फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 25

Spare some time for yourself

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 25

चंचल आणि आई जेवण बनवता बनवता बोलत होत्या,

चंचल- आई तुम्हाला काय कारावंस वाटत होतं ,पण करता नाही आलं 

आई-म्हणजे नक्की काय विचारायचं आहे तुला

चंचल- अहो म्हणजे तुम्हाला काय करावंस वाटतय की, जे केल्यावर तुम्हाला बरं वाटेल 

आई- बरेच दिवस झाले ,सिध्दिविनायकला जायची इच्छा आहे,जेव्हा मुंबईत राहत होतो ,तेव्हा आठवड्यातून एकदा तरी  मी आणि बाबा जायचो ,इकडे आलो आणि संसाराच्या रगाड्यात खूप दिवस झाले जाणं झालच नाही ,बघू देव बोलवेल तेव्हा जाऊ.

चंचल - बोलवले तर जाणार ना

चंचल भाजीच्या धंद्यांकडे बाबांचा चहा घेऊन जाते 

चंचल- एक विचारू का रागावणार नसाल तर 

बाबा -बोल ना बाळा 

चंचल -मी परवा सकाळी अर्धा दिवस सुट्टी टाकते ,तुम्ही आणि आई सकाळी लवकर सिध्दिविनायक आणि महालक्ष्मीला जाऊन या ,मी एक वाजता ऑफिसला जाईल,ताई सगळं दुकान बंद करून ठेवतील,जाल ना ,पर्वा त्यांचा वाढदिवस पण आहे.

बाबा-तसंही तुमचं लग्न जमलं तेव्हाच ती जायचं म्हणत होती,पण राहून गेलं 

चंचल-पण हे सर प्राईज आहे ,सांगू नका त्यांना 

बाबा -हो गं बाई , तू एवढा सगळ्यांचा विचार करते ,देव तुला सुखी ठेवो.

चंचल- अहो बाबा ,तुमचे आशिर्वाद असल्यावर आम्हाला काहीच टेन्शन नाही ,मी ताईंशी पण बोलून येते ,परत आईं समोर सांगू शकत नाही 

बाबा-पटकन ये

चंचल ताईंच्या घरी जावून सगळ्या गोष्टीची कल्पना देते ,ताईही तिला मदत करायला तयार होतात.

----------------------------------------------------------

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी चंचल आणि बाबा लवकर ऊठून आईंना पण उठवतात ,दोघेही त्यांना विश नाही करत, आईंना वाटते,विसरले असतील,करतील नंतर विश,बाबा आवरून रेडी असतात ,ते आईंना म्हणतात ,आपल्याला जरा बाहेर जायचे आहे ,चांगली साडी घाल की ड्रेस घालते

आई-नको इथे सगळ्यांसमोर साडीच घालते ,पण कुठे जायचयं अचानक 

बाबा-कळेल तुला,चल आवर पटकन

आई-बरं ,बरं आवरते

आई आवरून येतात आणि म्हणतात -चला ,कुठं नेत आहे देवास ठाऊक

बाबा -चल 

असं म्हणून घराच्या जवळ असणा-या बस स्टॉपवर उभे राहतात ,पाच दहा मिनिटांनी दादरला जाणारी बस येते ,तसं बाबा आईंचा हात धरून म्हणतात ,चल या बस मध्ये चढायचं आहे ,ज्येष्ठ नागरिकांची सीट रिकामी होती,त्यावर दोघे बसतात.

आई- आपण सिध्दिविनायकला चाललोय ,देवाने शेवटी मला बोलावणं पाठवलं 

बाबा- देवाने बोलावणं पाठवले आहे,पण चंचलच्या माध्यमातून,ही सगळी तिचीच आयडीया,ती अगदी आपल्या घरात आपली लेक बनून लक्ष्मीच्या पावलांनी आली.

