मुले जेव्हा पालक होतात....

Nyc story

अनिता, निलेश आणि आर्ची छान कुटुंब... छोट्या आर्चीला खूप छान घडवत होते... छान संस्कार करत होते....

एकदा आर्चीच्या शाळेत स्पर्धा होती.. अनिताने खूप छान तयारी करून घेतली होती तिची... आर्ची खूप ऍक्टिव्ह होती... बडबडी, हुशार... सगळ्यांची लाडकी... सगळ्यात नंबर यायचा तिचा....

ह्या वेळेस सुद्धा स्पर्धा सुरू होण्याआधीच तिने नंबर आल्यावर तिला काय हवे याची खूप मोठी लिस्ट दिली... अनिताला तीच्या याच स्वभावाचे टेन्शन यायचे...तिला कसे समजावून सांगायचं हेच तिला कळंत नव्हते...

अन या वेळेस शेवटी उलटच झाले,नंबर आला नाही... खूप निराश झाली आर्ची.. कोणाचे ऐकत नव्हती...कोणाशी बोलत नव्हती... शेवटी अनिताने खूप समजावलं आणि म्हणाली माझे मन मला सांगतय तूला स्टोरी मध्ये नक्की बक्षीस मिळेल... तेव्हा तीला पटले... आणि आनंदाने आईला मिठी मारली...

असेच दिवस जात होते.. अनिताच्या ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन होते आणि त्यावरून प्रमोशन मिळणार होते... या आधी प्रत्येक वेळेस तिला आर्ची लहान असल्यामुळे कंपनीने डावलले होते... पण यावेळी तिने अगदी ठाम ठरवल होते... खुप तयारी केली होती तिने.... पण शेवटी जे व्हायचे तेच झाले...

घरी आल्यावर अनिताने रागात येऊन पर्स ठेवली,छोटी आर्ची बघत होती...
निलेशने विचारले काय झाले प्रेझेंटेशनचे..??
सगळ्यांना खूप आवडले... टाळ्या पडल्या... पण फॅमिलीवाल्याना आम्ही ‌म्हणुन प्रोमोशन नाही.. खुप् राग आला होता तिला....

तेवढ्यात आर्ची म्हणाली... अगं आई मीपण रडले होते अशीच माझा नंबर नाही आला म्हणून पोएम मध्ये.... तेव्हा तु मला काय शिकवलस की नंबर येण्याला महत्व नसते, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मॅडमनी तर तुझी पापी घेतली म्हणजे तु छान बोललीस याची पावती तुला दिली याला महत्व आहे.... आणि यश मिळाले नाही म्हणुन प्रयत्न सोडायचे नाहीत... परत सगळ्यात भाग घ्यायचा..... आता तुला पण टाळ्या पडल्या.....
तेव्हा मला तु गाणे शिकवलं होतंस.... आणि आता तुच विसरलीस... चल आपण बोलूया दोघी...

"हम होंगे कामयाब एक दिन......"

अनिता आणि निलेश कौतुकाने लेकीकडे पाहतात...... 


निलेश म्हणतो, बघ तूला काळजी वाट्त होती ना.. या आर्चीचे कसे होणाऱ?? आता ती तूला शिकवते... मुले आपोआप शिकत असतात ग.. आणि आपण सांगितलेले ऐकण्यापेक्षा ते आपले अनुकरण करतात... आपल्या संस्कारांवर विश्वास ठेव... आपण तिला सर्व चांगलेच देत आहोत त्याची परतफेड चांगलीच होणाऱ... आणि ही आताची पिढी म्हणजे कधी आपलेच पालक होतील काही सांगता येत नाही बघ... दोघे हसतात...

तेवढ्यात छोटी आर्ची बाई मस्त आईस-क्रीम घेऊन येते तीच्या लाडक्या आईसाठी.... आई माझे मन मला सांगतय तूला खूप मोठी पोस्ट लवकरच मिळेल...!!!!

कशी वाटली कथा नक्की सांगा..... खरंच कधी कधी मुले आपल्या नकळत मोठी होतात नाही का??? आणि त्यांचे असे वागणे आपल्याला प्रेरणा देऊन जाते....
तुमचा असा काही अनुभव असेल तर नक्की सांगा.... तुमच्या लाइक आणि कंमेंटची वाट पाहते.... अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all