नात माझी इवलीशी

My granddaughter

नात माझी इवलीशी

नात माझी इवलीशी
आहे साजिरी गोजिरी
मीच लहानपणीची
जितेपणी जन्मा आली

लडीवाळ हट्ट तिचे
तिज कसे रागे भरु
हरएक कामा माझ्या
लुडबुड करे मनू

सणासुदी येई घरा
चारआठ दिसांसाठी
जाई ठेवुनी आठवा
माझ्या रित्या दिसासाठी

नेत्र माझे पाझरती
दाट सयीने तियेच्या
स्वप्नी माझ्या येऊनिया
मज देते गोडपापा

-----सौ.गीता गजानन गरुड.