मुलीने माहेरची जबाबदारीही निभवायला हवी

मुलीने लग्न झाल तरी माहेरची जबाबदारीही निभवायला हवी ते तिच कर्तव्य असत.
        लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी मदत केलेली सासरच्यांना आवडत नाही. लग्न झाल मुलीला सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबाचा आणि जबाबदार्‍यांचा विचार करावा लागतो.शालिनीच लग्न जमल. ती घरात मोठी मुलगी असल्याने चांगली शिकुन नोकरी करत होती. घरात तिच मोठी असल्याने माहेरी तिच्यावर जबाबदारीही होती. कारण भाऊही तिचा छोटा होता. एवढ्या मूलांच शिक्षण आणि घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. वडीलही प्रायव्हेट जाॅब करायचे आणि आईही धुणीभांडी करून जमेल तेवढ करून आपल्या संसाराला हातभार लावायची. शालिनीच लग्न करायची वेळ आली. तेव्हा तिचेदोन बहीणी आणि भाऊ शिक्षण घेत होते. तिच लग्न निलेशसोबत जमल तेव्हा तिने स्पष्ट सांगितल होत की, " लग्न झाल्यावरही मला माहेरी थोडी आर्थिक मदत करावी लागेल. कारण भावंडांच शिक्षण व्हायचय अजुन आणि वडील ही अलीकडे खुप आजारी असायचे, त्यांचाही हाॅस्पिटल आणि औषधांचा खर्च भागवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. शालीनी होती तोपर्यंत आई बाबांनाही टेन्शन नव्हत. ती मनापासून करत होती सगळ तिला परिस्थितीची जाणीवही होती.तिलाही वाटायच भाउ आणि बहीणी उद्या ज्याच्या त्याच्या पायावर उभ राहतील त्यांच शिक्षणही होईल पण तोपर्यंत आपण हातभार लावला पाहीजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती.


    शालिनीने लग्नाआधीच त्याला आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींशी ही गोष्ट बोलून घेतली तेव्हा त्यांनी म्हटल की आमची काही हरकत नाही तु नोकरी करतेस आणि त्यातुन तु माहेरी मदत करू शकते उलट निलेशने तर सांगितल की , " शालीनी मी ही तुझ्यासोबत आहे तु नोकरी करुन मदत करू शकते माझी काही हरकत नाही आणि उलट कधी लागल तर मी ही तुझ्या भावंडांना आणि माहेरच्यांना मदत करेन माझही ते कर्तव्य आहे. आपल्या दोन्ही फॅमीली लग्नानंतर माझ्यासाठी सारख्याच असतील त्यामुळे मी दोन्ही कुटुंबाची जबाबदारी निभावू शकतो तु टेन्शन घेऊ नको " , निलेशने असबोलल्यावर शालिनीला खुप छान वाटल की आपला नवरा किती विचार करतो आपल्या माहेरच्यांही लोकांचा ती भारावून गेली त्याचे विचार ऐकुन. अगदी निर्धास्त होती ती लग्न करायला तर तयार होती. थोड्याच दिवसात साखरपुडा पार पाडला. तिच्या कुटुंबाने शालिनीच लग्न सर्वांच्या उपस्थितीत मस्त पार पाडल. आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला, याच त्यांना कौतुक होत. तिने लग्ना आधीच निलेशचे विचार घरी सांगितले होते. त्यामुळे घरच्यांना वाटायच शालिनी निलेश सोबत सुखी संसार करू शकेल. तिच सासरची माणसही चांगली आहे आलीच वेळ कधी अडचणीची तर पाहुणे मदत करण्यासारखे आहेत अस तिच्या बाबांना वाटायच.लग्न झाल्यानंतर शालिनी घर आणि नोकरी दोन्ही जबाबदार्‍या उत्तररित्या सांभाळायची. एवढच काय निलेशचे येणारे जाणारे पाहुणे कुणुही असो प्रत्येकाच ती आदरतिथ्य छान करायची. प्रत्येक जबाबदारी ती निभवायची. सासर आणि माहेर दोन्ही फॅमीलीला ती सारखच मानायची. सासरच्या माणसांना तर तिने केव्हाच आपल केल होत. सगळ छान सुरू होत पण नव्याचे नवलाई संपली... नंतर खर रुप निलेश आणि त्याच्या घरच्यांच शालीनीसमोर आल. म्हणतात ना... खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे अशी माणस होती.

