Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 22

Always Complete responsibiity with proper precautions otherwise accidents happens

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 22

सगळे आपापल्या घरी जातात .

बाबा-छान अरेंजमेंट केली होती,दमला असाल दोघेही

अमेय-ह्या सगळ्या गडबडीत आमचं गिफ्ट द्यायचं राहून गेले 

चंचल-तरी मी विचार करत होते की,मी काहीतरी विसरत आहे 

असं म्हणत ती गिफ्ट घेऊन येते ,दोघे मिळून दोघांना गिफ्ट देतात आणि पाया पडतात .

बाबा -अरे याची काय गरज आहे ,तुम्ही सेलिब्रेशन केलं हेच खूप आहे 

अमेय-गिफ्ट घेण्याची आयडिया चंचलची ,बघा आवडतय्ं का 

दोघे गिफ्ट खोलून ,एकमेकांकडे बघतात ,त्यांना असं एकमेकांकडे पाहताना बघून चंचल-नाही आवडलं का

बाबा-असं काही नाही,पण आम्ही असे कपडे घालत नाही आणि भाजीच्या धंद्यावर पायजमा शर्ट बरं वाटतं आणि ही तर साड्याच घालते 

चंचल-हो तुमचं खरं आहे,आतापर्यंत नाही घातलं पण मी कुठे म्हणतेय की रोज घाला ,फिरायला जाताना तर घालू शकता ना

बाबा -पण आम्ही कशाला जातोय कुठे फिरायला 

चंचल-आपणच जाऊ कुठे तरी सगळे,तिथे तर घालाल ना

बाबा- आता तू एवढ्या आवडीने आणले आहेस ना ,मग आम्ही नक्की घालू

चंचल-ठिक आहे 

आई-चला झोपा ,आता सगळे,उशीर झाला आहे,उद्या सकाळी परत उशीर होईल नाहीतर तुम्हाला ऑफिसला 

चंचल-हो ,गुड नाईट आई बाबा

असं म्हणून दोघे वर झोपायला जातात 

----------------------------------------------------

रेखा-काय मैडम कशी चाललीय लग्नाची तयारी

चंचल तिला जे ठरलं आहे ते सांगते

चंचल-नववारी आजीची घेऊन येईल,ती पार्लर मध्ये जाऊन नेसून घेईल,साडी दुपारच्या रिसेप्शनला दिवाळीत घेतलेली आहे ,ती छान आहे,मला चनिया चोली मात्र घ्यावी लागेल,मी चौकशी केली तर कमीत कमी दोन हजार ,काय करु समजत नाही ,एका दिवसा साठी एवढे पैसे घलवायची इच्छा नाही ,रेंटनी घेऊ का नाही तर 

रेखा-माझ्या शेजारी माझी मैत्रिण आहे,तिला विचारते थांब,तिच्याकडे दोन तीन आहे ,ती देते का विचारते ,पण तुला त्याच्यावर मेचिंग ब्लाऊज मात्र घ्यावा लागेल ,कारण तू बारीक आहे अंग काठीने तिच्या पेक्षा,विचारू का आताच

चंचल -नेकी और पुछ पुछ

रेखा फोन करून बोलते ,फोन ठेवल्यानंतर बोलते ,झालं तुझं काम,उद्या घेऊन येते ,म्हणजे तुला सगळ्या मेचिंग घेता येईल 

चंचल-थैंक्स यार

संध्याकाळी घरी गेल्यावर 

आई-अमेय आज आपण चंचलला साडी आणि चनिया चोली आणायला जाऊ

चंचल-आणि तुम्हाला पण साडी घेऊ

आई-मला कशाला दादाने आता लग्नासाठी घेतली आहे , त्यावर ब्लाऊज शिवेल आणि तुमच्या लग्नात मिळालेल्या तीन चार साड्या काढून ठेवल्यात म्हणजे सगळ्या कार्यक्रमात वेग वेगळी साडी घालता येईल ,हे बघ ह्या आहेत मी काढल्यात 

चंचल त्यातल्या चार आईंसाठी सिलेक्ट करते .