आई-म्हणुनच त्या दिवशी मला विचारत होती,आता लक्षात आला तिचा हेतू 

बाबा-अगं पण चांगला हेतू होता तिचा ,हे सगळं तुला आनंदात बघण्यासाठी ,आज तिने सकाळी अर्धा दिवस सुट्टी पण टाकली, न सांगता सगळं करते ,आपण नक्कीच काहीतरी चांगल काम मागच्या जन्मी केलं असेल म्हणून अशी सून आपल्याला मिळाली असेल

आई- आज देवाचे त्याबद्दल खरचं मी आभार मानणार आहे , अमेयचं लग्न करताना मला खरचं खूप टेन्शन आलं होतं ,एवढ टेन्शन पोरींची लग्न करून दिले तेव्हाही नव्हते आले ,कारण आपल्या मुली दुस-या घरात नांदायला जातात,त्या सगळ्याच वातावरणाशी जुळवून घेतील ,ही खात्री असते.पण आपल्या घरात येणारी मुलगी जर सगळ्यांना माळेतल्या दो-यासारखी एकत्र बांधून ठेवत असेल ,तर खरचं आपण त्या बाबतीत खूप भाग्यवान आहोत,म्हणूनच बाप्पाचे आभार मानायचे आहे आणि प्रार्थना करणार आहे की,माझ्या दोन्ही पोरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर.

बोलता बोलता दादर कधी आलं ते कळलच्ं नाही ,अजुनही तसचं गजबजलेलं ,आजू बाजूनी रस्त्यावर सगळी दुकानेच दुकाने .

आई-तुम्हाला आठवतंय का ,आपण इकडे राहायचं तेव्हा या रस्त्यावर किती पायी फिरायचो आणि खरेदी करायचो ,जास्त महागाच्या वस्तू नाही घ्यायचो पण ती पण एक वेगळीच मजा होती.

बाबा- जास्त काही नव्हतं आपल्याकडे,पण जे होतं त्यात समाधानी होतो ,भाड्याच्या एवढुशा घरात तू किती आडजस्ट केलं आणि तेही हसत हसत,तू माझ्या बरोबर होतीस म्हणून आज आपण सगळ्या जबाबदा-या पार पाडून,आज आपण खाऊन पिऊन सुखी आहोत.

आई- गेले ते दिवस,कशाला काढता त्या आठवणी 

बाबा- अगं तसे दिवस काढले ,म्हणून तर आज आपण समाधानी आहोत

आई-हे बाकी खरं 

तितक्यात सिध्दिविनायकचा स्टॉप येतो ,ते उतरतात ,आज वेगळा वार असल्याने जास्त गर्दीही नव्हती, दर्शन खूप शांततेत झालं,आता बाहेर आल्यावर आईने हातात बांधायला धागे घेतले,बाबा त्यांना बोलले ,तुझं आपलं काहितरीच असतं.

बाहेर आल्यावर दोघे आधी जिथे जाऊन डोसा खायचे ,तिथे गेले ,तर त्या गाडीचं हॉटेलात रुपांतर झालं होतं,पण चव मात्र तीच होती.

दोघे तिथून बाहेर पडले आणि चालत निघाले ,तिथे गज-या वाला दिसला ,त्यांनी त्याच्याकडून सहा गजरे घेतले ,चार बांधून द्यायला सांगितले आणि दोन तिच्या हातात दिले आणि डोळयात बघितले ,तर त्या लाजल्या 

बाबा-घरी असतो तर घातले असते ,इथं रस्त्यावर तुलाच्ं तुझ्या केसात घालावे लागणार आहे 

आई गजरे घालतात ,तसे बाबा टैक्सीला हात करून थांबवतात, दोघे बसतात ते ड्राईवरला सांगतात ,महालक्ष्मी 

थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतात ,तिथेही दर्शन अगदी आरामात होते ,दहा वाजेपर्यंत दोन्ही दर्शन झाल्यावर,दोघेही बस स्टॉपवर उभे राहतात ,बस येते तसे बसमध्ये चढतात ,दोघांनाही बसायला जागा मिळते,आई परत एकदा हात जोडून नमस्कार करत,तोंडातल्या तोंडात काहितरी पुटपुटत असतात 

बाबा-आता बसमध्ये कुठला देव आहे 

आई-अहो चरा चरात देव आहे 

बाबा -मला माहितच नव्हतं,मग उगीच एवढ्या लांब आलो ,घरच्या देवाच्या पाया पडलो असतो ,तरी चाललं असतं,पण तुझं किती दिवस चाललं होतं की,मला सिध्दिविनायकला जायचंय 

