फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 12

Marriages are made to share everything and support each other

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 12

अमेय आणि बाबा बाहेर जातात , त्यांच्या घराजवळ एक तलाव असतो ,त्याच्या पाय-यांवर जाऊन बसतात.

अमेय- बोला आता काय बोलायचं आहे 

बाबा - मैन टु मैन टॉक 

अमेय -म्हणजे मला नाही समजलंं

बाबा -असं म्हणतात,जेव्हा बापाची चप्पल मुलाला येते ,तेव्हा वडील आणि मुलामध्ये मित्राचं नातं असलं पाहिजे ,दोघांना मिळून एकत्र बसून घेताही आली पाहिजे असं ,आता आपण दोघंही घेत नाही, असं मला वाटतं,कारण माझ्या तर गळ्यात माळ आहे,मला तुझं माहित नाही ,कारण तू तुझ्या मित्रां सोबत दोन तीन दिवसांसाठी फिरायला जातो ,तर माहित नाही.

अमेय- घेतलीय एकदा दोनदा पण फक्त बिअर,सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि ती पण जास्त नाही प्रमाणात. 

बाबा-तू माझ्याशी मित्रासारखा बोललास तर बरं वाटलं,मी पण तुझ्या वयाचा होतो तेव्हा घेत होतो ,पण कोणतीही गोष्ट प्रमाणात असली पाहिजे ,तिचं व्यसनात रूपांतर नको व्हायला ही काळजी आपण घ्यायची असते ,मी हे वडील या नात्याने नाही तर मित्र या नात्याने सांगत आहे ,मित्र परिवार सुध्दा असा असावा ,जे आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेतील .

अमेय-हो बाबा ,तुम्ही तर माझ्या  सगळ्या मित्रांना चांगल ओळखता.

बाबा- हो रे तसे तुझे सगळे मित्र छान आहे ,नेहमी एकमेकांना मदतही करता, मला तुझ्याशी वेगळ्याच मुद्यावर बोलायच आहे ,तुला लग्न म्हणजे काय असतं असं वाटतं 

अमेय -दोन व्यक्ती एकत्र येऊन आयुष्यभरासाठी एकमेकांबरोबर राहणं 

बाबा-तुझ्याकडून हे ऐकून बरं वाटलं, पण एकमेकांना समजून घेणं, प्रत्येक सुख दु:खात साथ देणं, एकमेकांची ओढ असणं, काही गोष्टी नाही बोलल्या तरी समजून घेणं आणि आयुष्य हसत खेळत घालवणं,आता तुम्ही फिरायला जाणार आहात ,तर बायको आहे ,तिच्यावर आपला हक्क आहे ,म्हणून ओरबाडून नाही घ्यायचं. प्रेम हळुवार फुलवायच की ,समोरची व्यक्ती स्वत:हून समर्पित झाली पाहिजे . नाहीतर आज कालची मूलं जोश मध्ये येऊन त्यांना होश राहत नाही. ह्या क्षणांची छान आठवणी राहिल्या पाहिजेत,आता ती आमची मुलगीही आहे ,त्यामूळे तिला त्रास झालेला आम्हाला चालणार नाही.

अमेय- हे बरं आहे,माझ्याच घरात मी पोरका होतो की काय अशी भिती वाटायला लागली आहे 

बाबा -अरे तसं नाही ,तू आधीपासून  आमच्यासोबत राहत आहे ,पण ती जिथे लहानाची मोठी झाली तिथलं सगळ सोडून तुझ्या बरोबर ज्या विश्वासाने आली ,तो विश्वास तू सार्थ ठरवला तर आम्हांला तुझा अभिमान वाटेल. दोघांनाही आमच्या कडून सारखच प्रेम मिळेल,तुम्ही दोघे खुश तर आम्ही खुश.

अमेय-जमेल ना मला सगळं ,कारण माझे सगळे मित्र सांगत असतात ,आईच्या आणि बायकोच्या मध्ये सैंडविच होतं ,ते कसं काय होईल 

बाबा-बायकांच्या गोष्टीत जास्त लक्ष नाही द्यायच ,त्यांना त्यांच्या लेवलवर सोडवायला सांगायच ,खरं  काय खोटं काय याचा शोध लावायचा नाही ,कुणीतरी एकजण नाराज होणारचं . काही गोष्टी एका कानाने ऐकायच्या आणि दुस-या कानाने सोडून द्यायच्या तरच सुखी राहशील.

अमेय-बराच वेळ झाला ,चला जाऊया

बाबा-हम्म ,चल

अमेय -एक सांगू

बाबा - बोल ना ,अजून काही शंका आहे का

अमेय-मला तुम्ही असे माझ्या बरोबर बोललात ते खूप आवडलं,असे प्रत्येक वडीलांनी आपल्या मुला बरोबर बोललं पाहिजे ,म्हणजे मनातली भिती आणि संभ्रम कमी होतो,

मी खरचं खूप लकी आहे की,तुम्ही दोघे माझ्या आयुष्यात आहात .

बाबा- मला माझं लग्न झालं तेव्हा असं वाटतं होतं,पण मला असं कुणीच काही सांगितल नव्हतं,मी तुझ्याशी बोलल्यावर मलाही बरं वाटल्ं आणि हे घे पाच हजार राहू दे तुझ्या जवळ.

