मुरांबा भाग 3

माधवरावांना आपली बालमैत्रीण भेटेल का?पाहू या !

तांत्रिक अडचणीमुळे भाग उशिरा पोस्ट झाल्याबद्दल प्रथम दिलगिरी वयक्त करतो.



आपण पाहिले की गौरीच्या मित्राची आज्जी म्हणजेच आपली बालमैत्रीण असे माधवरावांना वाटत होते.त्यांनी आणि त्यांचा जिवलग मित्र सदा पाटील यांनी हे शोधायचं ठरवलं .त्यासाठी आधी सोहम चे घर किंवा फोन नंबर शोधायला हवा ,ते पण गौरीला संशय न येता.दोघा मित्रांनी व्यवस्थित चर्चा केली.



दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफी पिताना माधवरावांनी गौरीला हाक मारली,"गौराई!!!हाक ऐकताच गौरी चमकली.मस्का नका मारू अजिबात गोड मिळणार नाही.नाहीतर आज्जीला सांगते.गप !आज्जीची चमची. गौरी काय ग तुझे मित्र मैत्रिणी काय म्हणतायत?घरी येत नाहीत सध्या? आजोबा सध्या सबमिशन ची गडबड आहे.एवढ्यात फोन वाजला.गौरी ओरडली ,काय???सोहम काय झाले रे!!काही नाही कसे?मी येते,थांब.



फोन ठेवला.आजोबा पळते मी.अरे पण झालं काय??सोहम ची आजी पाय घसरून पडली.काय?माधवराव ओरडले.गौरी वळली,चिल आजोबा.आपली नाही सोहमची आजी.मी येऊ का बरोबर? कशाला??तुमची ओळख आहे का?गप बसा.



माधवरावांनी लगेच सदा ला फोन लावला.माध्या अरे पाठलाग करायचा तिचा.सद्या गप रे!एवढ्यात बेल वाजली.सद्या गृहमंत्री आले .मालती बाई तणतण करतच आल्या.काय झालं मालू?काही नाही ओ. आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी भेटणार होतो ,पुढच्या आठवड्यात.हो का.मला चहा दे!!आता मालती बाई चिडल्या, प्या चहा प्या!!काय झालं??आहो ती देशमुख आहे ना!!माधवरावांनी परत पाहिलं.मालतीबाई हात ओवाळत म्हणाल्या,"माझ्या मैत्रिणी कशाला आठवतील म्हणा?अरे पण झालं काय??काही नाही ती आता येत नाहीय.कारण पण सांगत नाही.म्हणते तुम्ही बाकीच्या भेटा.मालतीबाई बडबड करत आत गेल्या.



माधवरावांनी परत गौरीला फोन केला.पोचलीस का ?हो!पोचले आजोबा.आणि गडबडीत ठेवला सुद्धा.आता मात्र माधवराव उतावीळ झाले होते.त्यांना कसेही करून सोहम च्या आज्जीला भेटायचं होत.एवढ्यात मालतीबाई बाहेर आल्या.अहो!!ऐकलं का?तेच करतोय पन्नास वर्षे(मनात) काय म्हणालीस?अहो ती देशमुख इकडे पुण्यातच रहाते.आपण जाऊ या का ? माधवरावांना जायचं नव्हतं.ते फक्त बघू!एवढेच म्हणाले.तर मालतीबाई चिडल्या,"काही नको!मी जाईन गौरीला घेऊन.इकडे सदा आणि माधव ने पार fb वर शोध चालू केला.शाळेतले अनेक मित्र मैत्रिणी सापडल्या.कमल मात्र सापडेना!!!



काय होईल पुढे?हा मैत्रीचा मुरांबा गोड होईल का??पाहूया लवकरच


🎭 Series Post

View all