Login

मृगजळ... भाग 19

आपण जे करतो आहोत ते योग्य करतो आहोत का? खूपच धोका आहे आज रेवा साठी, राकेशही काय करतो काय माहिती? आई ला घेऊन तो निघाला की नाही? , आपण हे सगळं आईसाठी करत होतो तर आईच धोक्यात येऊन गेली, प्रेमाच्या बाबतीत असं नको व्हायला, खूप जागरूक रहाव लागेल आज


मृगजळ... भाग 19

©️®️शिल्पा सुतार
..............

संदीप ने राकेशला फोन केला, राकेश घरी ये थोड बोलायच आहे

राकेश आला संदीप चहा करत होता, त्याने राकेशला चहा दिला

"राकेश आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी, तु मला मदत करणार आहे का?, तुला माहिती आहे ना आज मी रिसॉर्ट वर जाणार आहे, माझा बर्थडे होईल तिथे , मग रेवाला पळवणार , मला आज काहीही करून आई घरी आलेली पाहिजे ?",.. संदीप

"मला एक गोष्ट बोलायची आहे तुझ्याशी संदीप, मला माफ कर, माझ्या मुळे तुझ खूप नुकसान झाल आहे माझ्या पासून लांब थांब, मी चांगला मुलगा नाही आहे, मीच काकूंना कीडनॅप करायला मदत केली ",... राकेश

संदीप आश्चर्याने राकेश कडे बघत होता,..." काय झाल अस नक्की त्या दिवशी? आई कुठे आहे राकेश? , प्लीज मदत कर मला, मी तुझे उपकार कधी विसरणार नाही ",..

" अस नको बोलू संदीप मी मदत करणार आहे तुला, आणि आता जावून काकूंना सोडवणार आहे, माझ काहीही झाल तरी चालेल",.. राकेश ने सगळ सांगितल,.. "तू त्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मी तुझ्या घरी गेलो होतो, काकू काम करत होत्या, त्यांना मी सांगितलं संदीप पडला आहे त्याला लागलं आहे, आपल्याला जायचं आहे दवाखान्यात, काकू खूप घाबरल्या होत्या, त्यांना मी घेऊन गेलो आणि गुंडाच्या ताब्यात दिल, काकू तिथे एका जुन्या फॅक्टरीत आहेत",..

" राकेश माझा राग नाही तुझ्यावर, तुझ्या मनात काही नसत, तू साधा आहेस, तूच मदत करू शकतो मला, तुला माहिती आहे ना आई कुठे आहे, घेवून ये तिला आणि मी देतो त्या पत्यावर ठेव आईला प्लीज मदत कर, कोणाला सांगू नको, बॉस ला ही नाही ",.. संदीप

" हो.. मी नाही सांगणार, मी करणार आहे मदत तुला, तू तुझ्या हाताने एक पत्र लिहून दे, मला नाही वाटत आता काकू माझी वर विश्वास ठेवतील, काम तसं खराब केलं आहे मी",.. राकेश

" हो मी तुला पत्र देतो आणि नवीन पत्ताही देतो, तिथेच तू आईला घेऊन जा आणि आईला तिथेच रहायला सांग इथे या खोलीत येऊ नका ",... संदीप

" संदीप तू माझ्यावर परत कस काय विश्वास ठेवतो आहेस मला माफ कर संदीप",.. राकेश

" माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राकेश, माझी आई ती तुझी आई, मला माहिती आहे तू आईला व्यवस्थित घेऊन येशील आणि मलाही मदत करशील पण आपल्या दोघांचं हे ठरलं आहे ते बॉसला सांगू नकोस",.. संदीप

" ठीक आहे मी निघतो, तू मला रिसॉर्ट वर पोहोचलास की कर फोन, आणि तुला खरच रेवाला किडनॅप करायच आहे का?, मला वाटल होत तू प्रेम करतोस तिच्या वर ",.. राकेश

" हो, मी प्रेम करतो रेवा वर पण तरी मला हे काम कराव लागेल, या नंतर मी कधीच चुकीच काम करणार नाही, सांगेन तुला नंतर सगळ, फक्त आजचा दिवस नीट जायला पाहिजे, राकेश हे घे थोडे पैसे ठेव तुझ्याजवळ",.. संदीप

" कसले पैसे आहेत हे संदीप? मला नको पैसे, मी आता ह्या कामाचे पैसे घेणार नाही, आधीच खुप चुका केल्या आहेत मी",.. राकेश

" असू दे रे राकेश थोडे पैसे ठेव सोबत लागले तर वापरता येतील, नाहीतर मला उद्या परत दे",.. संदीपने बळजबरी राकेशला थोडे पैसे दिले