शालीनी सासरीही पैसे द्यायची जमा करायची, खर्च करायची तिलाही कळायच आपल घर आहे आपला संसार आहे तिला सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारींची जाणीव होती म्हणून ती कधी नोकरीला असुन स्वतःवर पैसेही खर्च करत नव्हती सासरच आणि स्वतःच सगळ करुन ती थोडी मदत आपल्या भावंडांसाठी करायची. त्यांच शिक्षण सुरू होत. शिक्षण म्हटल की पैसा लागतोच. पण हे निलेशही आवडत नव्हत आणि तिच्या घरच्यांनाही. निलेश शालिनी मदत करायची म्हणुन तिला बोलून दाखवायचा, त्याने स्वतःने लग्नाआधी म्हटला होता की वेळ आली तर मी ही मदत करेल त्याच्या मदतीची अपेक्षा शालीनीला नव्हतीही तिने त्याला कधी तस म्हटलेही नाही. पैसेही मागितले नाही उलट तिच्या सासरचे म्हणायचे, " शालिनी तुलाही तुझा संसार आहे ग, तुला पैसे मागताना कसतरी वाटत पण परिस्थितीत तशी आली होती " तिच्या आईला खुप वाईट वाटायच. दोन नंबर बहीणीने पार्ट जाॅब करायला सुरुवात केली. तिच्या सासुलाही हे आवडत नसे त्या तर सर्वांना सांगत की, शालीनी जाॅब करते सगळे पैसे माहेरीच देते " या सगळ्यात शालिनीला खुप कसतरी वाटायच पण करणार तरी काय होती ? तिलाही कळत होत की आपली माहेरची परिस्थिती ठिक नाही मदत केली तर बिघडल कुठे मला तरी कुठे आयुष्यभर करायच आहे म्हणा आज ना ऊद्या भाऊही शिक्षण झाल की नोकरी करेल तो करेल सगळ आईबाबांच आणि बहीणीही त्यांच्या सासरी जातील अस शालिनी तिच्या मनाची समजुत घालायची कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलीचा विचार करायची. एवढच नाही तर शालिनी निलेशच्या आईबाबांचा हाॅस्पिटल आणि मेडीसिनचा खर्चही करायची. निलेश तर कधी विचारतही नव्हता सगळ शालीनीच बघायची पण सासुबाई म्हणायच्या केल तर काय झाल ते तिच कर्तव्यच आहे पण माहेरचही मुलीने थोडफार करण कर्तव्य असत हे मात्र विसरल्या होत्या.
दोन्ही बाजुंचा विचार त्या करतच नव्हत्या. काही दिवसांनी शालिनीचे बाबाही त्यांना सोडून गेले. तेव्हा शालिनीवर घरची जबाबदारी येऊन पडली तरी ती हारली नाही सगळ मॅनेज करत होती.


     शालिनीला माहेरी मदत करते हे सगळ माहीती झाल. निलेशने तिला खुप बडबड केली. दोघेही तिला यावरुन भांडले. तेव्हा शालिनी गप्प बसु शकली नाही. तिही शिकलेली आणि नोकरी करणारी होती. निलेशपेक्षा जास्त कमावणारी दोन्ही कुटुंबांच सगळ आर्थिक भार सांभाळायची. त्यादिवशी तिलाही त्यांच्या बोलण्याचा रागच आला. शालिनी म्हणाली," मुलीने सासरी मदत केली तर ती चालते, माहेरी केलेली चालत नाही अस का ? माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात का तर माझ्या संसाराचा ते विचार कसतात. हि मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या भावंडांसाठी. ती प्रत्येक मुलीची आणि माझीही जबाबदारी आहे आणि तिच मी निभावत आहे यात मी चुकीच काही करत नाही. ज्या आईबाबांनी मला एवढ कष्ट करुन शिकवल, मोठ केल आज मी त्यांच्यामुळेच मोठ्या पोस्टवर आहे आणि चांगली कमावतेही मग माहेरी गरज असताना थोडे दिवस मी आर्थिक मदत केली तर बिघडल कुठे आणि हो मि तुमच ही सगळ करते आणि आमचा संसार पुढील भविष्य याचाही विचार करून मी पैसे जमा करत असते. त्यादिवशी ते दोघेही शालिनीला काहीच बोलू शकले नाही.शालिनीच्या सासुबाई खुप आजारी होत्या. त्यांची मुलगी त्यांना पैसे लागणार होते तर स्वतःहुन निम्मे पैसे भरायला तयार झाली तेव्हा शालिलीने म्हटल, " ताई आम्ही दोघ आहोत की निलेश आणि मी बघतो पैश्याच तुम्ही काळजी करू नका "" नाही वहीणी माझही कर्तव्य आहेच की शेवटी आई आहे ती माझी. मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच दोघांनाही त्यांनी मोठ केलेल असत शिक्षण, नोकरी त्यांच्यामुळे पूर्ण होते मग अश्या वेळेस माहेरी मुलीने मदत केली तर काय होत. मी ही जाॅब करते माझी सेव्हींग्ज आहे

" अर्थात शालिनीही अश्याच विचारांची होती. आपल्या बहिणीला निलेशही काही बोलू शकला नाही.तिने म्हटल की मला वाटत लग्न झाल्यानंतरही मुलीसाठी माहर परक होत नाही मुलीने कधीतरी माहेरचीही जबाबदारी आपल्या आईवडीलांसाठी काही केल तर बिघडत नाही. शालिनी इतक्या दिवस हे बोलत होती तेव्हा तिच्या सासुबाईंना पटल नाही, आज मुलीने म्हटल्यावर तिने केलेली मदत हे सगळ पाहुन आपण शालिनीशी चुकीच वागलो तिला यावरुन दुखावल याची त्यांना जाणीव झाली. निलेशलाही थोड वाईट वाटल.दोघांनीही शालिनीची माफी मागितली कारण त्यांनाही पटल होत." लग्न झाल म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी कर्तव्ये विसरून चालत नाही.ती स्वतःच्या पायावर उभी असेल नोकरी करत असेल माहेरची परिस्थीती बेताची असेल कीॅवा माहेरीही कधीतरी मदतीची गरज लागते अश्या वेळेस मुलीने मदत करण हे तिच कर्तव्यच असत. तिच्यासाठी दोन्ही कुटुंब सारखीच असतात. या सगळ्यात फक्त तिला सासरच्यांनी समजुन घ्याव हिच अपेक्षा असते. मुलीने माहेरी केलेली मदत सासरच्यांना आवडत नाही. पण हे ही विसरुन चालणार नाही... पण लग्न झाल म्हणुन तिच्यासाठी माहेर महत्वाच नाही अस नाही ना... मुलीने सासरची जशी जबाबदारी असते तशी माहेरचीही जबाबदारी निभवायलाच हवी !

                  समाप्त