Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मुलाचे जीवन घडवणारा शिक्षक....

Read Later
मुलाचे जीवन घडवणारा शिक्षक....

विषय:- मुलाचे जीवन घडवणारा शिक्षक....                                                   जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण गुरू शोधत असतो जो आपणास यशाचा मार्ग दाखवेल आपल्यातील कमतरताची आपणास जाणिव करून देईल.... की तू ते काम करू शकतो कितीही अवघड रस्ता असला तरी तो सोपा कसा करायचा हेच तर गुरू शिक्षक शिकवत असतात. काहीही झाले तरी यशाचा मार्ग सोडू नकोस. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला,अपमान झाला, कोणी नावे ठेवली,पाय ओढले, थट्टा मस्करी केली,अडवले, थांबवले,काहीही होवो, चांगल्या कामात निरलज्ज व्हा, मान, सन्मान, इगो, अहंकार, मोठेपणा, सर्व सोडा, फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे असे शिकवणारे आमचे शिक्षक....                              कुंभार जसे मडक्याला आकार देतो तसे शिक्षक पण मुलाच्या आयुष्याला आकार देतात... पुस्तकातले तर सगळेच शिकवतात पण ह्या जगात कसे वागावे,कसे जगावे,कसे चलावे हे शिक्षक तर शिकवतात... प्रत्येक आव्हान कसे पेलायचे हे तेच तर शिकवतात.. ह्या practically जगात योग्य वेळी आपली आपली निर्णय क्षमता कशी वापरायची हे आपल्या कृतीतून मुलांना दाखवून देतात कारण उद्याचे भविष्य त्याचा हातात असते ना...                                              आज जगात 4G आले 5G आले तरी शिक्षकाची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणाच्या ना कोणाच्या रुपात शिक्षक नक्की भेटतो...ज्या कामात आपण कमी तिथे सावरणारा प्रत्येक जण आपला गुरूच तर असतो...लहान असो वा मोठा सगळ्यांकडून काहीना काही शिकायला तर नक्की मिळते .....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...

//