जरा वेळाने राकेश गेला

संदीप ने रोहनला फोन केला,.." सर त्या फ्लॅटची चावी आणि पत्ता हवा होता ",

" चावी तर खाली वॉचमनकडे मिळेल, पत्ता पाठवतो मी तुला लगेच, सांगितलं का राकेशला तुझ्या आई बद्दल",... रोहन

" हो सर सांगितलं तो तयार आहे काम करायला",.. संदीप

"काही पैसे लागत असतील तर आपण देऊन टाकू राकेशला",.. रोहन

" पैसे नाही पण नंतर त्याला थोडी मदत करावी लागेल त्याला ",.. संदीप

" चालेल काही हरकत नाही, तो संध्याकाळी ही मदत करेन ना ",.. रोहन

हो..

" तुमचं बोलणं झालं का सर तिकडे एजन्सीच्या लोकांशी? त्यांना सांगितलं का रिसॉर्ट वेगळ आहे ते",.. संदीप

" हो झालं आहे बोलणं ते काहीतरी प्लॅन करत आहे",..रोहन

" मी काय करू आता ",.. संदीप

" तू तुझ्या प्लॅनप्रमाणे सगळं कर, आता कॉलेजला जा आणि मुलांबरोबर एन्जॉय कर, संध्याकाळी रिसॉर्टवर ये, त्यांनी फिल्डिंग लावली आहे, कोणी दिसणार नाही पण ते असतिल आजूबाजूला",.. रोहन

" ठीक आहे",.. संदीप

संदीप तयार झाला कॉलेज ला जायला, समोर आईचा फोटो होता, आईकडे बघत संदीप इमोशनल झाला होता, किती दिवस झाले आहे तुला बघितलं नाही मी आई, आज राकेश तुला घेऊन येईल तरी आपली भेट होणार नाही, सगळं चांगलं झालं तर आज रात्री भेटता येईल आपल्याला

संदीप लहानपणापासून मेहनती होता, हुशार होता, पण गरीब म्हणून सगळीकडे त्याची हेळसांड व्हायची, सगळे त्याला दूर करायचे कितीही मेहनत केली तरी अति कमी पैसे मिळायचे, पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा होती त्याची, पण त्यासाठी पैसे नाहीत, एकंदरीत हलाखीची परिस्थिती होती, तसा तो स्वभावाने फार चांगला होता, आई ने त्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या, पण परिस्थितीपुढे तो मजबूर झाला, त्याला भरपूर पैसे कमवून चांगलं पुढचं शिक्षण घ्यायचं होतं आणि आईला सुखी ठेवायचं होतं, अल्लड वय त्यामुळे कळत नाही कधीकधी की हा रस्ता चुकीचा आहे, तेव्हा केलेल्या चुकीचा परिणाम किती मोठा आहे आता, यातून व्यवस्थित बाहेर पडायला पाहिजे संदीप विचार करत होता, या पुढे अशी चूक करायची नाही

रोहन प्रिया विभा सुलभाताई रेवा सगळे नाश्त्याला खाली आले, रोहन एकदम गप्प होता आज काय होईल याचं टेन्शन होतं त्याला,

रेवा खूप खुश होती काहीही खावंसं वाटत नव्हतं तिला, कधी एकदा कॉलेजला जातो असं झालं होतं, सगळ घेतल आहे ना संदीप च गिफ्ट वगैरे, परत एकदा रेवाने चेक केल

सीमा आली, रेवाने तिचं सगळं सामान आणून गाडी ठेवलं सिमाने रेवाच्या दोघी बॅगला सामानाला ट्रेकिंग डिवाइस लावलं

" रेवा आज आहे ना संदीप च्या वाढदिवसाचा कार्यक्रम",.. विभा

"हो संध्याकाळ आहे",.. रेवा

" जर खूप उशीर होत असेल तर लवकर आटपा बर्थडे, घरी निघून ये तू",.. विभा

हो मम्मा..

"आणि सीमाचं ऐक, ती जर म्हटली लवकर निघुया तर लवकर निघ, तुझ्याबरोबर तुझ्या मित्र-मैत्रिणींची ही काळजी घे",... विभा

हो मम्मा...

रेवाने नाश्ता केला, ती खूप खुश होती, प्रियाच्या ही गोष्ट लक्षात आली होती, रेवा भरपूर खावून घे, तू हा ड्रेस घालून जाणार आहे का वाढदिवसाला, अति उत्साही राहू नको तिथे, अलर्ट रहा

हो.. प्रिया मी दुसरा ड्रेस सोबत घेतला आहे बॅगेत

"तिथे कुठे कपडे बदलणार",.. विभा

"कॉलेज हून तयार होवुन जाणार आहोत आम्ही",.. रेवा

रोहनने सीमा ला मेसेज पाठवला,... "रेवाच्या दोन बॅग आहे वाटतं",..