आई -असते प्रत्येकाची वेग वेगळी श्रध्दा,अशी थट्टा करु नका

बाबा- सगळी तुझीच वाक्य आहे आणि ती पण विरुध्द ,तूच सांग मी कोणतं खरं समजू

आई-अहो घरातही देव असतो ,पण बाहेरच्या वातावरणात गेलं की,आपल्याला बरं वाटलं 

बाबा-म्हणजे थोडक्यात काय,आपल्या सोयीनुसार अर्थ घ्यायचा 

आई-तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे ,तो घेऊ शकता,माझा सकाळ पासून दिवस छान गेला आहे आणि तुमच्याशी वाद घालून मला माझा मूड घालवायचा नाही.

----------------------------------------

घरी पोहोचतात दोन वाजता ,चंचल ऑफिसला गेलेली असते आणि ताई दुकान बंदच करत असते तर बाबा तिच्या मदतीला जातात ,दोघे मिळून दुकान बंद करून घरी येतात .

आई किचन मध्ये जाऊन पाहतात ,त्यांना आवडणारी वांग्याची भरलेली वांगी ,चपाती,भात आणि आम्रखंड आणून ठेवलेलं असतं ,तिथं एक छान ग्रीटींग बनवून ठेवले होते,त्यात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सरप्राईज आवडले का?

त्यावरुन त्या ओळखतात की,हे चंचलचं काम आहे.

ताई-आज एका बाईची मजा आहे,सगळे आवडीचे पदार्थ 

आई-हो ,आज सगळं छान आवरून गेली आहे 

ताई-तिला फोन करून सांग जेवल्यानंतर 

आई-हो बाई हो सांगते 

ताई- आणि हो ,तुम्ही सगळे रात्री माझ्याकडे जेवायला या 

आई-आज मला पूर्ण आराम देताय का 

ताई- तसं म्हण हवं तर,पण मलाही काहितरी करु दे ना 

आई-बरं बाई ,तू म्हणशील तसं 

ताई- चल मी जाते आता ,परत जेवणाची तयारी करायची आहे

आई-येऊ का मी मदतीला,काय बनवणार आहेस?

ताई- नेहमीच मदत करते ,आज जरा आराम करून बघ,सरप्राईज आहे तुझ्यासाठी 

आई-आज सकाळ पासून सरप्राईजच मिळत आहे 

ताई-अगं, मग भरभरून आनंद घे त्याचा 

आई- हो गं ,माझे आई 

ताई गळ्यात पडून म्हणते -नाही ,तू माझी आई,चल ,या मग संध्याकाळी  चंचल आणि अमेय आल्यावर 

आई-हो 

--------------------------------------------------

संध्याकाळी सगळे ताईकडे जेवायला जाणार म्हणून ,चंचल आईंना छान साडी काढुन देते नेसायला ,केसांचा छान आंबाडा घातला ,तिला दिलेल्या गज-यातला एक गजरा आंबाड्यावर माळला, छान दिसत होत्या.

ताईकडे गेल्यावर चंचल आत जाते-झालं का मी सांगितलेलं

ताई -हो 

चंचल -द्या उरलेलं मी करते 

बाहेर सगळे टिव्ही पाहत बसले होते ,बाबाही भाजीच दुकान बंद करून येत होते , बाबा येतात आणि बसतात 

अमेय-ताई बाबा आले 

ताई बाबांना पाणी देते - झालं आहे सगळं,आलो आम्ही दोन मिनिटात

आईला दोघींना एकमेकींची मदत करताना पाहून समाधान वाटतं.

ताई बाहेर येऊन पाट मांडते,बाजूनी रांगोळी टाकते आणि आईला त्यावर बस म्हणून सांगते ,तेवढ्यात चंचल आरतीचे ताट घेऊन येते.

आई-अगं मी काय लहान आहे का ,हे सगळं करायला 

चंचल-आई ,या बसा ,तुम्ही लहान असताना परिस्थिती नव्हती ,आता सगळंच आहे आणि गोष्ट राहिली वयाची ,तर मजा करायला वयाच्ं बंधन नसते 

आई-बरं बाई ,बसते 

दोघी आईला ओवाळतात ,ताई त्यांना बाहेर येण्या जाण्यासाठी बैग गिफ्ट म्हणून देते आणि चंचल नाकातली मुरणी देते .

