
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 13
सकाळी पाच वाजताचा गजर लावला होता ,आवाज होताच चंचलला जाग आली,ती उठली आणि खाली जायला लागणार तसं अमेय म्हणाला ,तुझं झालं की,मला आवाज दे .ती हो म्हणून खाली गेली . आई जाग्या झाल्या होत्या,त्याही उठल्या.
चंचल प्रातर्विधी उरकून आंघोळीला गेली,तोपर्यंत आईंनी पीठ मळुन पाच सहा चपात्या आणि भेंडीची भाजी बनवली होती . ती बाहेर आल्यावर तिने विचारलं,इतक्या सकाळी जेवण ,तसं त्या म्हणाल्या आता तीन चार दिवस बाहेरच खाणार आहात ,निदान आज दुपारचे तरी घरचे ,जा त्याला उठव,परत उशीर झाला की ,चिड चिड करतो. ती खालूनच हाक मारते ,अहो उठा ,तसं तो ऊठून येऊन आंघोळीला जातो.
ती केस विंचरत असते ,तर ताई येतात ,त्या विचारतात,झाली का तयारी ,तशी ती बोलते ,चालू आहे .
ताई- हे घे ही कडी घाल,बांगड्या निघतात ना
चंचल-कशाला राहू दे,चालतील मला ह्या बांगड्या
आई-अगं घाल मीच सांगितल्या होत्या तिला आणायला ,आता बाहेर फिरायला जाणार ,जीन्स घालणार ,त्यावर कुठे एवढ्या बांगड्या घालून फिरणार ,नाही घातल्या नंतर तरी माझं काही नाही ,पण नुकतच नवीन लग्न झालय म्हणून कडं राहू दे,एक एक हातात आणि तिकडून आल्यावरही घातलं तरी चालेल
ताई-बघ चंचल,तुझ्या सासूला तुझी किती काळजी आहे
आई -अगं असं नाही मी समजू शकते,कारण मीही त्यातून गेली आहे,बांगड्यांचा आवाज येऊ नये म्हणून आम्ही तर बांगड्यांना दोरा बांधायचो ,नाहीतर शेजारच्या बायका अगदी चिडवणार,एक संधी सोडत नव्हत्या .तशा दोघी हसायला लागल्या ,तेवढ्यात अमेय बाथरुम मधून बाहेर आला,त्यांना हसताना पाहून त्याला वाटल्ं ,त्यालाच हसत आहे .
अमेय-काय झालं हसायला
तो फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आला होता ,तर चंचलने आपले तोंड दुसरीकडे फिरवले .
ताई -अरे आम्ही, आई सांगत होती त्यावर हसलो ,तुझ्यावर नाही ,आवर तू उशीर नाही होत आहे का
हो ,असं म्हणत तो वर ड्रेस घालायला जातो.
ताई हळूच चंचलच्या कानात बोलते- आता तर बिना टॉवेलच पाहावं लागेल ,मग काय करशील
चंचल-ताई ,तुम्ही पण,आले मी बैग घेऊन असं लाजून म्हणत बैग आणायला जाते.
ती वर बैग आणायला जाते ,तर अमेयच्ं आवरून झालेलं असतं,तो मध्येच उभा असतो ,ती म्हणते तुमची आणि माझी बैग द्या ,तसं तो मागं वळून पाहतो आणि गालावर बोट दाखवत म्हणाला,देतो आणि डोळ्याने तिला बोलतो ,तू दे.
तसं ती त्याला खुणेनेच सांगते ,पहिली बैग,तो बैग देतो आणि चंचल पटकन गालावर किस करुन खाली जाते , तर तो बोलतो,जरा हळू .
त्याचं वाक्य ऐकून आई-चंचल हळू उतरत जा ,खुप अरुंद आहे ती शिडी.