" हो मी त्या दुसऱ्या बॅगला ही ट्रेकिंग डिवाइस लावला आहे",.. सीमा

" ठीक आहे be alert",.. रोहन

नाश्ता झाल्यानंतर रेवा कॉलेजला निघून गेली

" कुठे जाते आहे ग आज रेवा?",.. सुलभाताई विचारत होत्या

" आई आज रेवाच्या मित्राचा वाढदिवस आहे, तिकडे जाते आहे ती",.. प्रिया

"काही धोका आहे का ग तिकडे?",... सुलभा ताई

" नाही आई ",.. प्रिया

" तुम्ही दोघं खुप चौकशी करत होते ",.. सुलभा ताई

" धोका तसं नाही पण आपण सावध राहायला पाहिजे ना आई",.. विभा

"हो बरोबर आहे तुझं ",.. सुलभा ताई

" तुम्ही ठीक आहात ना आई आता मनातली भीती गेली ना थोडी ",.. विभा

" हो आता बरं वाटतंय सिक्युरिटी वाढवली आहे तर आणि रणजित भेटला नाही कधीचा त्या मुळे बर आहे ",... सुलभा ताई

" अरे हो दोन दिवसा पासुन कुठे आहे रणजित? एकदम गप्प आहे तो, आपल्याला त्रास द्यायचा नवीन प्लॅन तर नसेल ना आखत",... रोहन

"काय माहिती? पण रणजित गप्प आहे म्हणजे काही तरी नक्की चाललय त्याच",... प्रिया

आम्ही जाऊन येतो ऑफिसला रोहन प्रिया ऑफिसला निघाले

" तुझ काय सुरू आहे रोहन दोन दिवसा पासुन मी बघते आहे तू वेगळाच बिझी आहेस, काय चाललय काय नक्की? ",.. प्रिया

" मीटिंग खूप आहेत ग",.. रोहन

" नाही ते नाही, ऑफिस बद्दल नाही बोलत आहे मी, तू काहीतरी लपवतो आहेस माझ्या पासून",... प्रिया

"नाही अस काही नाही",.. रोहन

तेवढ्यात रोहनच्या फोन वर क्लायंटचा फोन आला तो बिझी झाला, ऑफिस आल, रोहन केबिन मध्ये निघून गेला

बर झाल वेळेवर फोन आला नाही तर प्रियाशी खोट बोलता आल नसत, काही लपवायच नाही तिच्या पासून, पण कोणाला सांगितल नाही तर कशाला, कोण आहे या मागे माहिती नाही, अजुन एक दोन दिवस..

प्रिया केबिन मध्ये आली ती काळजीत होती काय सुरू आहे नक्की रोहनच? दोन तीन दिवस झाले नीट बोलत ही नाही हा, काही सांगत नाही, सारखा फोन वर बोलतो गुपचूप , आज शोध लावायला पाहिजे नक्की काय सुरु आहे ते? आज मी रोहनच्या मागे जाणार, सीमा आहे वाटत याच्या सोबत, बघते नक्की काय सुरू आहे,

विभा ने रणजित ला फोन केला,.. "कुठे आहेस दोन दिवसा पासुन?",..

"आवाज येत नाही वहिनी",.. रणजित

"तू बाहेर आहेस का कुठे?",... विभा

"हो कामानिमित्त बाहेर आलो आहे मी",.. रणजित

"कुठे आहेस",.. विभा

"बोलतो नंतर वहिनी मी बिझी आहे",... रणजीत

विभाने फोन ठेवला, ती विचारात होती एवढं काय महत्त्वाचं काम करतो आहे रणजीत? की त्याला बोलायला ही वेळ नाही? काल-परवापर्यंत काहीच काम नव्हतं त्याला, असं अचानक कुठलं महत्त्वाचं काम आलं आणि त्याच्या फोनला रेंज नव्हती म्हणजे तो नक्की गावाबाहेर आहे, काय चाललय या घरात सगळ्यांच काय माहिती? , मी पुढच्या आठवड्यात जाईन वापस, रेवा येईल तर तिला ही घेवून जाईल थोड्या दिवसा साठी, मग इकडे काहीही गोंधळ घाला,

विभा तिच्या कामाला लागली..