चंचल- बघा, आवडली असेल तर घाला नाहीतर बदलून घेऊ

आई उघडून बघतात ,छान डायमंडची सात खडयाची असते 

आई-छान आहे ,त्या लगेच नाकात घालतात आणि आरशात जाऊन पाहत म्हणतात ,छान चमकते .

ताई- किती दिवस झाले तू म्हणत होती,मला घ्यायची आहे ,पण त्यासाठी जमवलेले पैसे दुसरीकडे खर्च व्हायचे आणि राहून जायचं,किती तरी वेळा पाहिलय्ं मी तुला 

आई-म्हणजे तू तिला सांगितलं

चंचल- सांगितल म्हणून तुम्हाला जे हवं होतं ते गिफ्ट देता आलं ,चला आता केक कटिंग

अमेय-पण आईला केक नाही आवडत 

चंचल-आम्ही त्यांच्या आवडीचा बनवला आहे

ताई केक घेऊन येतात ,तर सगळे पाहतच बसतात ,शी-याला गोल आकार दिलेला होता ,बदामाने आई लिहिलं होतं, साइडनी चारोळे,काजू ,माणके यांच डेकोरेशन केलं होतं.तो ज्या डिशमध्ये ठेवला होता त्याला बाजूने गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं होतं .

अमेय-तरीच आलो ,तेव्हा प्रसादासारखा वास आला 

सगळे मिळून केक कापतात, केक कापल्यावर बाबा आईंना केक भरवतात. 

नंतर सगळे जेवायला बसतात ,जेवायला मासवड्या केलेल्या असतात ,कारण आईंना आवडायच्या, त्या जेवायला बसल्या ,तसं डोळ्यांत पाणी आलं.

ताई-अगं काय झालं 

आई-काही नाही 

ताई -नेहमीच आहे हिच ,लगेच डोळे भरून येतात

 आई ,ताई आणि चंचलला सगळ्यांसोबत जेवायला बसायला  सांगतात .

सगळे हसत खेळत जेवतात.

आता सगळे आईला म्हणतात,तुझा आजचा दिवस कसा गेला ते सांग.

आई- खरं तर ,माझ्या माहेरी परिस्थिती फारशी चांगली नव्हती,

शाळेत जी तारीख आहे ,ती जन्म तारीख,पण ती खरी की खोटी ते सांगता नाही येणार, लग्न झाल्यावर परिस्थितीबरोबर जुळवून घेण्यात आर्ध आयुष्य गेलं,नंतर तुमचे वाढदिवस साजरा करण्यात आनंद मिळायला लागला ,मी माझं स्वत:च अस्तित्त्व विसरून गेले, तुम्ही मोठे झाले,कॉलेजला जायला लागले ,तसं तुम्ही सगळे मला निदान काहितरी गोड पदार्थ तरी कर ,असा हट्ट धरायला लागले ,पोरींची लग्न झाली ,नातवंड आली ,मग सगळ्यांचे लाड पुरवता पुरवता, मी स्वत:ला पूर्ण विसरून गेले,पण जेव्हापासून चंचल घरात आली,तिने मला माझ्या आस्तित्वाची जाणीव करून दिली, मला स्वत:बद्दल आदर बाळगायला शिकवलं,स्वत:साठी जगायला शिकवलं,मी तिची खरचं खूप आभारी आहे .

चंचल-अहो आई ,मी असं काही केलं नाही ,या सगळ्यावर तुमचा हक्कच आहे 

आई-थांब ,मला अजून बोलायचं आहे आणि आजचा दिवस मी कधीच विसरु शकणार नाही,सकाळ पासून आता पर्यंत माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या,आतापर्यंतच्या सगळ्या कष्टाचे चीज झाल्या सारखं झालं आणि याचं सारं श्रेय तुम्हां सगळ्यांना जातं.

घरी आल्यावर अमेय आणि चंचल वर झोपायला जातात .

अमेय आज थोडा गप्प गप्पच होता ,चंचल विचारते,तर टाळतो आणि म्हणतो,दमलोय ,झोप आता .

अमेय का गप्प आहे ,त्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all