मुरांबा

एक सुंदर कथा.वयाच्या वळणावर बदलणाऱ्या नात्यांची आणि जुन्या गोड आठवणींची

गौरी!गौरी!!आजोबांनी हाक मारताच गौरी धावतच आत आली.आजोबा काय हो! काय झालं?गौराई अगं कुठं गेली होतीस.काय champ विसरलास ना !!गौरी आणि तिचे आजोबा याचं खास बॉंडिंग होतं. माधवराव देसाई रिटायर जज ,कडक आणि शिस्तप्रिय .पण गौरी त्यांचा विक पॉईंट.त्यांच्या थोरल्या मुलाची धाकटी मुलगी.गौरी CA आर्टिकलशिप संपवून अंतिम परीक्षा देत होती.



आजोबा ! माझा एक मिनिटं! काय? अहो काल त्या सोहम कडे गेलो होतो सगळे.त्याच्या आजीने सर्वांना खाऊ दिला आहे.गौरीने डबा उघडला .वा! गौरे ,वास मस्तच येतोय .हो ,पण गोड आहे तेव्हा.....गप ग एक घास.असे म्हणून माधवरावानी मुरांबा खाल्ला.आत एक गोड जाणीव आणि एक सुंदर आठवण उमटली.जीभ आणि मन दोन्हीकडे.गौरी नाव काय ग? अहो सोहम देशमुख.सोहम च नाही त्याच्या आजीच.प्रश्न ऐकून गौरी गर्रकन वळली .आ....काय? अगं मुरांबा छान झाला म्हणून विचारले.सुनंदा आजी नाव आहे .गोड आहेत खूप.गौरी तिच्या खोलीत गेली .



माधवरावांना मात्र तो मुरांबा पन्नास वर्षे मागे घेऊन गेला.कोकणातील एका गावात.जिथे त्यांच्या वडिलांची नुकतीच बदली झालेली.माधव तेव्हा नववीत होता.छान टुमदार तालुक्याच गाव होत.तिथे माधव लवकर रुळला.छान मित्र मिळाले.हा हा म्हणता एक वर्ष गेले.दहावी चा वर्ग सुरु झाला आणि.......पहिल्याच दिवशी....अख्ख्या वर्गाची विकेट गेली.चाफेकळी नाक,कंबरेपर्यंत रुळणारे केस, गोरा रंग आणि हसणं ....सगळा वर्ग पहातच राहिला.



बाईंनी ओळख करून दिली.मुलांनो हि कमल सावंत.या वर्षी आपल्या वर्गात आहे.कमल तिच्या मावशीकडे आली होती शिकायला.सुंदर असणंरी कमल।अभ्यासात सुद्धा हुशारच होती.सगळे तिच्यावर फिदा. पण त्याकाळात मुलींशी बोलायचं म्हणजे???फारच अवघड.तरीही माधव वर्गात हुशार असल्याने ती एखादं दुसरा शब्द बोले.असच एक दिवस माधव डबा विसरून आला होता.जेवणाची सुट्टी झाली.तो वर्गात एकटाच होता.एवढ्यात कमल आत आली.एक पोळी देऊन म्हणाली,"मुरांबा पोळी आहे,मी स्वतः बनवलाय बर".झटकन निघून सुद्धा गेली.



ती चव आजही माधवच्या मनात होती.पण त्यानंतर वयानुसार थोडा वेडेपणा केला. कमल नंतर भेटलीच नाही.पण हा मुरांबा खाऊन तिची आठवण झाली.हि सुमन कोण आहे ?शोधायला हवं.



सुमन कोण असेल?माधव ने शाळेत काय वेडेपणा केला? गौरी आणि सोहम च नातं काय???हा मुरांबा पुढे कसा गोड होत जातोय ते.


🎭 Series Post

View all