रेवा श्रुती कॉलेजला आल्या, अजून संदीप आलेला नव्हता, सगळे संदीपची वाट बघत होते, पहिला लेक्चर झालं

"श्रुती संदीप का नाही आला",... रेवा

"माहिती नाही येईलच बहुतेक पार्टीची तयारी करत असेल",... श्रुती

"गिफ्ट आणल का ते कॉन्ट्रिब्युशन केल होत ते",.. रेवा

"हो गाडीत आहे खाली संध्याकाळी देणार आहोत",.. श्रुती

संदीप येताना दिसला, तो वर्गात आल्यावर बरीचशी मुलं त्याच्या आजूबाजूला घोटाळले, सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते, त्यांना सगळ्यांना बाजूला सारून संदीप सरळ रेवा समोर आला

" हॅपी बर्थडे संदीप",.. रेवा खुश दिसत होती

" थँक्यू.... नुसतं हॅपी बर्थडे रेवा, मला गिफ्ट वगैरे काही आणल आहे की नाही?",.. संदीप

"आणल आहे ना खाली बॅगेत आहे",.. रेवा

"ते नको आहे मला गिफ्ट",.. संदीप

"मग तुला काय गिफ्ट हव आहे? तू सांग म्हणजे मी घेऊन येईल",.. रेवा

" मी पंधरा दिवसापूर्वी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याच उत्तर अजून मला मिळालं नाही, त्याच उत्तर माझं बर्थडे गिफ्ट असेल अस वाटत आहे मला ",.. संदीप रेवा कडे बघत होता

रेवा प्रचंड लाजली होती, ती खाली बघत होती, सगळे बघता आहेत इकडे संदीप नंतर बोलू आपण

"मला काही फरक पडत नाही कोणी ही बघु दे रेवा, आज मला माझ्या प्रपोझल च उत्तर हव",.. संदीप हट्टाला पेटला होता, त्याचा हा हट्ट खूप आवडत होता रेवाला, ती लाजून चूर झाली होती

रेवा काही बोलली नाही ,.... स्वप्न वत होत हे सगळ, मी आणि संदीप, खूप छान वाटत होत रेवाला, संदीप माझ्या जवळ तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट आहे, माझं पूर्ण आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायच आहे, घरचे मित्रमंडळी काहीही म्हणू देत आता मला कोणाचीही फिकीर नाही, मला तुझ्या विषयी काय वाटत ते मी लेटर मध्ये लिहिल आहे आणि ते मी तुला संध्याकाळी केक कापल्यानंतर देणार आहे, रेवा गालातल्या गालात हसत होती

"काय विचार करते आहेस रेवा मलाही सांग",.. संदीप ने असो म्हटल्या नंतर रेवा अजुनच लाजली

खरंच किती छान दिसते रेवा, खूप खुश आहे ती, पण तिला काय माहिती पुढे केवढ मोठ संकट तिची वाट बघत आहे, सगळ्या बाजूने धोका आहे, कोण आपल आहे कोण परक तेच समजत नाही,

संदीप ने सगळ्यांना चॉकलेट दिल, आज संध्याकाळी सगळ्यांना माझ्या तर्फे रिसॉर्टवर पार्टी आहे, सगळ्यांनी यायचं, पत्ता सांगतोच मी थोड्यावेळात, नाहीतर कॉलेज नंतर सोबत जाऊ सगळे,

सगळे मित्र मंडळी आनंदात होती,

आपण जे करतो आहोत ते योग्य करतो आहोत का? खूपच धोका आहे आज रेवा साठी, राकेशही काय करतो काय माहिती? आई ला घेऊन तो निघाला की नाही? , आपण हे सगळं आईसाठी करत होतो तर आईच धोक्यात येऊन गेली, प्रेमाच्या बाबतीत असं नको व्हायला, खूप जागरूक रहाव लागेल आज

चला आपण कॅन्टीनला जाऊ , सगळे कॅन्टीनमध्ये गेले, तिथे मुलांनी एक केक अरेंज केला होता, संदीप आज रेवाच्या सोबत होता, तिच्या मागे मागे करत होता, संदीपने तो केक कापला, पहिला घास रेवाला भरवला, सगळे खूप खुश होते,

रेवाला तर खूपच स्पेशल फील होतं होत, या आधी तिला इतकं महत्त्व कोणीच तिला नव्हतं, तिने मनोमन ठरवलं की संदीपची साथ कधी सोडायची नाही, किती चांगला वागतो हा माझ्याशी, मी म्हणेल ती पूर्व दिशा, अजून एक मुलीला काय हव आहे, बर्थडे पार्टी साठी मी खूप एक्साईटेड आहे संदीप......

🎭 Series Post

View all