माझी मैत्रीण

This is article is all about one my female friend .

          असं म्हणतात कि एकवेळ गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण एक मुलगी बेस्ट फ्रेंड असावी. आपला समाज हे एक मुलगा आणि मुलीला फ्रेंड म्हणून मान्य करत नाही . त्यांना वाटत कि एक मुलगा आणि मुलगी हे फक्त प्रियकर आणि प्रेयसी असतात .पण असं नाही , ते मित्रमैत्रिणी सुद्धा असू शकतात . अशीच एका मैत्रीणबाबत मी आज सांगणार आहे .

दोन वर्षांपूर्वी मी तिला भेटलो . म्हणजे कॉलेजमध्ये तिला भेटलो , तेंव्हा ती खूप शांत वाटत होती . बाहेरून तरी शांत वाटत होती . मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो , तिथे आमच्या डिपार्टमेंटच कोणताही कार्यक्रम असला तर आम्हा विद्यार्थ्यांना करावी लागे आणि आम्हीही ते उत्सुकतेने करत होतो . आमच्याकरिता पहिला कार्यक्रम ' शिक्षक दिन ' या दिवशी शिक्षकासंदर्भातली काही कार्यक्रम घ्यायची होती . आमचे सिनियर आम्हाला या कार्यक्रमातील सगळी जबाबदारी दिली होती . याच कार्यक्रमासंदर्भात माझी आणि तिची ओळख झाली . तीच काम हॉल मधील डेकोरेशनच होत आणि माझी जबाबदारी सकाळी हॉलची व्यवस्था बघणे होत . कारण मी कॉलेजवळच रूमवर राहत होतो . 

याचीच तयारी करताना मला कळल कि हि वाटती तेवढी शांत नाहीये . तेंव्हा पासून आम्ही थोडंथोडं बोलत लागलो .

जशे कॉलेजचे दिवस जात होते , तशे आमच्यातली मैत्री वाढू लागली . ब्रेक मध्ये ती आणलेली टिफिन माझ्यासोबत शेअर करत होती आणि बाकी कोणताही प्रॉब्लेम तिला आला असेल तर ती माझ्यासोबत शेअर करू लागली . मला कोणताही प्रॉब्लेम आला तर ती ओळखून घ्यायची आणि मला विचारायची . ती माझ्या मनातील ओळखून होती . कधीकधी माझे खूपच वैयक्तिक समस्याही ती माहिती झाली तेंव्हा ती माझी समस्या सोडवली आणि ती जर समस्या सोडवू शकत नसली , तर मला आधार मात्र नक्कीच द्यायची . दुःखात हि नाही , तर सुखात हि ती मला साथ द्यायची . माझ्या वाढदिवस साजरा करण्याबाबत असोत किंवा माझ्या कोणत्याही सुखाचा क्षण असोत , ती माझ्या सोबत होती . तिच्या वाढदिवसाला मी एक छोटीशी गिफ्ट दिलो होतो आणि ते पण सहल जाण्याच्या आदल्या दिवशी ... तिच्या काही दिवसातच माझाही वाढदिवस होणार होता . पण ती तेंव्हा माझ्या सोबत नसणार होती. कारण तेंव्हा मी सहलीत असणार होतो आणि ती सहलीला येणार नव्हती .तिला त्याबद्दल दुःख हि वाटलं होत .

तिच्या घरचे मात्र कडक होते . म्हणून ती घरी लवकर जात असे . असेच दिवस गेले . शेवटचा सेमिस्टर आला . तोपर्यंत तिच्या सोबतचा क्षण खूप आनंदात जात होते . शेवटचा निरोप समारंभाची कार्यक्रम झाली . पण त्यात मी तिला काहीच बोलू शकलो नाही किंवा तीही काही बोलली नाही . याच खंत मला आजही वाटतो . पण नंतर परीक्षा होणारच होती कि कोरोना सारखी महामारी आपल्या देशात येऊन टपकली . परीक्षासंदर्भात का होईना मी तिला भेटलो असतो , पण असं नाही झालं . 

तेंव्हा आमची परीक्षा ऑनलाईनच झाले आणि आमची भेटण्याची एक संधी होती , तीही नाही भेटली . कोरोनाच्या त्या दिवस सारल्या नंतर मी माझ्या शहरातून परत माझ्या कॉलेजकडे जाण्याची योजना करू लागलो . तिथे जातच आहे , तर एकदा तिला कॉन्टॅक्ट करून तरी पाहुयात म्हणून कॉन्टॅक्ट केला . तर मला कळलं कि जॉब करू लागली होती . मी येत असल्याचं सांगितलं तर ती भेटण्यास लगेचच तयार झाली आणि तीही जॉबवरून फक्त काहीवेळासाठी येणार होती . मी तिथे पोहचलो , तर ती मला भेटली आणि माझ्या वाढदिवसाचा राहिलेला गिफ्ट मला दिली . ते लहानस गिफ्ट खूप काही सांगून गेलं . तेंव्हाही मी काही बोलू शकलो नाही . कारण तिला लवकर निघावं लागलं . 

त्यानंतर ती अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे . बाकीचे सगळे कॉन्टॅक्ट सोडून गेले खरे पण ती कॉन्टॅक्ट मध्ये आहे . शेवटी एवढंच सांगतो कि मैत्रीला कोणताही शब्द पुरु शकत नाही , पण काही शब्दात मी ते मांडलो . तिला फक्त हेच सांगू इच्छितो कि माझ्यासोबत मैत्री केल्याबद्दल धन्यवाद ????

****************************

ऋषिकेश मठपती 

धन्यवाद