आवडते पुस्तक !

A short and sweet , wild imagination with loved one Shortstory love Marathi

लघुकथा - "आवडते पुस्तक !"

आपण दोघे ....अनेक दिवसापासून प्लॅन करत आहोत ....कि फक्त आपण दोघे मस्त ट्रेक ला जाऊन निसर्गाच्या सानिध्यात राहायचं.

हो नाही करता करता अखेर ठरतं मग आपलं.

तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आपण पोहचतो त्या छान डोंगरावर. तुरळक वस्ती, निरभ्र आकाश, मंद वारा आणि आसमंतात वेगळाच एक गन्ध. ...आणि सोबत तू. ... बस्स्स अजून काय हवंय मला.

हे मात्र बरं झालं कि आपण त्या धाब्यावर जेवण करून घेतले. बाहेर असं पडलं ना कि जेवण खाणे या साठी जास्त ऊर्जा घालवणे आपल्या दोघांनाही आवडत नाही ना.

सरते शेवटी जमल सगळ. छोटा तंबू उभारलाय. पाऊस आला किंवा दव जास्त असेल तर बरं पडत. मी लाकडे जमवली आणि मस्त कॅम्प फायर तयार करून आपण दोघे दोन खुर्च्यांवर तंबू समोर बसलो आहोत.

तुझी अगदी अविवरत बडबड चालू आहे. निघाल्यापासून बोलत आहेस तू. मला नेहमी प्रश्न पडतो,"बाई ग ... तुझं तोंड कसं दुखत नाही." आणि असं विचारलं कि तुझा गुद्दा ठरलेलाच ना ग. नेहमीसारख.

पण जसा जसा सूर्य मावळतो तशी तशी तू अबोल होऊ लागतेस. जणू पाकळ्या मिटू लागल्या आहेत कमळाच्या.

गप्पा हळू हळू निर्सगाकडे वळल्या आहेत. मधोमध असलेली शेकोटी छान उब देतेय. सरते शेवटीआपण दोघे शांतपणे काही न बोलता चांदण्या बघत आहोत. तुला आवडत ना डोळ्यांनी चांदण्यांची नक्षी गुंफायला. नेहमी सारख.

तू बोलतेस , "मी खूप थकलीये रे ....

जाऊ का रे झोपायला "

मी म्हणतो " ठीक आहे ....पड तू शांत शोन्या ..." तुला इतर वेळी आवडत नाही ना मी शोन्या बोललं तर.....नकट्या लाल चुटुक नाकावर कसा राग येतो ना. पण एकांतात मात्र शोन्या म्हंटले कि तू अजून बिलगतेस मला. नेहमी सारख.

"मी जरा कॉफी घेत घेत माझं आवडत पुस्तक वाचणार आहे." मी वर आकाशाकडे नजर लावत म्हणतो.

तू नेहमी प्रमाणे सरळ दोन्ही खांदे उडवून चेहऱ्यावर निरागस भाव आणत बोलतेस ,"ठीक आहे."

मग एक मिनिट गप्प राहून परत लटक्या रागाने बोलतेस, " किती बोर आहेस रे तू. "

आणि हसतेस ......हाय .....तुझा लुकलुकणारा डबल दात माझा हृदयाचा ठोका चुकवतो. नेहमी सारखा.

मी थोडा वैतागूनच म्हणतो, "हो आहेच बोर मी. ... जा झोप तू शांत". माझा त्रासिक स्वर ऐकून मग मात्र तुझं मनाचं समाधान होतं.

मग तू समोरच मॅट वर पडतेस. डोळ्यातून खट्याळ हसत, आणि अलगद ओठ मुडपून हसू दाबण्याचा अभिनय करतेस. मला असं छळलं कि शांत झोप लागते ना तुला.

दुष्ट सुंदरी कुठली !

आता सुस्तावली आहेस ना तू . छान पांघरून घेऊन परत चांदण्याची नक्षी डोळ्याने गुंफत ! तुझ्या स्वप्नाच्या मागे धावणारे डोळे मिटू लागलेत ना. थकलेल्या पापण्या जड होऊ लागतात. आणि हळूच माझी हि परिराणी झोपते.

किती निरागस दिसतेस ना ग तू जेव्हा अशी शांत झोपतेस , ....

खरं सांगू ... झोपलीस कि किंचित घोरतेस ना ग तू.....आणि हे तू कधीच मान्य नाही करत. मी कित्येक वेळा तुझा घोरण्याचा विडिओ रेकॉर्ड केला पण एकदा बघून तुला न दाखवताच डिलीट केला. काही गोष्टी सिद्ध करण्यापेक्षा असेच वाद घालायला मजा येते.

बरं ...तर आता ते काम ....ज्या कामासाठी मी इकडे दूर डोंगरात येतो ते !निसर्गाच्या कुशीत मी आणि माझं आवडते पुस्तक.

मी आता फटाफट कॉफी करायला घेतो. शेकोटीवर कॉफी करणे फार सोपे नसले तरी अवघड पण नाही हा. तुला नाहीच पटत ते. आणि तुला कॉफी म्हणजे भरपूर दूध आणि साखर घातलेली बासूंदी कॉफी आवडते ना ! येडू ..!

कॉफी कशी असते फक्त पाणी आणि कॉफी ! तू तिला कडू जार बोललीस तरी तीच खरी कॉफी असते हा...! अमेरिकेत राहून शिकलोय मी .....हम्म ! माहित आहे मला ....रागवतेस ना असं बोललोकि....नेहमी सारख.

आता मस्त छान वाफाळती कॉफी पीत पीत मी पुस्तक वाचत आहे.तू समोरच दिसतेस. निर्धास्त, गाढ झोपलेली

आणि तुझे ते खट्याळ डोळे झोपेत देखील पापण्यांच्या आत फिरत आहेत. कोणत्या स्वप्नाच्या मागे पळत आहेत देव जाणे.

आणि मी बघत आहे तुझ्या कडे ...

आणि ना तू अचानक लहान बाळासारखी अशी खुद्कन स्वतःशीच हसतेस...

आई शप्प्प्पत!!   माझ्या हातून काफी पडता पडता वाचते... मी चटकन भानावर येतो आणि परत पुस्तक वाचायला लागतो.

तेच पुस्तक

माझं आवडत पुस्तक

तुझ्या चेहऱ्याचं आणि तुझ्या डोळ्यांचं पुस्तक आणि त्यातील सर्व गोष्टी. माझ्या आणि तुझ्या गोष्टींचं पुस्तक ! कस काय ग इतक्या वर्ष्यांनी देखील तू तितकीच सुंदर दिसतेस.

तासंतास तुझ्या कडे बघत वाचाव्या वाटतात या गोड गुज गोष्टी.

ह्म्म्म ! काय आहे ना ग हे ? !

संपत च नाही हे पुस्तक !

जाऊ दे अजून एक कॉफी करायला घेतो मी.आज रात्रभर वाचन आहे ग माझं.

रात्रभर वाचन आहे ......तूझं ! अगदी नेहमी सारख.

????????????????

तुझाच

"श्यामन "❤️‍????