चंचल-आपण परवा जाऊ 

आई-बरं 

दुस-या दिवशी रेखा चनिया चोली दोन घेऊन येते ,त्यातून चंचल एक सिलेक्ट करते आणि खूश होते ,संध्याकाळी अमेय तिला विचारतो ,कसली बैग आहे ,ती म्हणते ,घरी गेल्यावर दाखवते .

घरी गेल्यावर आई विचारतात ,अगं बैगेत एवढं काय आणलं आहे 

चंचल-दाखवते ,थांबा 

ती चनिया चोली काढून दाखवते ,तसं आई म्हणतात,छान आहे,पण ब्लाऊज नाही येणार तुला

चंचल-हो ब्लाऊज घ्यावा लागेल,माझ्या मैत्रिणीचा आहे ,तिच्या कडे असाच पडून होता ,मी बोलली ,मला घ्यायचा आहे तर ती बोलली एका दिवसा साठी कशाला घेते ,माझा घाल आणि ती आज घेवून आली ,उद्या ताई आणि मी जाऊन मेचिंग ज्वेलरी आणि ब्लाऊज घेऊन येऊ ,तसाही उद्या बाजार असतो त्या बाईकडे छान डिझाईनचे ब्लाऊज असतात आणि तीनशे रुपयेला मिळेल,दुकानात महाग मिळतात,उरलेल्या पैशात बाकीची ज्वेलरी येईल,तुम्हाला पण आंबाडा आणि त्याला लावायला ब्रोच असं काही सामान घेऊन येऊ आणि  माझ्याकडेही लग्नात घेतलेल्या साड्या आहेतच की,दुपारी रिसेप्शनला मी शालू नेसेल.

आई- अग पण आपण घेतला असता,आता साडी पण नाही घ्यायची म्हणते तर घेऊ ना

चंचल- खरं सांगू का ,एका दिवसासाठी एवढे पैसे खर्च करायचे जिवावर आलं आहे आणि हा मला खरचं आवडला.

आई-उद्या जा तुम्ही दोघी आणि काय काय आणायचं ते आणा

दुस-या दिवशी ताई आणि चंचल दोघी जाऊन खूप खरेदी करून येतात .

आई-अगं एवढं काय आणलंय

ताई-तुझ्या सुनेलाच विचार ,तुझ्यासाठी पण सगळ्या साड्यांवर मेचिंग बांगड्या आणि ब्रोच ,आंबाडा पण आणलाय तिच्या बरोबरीने.

आई-तिचा ब्लाऊज मिळाला का 

चंचल-हे बघा छान आहे ना,दोनशे रुपये,आवडला का तुम्हाला 

आई-अगं अजून चांगला घेतला असता तरी चाललं असतं,या वयात नाही हौस करायची तर कधी,लग्नात छान दिसली पाहिजे

चंचल-हाच छान होता ,हो ना हो ताई

ताई-हा मेच पण होत होता 

आई-अजून काही राहिलं का 

चंचल-सगळं झालं,ब्लाऊज तेवढं फिटिंग करून आणावं लागेल,मी चहा ठेवते

ताई- आई चंचल सगळं तुझ्या साठी करते ना ,खरचं खूप बरं वाटतंय ,आम्ही तुझ्या मुली असून सुध्दा कधी असा विचार नाही केला ,देवा तुमच्या दोघींच नातं नेहमीच असं राहू दे.

तितक्यात चंचल चहा घेऊन येते ,आई दोन्ही हात तिच्यावरून ओवाळून नजर काढतात ,तिला कळतच नाही ,त्याना अचानक असं काय झालं ,ती डोळ्यांनीच ताईंना विचारते,काय झालं,ताई डोळ्यानीच काही नाही असं सांगतात.

--------------------------------------------------------

आता लग्नाचे दिवस जवळ येत असतात , रिसेप्शनला परत सगळ्या जणी डान्स करणार असतात ,मग कोरिओग्राफरला डान्स बसवण्यासाठी बोलावतात ,ती सगळ्यांकडून डान्सची प्राक्टीस करून घेते कारण रिसेप्शनला सगळ्यांच्या ऑफिस मधून लोकं येणार असतात ,त्यांच्या समोर चांगल वाटल्ं पाहिजे ना ,सगळे मन लावून प्राक्टिस करतात.

