याने ,घरात शांतता राहत नाही आणि जर काही खटकत असेल ,तर पुढाकार घेऊन,गैरसमज दूर केले पाहिजेत. नाहीतर प्रत्येकाच्या आयुष्यात गैरसमज निर्माण करणा-या लोकांची कमी नसते.
जर तुम्हाला या कथेचा प्रवास आवडला असेल तर अभिप्राय अवश्य द्या आणि हसत रहा,आनंदात रहा .
तुम्ही कथेला भर भरून प्रतिसाद दिला,त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा