मुरांबा भाग 2

माधवराव आणि कमल पुन्हा भेटतील का?गौरी आणि सोहम चे काय होईल? नात्यांचा हा गुंता थोडा नरम विनोदी प

मागील भागात आपण पाहिलं की सोहम च्या आजीच्या हातचा मुरांबा खाऊन माधवराव काही आठवणींत हरवून गेले.दहावीच्या वर्षातील त्या सगळ्या घटना त्यांना आजही आठवत होत्या.माधव तसा सरळमार्गी जरी कमल त्याला आवडत होती तरी आता फक्त अभ्यास करायला हवा हे मात्र त्याला कळत होत.त्यामुळे तो कमलशी अगदी मोजक बोलत असे.



माधव तसा हुशार आणि त्यात शिक्षकांचा मुलगा ,त्यामुळे सगळ्या शाळेचा लाडका.माधव आणि सदाशिव जिवलग मित्र.सदा हुशार असला तरी बेधडक आणि अतिशय बंडखोर.कमल त्याला आवडते हे सगळ्या शाळेला माहित होत.दहावीची फॉर्म परीक्षा झाली.एक दिवस सदा माधवच्या घरी अभ्यासाला आला.त्याने माधवला गळ घातली .मला कमल आवडते तर तिला द्यायला चिठ्ठी लिहून दे.माधव विचारात पडला.



एका बाजूला जिवलग मित्र तर दुसऱ्या बाजूने त्याला हे पटेना.शेवटी मैत्रीचा विजय झाला.माधवने पत्र लिहिलं आणि खाली नाव मात्र तुझ्या अक्षरात लिही असं सांगितलं..सदा पत्र घेऊन घरी आला.दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर पत्रावर नाव लिहू असे ठरवले.सदा आणि माधव शाळेत आले.मराठीचे सर वह्या गोळा करू लागले.आणि..........सदाच्या वहीत पत्र तसेच .सरांनी वही घेताना चिठ्ठी खाली पडली.सरांनी चिठ्ठी वाचली.पन्नास वर्षांपूर्वी हे कृत्य म्हणजे गुन्हाच की.त्यांनी सरळ सदा आणि माधवला आत बोलावलं.चिठ्ठीवर नाव नाही पण अक्षर माधवचे. सदा काही बोलायच्या आधीच सरांच्या हाताची बोट माधवच्या गालावर उमटली.माधवने सदाला गप्प रहा अशी खूण केली.



वर्गात कोणाला काहीच कळले नाही.सरांनी कमल ची मात्र कान उघडणी केली.त्यानंतर मात्र कमल माधवशी कधीच बोलली नाही.पुढे दहावी झाली.नंतर माधव शहरात आला.कमल आली वडिलांकडे परत गेली.त्यानंतर कमल हा भूतकाळ या दोघां मित्रांचा हळवा कप्पा झाला.हि मुलं टुकार आहेत ,हा कमलचा झालेेला समज .



इतक्या वर्षांनी सुद्धा या दोघा मित्रांना कमल भेटावी असे वाटायचे.एवढ्यात आजोबा ! आजोबा !अशी गौरीची हाक ऐकून माधवराव कॉफी प्यायला उठले.संध्याकाळी निवांत झाल्यावर त्यांनी सदा ला फोन लावला.सदा हे ऐकूनच हसला.मध्या लेका अरे हि सुमन कोण? कमल आणि ती एकच असेल कशावरून?



फक्त मुरंब्यावरून???आणि गौरी ला तरी कसे विचारणार तू?काय सांगणार? शिवाय वहिनी असताना तर नकोच .माधवराव हो म्हणाले.फोन 



फोन ठेवला तरी सोहम च्या आजीला एकदा भेटावे असं मात्र सारखं वाटत होत त्यांना.कमल आणि सुमन एकच असेल का?माधवराव भेटू शकतील का?पाहू ह्या मुरंब्याचा आंबट गोडपणा कसा वाढतोय....


🎭 Series Post

View all