मृगजळ... भाग 21

आता तिथे रिसॉर्टवर जाऊन काय होणार आहे? हे सर्व प्रियाच कारस्थान आहे आणि ती मुक्त फिरते आहे, माझं ऐक वहिनी तिची कंप्लेंट करून टाक


मृगजळ... भाग 21

©️®️शिल्पा सुतार
..............

अर्धा एक तास झाला तरी रेवा आली नाही, श्रुती तिची वाट बघत होती, शेवटी ती रूम बाहेर आली, बाहेर कोणीच नव्हत, रेवाच सगळ सामान फोन रूम मध्ये होता

रेवा..... रेवा

"कोण हव तुम्हाला मॅडम?",.. वेटर

"आता इथे बर्थडे पार्टी होती ना? कुठे गेले सगळे मुल ",.. श्रुती

"ते गेले घरी, अर्धा तास झाला",... वेटर

"असे कसे मला न सांगता गेले, कमाल आहे, मी उद्या बोलणार नाही रेवा संदीपशी कॉलेज मध्ये ",.. श्रुती

श्रुती सगळ सामान घेवून पार्किंग मध्ये आली, रेवाची गाडी उभी होती, गाडी इथे आहे म्हणजे रेवा गेलेली नाही, काहीही सांगतो तो वेटर, तिने गाडीत बघितल सीमा मागच्या सीट वर झोपली होती, ड्रायवर पुढे झोपला होता, तिने गाडीच दार उघडाल,

" सीमा... सीमा रेवा कुठे आहे?, सीमा उठ, काका उठा, काय झाल हे सगळे असे का झोपले",... श्रुती

सीमा बेशुद्ध होती,

सीमा उठ.... ती उठली नाही, रात्र वाढत होती सुनसान रिसॉर्ट वर काय कराव समजत नव्हत, पार्किंग मध्ये एक ही गाडी नव्हती, संदीप आला ती गाडी कुठे गेली? संदीप कुठे आहे? रेवा दिसत नाही

रोहन रिसॉर्ट वर पोहोचला, गाडी पार्किंग मध्ये उभी होती बाजूला श्रुती उभी होती,... "श्रुती तू इथे काय करतेस? रेवा कुठे आहे?",

"अंकल गडबड झाली, रेवा सापडत नाहीये, आणि सीमा झोपली आहे इथे, कोणी नाही रिसॉर्ट वर, मला माहिती नाही कुठे गेले सगळे ",.. श्रुती रडायला लागली

"एक मिनिट श्रुती, काय बोलते आहेस तू? नीट सांग, रेवा कुठे आहे? काय झालं तिकडे? , बाकीचे मूल कुठे आहेत?, आत आहे का ती",.. रोहन

" नाही अंकल मी तेच सांगते आहे, आत रिसॉर्ट मध्ये कोणी नाही, बर्थडे झाला, आम्ही निघणार होतो घरी यायला, संदीपला रेवाशी बोलायच होत तो आणि रेवा बोलत होते बाहेर, मी कपडे बदलायला रूम मध्ये गेली रेवा आली नाही, अर्धा एक तास झाला मी त्यांना बघायला बाहेर आली तर कोणीच नव्हत बाहेर, मी पार्किंग मध्ये आली तर सीमा झोपलेली आणि ड्रायवर काका झोपले आहेत ",.... श्रुती

" तिच्या तोंडावर पाणी मार, कार मध्ये असेल पाणी moov fast ",.. रोहन

श्रुतीने सीमाच्या तोंडावर पाणी मारल, तरी ती उठली नाही, ड्रायवर काका ही उठले नाही

प्रिया पोहोचली तेवढ्यात रिसॉर्टवर, रोहन कार जवळ उभा होता, तिला रोहनला बघून खूप राग आला, काय हे अस इथे कुठे फिरतो आहे रोहन,...." रोहन काय करतो आहेस तू इथे? ,काय चाललय हे? मला समजायला पाहिजे" ,