अमेय-आहेत माझ्याकडे

बाबा-अरे असू दे,बाहेर गेल्यावर लागतात आणि दोघेही छान एन्जॉय करा

-------------------------------------------------------

दुस-या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर ,घरातील सगळी कामे उरकली तसं अमेयची आई म्हणाली ,जा तुम्ही दोघे मार्केट मध्ये,काय घेऊन यायचे ते घेऊन या.तसं चंचलनी छानसा ड्रेस घातला आणि दोघे टू व्हिलर वर निघाले . तो बोलला जाऊ मार्केट मध्ये तुला काही आवडलं तर घे . मार्केट मध्ये गेल्यावर ती जीन्सवर घालायला दोन फैन्सी टॉप अमेयच्या पसंतीने घेते . मग तो तिला एक लॉन्ग गाऊन घेऊन देतो ,तो तिला विचारतो ,तुला शार्ट वन पीस घालायला आवडेल का.ती म्हणते,नको .

आता दोघांना भूक लागते तर दोघे ज्यूस पितात, मग अमेय बोलतो,इकडे एक गार्डन आहे ,तिथे जाऊ .

चंचल-तुम्ही न्याल तिथे

ते गार्डन मध्ये जातात आणि एका बेंचवर बसतात .

अमेय-आवडलं का तुला चाळीतल वातावरण

चंचल-सगळे तर छान वाटले

अमेय- मला माहित आहे रूम थोडा छोटा आहे ,आपण जाऊन आल्यावर राहतो  आहे तो रूम भाड्याने देऊन 1 बी एच के  भाडयानी घेऊ असं चाललंय,तसं एक दोन जनांना सांगितल आहे रूम पाहायला .

चंचल- असं काही नाही,मी करेल ऐडजस्ट 

अमेय- तू करशील ,पण आई बाबांचच चाललंय,बघू काय होतं 

चंचल-उद्या सकाळी किती वाजता जायचं 

अमेय -निघू सकाळी सहाला म्हणजे उन्हाच्या आधी पोहोचू

चंचल-घरी जावून बैग भरावी लागेल

अमेय-आई बाबांची आठवण येते का ,फोन लाव मग

चंचल फोन लावते ,आई फोन उचलते ,ती त्या दिवशी चाळीतल्या लोकांनी केलेल्या स्वागताबद्दल सांगते,ती बोलताना खुश असते ,अमेय मात्र तिच्याकडे सारखं बघत असतो. ती सगळ्यांशी बोलून फोन ठेवते 

अमेय-मग खुश का राणी सरकार

चंचल लाजतच - हो

अमेय-मग आता आम्हांला खुश करा  आणि गाल पुढे करतो

तिला काही कळत नाही ती विचारते,काय 

अमेय गालावर बोट ठेवतो ,तसं ती म्हणते ,इथे

अमेय-कुणी नाही ,चल पटकन

चंचल इकडे तिकडे पाहत,पटकन त्याच्या गालावर किस करते.

अमेय-चेक करत होतो की,तू आपल्या नात्यासाठी म्हणजे हनिमून साठी तयार आहेस का

चंचल- काही पण असं म्हणत लाजते,तिचे गाल आरक्त झालेले असतात.

अमेय-चल जावू ,घरी आई जेवायला वाट पाहत असेल ,दोघेही थांबले असतील.

घरी पोहोचल्यावर अमेयची आई बोलते ,तोंड हातपाय धुवून या जेवून घेऊ.

रात्री अमेयची आईच जेवण बनवते ,ती फक्त त्यांच्या हाताखाली करत असते.

जेवल्यावर आई तिला बोलतात ,आज तू वर झोपायला जाऊ शकतेस .

तसं ती लाजत म्हणते-मी झोपते खालीच 

आई-अगं तिकडून आल्यावर तुम्ही तिकडेच झोपणार आहात ,लाजू नको जा.

ती वर जाते तर छोटासा पोटमाळा असतो ,एका साइडला कपाट जे चंचलला मिळालं होतं,त्याच्या बाजुला बेड तो सुध्दा तिला मिळालेला होता ,बेड सोडून एका साईडला ड्रेसिंग टेबल त्या समोर एकच जण उभे राहून आवरू शकेल एवढी जागा होती.पुढच्या साईडने एक अर्धी भिंत होती आणि त्यावर पडदा लावलेला होता ,पडदा लावला की रूमचा फिल येत होता,पण खाली बोललेलं सगळं ऐकू येत होते,म्हणजे वर बोललेल खाली ऐकू जाणार असा कयास तिने बांधला .

अमेय सगळं बोलणं ऐकत असतो ,ती आल्यावर तिच्या चाहुलीने त्याने तिला झोपायला जागा दिली ,ती शेजारी झोपली तशा तिच्या बांगड्या वाजल्या,पैंजणांचा आवाज झाला .

इकडून तिकडे झाल तरी बांगड्यांचा आवाज झाला . तसा तो तिच्या कानात बोलला शांत झोप ,उद्या आपल्याला सकाळी लवकर जायचंय,तिला हे ऐकून बरं वाटलं. तिने त्याच्या हातावर डोकं ठेवलं आणि त्याने तिच्या अंगावर हात टाकला आणि दोघेही उद्याची स्वप्न पाहात झोपी गेले.

काय होईल पुढे ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा आणि आनंदी राहा ,आपला अभिप्राय नक्की द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all