मुरांबा भाग 6

मैत्रीच्या शोधात आला एक नवीन ट्विस्ट
मागील भागात आपण पाहिलं की कमलला शोधायचा आणखी एक प्रयत्न म्हणून सुमनला भेटायचं असे माधव आणि सदा ठरवतात.आता पाहूया पुढे.

माधवराव घरी आल्यावर मालतीबाईंनी जेवणावरून विषय नाव बद्दलण्यापर्यंत नेला.
तो धागा पकडत गौरी हसत म्हणाली,
आजी तुझ्या टिंब टिंब ला विचार आईस्क्रीम खाणार का?"
मालतीबाई रागाने म्हणाल्या,
"मित्रांबरोबर पोटभर हादडल असेल,तरीही आईस्क्रीम भरून मधवरावांसमोर आपटलीच."
ते पाहून गौरीने लगेच मल्लिनाथी केली,"तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना."
तेवढ्यात करमेना वरून काहीतरी आठवत मालतीबाई म्हणाल्या,
"अहो!ऐकताय का?"
माधवराव मनात(आयुष्यात दुसरं काय असत लग्न झालेल्या पुरुषांच्या)हो! बोल मालू."
मालतीबाई,"तर मी काय म्हणत होते,कुमुद आणि मी या शनिवार रविवार आमच्या बाहेरगावच्या मैत्रिणींना स्नेहमेळाव्याच आमंत्रण द्यायला जातोय."
माधवराव आणि गौरीला हे ऐकूनच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
तेवढ्यात मालतीबाई म्हणाल्या,
"मी घरी नाही म्हणून दोघांनी कुठेही उंडारायच नाही,बाहेरच खायचं नाही,वेळेवर घरी या."
दोघेही हो हो म्हणत शनिवार आणि रविवारचा प्लॅन आखत होते.माधवरावांनी लगेच सदाला फोन करून ही माहिती देऊन पण टाकली. शनिवारी सकाळी मालतीबाई निघाल्या. जाताना दोघांना हजार सूचना देत होत्या.
शेवटी वैतागून गौरी म्हणाली,
"आजी इथे cctv लावू का?म्हणजे तुला चोवीस तास सूचना देता येतील आम्हाला."
मालतीबाई गेल्यावर थोड्या वेळाने सखू आली. तिने गौरीला विचारलं,"चाय आणि पोहे करू का?
तेव्हा दोघे आजोबा आणि नात आंबट चेहरा करत म्हणाले,"पोहे? चहा? सखू आज तेरी छुट्टी।
तशी सखू रागावून म्हणाली," मस्का लावू नका. आजींची सक्त ताकीद आहे. किमान सकाळी तरी हितच खावं लागलं."
मग काय आलिया भोगासी.....दोघेही ओरडले. चहा घेताना गौरीने बॉम्ब फोडला,"काय आजोबा!सापडली का कमल!
माधवराव उडालेच. तरीही सावरत गौरीला हळू बोलायची खुण केली. आजीचा गुप्तहेर घरात आहे.
माधवराव बारीक डोळे करून म्हणाले,"तुला समजलं कस?"
गौरी परत हळू आवाजात म्हणाली,"माझ्या लॅपटॉप वर fb वरून सर्च केलं आणि सर्च हिस्ट्री तशीच!!
माधवरावांनी डोक्याला हात लावला. गौरीने हसत कोणाला सांगत नाही अशी खुण केली. गौरी आवरून कॉलेजला गेली आणि माधवराव बाहेर पडले.
सदा त्यांची वाटच पहात होता,"माधवा अरे किती उशीर?तो दिन्या कोकलतोय केव्हाचा!
माधवराव म्हणाले,"बायको घरी नसली तरी तिची सूत्र असतात ना बातमी द्यायला. चल आता लवकर."
दिनकरने लोकेशन पाठवले होते. तिघेही सुमनच्या घरी पोहोचले. दरवाजावरची बेल वाजली. दरवाजा उघडला आणि समोर .. प्रसिद्ध वकील जाई वाडकर. माधवराव जाईला ओळखत होते.