रोहन दचकला...... प्रिया तू इथे कशी? तू माझ्या मागे येत होतीस का? काय झाल? ",.. रोहनने प्रिया ला प्रेमाने विचारल

"श्रुती तू इथे? , अच्छा इथे होती का बर्थडे पार्टी? , तू इथे रेवा साठी आला का रोहन?, मग मला सांगितल का नाही, तुम्हा लोकांना अस वाटत का की मला रेवाची काळजी नाही, मी पण आली असती ना तुझ्या सोबत रेवा कडे लक्ष द्यायला " ,... प्रिया

"प्रिया.. रेवा गायब आहे",... रोहन

" बापरे हे कधी समजल? काय झाल नक्की? ",.. प्रिया

" आत्ताच, श्रुती तेच सांगते आहे ",.. रोहन

" श्रुती काय झाल? ",.. प्रियाने कार मध्ये बघितल सीमा बेशुद्ध होती, काय झाल हिला?..... प्रिया घाबरून गेली होती, खूप तिचे हात पाय थरथरत होते

" रेवा हरवली आहे, श्रुती बोलते आहे ती रिसॉर्ट वर नाही आणि सीमा बेशुद्ध आहे",.. रोहन

" काय झालं नक्की रोहन? कोणी सांगेल का मला ? ",.. प्रिया रडवेली झाली होती

" श्रुतीकडे रेवाचा फोन आहे , सामान आहे, रेवा नाहिये आत",.. रोहन आत पळत गेला, त्याने पूर्ण रिसॉर्ट चेक केल

आता त्याने सिक्रेट एजन्सीला फोन केला,..." काय मूर्ख पणा आहे हा? कुठे आहात तुम्ही लोक? इथे मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही तुमची माणस पाठवणार होते ना, माझी मुलगी गायब आहे ",..

" आम्ही इथे आहे रिसॉर्ट जवळ पोहोचतो आहोत, आणि आमची दोन माणसं ऑलरेडी तिथे आहेत साहेब",...

"नाही इथे कोणी नाही, तुम्ही किती उशिरा आलात, प्रॉब्लेम झाला इथे, कुठे शोधू मी माझ्या मुलीला ",.. रोहन

" काय झाल साहेब",..

" रेवा गायब आहे, तिच्या सौरक्षणासाठी मी एवढा खर्च करून तुम्हाला नेमल ना? करतात काय तुम्ही लोक? ",.. रोहन खूप चिडला होता

" आमचे दोन माणस होते रिसॉर्ट वर, त्यांनी वेळोवेळी रीपोर्ट केला होता, काय सुरू होत तिकडे ते, आता काम लास्ट टप्यात होत, आम्ही येवून बघतो काय प्रॉब्लेम झाला ते",....

" मग कुठे गेले ते लोक?,मदत का केली नाही त्यांनी काही ",..रोहन

" काय माहिती काय झाल तिकडे ते, आम्ही येतो आहोत बघतो",...

" लवकर या जरा, अहो ही मुलांची पार्टी होती सगळ्यांना घरी जायच होत लवकर, सगळे लहान मुल होते, तुम्ही लवकर यायला हव होत, किती हा निष्काळजी पणा, तुमचे दोन लोक इथे होते ना पुढे आलेले, तरी नीट काम झाल नाही",.. रोहन

वेटर पळत आला,... "सर आत मध्ये दोन लोक बेशुद्ध आहेत",.

रोहन आत गेला, चेक केल, ते सिक्रेट एजन्सी चे लोक होते

किती डेंजर आहेत हे गुंड त्यांनी बरोबर सगळ्या बॉडीगार्ड ला बेशुद्ध करून रेवाला पळवून नेलं, संदीप कुठे आहे पण? संदीप ने तर नाही केलं ना हे काम? काय माहिती काय झालं आहे?