हळद आणि गोंधळ एकाच दिवशी असतो ,त्याच दिवशी अजून एक खूप मोठा गोंधळ होतो ,इकडे गोंधळाची तयारी चालू असते ,त्यासाठी चंचल,ताई रिक्षाने आवरून येत असतात ,त्या रिक्षातून उतरल्या पण मागे जी पिशवी ठेवली होती ,ती रिक्षातच विसरते ,त्यांच्या लगेच लक्षात येतं ,तो पर्यंत रिक्षावाला निघून गेलेला असतो ,त्या रिक्षावाल्याला त्या खूप शोधतात ,पण तो काही भेटत नाही,रिक्षावाला नाही भेटला तर त्या खूप टेन्शन मध्ये आल्या,काय होत त्या पिशवीत,त्या पिशवीत साड्या आणि ब्लाऊज होते, अमेयच्या मामींचे आणि त्यांच्या मुलीचे ,ज्या मामींचे होते ,त्या थोड्या स्वभावाने कडक होत्या ,ते सगळं सामान मामींनी ताईंना आणायला सांगितलं होतं,म्हणून ते त्यांच्याकडे होतं ,दोघी बोलण्याच्या नादात उतरल्या आणि पिशवी मागेच राहिली . जर वर गेल्या तर मामी विचारणार ,सामान आणलं का ,काय करावं हे त्या दोघींना सुचत नव्हते.

चंचलने अमेयला ऑफिसमध्ये फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला,तो सुरवातीला चिडला आणि म्हणाला ,ताईला काय गरज आहे कुणाची काम करण्याची,त्यांनी त्यांचे नेले असते ना ,पण परत शांत होत म्हणाला ,तुम्ही ज्या रस्त्याने आलात त्या रस्त्यावर एखाद्या दुकाना समोर सीसिटीव्ही कैमरा आहे का ते चेक करा ,मी तोवर येतो ,त्या वर न जाता परत घरी गेल्या ,रस्त्यावरुन चालत चेक करत होत्या की,कैमरा कुठे दिसतोय का,एका मेडिकल मध्ये होता ,त्या त्याला विचारणार तितक्यात अमेय तिथे येतो ,तो बोलता थांबा मी विचारतो.

इकडे त्या अजून कशा आल्या नाही ,म्हणून अमेयची आई चंचलला फोन करते ,चंचल विचार करते ,काय सांगू ,फोन उचलते आणि सगळं खरं सांगते ,त्या तिला धीर देतात ,मिळेल,तुम्ही रिक्षाचा नंबर बघून पोलीस स्टेशनला कंप्लेट करा ,मिळेल आणि एकमेकांवर चिडू नका ,शांततेने जे काही करायचं ते करा,बरं आई ,असं म्हणून फोन ठेवते.

ताई विचारतात ,आईचा फोन होता का,काय म्हणाली ,चिडली का

चंचल-नाही त्या म्हणाल्या शांतचित्ताने करा ,मिळेल,त्या असं बोलल्या तर मला जरा धीर आला आहे.

इकडे आई फोन ठेवल्यावर मागे वळून पाहतात,तर ज्या मामींच्या साड्या आणि ब्लाऊज असतात ,त्या मागे उभ्या असतात ,त्यांनी सगळं ऐकलेले असते.

मामी-त्या असं कसं विसरल्या रिक्षात ,त्यात जवळ जवळ पंधरा हजाराच सामान होतं 

आई-अगं मिळेल,ते प्रयत्न करत आहेत,कैमरातून बघून रिक्षा वाल्याचा नंबर शोधत आहे,तो मिळाला की मिळेल 

मामी-आम्हाला लग्नात घालायचं आहे सगळं ,नाही मिळालं तर आम्ही काय करू 

त्यांचा दोघींचा आवाज आला ,तसे घरातले सगळेच तिथे येतात ,सगळ्यांनाच टेन्शन येतं ,कारण त्या मामींचा स्वभाव सगळ्यांनाच माहित असतो ,सगळे धीर देतात ,मिळेल,पोरं एवढी प्रयत्न करत आहेत तर ,मामा तर काहीच बोलत नाही.

