फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 21

To complete parents wish like satisfaction of God

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 21

रविवारी संध्याकाळी पाच वाजता सगळे हॉलवर  पोहोचले,मुलाकडची लोकं साडेपाच वाजता आली , साखरपुडयाचे सगळे विधी पूर्ण झाले,आता सगळ्यांनी मिळून जो डान्स बसवला होता, तो सगळ्यां समोर सादर करण्यात आला .

सगळ्याजणी दोन्ही साइडला उभे राहून ठुमका मारायला सुरुवात केली ,गाणी सुरु झाली 

गो-या गो-या गालावरी चढली लाजेची लाली,

ग पोरी नवरी आली ,

तसं नवरीला हाताला धरून समोर ठेवलेल्या खुर्चीवर नवरदेवासोबत बसवले.

तसे सगळ्या छोट्या बहिणी पुढे आल्या,

ही लाज लाजिरी,ताई तू होणार नवरी,

फुलाफुलांच्या बांधून माळा,मंडप घाला हो दारी

मग दोघी कॉलेजमधल्या बहिणी पुढे आल्या,

चला चला हो भरभर,

चला घड्याळाच्या काट्यावर,

आला दारात तालेवार,

आज बँड बाजा वाजणार,

अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे,

हिला मेचिंग मेचिंग नवरा पाहिजे.

आता चंचल सहित सगळ्या बायका पुढे येतात ,चंचल सगळ्यात पुढे असते आणि तिचं पाहून सगळ्या करत असतात ,पाठिमागे अमेयची आई,मावशी ,मामी असे सगळेच असतात.

नवरा आयलय ,नवरी आयलीय,

व्हायलाय साखरपुडा,रे नखवा ,व्हायलाय साखरपुडा,

ह्या गाण्यानंतर पुढचं गाणं लागतं,

ह्या गो दांड्यावरून,नवरा कुणाचा येतो,

ह्याच्या कलव-या गो, कलव-या नाजूक साजूक,

ह्या नेसल्या गो,नेसल्या पैठणी साड्या

ह्या गाण्यासाठी सगळ्यांनी काठाच्या साड्या घातल्या होत्या,त्यावर आंबाडा ,त्यावर गजरा अशी सगळ्यांनी तयारी केली.

नवराई माझी लाडाची लाडाची गं,

आवड हिला चंद्राची चंद्राची गं 

या गाण्यावर नवरीला मधे घेत सगळ्यांनी तिच्या भोवती फेर धरुन नाचत होत्या .

आता चंचल आणि मामींनी शेवटच्या गाण्यावर डान्स केला.

साजिरी गोजिरी जोडी ही आहे जबर,

लाखात एक हे मेड फॉर इच अदर,

अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना.

सगळ्यांनीच चंचलच डान्स छान केला म्हणून कौतुकही केलं.

चंचलच्या मन मिळाऊ स्वभावाने तिने सगळ्यांना आपलेसे केले होते,सगळे नातेवाईक अमेयच्या आईला म्हणायचे,सुनबाई छान आहे की आईचा ऊर भरून यायचा.सगळ्यांच्या तोंडून सुनेच्ं कौतुक ऐकून त्यांना खूप बरं वाटतं होतं.

लग्नानंतर पहिल्यांदाच तिने सासरचं फंक्शन अटेंड केलं होतं आणि सगळ्यां बरोबर तिनेही खूप एन्जॉय केलं होतं,सगळं वातावरण अगदी फ्री,असं काहिच नाही ,की तू सून आहे म्हणून हे करू शकत नाही,त्यामुळे ती स्वत:ला लकी समजत होती.

---------------------------------------------------------

आता लग्न दोन महिन्याने होतं ,सगळ्यांनी ठरवलं होतं,ड्रेस कोड करुया ,चंचलही सगळ्यां मध्ये सामील होत होती ,सगळ्या अमेयच्या बहिणी ती छान मिक्स अप होते म्हणून खूश होत्या ,सगळ्यांची लग्नाची खरेदी चालू झाली होती.

सकाळी हळदीसाठी नववारी साडी ,लग्नात आणि लग्नानंतरच्या रिसेप्शन साठी  आपापल्या आवडीची साडी , संध्याकाळी घरचे आणि ऑफिसचे लोक यांच्यासाठी रिसेप्शन मध्ये चनिया चोली किंवा लॉन्ग गाऊन असं सगळं ठरलं.

अमेयच्या आईने मामांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात ,घरात लागणारी सगळी भांडी दिली होती ,आताही त्यांना ती ह्या लग्नातही देण्याची इच्छा बोलून दाखवली होती,अमेय सगळ्या खर्चाचा विचार करत होता,तितक्यात चंचल आली.

चंचल-अमेय कसला  विचार करत आहे

अमेय तिला आईच्या इच्छेबद्दल सांगतो.

चंचल-होईल सर्व व्यवस्थित

अमेय-अगं तुम्ही सगळ्यांनी ड्रेस कोड ठरवला आहे ना ,मग तुलाही त्याप्रमाणे कपडे घ्यावे लागतील.

चंचल-बघू काय होईल ते ,आता झोप रे,सकाळी लवकर उठायचे आहे आणि तुला माहित आहे ,मला झोप कधी येते,चल दे बरं तुझा हात उशी म्हणून.

