#सुन नव्हेच; लेकच माझी...

सुनेलाही लेक बनता येतं पण त्यासाठी घराला आपलंसं करून माणसांना जोडावं लागतं

दिशा आणि निशा या दोन सख्ख्या बहिणी असूनही स्वभाव मात्र दोघींचे दोन्ही टोकांचे.... दिशा ही नेहमी आपलेच म्हणणे खरे अस म्हणणारी.... आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा अशा स्वभावाची.... मात्र निशा मोठी माणसे बोलतात ते अनुभवाचे बोल असतात अस म्हणून सर्वांच ऐकून घेणारी  ...आई-वडिलांनाही दिशा ची खूप काळजी वाटायची.... लहान आहे अजून... होईल हळूहळू स्वभावात बदल... आपल्या मुलांच्या चुका आपणच  पोटात घ्यायच्या... हा विचार करून त्यांनी दिशाच्या चुकांवर पांघरूण घातलं....



पुढे दोन्ही मुली लग्न करून सासरी गेल्या... निशा चे पती आणि सासरची माणसं अतिशय प्रेमळ... आणि निशाचा स्वभावही समजूतदार असल्यामुळे भांड्याला भांड लागलं तरी त्याचा आवाज बाहेर येत नव्हता...पण दिशा मात्र हट्टी... आणि तिचा नवरा ही खूपच रागीट... \"तुझं माझं जमेना\" अशी काहीशी स्थिती... सतत भांडणं... सतत तक्रारी.. याचा त्रास आजूबाजूचे शेजारी.. आणि दिशाचे आई वडील यांना खूप व्हायचा.



दिशाला दुसऱ्याचे काहीच आवडत नसायचे. कोणाच्या चांगल्या कृतीला तिच्याकडून कधीच दाद मिळत नसे. तिच्या मनातूनच ती नेहमी दुःखी असायची...मन दुखी असेल, तर माणसाला समोर असलेल्या सुखाचा उपभोग घेता येत नाही.... निशा मात्र दुसऱ्यांचे तोंडभरून कौतुक करत असे... सर्वांच्या आशीर्वादाने म्हणूनच तिचा एक मुलगा डॉक्टर... व दुसरा इंजिनियर झाला ..


मुलं मोठी झाली तरी दिशा आणि तिच्या नवऱ्याची भांडण काही कमी झाली नव्हती... आणि त्यात भर पडली ती दिशा च्या मुलीची... दिशाच्या मुलीन न सांगताच लग्न केल.... आणि भांडणात आणखीनच भर पडली. दिशा आणि तिचा नवरा एकमेकांना दोष देऊन अजूनच जास्त भांडू लागले...


पण काही दिवसांनी दिशा ला खूप समजूतदार सून मिळाली... सासूबाईंचा स्वभाव माहीत असूनही तिने पूर्णपणे दुर्लक्ष करून, संसाराची धुरा मोठ्या जिद्दीने सांभाळली.. दिशाच्या सुनेनं फॅशन डिझाइनिंग चा कोर्स लग्नाआधी केला असल्यामुळे ती सुंदर सुंदर कपडे शिवून देत होती. सासुबाईनाही सुनेच्या कलेचं कौतुक वाटू लागलं. दिशाही मग सुनेला लागणारे साहित्य मोठ्या हौसेनं शहरातून आणून देऊ लागली. दिशा बोलण्यात पटाईत असल्यामुळे गिराईकही चांगलं येऊ लागलं. नवरा-बायकोना भांडण्यासाठी वेळच मिळेनासा झाला. एकंदरीत "रिकामे मन सैतानाचे घर.." म्हणतात ते खरं असतं. 


माणसांने आपला छंद जोपासावा. कशात तरी स्वतःला गुंतवून घ्याव. तरच नकारात्मक विचारांना मनात थारा मिळत नाही आणि मानसिक संतुलन बिलकुल खराब होत नाही. अशी ही लक्ष्मीच्या रूपाने आलेली सून घराला घरपण प्रदान करते. तेव्हा ती त्या घराची केवळ सून नसते तर मुलगी बनते. 


सौ प्राजक्ता पाटील...


लेख आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा नावासहित शेअर करा...