चंचल-हो आई
आई-धर ,हा डबा ठेव
अमेय खाली येतो ,देवाच्या पाया पडून,आईबाबांच्या पाया पडून गाडीची चावी घेऊन बोलतो ,मी आलो गाडी घेऊन ,तोवर तू ये बाहेर .
तो गाडी आणायला जातो, तोवर सामान घेऊन ताई,आई आणि चंचल रस्त्यावर येऊन उभ्या राहतात.
गाडी आल्यावर अमेय सगळं सामान डीक्कीत ठेवतो ,सगळं घेतले ना ,असं विचारतो ,ती हो म्हणते ,पुढ जाऊन बसते.
आई-व्यवस्थित जा,पोहोचल्यावर फोन कर आणि तिच्या पर्स मधून दोन हजार काढले आणि अमेयला देत म्हणाली,राहू दे लागतील.
अमेय-अगं बाबांनी दिले
आई-मला काही बोलले नाही
तसं ताई आणि अमेय एकमेकांकडे पाहत हसतात.चंचल मात्र प्रश्नार्थक नजरेने पाहते .
आई-तरी राहू दे.
अमेय-चला येतो ,पोहोचल्यावर फोन करतो
चंचलही बाय करते.
अशी प्रवासाला सुरुवात होते.
---------------------------------------------
चंचल-ताई आणि तुम्ही का हसले
अमेय-अगं त्या दोघांचा जीव तुटतो ,दोघेही आप आपल्या परीने प्रयत्न करत असतात पण एकमेकांना बोलून दाखवत नाही,आता हेच बघ ना ,पैसे आहे म्हटलं,तरी बाबांनी पाच हजार दिले आणि आईने दोन हजार ,ते असतं ना तुझं माझं पटेना ,तुझ्या वाचून करमेना ,अशी गत आहे .
चंचल-किती वेळ लागेल पोहोचायला
अमेय-का घाई झाली का खूप
चंचल-तुमचं आपलं काहीतरीच,असचं विचारलं
अमेय गाणं लावतो ,तर गाणं लागत
ये हसीं वादियां,ये खुला आसमां,आ गये हम कहां
तसे दोघे एकमेकांकडे पाहून हसतात .
चंचल-बरोबर गाणं लागलं आहे
अमेय-तुला रात्री टेन्शन आलं होतं ना
चंचल-बांगड्यांचा आणि पैंजणांचा जो आवाज येत होता ना त्यामूळे आणि खाली सगळा आवाज जात असेल या विचाराने,मी बेहाल झाले होते.
अमेय-ते आलं माझ्या लक्षात ,म्हणूनच मी तसं बोललो,तुझं पण मत माझ्या साठी महत्त्वाचे आहे आणि बाबांनी तर धमकी दिली की,तुला त्रास द्यायचा नाही.
चंचल- कधी त्या दिवशी बाहेर गेले होते तेव्हा का
अमेय-हो
पुढचं गाण लागतं,तसं दोघे परत एकमेकांकडे पाहून हसतात.
चुरा लिया है ,तुमने जो दिलको,नजर नहीं चुराना सनम ,
बदलके तुम मेरी जिंदगानी ,कहीं बदल ना जाना सनम
तसं चंचल त्याच्याकडे एकटक पाहत असते ,तसं तो गाडी बाजुला घेतो आणि तिच्याकडे पाहतो ,तसं ती विचारते- गाडी का बाजूला घेतली ,काही झालं का
अमेय-एक काम कर ,तू गाडी चालव ,मी तुझ्या जागी बसतो
चंचल-अरे पण,झालं काय ते तर सांगशील
अमेय-तुला खरचं नाही कळत आहे
चंचल-नाही
अमेय-आपल्याला पोहोचायचं आहे ना व्यवस्थित महाबळेश्वरला ,तू जर अशी एकटक माझ्याकडं बघत असशील तर मी गाडी चालवण्याकडे लक्ष कसे देणार .