अमेय- बरं बरं,चल गुड नाईट 

---------------------------------------------------------

पुढच्या आठवड्यात बाबांचा बर्थडे आहे,त्यांना बर्थडे साजरा करायची खूप हौस आहे,पण आता पर्यंत आमचं सगळ्यांच करता करता त्यांच सगळं आयुष्य गेलं, असं अमेय तिला ऑफिसला जाताना सांगतो.

चंचल- करु आपण साजरा करु , रात्री बोलू या विषयावर

अमेय तिला बाय करून त्याच्या ऑफिसला जातो.

रात्री अमेय चंचलला विचारतो -मग कसा करुया 

चंचल-आपण सगळ्या मामांना आणि मावशीला ,तुमच्या तिन्ही बहिणी बोलवूया,इथेच राहतात सगळे,जेवण बाहेरून बोलवू ,एक केक मागवू ,आपल्या लग्नात त्यांना भरपूर ड्रेस मिळाले आहे,त्यातला एक आईंना गुपचूप शिवून आणायला सांगू ,मी त्यादिवशी ऑफिस मधून लवकर येऊन डेकोरेशन करेल.

अमेय-डन आणि मला काय वाटतं आईबाबांचा लग्नाचा वाढदिवसही त्याच दिवशी साजरा करू त्यानंतर दोनच दिवसानंतर आहे ,तुला काय वाटतं 

चंचल-हो चालेल ना ,मग आईं साठी काय गिफ्ट घ्यायचं,मला असं वाटतं की,एक ड्रेस घेऊ म्हणजे त्यांना बाहेर फिरायला जाताना घालतील ,त्यांची तरी कोण हौस करणार,तुला चालेल ना.

अमेय- अगं माझ्या मित्रांच्या आया ड्रेस घालतात , मी एकदा आईसाठी ड्रेस आणला होता,पण ती बोलली या वयात आता हे बरं नाही वाटत, आता पर्यंत कधी नाही घातला आणि आता घातला तर लोकं काय म्हणतील ,असं म्हणून घातलाचं नाही , तुला ट्राय करायचा असेल तर तू करू शकतेस.

चंचल-आई ,ऐकतील माझं ,बाबांना पण आईंना सांगून पँट शर्ट शिवायला सांगते ,म्हणजे दोघांचाही मेक ओव्हर होईल आणि सगळ्यांसाठी सरप्राईज पण,तसे ही ते मला अगदी लव्ह बर्ड्स सारखे वाटतात ,किती प्रेम आहे ना त्यांच्यात 

अमेय तिला जवळ घेतो - आणि आपल्यात 

चंचल-आला लाडात ,हे वेळ ठरवेल की आपण त्यांच्या वयात जाईस्तोवर काय होईल,पण मला आवडेल त्यांच्या सारखं नातं

अमेय -हो का 

दोघंही एकमेकांच्या कुशीत विसावतात.

-----------------------------------------------------

आता सगळ्यांना बोलावलच्ं आहे,तर मामांच्या मुलीच केळवणही करायचं ठरवलं,सगळे आले ,चंचलने छान डेकोरेशन केलं होतं,सगळ्यांनी खूप कौतुक केलं तिचं ,मग केक कट केला, त्यानंतर गाणी लावली ,त्यावर आईबाबांना डान्स करायला लावला ,नंतर सगळ्यांनी मिळून खूप डान्स केला ,फुलटू धमाल ,सगळे दमले आणि बसले ,मग काही जण ताईंच्या घरी जाऊन बसले.

इकडे चंचलनी ताटांसमोर रांगोळी काढली,नवरी , मामा ,मामी आणि अमेयचे तीनही भावजी जेवायला बसले,त्यानंतर परत दोन पंगती झाल्या ,सगळे गप्पा मारत बसले लग्नाच्या तयारीची,आज आई बाबा खूप खूश होते ,कारण त्यांचा सगळा परिवार एकत्र होता आणि त्याला एकत्र करण्याचे काम चंचलने केलं होतं . अकरा वाजले तसे सगळे जण आपापल्या घरी जायला निघाले,तसे आईबाबा म्हणतात , आम्हांला सगळ्यांसमोर काहीतरी सांगायचे आहे,सगळे म्हणतात,बोला.

बाबा-आज पहिल्यांदा माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि तुम्ही सर्व जण वेळ काढून आले त्याबद्दल धन्यवाद,सगळ्यात जास्त धन्यवाद चंचलला,जिने पुढाकार घेऊन ही सगळी अरेंजमेंट केली आणि आम्हाला छान आठवणी दिल्या ,त्याबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो, तू या घराला तुझ्या वागण्याने घरपण दिलं ,तू नेहमीच अशी खूश रहा आणि सगळ्यांना आनंद देत रहा.

चंचलला भरून आलं आणि ती दोघांना जाऊन बिलगली.

तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

चंचल-तुम्ही मला लाजवताय असं सगळ्यां समोर ,मी काही एवढं मोठं काम केलं नाही ,असाच तुमचा हात आमच्या डोक्यावर असू द्या.

आई-अगं कौतुक सगळ्यां समोर केलं पाहिजे ना म्हणून बाबा बोलले ,आम्ही तर नेहमीच तुमच्या सोबत आहोत.

पुढे अजून काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदी रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात

🎭 Series Post

View all