रोहन खाली डोकं धरुन बसला, प्रिया त्याच्या जवळ आली

"काय झालं आहे रोहन? तुला माहिती होतं का इथे काय होणार होत ते, काय आहे हे सिक्युरिटी एजन्सी वगैरे",... प्रिया

"हो प्रिया मी दोन-तीन दिवसापासून त्याच गडबडीत होतो, आमचा असा प्लॅन होता आज इथे किडनॅपरला मी पकडणार होतो, तर सगळीच गडबड झाली, ते लोक हुशार निघाले आपल्या पेक्षा, माझी रेवा कुठे आहे? मी काय सांगणार आहे विभा आणि आई ला, त्या घरी वाट बघत असतिल, तिला काहीच माहिती नाही ",... रोहन

प्रियालाही आता खूप टेन्शन आलं होतं, तिला विभा आणि सुलभा ताईंचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता,.. "तू मला एक शब्दाने सांगायचं होतं रोहन, हे असं चालतं का रिस्क घेऊन? आपली एवढी तरुण मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, काय करतील ते माहिती नाही ",... प्रिया आता रडत होती

" आता या सिक्युरिटी एजन्सीच्या नादी लागून काही उपयोग नाही, मूर्ख लोक आहेत ते लोक, मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे, कुठे शोधणार आता मी रेवाला",.. रोहन रडत होता

रोहनने पोलिस स्टेशनला फोन लावला

हवालदार बोलतोय कोण हवय आपल्याला?

"इंस्पेक्टर सावंत यांना फोन द्या लवकर it\"s urgent",... रोहन

"कोण बोलतय",..

रोहन

" बोला रोहन साहेब ",.. इंस्पेक्टर सावंत

" मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ज्याची भीती होती तेच झाल रेवा सापडत नाही",.. रोहन

"काय झालं ते नीट सांगा, कुठे आहात तुम्ही? घरी का?",...इंस्पेक्टर सावंत

नाही आम्ही रिसॉर्ट वर आहोत, रोहनने काय काय झाल ते सगळ इंस्पेक्टर सावंत यांना सांगितल

"कुठे आहे रिसॉर्ट? पत्ता घ्या, आम्ही येतो लगेच, तुम्ही आधी का नाही सांगितल सगळ मला, खूप मोठी रिस्क घेतली तुम्ही साहेब ",.. इंस्पेक्टर सावंत

" हो मूर्ख पणा झाला माझा",.. रोहन

" सीमा तिची बॉडीगार्ड कुठे आहे? ",.. इंस्पेक्टर सावंत

" ती बेशुद्ध आहे",.. रोहन

" मोठा घातपात दिसतो आहे हा, या मागे कोणी तरी मोठे लोक दिसता आहेत, तुम्हाला माहिती होत ना साहेब आम्हाला सांगायला हव होत ",... इंस्पेक्टर सावंत

"चूक झाली माझी, स्वतःहून रेवाला त्यांच्या कडे दिल मी ",.. रोहन

"हे लोक अट्टल गुन्हेगार असतात साहेब, आपण समजतो त्याच्या बरोबर विरुद्ध ते विचार करतात",.. इंस्पेक्टर सावंत

रोहन कार जवळ आला, प्रिया श्रुती तिथे उभे होते,

" बघ ना रोहन सीमा नाही उठत आहे ड्रायवर काका झोपले आहेत ",.. प्रिया

" मला खुप भिती वाटते आहे आंन्टी तुम्ही प्लीज मला घरी सोडून या ",.. श्रुती रडत होती

" हे बघ श्रुती तू शांत हो, सीमा ला उठु दे आधी, नक्की इथे काय झाल ते समजू दे, रोहन या दोघांना उठव, काहीही कर फास्ट, प्लीज तिच्या तोंडावर पाणी मार, आपण जाऊ थोड्या वेळाने घरी श्रुती, तू काळजी करू नकोस ",.. प्रिया

श्रुती च्या घरून फोन आला ते लोक येत होते तिला घ्यायला,...

