बाप माझा शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा,
बाप माझा शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा,
परमेश्वराने साथ द्यावी
कमीत कमी यंदा
नाहीतर माझ्या बाबांचा
होईल वांद्रे
रागीट आहेत खूप असे
म्हणतात सगळे, पण
प्रेम त्यांचे इतरांहून वेगळे
चुकले तर लागतात
माफी ही देतात...
बाबा माझे माझ्यावर
खूप प्रेम करतात,
राब राब राबतात
खूप कष्ट करतात,पण
दुखणे त्यांचे नेहमीच लपवतात
आई बद्दल सगळेच बोलतात, पण
संसाराचा गाढा चालवणाऱ्या
दुसऱ्या चाकाला सगळेच विसरतात,
संसाराच्या गाढ्याची दोन चाके असतात,
एक आई अन् दुसरे बाबा, पण
बाबाला माझ्या सगळेच
गृहीत धरतात.
फाटका सदरा घालतात,
आणताना चालतात, पण
बाबा माझे सर्व हट्ट पुर्ण करतात,
ऊन असो वा पाऊस
रात्रंदिवस झटतात,
लाडक्या लेकीच्या लग्नासाठी
पाई पाई जमवून पैसे उभारतात
लेक सासरी जाणार या विचाराने
एकांतात त्यांचे आश्रू वाहतात
लेकिला ठेच लागली कि,
वेदना त्यांना होतात, पण
स्वत:च्या वेदना हसत हसत झेलतात
माफ करा बाबा कधी
चुकले असेल तर, नकळत कधी
दुखावले असेल तर, कारण
तुमच्या सारखे बाबा मला लाभले
हेच माझे भाग्य खरेतर
जन्मोजन्मी माझे बाबा तुम्ही व्हा
लाडक्या लेकिला असेच प्रेम द्या.