मुरलेला बाप

Murlela Baap
मंजू काय हे किती गोड खाऊ घालशील..! प्रमोद

दादा तू थांब ,तुला मीच एकटी गोड नाही खाऊ घालणार..आज सगळेच जण तुझ्यावर गोडाची बरसात करणार आहेत... मंजू हसत हसत म्हणाली


मंजुला वेड लागलंय जणू...आली तशी गोड खाऊ घालत आहे..कधी साखर तर कधी गूळ ,तर कधी अद्रक वडी...प्रमोद वैतागून म्हणाला


तिकडून आई बाबा ,आणि तृष्णा ही समोरून हसत आले..त्यांना हसताना पाहून त्याला त्या मागचे गमक नाही कळले


काय काय झाले बाबा या बायकांना...मंजू आज तर तिचे काम उरकून लगेचच घरी आली आहे...प्रमोद


तू मन हृदय घट्ट कर...आणि तुझ्या कानावर विश्वास ठेव...तुला एक जबाबदारी पुन्हा निभवायची आणि तन्वी सारखी...आई


ए काय हे कोड्यात बोलत आहेत तुम्ही लोक...इतका हुशार नाही मी कोडी सोडवायला आता तरी सांगा कोणी, काय चालू आहे....प्रमोद


बाबा हसून म्हणाले ....तू थोडं डोकं खाजव...तन्वी सारखीच जबाबदारी म्हंटल्यावर काय असेल ती जबाबदारी..बघ बाबा..


तुम्ही तर नेहमीच कोडत्यात प्रश्न टाकले म्हणजे मी लगेच ओळखून घेईल असे वाटते का तुम्हाला.. कोण पाहुणा येणार आहे का छोटा.. तो समय येणार आहे का सिद्धार्थ चा घरी खेळायला...ती जबाबदारी नको रे बाबा..खूप बंड मुलगा आहे तो...



तू खूप जवळ आला आहेस दादा ह्या कोड्याच्या..पाहुणा इथपर्यंत पोहचलास तू...मंजू पुन्हा दादाची खेचत बोलली


पाहुणा !! ,पाहुणा !!  म्हणजे...म्हणजे मी पुन्हा बाबा होणार..!! प्रमोद


हो, good news आहे आपल्या घरी पुन्हा....आई


तो तृष्णा कडे जाऊन तिला आनंदात उचलून घेता आणि तिचे ही खूप खूप अभिनंदन करतो... congrats to be आई...

ती....congrats to be papaa


अरे आता उतरव तिला खाली ,आता जरा काळजी घेतली पाहिजे तुम्ही दोघांनी इथून पुढे.. अजिबात हलगर्जी नकोय..वाद नकोय...फक्त काळजी घ्यायला हवी...आई


तो तिला खाली उतरवतो आणि तिला म्हणतो, आता तू तुझी काळजी सक्षम पणे घेऊ शकते...कारण पहिल्या वेळी तुला आईने खूप जपले होते , आता तू मुरलेली आई आहेस....तुला सगळं कळतंय कसे काय करायचे, कशी काळजी घ्यायची...काय खायचे..काय टाळायचे...प्रमोद तिच्यावर तिच्या काळजीची जबाबदारी टाकून मोकळा झाला होता

ती बघतच होती...तिला कमाल वाटली..ती पुन्हा वाद नको म्हणून गप्प बसली होती...आणि तसे ही आईने आत्ताच सांगितले होतेच...पुन्हा दोघा मध्ये वाद नकोत...ही प्रकर्षाने काळजी घ्या....

हे सांगत असतांना मंजू पुढे आली ,आणि म्हणाली, दादा जशी वहिनी मुरलेली आहे आहेस म्हणाला तसा तू ही आता एक मुरलेला आणि जबाबदार बाबा आहेस...तर ह्या वेळी काळजी करण्याची जशी तिची जबाबदारी आहे तशी तिची ह्या अवस्थेत  काळजी घेण्याची तुझी ही जबाबदारी आहे बरं...

तो तिला काही बोलणार इतक्यात, आई मध्ये पडली आणि म्हणाली वाद टाळा जसे तृष्णाला साठी होते तसे तुझ्यासाठी ही आहे...नियम अटी जश्या मुरलेल्या आईला लागू आहेत ,असतील तश्याच मुरलेल्या बाबाला ही आहेतच विसरू नकोस...

प्रमोदला चूक कळली...आणि त्यावर तो मंजुला म्हणाला, अग वेडे मी गम्मत करत होतो तुमची..मला बघायचे होते मी तुझ्या वहिनीला बोलल्यावर तू कशी लगेच तिच्या बाजूने बोलतेस...सासरी गेल्यापासून तू अगदी वहिनीची बाजू पडून देत नाहीस..


दादा तू फक्त मुरलेला बाबा नाहीस तर तू मुरलेला नवरा देखील आहेस अगदी


मुरलेला बाबा आणि मुरलेली आई जेव्हा पुन्हा आई बाबा होतात तेव्हा सगळी जबाबदारी खरे तर बाबा यांनी घ्यायला हवी...कारण तिचे मूड हे तिच्या हातात नसतात...पण ते त्याच्या हातात असतात...जो त्रास ती आतून सहन करते तो त्रास ती बाहेरून मानसिक रित्या ही सहन करते...त्यात तिला ह्या मुरलेल्या बाबांची ही अनुभवी साथ असने गरजेचे होऊन जाते...कारण आंनद हा दोघांसाठी तितकाच महत्वाचा असतो... ह्या टप्प्यावर तिला साथ दिली की ती कायम लक्षात ठेवतेच

बरोबर ना....


©® अनुराधा आंधळे पालवे