तेवढ्यात दिनेशला पाहून जाई ओरडली,"आजी मामा आजोबा आलाय ग." तिघे आत येताच जाईने त्यांना विचारलं ,"सर तुम्ही इथे? खरतर निवृत्त झाल्यावर तुम्ही वकिली करायला हवी होती. मी निघते आता कोर्टात जातेय."
तेवढ्यात सुमन बाहेर आली. समोर माधवला पाहून ती जरा गडबडलीच. अजूनही रुबाबदार दिसणारे माधवराव थोडे सावरून बसले. एवढ्यात सुमनने चहासाठी आत आवाज दिला.
सदा मात्र सुमनशी बोलू लागला,"किती दिवसांनी पहातोय रे! किती बदल झालाय."
सुमन हसत म्हणाली,"सदा अजून आहे तसाच आहेस बरं! अगदी मिश्किल."
तेवढ्यात दिनकरने हळूच विषय काढला,"सुमे, आपल्या शाळेतील आमच्या वर्गाचा स्नेहमेळावा आयोजित करतोय आम्ही."
"अय्या हो का!किती छान! ये पण मुली सापडल्या का सगळ्या? नाही म्हणजे नाव वगैरे बदललेली असतात ना!सुमन बोलतच सुटली.
सदाने तिला मध्येच अडवलं,"अरे हो! हो! त्यासाठीच तुझी मदत हवी आहे.असे म्हणून मुलींच्या नावाची यादी तिच्या हातात दिली."
तशी सुमन त्यावर नजर फिरवत म्हणाली,"यादी आपली नावाला दिली,सदा सरळ सांग ना. कमल सावंत बाबत माहिती हवी."
हे ऐकताच तिघांना ठसका लागला. तशी सुमन हसत म्हणाली,"कमल सगळ्या मुलांना आवडायची ठाऊक आहे मला. मलाच नाही तर तेव्हाच्या बऱ्याच मुलींना.काय माधव?
माधवराव गडबडले,"आवडायची अस नाही. पण हुशार होती ना."
तेव्हा सुमन हसली,"माधव अरे पन्नास वर्षे होत आली. आता काय लपवायच?"
दिनकर चिडला,"सुमे, तुला पत्ता ठाऊक आहे का तिचा?
सुमन परत चिडवत म्हणाली,"किती तो उतावीळपणा. वहिनीला सांगू का?"
दिनकर म्हणाला,"बघ सदा! अस करते ही."
सुमन परत हसली. मग थांबून ती बोलू लागली,"मी फर्ग्युसनला असताना कमल मला सिनियर होती. पण ती अजिबात बोलत नसे कोणाशी. हा पण तिचा पत्ता एका वयक्तीला शंभर टक्के माहीत असेल."
माधवराव अधीरतेने म्हणाले,"कोणाला?
सुमनने ते नाव उच्चारले,"सुमती जोशी."
काय??तिघेही जोरात ओरडले.
"कस शक्य आहे?" सदा जोरात म्हणाला.
तेव्हा सुमन शांतपणे आत गेली. तिने कागदावर एक पत्ता लिहून आणला. सुमतीकडे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत.तिला भेटा.
तिघेही तो पत्ता घेऊन बाहेर पडले. सुमती जोशी. गोरा रंग,अपर नाक,लांब केस.कुलकर्णी बाईंची मुलगी.कमल यायच्या आधी सुमती शाळेत सर्वाधिक भाव खाई. पण...?
कमल आणि सुमतीमधली सुप्त स्पर्धा होती. माधवराव म्हणालेच,"कस शक्य आहे? कमल आणि सुमती? एकत्र?
दिनकर म्हणाला,"आता त्याची उत्तर फक्त सुमती देऊ शकते. तो पत्ता तरी वाच. मघापासून शॉकमध्ये असणारे तिघेही जरा सावरले. पत्ता होता :मधूस्मृती बंगला भोर.
सदा पटकन म्हणाला,"भोर?"
दिनकर म्हणाला,"उद्याच जाऊ आपण.आता या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं."
सुमती आणि कमलच्या मैत्रीवर एवढा अविश्वास का? सुमतीकडे असेल का कमलचा पत्ता? हा मैत्रीचा मुरांबा गोड होणार का? वाचत रहा कथामालिका मुरांबा.

🎭 Series Post

View all