ते ऐकून तिला हसू आलं आणि मग म्हणाली -आता नाही पाहणार ,बस
तसं अमेय गाडी सुरू करतो .
चंचल आता एकटक खिडकीतून बाहेर बघत असते ,तो दोन तीन वेळा तिच्याकडे पाहतो ,पण तिच लक्ष नसतं,आता परत तो गाडी बाजुला घेतो ,आता मात्र ती त्याच्या कडे पाहत म्हणते-आता काय झालं
अमेय-तू चिडली आहेस का
चंचल-नाही रे ,तूच तर म्हटलास ना बघू नको म्हणून बाहेर पाहत आहे
अमेय - तू असं सारखं बाहेर पाहते ,तर माझं ड्रायव्हींग मध्ये लक्ष नाही लागत आहे
चंचलल-नक्की मी काय करायचं ते सांग ,बघायचं की नाही बघायच्ं
अमेय-दोन्ही थोडं थोडं कर ,एवढी सुंदर गाणी लागलीत ती एन्जॉय कर
चंचल-तिच एन्जॉय करत होती ,म्हणून तर तुझ्याकडे पाहावस वाटत होतं,तर तुला त्रास होत होता मग राहिलं तर
अमेय-दोन्ही गोष्टींचा मध्य साध,प्लीज समजून घे जरा
अमेय परत गाडी चालू करतो ,आता ती जे गाणं लागल ते गुणगुणत होती आणि मधून मधून त्याच्याकडे पाहत होती.
आता तोही छान मूड मध्ये गाडी चालवत होता.आता गाडी वाईला पोहोचली ,तिथल्या कृष्णा माई आणि गणपतीचे दर्शन घेतले,दोघांनीही देवाला प्रार्थना केली की,आमचे सहजीवन आनंदात जाऊ दे.
आईंनी दिलेला डबा तिथेच कृष्णा माईच्या तिरावर बसून खाल्ला आणि परत प्रवासाला लागले .
----------------------------------------------------
आता पुढे घाट लागणार होता , घाटात इतकी वळणे होती की , चंचल थोडी अस्वस्थ होत होते
अमेय-अगं मला सवय आहे आणि आतातरी हा घाट चांगला बनवला आहे, पहिला तर ह्याच्या पेक्षा जास्त बेकार कंडीशन होती.
चंचल-माझा तुझ्यावर विश्वास आहे
आता घाट संपत आला होता घाट संपल्यावर दोन वळणे गेल्यावर तिस-या वळणावरून गाडी खाली घेतली ,थोडं पुढे गेल्यावर एक गेट आले ,त्यातून गाडी आत नेऊन पार्क केली आणि अमेय बाहेर उतरला
अमेय-मी आलो जरा,तू बाहेर येऊन थांबू शकतेस
चंचल बाहेर येवून उभी राहिली आणि इकडे तिकडे पाहत होती,समोरच स्ट्रॉबेरीचे मळे होते ,फार्म हाऊस ही स्वच्छ होते .
बाहेरून कुंपण होते ,आतल्या बाजूने सगळीकडे झाडे होती ,अशा बैठ्या खोल्या होत्या ,त्यावर पत्रे होते ,बाजुला ऑफिसची रूम असावी,ज्यात अमेय गेला होता, एका साईडला पत्र्याखाली चूल मांडलेली दिसत होती आणि आजुबाजूला भांडी पण होती ,ते स्वयंपाकघर असावे. सगळीकडे गवताचा गालीचा होता आणि मधून चालता येण्यासाठी फरशा टाकल्या होत्या ,एका बाजुला कवलाचे छप्पर असलेला झोपाळा होता आणि तो सगळी कडून वेलींनी सजला होता ,त्याकडे बघून तिला राहावलं नाही,आपसुकच तिचे पाय तिकडे वळले . ती झोपाळ्यावर जाऊन बसली ,झोपाळ्याच्या बाजूला लहान मुलांची घसरगुंडीही होती ,तसे तिला पण घसरगुंडी खेळावी असं वाटलं,पण क्षणात तिने विचार बदलला,तिने समोर पाहिले तर कारंजे होते आणि सभोवताली भारतीय बैठकीचे जेवणाचे टेबल होते ,प्रत्येक टेबलवर पत्र्याचे शेड होते ,कुठेही बसले तरी कारंजे दिसत होते.
