निर्णय स्वातंत्र्य

माझे घर माझा हक्क

सुवर्णा आणि सागर एक आनंदी जोडी... त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती... एकत्र कुटुंबात रहात होते... अगदी हसते खेळते कुटुंब होते... दोन मुले, सासू-सासरे... दीर... जाऊ बाई लग्नानंतर वर्षभरात अपघात होऊन गेली... तेव्हा त्यांच्या कुटुंबाची घडी जरा विस्कळीत झाली होती... पण एका वर्षात सर्व सावरले...

छोट्या दीराच्या लग्नं म्हणून त्यांनी मोठ्या गडबडीत नवीन घर बांधलं... गणेश पूजन करून त्यांनी गृहप्रवेश केला... पण वास्तुशांत करायची राहून गेली... आणि त्यात जाऊबाईचा अपघात.... एका मागून एक घडामोडी घडत गेल्या... त्याचा धक्का बसून सासूबाई ना अॅटॅक येऊन गेला... पुढची दोन वर्षे ह्या सर्वात गेली... मग् ब्राम्हणाने सांगितले म्हणून घाई घाईत वास्तुशांत करायच ठरले... कोणाला बोलवायचं नाही असे ठरलं... सुवर्णा चे माहेर अगदी गावात... तिनेच शेवटी विषय काढला की आपण आई बाबांना बोलवू... सागर आधी हो म्हणाला.... आणि मग् काय झाले तिला काही कळले नाही... सासूबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या कोणाला बोलवायची गरज नाही... आधीच त्याचे असे झालंय... उगाच काही वाढवायची गरज नाही....

सुवर्णा ने तें ऐकले आणि तिला खूप भरून आले... माझे घर... आणि माझ्या आई बाबांना बोलवायचं नाही... एवढी वर्ष झाली लग्नाला तरी एवढे स्वातंत्र्य सुद्धा नाही मला.... तिला खूप राग येत होता... पण घरात भांडण नको म्हणून गप्प बसली....

गावात एका ठिकाणी लग्न होते.... म्हणुन तिच्या सासूबाईच्या नणंदा येणार होत्या.... आणि भटजींनी त्यानंतर दोनच दिवसांनी वास्तुशांतीचा मुहुर्त दिला होता... पाहुणे घरात आले त्यांना राहायचा आग्रह झाला... पूजा आहे जाऊ नका... सुवर्णाचे डोळे भरून येतं होते... पण तिच्यावर झालेले संस्कार त्यामुळे ती गप्प होती... तिला अजिबात इच्छा नव्हती कसलीच.... आज एवढी वर्षे झाली... तरी माझ्या पायात ह्यांच्या बेड्या का??? एवढे पाहुणे आले ते चालतंय...पण माझे आई बाबा आले असते तर काय झाले असते....

वास्तुशांतीचा दिवस येतो...ती सर्व तयारी करत असते... पूजा सुरू होते.... माहेरच कॊणी आले असेल तर... आेटी भरायला या... सुवर्णाचे डोळे गच्च भरून आले... आई तिची... कधीच कोणत्या कर्तव्याला चुकली नव्हती... तिने आधीच ओटी पाठवुन दिली होती... आत्या सासूबाई नि ओटी भरली... ती काही बोलत नसली तरी तीचा चेहेरा अन डोळे बरेच काही बोलून गेले....

पूजा आटपून जेवणं झाली...तिला मात्र सतत मनात तेच विचार येतं होते... सागरचं आई-बाबांपुढे काही चालत नव्हते.... सर्व आवरून ती खोलीत आली... सागर ला तिच्या भावना समजत होत्या... पण.. हा पणच आज ही परिस्तिथी घेऊन आला होता....

आत्या सासूबाई नि सासू सासरे याना समजावून सांगितलं.... कि तुमचे आज चुकले... आता तुमचा संसार नाही...तिचा आहे... आणि जे काही झाले त्यात तिची काय चूक??? तिला या घरात कोणाला बोलावायच अन कोणाला नाही याच स्वातंत्र्य असायला हवे... फक्त त्या स्वातंत्र्याचा जर तिने गैरफायदा घेतला तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे... त्या बाबतीत जाब विचारण्याचा... पण ती वेळ ती कधीच येऊ देणार नाही खूप गुणी मुलगी आहे...

कारण तसे नसते तर आज तुमच्या विरोधात जाऊन तिच्या माहेरच्या लोकांना ती बोलवू शकत होती पण तसे तिने नाही केले... अन तिच्या आईने देखील आेटी पाठवुन त्यांचे कर्तव्य पार पाडले... यावरून त्यांचे संस्कार दिसून येतात... आज तुम्ही वास्तुशांत केली... घरात शांतता, सुख, समॄद्धी यावी म्हणून....पण आज लक्ष्मी म्हणून आणलीत तिच्या डोळ्यात पाणी.. तुमच्या मुलाने जर तुम्हाला बोलवले नाही तर तुम्हाला कसे वाटेल..?? त्यांनी मुलगी दिली म्हणजे जगाची रीत म्हणून दिली... त्यांना सुद्धा पूर्ण अधिकार आहे तिच्या सुखदुःखात सामील व्हायचा.... हे मी बोलते कारण आज मी एका मुलीची आई आहे.. त्यामुळे मी समजू शकते... तुंम्हाला मुलगी नाही त्यामुळे तुम्हाला कधीच समजणार नाही...

हल्ली मुलींना सासरी स्वातंत्र्य दिले जाते..असे बोलले जाते... पण तें खरच असते का?? की स्वातंत्र्य देतोय असे दाखवत कर्तव्याच्या बेड्यांमध्ये तिला अडकून ठेवले जाते... मग् हीच कर्तव्य मुलाना का नाही?? तिने सासू सासरे... सासरची माणसे जपून ठेवण्यासाठी आयुष्यभर झटायच... मग् त्याला का नाही?? नाते तेच फक्त नियम वेगळे....

सासूबाई चे डोळे उघडतात... त्या म्हणतात खरच चुकले माझे... अन संध्याकाळी तिच्या आई-बाबांना सन्मानाने बोलवतात...

मैत्रिणींनो ही कथा पूर्ण काल्पनिक आहे... पण आजूबाजूला हे चिञ नक्की दिसते.... बोलायला असते तीचं घर आहे... तिला स्वातंत्र्य आहे  पूर्ण.. पण माहेरची माणसे... तिच्या मैत्रिणी आलेल्या पटत नाहीत... तिच्याकडून कोणतीही चूक झालेली पटत नाही.... तुम्हाला काय वाटत जरुर सांगा....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