" हे बघ श्रुती इथे काय झाल ते सांगू नको कोणाला, अजून माहिती नाही काही की रेवा कुठे आहे",.. रोहन

हो अंकल.....

" विभा चा फोन येतो आहे रोहन, काय करू?",.. प्रिया

"स्पष्ट सांगून टाक तिला, काही नको लपवायला ",.. रोहन

" माझी हिंमत नाही होत ",.. प्रिया

फोन कट झाला..... परत विभाचा फोन आला, प्रियाने फोन उचलला

"काय झालं आहे प्रिया? कोणीच घरी नाही? रेवा फोन उचलत नाही, मला खूप काळजी वाटते आहे, रोहन कुठे आहे?",... विभा

प्रिया काही बोलली नाही,

"प्रिया बोल ना काही तरी, काय झालं आहे, तू ऐकते आहेस ना? ",... विभा

विभा रोहनशी बोल

प्रियाने फोन रोहन कडे देऊन टाकला

"रोहन काय झालं आहे काही अडचण आहे का?, तुम्ही कुठे आहात? ",.. विभा

" विभा मी जे सांगतो ते नीट ऐकून घे, हे बघ पेनिक होऊ नको" ,... रोहन

"हो अरे बोल पटकन ",.. विभा

" रेवा इथे वाढदिवसाला आली होती ना ती सापडत नाही आहे",... रोहन

" म्हणजे?? काय आर आयु सिरीयल, कुठे आहात तुम्ही सगळे?",.. विभा

" आम्ही रिसॉर्टवर आहोत जिथे संदीप चा बर्थडे होता",.. रोहन

"तुम्ही सगळे कसे काय गेला तिकडे? प्रिया काय करते आहे तिकडे?",.. विभा

"माझं आधीच ठरलं होतं रिसॉर्टवर यायचं प्रियाही आली माझ्यासोबत",.. रोहन ने विभाला सांगितलं नाही की प्रिया मागून एकटी आली, पिछा करत, उगाच गैरसमज व्हायचा

" मी आत्ताच्या आत्ता येते आहे तिकडे",.. विभा

" नको विभा तू नको येऊ ",.. रोहन

" मी येणार आहे",... विभा जोरात रडत होती

विभा शांत हो...

" मला पत्ता दे नाही तर मी माझ्या जीवाचं काही तरी बरं वाईट करून घेईन, मला रेवाला शोधलं पाहिजे",... विभा

" तू शांत हो विभा प्लीज, ठीक आहे मी देतो पत्ता",.. रोहन ने विभा ला रिसॉर्ट चा पत्ता दिला

विभाच्या फोनवर रणजित चा फोन आला, विभा रडतच होती

"काय झालं आहे वहिनी? ",.. रणजित

" रणजीत रेवा गायब आहे

म्हणजे ....

"रेवाला किडनॅप केलं कोणीतरी, आज तिच्या मित्राचा वाढदिवस होता, रिसॉर्टवर पार्टी होती तिथे रेवा गेली होती, आता ती सापडत नाहीये ",... विभा

" सापडत नाहीये म्हणजे काय? हे कसं समजलं तुला वहिनी?",... रणजित

आता रोहनने सांगितल...

" मी कधीपासून बोलतो आहे त्या प्रिया पासून आपल्या सगळ्यांना धोका आहे तुम्ही लोक कोणीच ऐकत नाही",... रणजित

"हो बरोबर आहे तुझं रणजीत, आताही ती प्रिया रिसॉर्ट वरच आहे, चल आपण लगेच जाऊ या रिसॉर्टवर तू माझ्यासोबत येतोस का रणजीत",... विभा

"हो मी टॅक्सी घेऊन येतो",.. रणजीत

विभा खाली आली, ती लगबगीने कुठेतरी बाहेर चालली होती

" कुठे चालली आहेस ग विभा? बाकीचे कुठे आहेत घरातले रोहन प्रिया? रेवा आली ग वाढदिवसाच्या पार्टी हून ",.. सुलभाताई

