Feb 24, 2024
वैचारिक

माझा, दादा ...

Read Later
माझा, दादा ...
दादा...
प्रत्येकाला हवा असतो, पण
प्रत्येकाला मिळतोच असं नसतं..
माझ्या लहान बहिणीला सगळ्या संकटापासून वाचवण्याची त्याची प्रबळ इच्छा,
जणू सीमेवर उभ्या असणारे भारतीय सैन्यासमान !
जोपर्यंत 'मी' इथे उभा,
तोपर्यंत तिच्या केसाला कोणी धक्का लावायची कोणाची काय मजाल ?
ही भावना हेच त्याचं शस्त्र असतं आणि
बहिणीचं त्याच्यावरचं प्रेम हीच त्याची ढाल !
माझा, दादा...
कुठे असतो तो ?
कुठेतरी दूरदेशी खपत असतो बिचारा,
सर्व सुखांचा त्याग करून बहिणीच्या ताटात ओवाळणी देऊन तिच्या चेहऱ्यावरचा हसू पाहायला आतुरलेला..
माझा, दादा...
त्याच्या अनमोल प्रेमाची परतफेड करण्याचा एकच मार्ग असतो,
त्याला त्याच्या लहान बहिणीच्या हातून खाल्लेल्या मिठाईचा गोडवा हवा असतो..
मन धन्य झालं की दादा पुन्हा निघतो,
पुढच्या वर्षी माझ्या छकुलीला अजून काहीतरी छान आणीन असं म्हणतो..
माझा, दादा...
वर्षातला हा एक दिवस तो फक्त त्याच्या बहिणीचा असतो !!!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Prapti Gune

MBBS Intern

I have profound love for marathi language and for everyone speaks in Marathi. Assal Marathi mulgi at heart.

//