मुलीचा गर्भ ( भाग एक )

मुलीचा जन्म म्हणजे अनेक जन्माची वात्सल्याची तहान पुर्ण करण्याची संधी आणि मुक्तीचा मार्ग


मुलीचा गर्भ ( भाग एक )

विषय: भूतकाळात डोकावताना

"सगळे रिपोर्ट्स चांगले आहेत. तरी आपण योग्य ती काळजी म्हणून पूर्ण बेड रेस्ट घेऊ. सकस आहार घ्यायचा. वजन उचलायचं नाही आणि दिलेली औषधं न चुकता घ्यायची. दर तीन महिन्यांनी चेकिंगला यायचं" डॉक्टर कागदावर औषध लिहीता लिहीता एक सुरी आवाजात बोलत होते.

ती दोघं मन लावून त्याचं बोलणं आहे ऐकत होती.

" मागच्या वेळी देखील सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. अचानक काय झालं होतं काही समजतच नाही ",तिचा नवरा डॉक्टरांना विचारत होता.

हे बघा सगळे रिपोर्ट नॉर्मल असले ,तरी एक टक्का चान्स हा निसर्गाकडे असतो. शेवटी निसर्गाचा जो निर्णय असतो तो आपल्याला मान्य करावाच लागतो. कदाचित असेही असू शकेल की तो दर गर्भ बाह्य परिस्थिती तग धरण्यास असमर्थ असेल म्हणून असं झालं असावं. पण मला वाटतं जे झालं ते झालं. आता जुन्या गोष्टी पुन्हा आठऊन त्याचा त्रास पेशंटला करवून देण्यास काही अर्थ नाही. आता आपण आशा करूया की सगळं काही व्यवस्थित होईल. चांगले विचार ठेवा.  परमेश्वराचं नामस्मरण करा. सगळं काही व्यवस्थित होईल. आपण यावेळी खूप काळजी घेतलेली आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही आता तुम्ही मनाने पक्के राहा सगळं काही व्यवस्थित होईल." डॉक्टर आश्वासक आवाजात तिला धीर देत होते. ती शून्य मनाने ऐकत होती.

मागच्या वेळचा अनुभव अतिशय हृदय द्रावक होता.घरात ती दोघच. तो दिवस ती विसरू शकत नव्हती. सगळं काही नॉर्मल होतं. त्या छोट्याशा बाळाच्या भोवती कितीतरी स्वप्न विणली गेलेली होती. त्याच्या तुम्ही पोटातल्या हालचालींनी संपूर्ण अंगभर शहारे उमटत असत. त्या हालचालींना तिचा नवरा देखील अनुभव करत असे. सगळी औषध ती व्यवस्थित घेत असे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळत असे. त्या दोघांचं विश्व त्या बाळाभोवती विणले गेलेल होत. त्या बाळाचं नाव देखील त्यांनी निश्चित केलेलं होतं.

तिला चांगल आठवत होत. मागच्या वेळेस तिला एक स्वप्न वारंवार पडत असे. अमावास्येचा दिवस होता. एक मोठी काळोखी विहीर तिला दिसायची. त्यात तिचं बाळ जावून पडत असे. एक दिर्घ किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडत असे. अंगाला दरदरून घाम फुटून ती जागे होई. आपल्या पोटावरून हात फिरवे आणि पुन्हा झोपून जाई. अनेक वेळा हे स्वप्न तिला पडायचं. तिने नवऱ्याला ही गोष्ट सांगीतली. तो ती हसण्यावारी नेई.सगळे मनाचे खेळ आहेत असं सांगून तिचं समाधान करी.

सातवा महिना संपला होता. तसगळं काही व्यवस्थित होतं. ती नेहमी प्रमाणे आंघोळीला गेली. अंगावरती एक तांब्या पाणी टाकल असेल ना असेल, तेवढ्यात तिला आपल्या पोटातून काहीतरी मोठा गोळा खाली घसरतो आहे असं जाणवलं आणि काही करण्याच्या आतच सगळ्या बाथरूम भर रक्ताचे थारोळ पसरलं. तिने किंकाळी फोडली. तिचा नवरा धावत आला. लगेच तिला घेऊन डॉक्टर कडे गेला. मुलीचा गर्भ होता.डॉक्टरांनी तिला तपासलं आणि सांगितलं की आता तिचं बाळ या जगात नाहीये. वरतून आता तिची गर्भ पिशवी स्वच्छ होण्यासाठी क्युरेटिंग कराव लागेल. ती सुन्न होऊन गेली. तिच्या डोळ्या देखत तिचं स्वप्न नष्ट होऊन गेल. स्वतःच्या जीवापेक्षा प्रिय असलेलं तिचं बाळ हे जग पाहण्याच्या आधीच अनंत विलिन होऊन गेले. ती सैरभैर झाली. दुःखाचा डोंगरच कोसळला होता तिच्यावर. ध्यानी मनी तिला तिचं बाळ दिसत असे. कितीतरी रात्री तिने रडून घालवल्या होत्या. झोपेत तिचं बाळ रांगत येऊन तिच्या कुशीत शिरत असे.

माहित नव्हतं पण सगळे म्हणत होते की त्या दिवशी अमावस्या होती.

तिच्या दृष्टीने आता प्रत्येक दिवस अमावशाच होता. त्या वेळी नवऱ्याने तिची खूप काळजी घेतली होती.
आणि आज पुन्हा ती त्याचं प्रसंगाला सामोरं जात होती. मागच्या सारखं काही होऊ नये म्हणून दोघंही काळजी घेणारं होते.

एकमेकांना सोबत करत दोघंही घरी आले.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all