रेवाचं नाव ऐकून विभाच्या डोळ्यात परत पाणी आलं

" काय झालं ग विभा? तू रडते आहेस का? ",.. सुलभाताई

"नाही काही झाल नाही ",.. विभा

"रेवा कुठे आहे? , रेवाला काही झाल का? ",.. सुलभाताई

" नाही आई रेवा ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतो बाहेर जावुन, अनिता आईंकडे बघ, कोणाला दार उघडू नकोस",.. विभा

विभा रस्त्यावर आली, रणजीत आला तिकडुन टॅक्सी घेऊन, ड्रायव्हरला पत्ता दाखवलं पटकन चला, अजिबात वेळ घालवू नका

" आधी पोलिस स्टेशनला चल वहिनी",.... रणजित

"तिकडे कशाला?, मला लवकरात लवकर रिसॉर्ट ला जायच आहे ",... विभा

" त्या प्रिया विरूद्ध कंप्लेंट कर लगेच, वेळ वाया घालवू नको, नाहीतर ती प्रिया अजून काही चाल करेन तुझ्याविरुद्ध",.. रणजीत

"नको आधी रिसॉर्ट वर जाऊ मला रेवा कुठे आहे ते बघायचं आहे" ,... विभा

"आता तिथे रिसॉर्टवर जाऊन काय होणार आहे? हे सर्व प्रियाच कारस्थान आहे आणि ती मुक्त फिरते आहे, माझं ऐक वहिनी तिची कंप्लेंट करून टाक",.. रणजीत

विभा विचार करत होती काय करता येईल? करून टाकते प्रियाची कंप्लेंट,

दोघेजण पोलीस स्टेशन ला गेले, प्रिया विरुद्ध कंप्लेंट केली..... माझ्या मुलीला किडनॅप करण्यात प्रियाचा मोठा हात आहे, ती कधीपासून त्रास देत आहे माझ्या मुलीला, तरी प्रियाची चौकशी व्हावी, तिला अटक व्हावी..

हवालदार काकांनी विभाला कंप्लेंटची एक कॉपी दिली, विभा आणि रणजीत रिसॉर्ट कडे निघाले

" मी काय करू रणजीत मला समजत नाही, रेवा कुठे असेल?",.. विभा

"आपण चाललो आहोत ना आता तिकडे, बघू तिकडे काय आहे परिस्थिती ",.. रणजित

"तुझ्या ओळखीचे आहे का कोणी? जे शोध लावू शकता, मला खूप टेंशन येत आहे " ,... विभा परत रडत होती

" हो बघतो मी वहिनी तू काळजी करू नको, रडू नको ग ",.. रणजित

इन्स्पेक्टर सावंत दिलेल्या पत्त्यावर निघाले

" डॉक्टरांना फोन करून दिलेल्या पत्त्यावर लगेच यायला सांग प्रिया, सीमा शुद्धीत येण खूप महत्त्वाचं आहे",.. रोहन

अर्धा तास झाला,..... काही पत्ता लागत नव्हता, रोहनला ती वेळ लांब वाटत होती, जसा वेळ जाईल तस रेवा सापडायला मुश्किल होईल, सारखा रेवाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, नक्की काय झालं आहे? कुठे असेल रेवा? सीमा बेशुद्धच आहे की तिच्या सोबत काही घातपात झाला आहे, काहीच कळायला मार्ग नाही

रेवाला काही झालं तर मी जगू शकणार नाही, आपल्याला वाटत होता इझी आपण त्या गुंडांना पकडू, पण ते लोक बदमाश असतात त्यांनी बरोबर वेगळा प्लॅन केला, आपण बरोबर त्यांच्या जाळ्यात फसलो, काय कराव आता समजत नाही, संदीप ही कुठे आहे माहिती नाही, की त्याला ही किडनॅप केल, काय माहिती काय सुरू आहे, रोहन ने परत संदीप ला फोन लावून बघितला, संदीप ने फोन उचलला नाही...

🎭 Series Post

View all