तितक्यात अमेय तिला तिच्या दिशेनं येताना दिसला ,तो बाजुला येऊन बसला आणि विचारलं आवडलं का ,माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे ,इथे देखरेखीसाठी त्याने दोन जोडपी ठेवली आहेत ,आपल्या लग्नाच गिफ्ट म्हणून त्याने आपल्याला चार दिवसांसाठी रूम दिला आहे ,पण मी एका अटीवर घेतलं की,जेवणाचे वगैरे पैसे मात्र मी देणार ,आवडला का तुला ,अगदी हाय फाय हॉटेल सारखा नाही ,परंतु निसर्गरम्य आहे .
चंचल-छान आहे.
अमेय-चल रूम मध्ये सामान ठेवू ,थोडसं फ्रेश होऊ आणि इथे जवळच गेम झोन ,बोटींग आहे तिथं जाऊन येऊ.
तसे दोघेही सामान घेऊन रूम मध्ये ठेवतात ,चंचल फ्रेश होऊन येते ,नंतर अमेय जातो ,मध्ये एक छान पलंग असतो त्याला छान अशी झालरची मच्छरदाणी लावलेली असते ,त्याच्या शेजारी ड्रेसींग टेबल असतो ,ती बैग काढून केस विंचरते आणि लाईट मेकअप करते ,तिथे जवळच एक खिडकी असते ,ती उघडते तर छान हवेची झुळूक येते,तर तिला अमेयने स्पर्श केल्याचा भास होतो ,तसं ती मागं वळून पाहते तर कुणी नसतं,तिला असं वाटतं भास झाला ,ती आरश्यात स्वत:ला पाहत असते ,तेव्हा असं वाटतं की,अमेय तिच्या पाठी उभा आहे ,मागं वळून पाहिलं तर कुणी नसतं,आरशात पाहत स्वत:च्या डोक्यात मारत पुटपुटते,चंचल आज हनिमून आहे तर प्रत्येक ठिकाणी अमेयच दिसत आहे आणि लाजत आरशात बघते तर परत अमेय तिच्या मागे उभा आहे असं वाटतं,तर ती म्हणते ,मी नाही आता मागे वळणार असंही मला खूप त्रास दिला आहेस ,तसं अमेय मागून तिच्या कंबरेला आपल्या हातांचा विळखा घालतो आणि म्हणतो,अजून तर काहीच त्रास दिला नाही,असं बोलत तिचं तोंड आपल्याकडे फिरवतो ,तस ती लाजून मान खाली घालते ,तो तिची हनुवटी धरून तिला म्हणतो,इकडे बघ ,ती त्याच्याकडे बघते ,दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवतात आणि आपसुकच एकमेकांच्या जवळ येऊन ओठांवर ओठ टेकतात ,आता पुढचं लगेच सगळा विचार करून मोकळं होऊ नका , दोन मिनिटांनी दोघे बाजुला होतात ,चंचल तर लाजून लाजून चूर झालेली असते ,तितक्यात बेल वाजते . अमेय दरवाजा उघडून सांगतो ,हो आलोच आम्ही.
अमेय-चहा तयार आहे ,चल जाऊ या
तशी ती स्वत:ला सावरत त्याच्या बरोबर जाते .
चहा घेऊन ते गेम झोनला जातात .
मग आठवले का सगळ्यांना लग्ना नंतरचे पहिले काही दिवस,अजून आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर वाचत रहा ,हसत रहा आणि अभिप्राय मात्र नक्की द्या.
क्रमशः
रुपाली थोरात