ज्यांच्या मुलीच लग्न असतं,ते मामा म्हणतात,आता सगळ्यांनी शांततेत घ्या ,नाही मिळालं तर उद्या मी पंचवीस हजार देतो , तुम्ही डायरेक्ट रेडीमेड कपडे घ्या आणि मला असं वाटतं,मिळतील सगळ्या वस्तू आता गोंधळी आलेत ,चला सगळे बाहेर .

सगळे बाहेर येतात ,कारण पाहुणे पण आलेले असतात ,थोडसं टेन्शनमध्ये पण गोंधळ पार पडतो .

अमेय-आम्हाला जरा तुमच्या कैमरात फुटेज बघायचं आहे , दुपारी एक वाजताच्या सुमाराच्ं ,आमचं काही सामान रिक्षात राहिलं आहे 

मेडिकलवाला -तो कैमरा आमचा पर्सनल आहे,आम्ही असं नाही दाखवत

ताई-अहो त्यात नवरीच्या सोन्याच्या बांगड्या होत्या आणि लग्न दोन दिवसांनी आहे आणि आमच्या कडून चुकून ती पिशवी रिक्षात राहिली ,फुटेज बघून आम्हांला रिक्षाचा नंबर मिळाला तर रिक्षा सापडायला मदत होईल,प्लीज ,ताई अगदी डोळ्यांत पाणी आणून बोलल्या .

मेडिकलवाला फुटेज दाखवायला तयार झाला, फुटेज मध्ये रिक्षातून जात असताना ताईंची साडी दिसते ,तो रिक्षाचा नंबर ते लिहून घेतात आणि पोलीस स्टेशनला जात असतात , तितक्यात मामाचा  फोन येतो ,कुठे आहे ,अमेय सांगतो , पोलीस स्टेशनला चाललोय ,मामा बोलतो,रिक्षाचा नंबर सांग , माझा  एक मित्र आहे आरटीओ मध्ये त्याला चौकशी करायला सांगतो ,अमेय नंबर देतो .

ते पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेट देतच असतात की, मामा , मामी,त्यांची मुलगी तिथे येतात .

त्यात काय काय होतं,ते पोलिसांना सांगतात ,हे करता करता तिथेच चार वाजतात ,तिथून बाहेर पडल्यावर सगळे अमेयच्या घरी येतात .

घरी आल्यावर मामी त्यांच्या मुलीला नको नको ते बोलतात ,अप्रत्यक्षपणे ते ताई आणि चंचल साठीच  असतं,त्या दोघीही खूप रडतात.

मामी-मी तुम्हाला काहिच बोलत नाही ,तुम्ही का रड़ताय 

चंचल-चूक आमच्या कडून झाली आहे ,तुम्ही तिला का बोलताय ते आम्हाला न समजायला आम्ही काही लहान नाही,पण आम्ही हे सगळं जाणून बुजून नाही केलं,चुकून झालं

अमेय-माहित आहे चुकून झालं,मामी चला हवं तर आताच तुम्हाला जे खरेदी करायची आहे ती करा ,मी देतो सगळे पैसे , अर्जंट मध्ये ब्लाऊज शिवून मिळतील आणि सामान मिळाल तर तेही तुम्हीच ठेऊन घ्या.

अमेयला असं चिडलेल्ं पाहून मामी शांत बसल्या, तितक्यात अमेयला आईचा फोन येतो 

आई-अरे काय झालं,अजून जेवायला नाही आले ,सगळे वाट पाहत आहे,केली ना पोलीस कंप्लेट,मिळेल आणि नाही मिळालं तर आपण त्यांना पैसे देऊन टाकू,चुकून झालं त्यांच्या हातून.

अमेय-चला सगळे तिकडे,वाट पाहत आहे आपली जेवायला

मामी-तुम्ही जावा ,आम्ही जातो आमच्या घरी

अमेय- जा ,पण तुमच्या अश्या वागण्यामुळे आईला जर काही झाले तर त्याला जबाबदार तुम्ही ,तूम्हाला माहित आहे ना तिला बिपीचा अटॉक येतो ते.

असं बोलताच मामा बोलतात ,चला जाऊ आपण सगळे.

सगळं सामान मिळत की नाही आणि पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.