Login

मुलांसाठी जीव तुटतो.. (भाग दोन)

आई-वडिलांचा जीव मुलांसाठी तुटतोच..

घरून घेतलेले सर्व सामान एसटी चढवत असताना ,एसटीचा दरवाजा हाताला लागू बापूंच्या हातातून रक्त वाहू लागते.
त्यांच्या हातातून रक्त वाहत असलेले पाहून कंडक्टर पुढे येतो व त्यांना  सामान चढवण्यासाठी मदत करतो...

कंडक्टर बोलतो ...ओ काका तुम्ही मुंबईला एवढं सामान घेऊन एकटेच कुठे चाललाय...
अंधेरीला जायचं आहे...
कोणाकडे चाललाय एवढं सामान घेऊन.
अहो माझ्या मुलाच्या घरी चाललोय. त्याला ऑफिसचं काम लागल्यामुळे तोच म्हंटला की तुम्हीच या मुंबईला मग मोकळ्या हाताने कसं जाणार... म्हणून थोडसं काहीतरी आपल्या सोबत घेतलं..
वडिलांच मुलावर असणारं प्रेम बघून कंडक्टर चे डोळे पाणवतात...
अहो काका तुमच्या हाताला लागलेलं ना!  हात तिकडे करा बघू रुमाल बांधतो..या इकडे. आणि घरी गेल्यानंतर एक टी टी चं इंजेक्शन घ्यायला विसरू नका.
बरं काका मला सांगा अंधेरीला उतरल्यानंतर हे  सामान घेऊन तुम्ही मुलाच्या घरी कसं जाणार.
अहो त्यालाच फोन लावतोय कधीपासून पण फोनच लागत नाही जाईपर्यंत फोन लागला तर तो येईल मला घेण्यासाठी फोरविलर घेऊन.
बापू अंधेरीला पोहोचेपर्यंत सुरज ला फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण कामाच्या गडबडीमध्ये सुरज बापूंचा फोन घेत नाही.
बापू शेवटी अंधेरीला पोहोचतात .
कंडक्टर त्यांच्यासाठी एक टॅक्सी थांबून त्यामध्ये त्यांनी आणलेले सर्व सामान चढवून देतो व बापू सांगतील त्या ऍड्रेस वर त्यांना सोडण्यासाठी सांगतो.
टॅक्सीवाला सर्वसामान बापूंना लिफ्टमध्ये ठेवण्यास मदत करतो लिफ्ट मधून बापू वरती जातात.
दाराची बेल वास्ते ईशान दरवाजा उघडतो.
बापूंना  बघून ईशानला खूप आनंद होतो आजोबा तुम्ही अचानक!
ईशांचा  आवाज ऐकून बेडरूममधून निशा बाहेर येते.
बाबा तुम्ही अचानकपणे.
या.. आत या...
बापूंनी आणलेलं सामान बघून निशा बोलते हे एवढं सगळं सामान आणायची काय गरज होती.
एक तर आम्ही तिघंच राहतो त्यातही सोहम कामासाठी महिन्यातून 15 दिवस तर बाहेरच असतो. माझं तर डाएट सुरू आहे . त्यामुळे मी भात खात नाही आणि चपाती देखील खात नाही. गावावरून सामान आणायचं आणि नंतर बोलू नाही दाखवायचं की आम्ही गावावरून सर्व पुरवतो म्हणून..
निशा बापूंना पाणी देण्याआधीच बडबड चालू करते.

बापू तिला बोलतात थोडं पाणी मिळेल का?

निशा त्यांना आतून पाणी आणून देते.
संध्याकाळी सोहम घरी येतो. बापूंना घरात बघून त्याला देखील आश्चर्य वाटतं अहो बापू तुम्ही अचानक.
अरे बाळा तुला यायला वेळ नाही ना म्हणून मी आलो.
निशा सोहमला बोलते हे बघ सोहम तुझा आणि बापूंचा स्वयंपाक करून ठेवला आहे. मी आणि इशान  दोघेही माझ्या मैत्रिणीच्या बर्थडे साठी बाहेर जात आहोत.
दिवसभर प्रवास करून थकून आलेल्या बापूंना रात्री  डाळ भात खाऊनच भूक भागवावी लागते...