मूल ..हवे की नको?

मी एक हौशी लेखिका आहे आणि ईरा वर नुकतेच लिहायला सुरुवात केली आहे. आवडल्यास लाईक आणि कमेंट करून प

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला मुलगी जावयाला मूल नको म्हणून काळजी वाटणाऱ्या मातेचा तो लेख होता “मातृत्वाचा झराच आटलाय का?”असा प्रश्न यामध्ये विचारले ला होता त्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार मांडण्याचा हा प्रयत्न.. लग्नानंतर मूल होणे हा निसर्गनियम तसेच व्यक्तिगत दृष्ट्याही ही प्रत्येकाची इच्छा असते पण समजा कोणाला तशी इच्छा नसली तर ती लादली जाऊ नये पती-पत्नी दोघांनाही मूल नको असेल तर इतरांनी तशी जबरदस्ती मुळीच करू नये आमच्या आईने जेवढ प्रेम माया आम्हाला दिली त्याच्या 50 टक्केच आम्ही आमच्या मुलांना देतो हे एक कटुसत्य आहे आमचा वेळ जातो तो त्यांना शिस्त लावण्यात, अभ्यास घेण्यात, मुलांनी कपडे खराब करू नयेत पसारा करू नये हा आमचा प्रयत्न असतो .त्यांच्या बालसुलभ भावना बालपणीच दडपून टाकताना आम्हाला त्यांना वळण लागल्याचे समाधान मिळते.आजकाल मुला- मुलींमध्ये मुळातच सोशिकपणा इतरांसाठी कष्ट घेण्याची वृत्ती या गुणांचा अभाव दिसून येतो आम्हाला मुले हवी होती तरी देखील ती त्रास देऊ लागली की कंटाळा येतो राग येतो त्यांचे आवरता आवरता नाकी नऊ येते मातृत्वाचा झरा पूर्णतः आटला नसला तरी तो आटत चालला आहे हे नक्की अशा वेळी ज्यांना मुळात मूल नकोच आहे त्यांच्या स्थितीबद्दल कल्पनाच केलेली बरी. बऱ्याच वेळा समाजातील लोकांची तोंडे बंद करण्यासाठी मुलाला जन्म दिला जातो इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की मूल झालं की प्रश्न संपत नाही तर सुरू होतात मुलांचे एक ना दोन हजार कामे असतात इतरांनी थोडीफार मदत केली तरी भर मात्र आईवरच असतो स्वतःहून स्वीकारलेल्या मातृत्वा मध्ये अर्थातच ही कामे वाटत नाही तर तो आनंददायी अनुभव असतो पण मातृत्व लादलेले असेल तर मात्र हे कठीणच काहीवेळा स्वतःचं पौरुषत्व किंवा स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी बाळाला जन्म देऊन मग त्याला पाळणाघराचे हवाली केलं जातं आईवेगळ्या वाढणाऱ्या त्या जीवाला प्रेम ,माया मिळत नाही त्यांच्या बाळलीलांचे कौतुक करण्यासाठी आई-वडिलांना वेळ नसतो भूक लागते,तहान लागते पण सांगणार कोणाला?अशी स्थिती होणार असेल तर मातृत्वाच्या मागे न लागता करिअरवर लक्ष केंद्रित करावे .असे करताना आपण पाप करीत आहोत असे समजू नये अमुक एका बाळाची आई म्हणून तुम्हाला फार तर एक कॉलनी किंवा शाळा ओळखेल पण समाजासाठी किंवा देशासाठी काही भरीव कार्य केले तर सगळा देश ओळखेल (ज्यांना इच्छा असूनही आई होता आलं नाही त्यांनीही असा विचार करावा) “घराण्याचे नाव राहण्यासाठी मुल असावं “असाही एक युक्तिवाद मांडला जातो देशासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांच्या, राजे-महाराजांच्या वारसदारांना सुद्धा आज लोक ओळखत नाहीत तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना घराण्याचे नाव राखून असा कोणता मोठा फरक पडणार आहे ? आज सर्वत्र समस्या आहेत प्रदूषण ,दुष्काळ ,भूकंप ,सुनामी ई.नैसर्गिक तसेच चोरी , गुंडगिरी, भ्रष्टाचार, व्यसनाधिनता इ. सामाजिक आपत्ती आ वासून उभ्या आहेत. पावलोपावली स्पर्धा, भीती अपघात असतांना बाळाला कोणतं सुरक्षित जीवन आपण देऊ शकणार आहोत? म्हणून अगोदर हे जग स्वच्छ-सुंदर करण्याचा आपल्यापुरता थोडा तरी प्रयत्न करूयात मग त्या देवदूतांना पण निर्धास्तपणे या धरतीवर आणू शकू .देशाच्या प्रगतीतील एक मोठा अडथळा म्हणजे वाढती लोकसंख्या अशावेळी काहींनी स्वतःहून व्यक्तिगत कारणामुळे का होईना मूल होऊ न देणे ही थोडीफार का असेना देश सेवा म्हणता येईल. इथे मी हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की ‘मूल होऊ देऊ नये’ असे मी म्हणत नाही फक्त याबाबतीत बळजबरी नसावी हेच मला सांगायचं आहे .जगात अनेकांना अनेक उपाय करुनही मूल होत नाही. मुल ही दैवी देणगी आहे यावर माझाही विश्वास आहे मला स्वतःला ही देणगी मिळाल्याबद्दल मी देवाची आभारी आहे. मूल नको म्हणणार्यांनाही मूल झाल्यावर त्याच्या बद्दल प्रेम जिव्हाळा वाटतो व कित्येकदा तरुण वयात मूल नको म्हणणारे प्रौढ वयात आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करताना दिसतात शिवाय मूल असणाऱ्यांना एक सामाजिक मान्यता मिळत असते. मूल नसलेली जोडपी समाजापासून वेगळी पडू शकतात. आम्हाला मूल नको आहे असे मत असणाऱ्यांनी काही गोष्टी पडताळून बघणे आवश्यक आहे.
१.आजपासून दहा वर्षांनंतरही तुम्ही याच मतावर ठाम राहणार आहात का? 
२.समाजाला तोंड देण्याची तुमची क्षमता आहे का? 
३.तुम्हाला खरोखरीच मूल नको आहे की केवळ त्या जबाबदाऱ्यांना तुम्ही घाबरत आहात?( हे कारण असेल तर आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्यातील वात्सल्याची भावना तुम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडेल)
 या सर्व बाबींचा विचार करुनही जर तुमचे मत कायम असेल तर आपल्या निर्णयावर ठाम राहा उगाच इतरांच्या दबावाला बळी पडून स्वतःचेआणि त्या बालकाचे नुकसान करू नका. मुलाला जन्म देण्यासाठी उत्सुक असणार यांनी सुद्धा काही बाबी विचारात घेतल्या पाहिजेत 
१.आपल्याला मुलांची खरच आवड आहे का ?आपण मुलांना आवश्यक ते प्रेम वात्सल्य देऊ का ?
२.मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक ती सहनशक्ती ,कष्ट घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे का ?
३.बदलत्या काळामध्ये मुलांना स्पर्धेला तोंड देता यावे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा ,त्यांचे एका जागरूक सामाजिक व्यक्ती मध्ये रूपांतर व्हावे यासाठी आपण यथायोग्य मदत, मार्गदर्शन करू शकतो का? 
४.त्यांच्या गरजा पूर्ण करणारी आपली आर्थिक आणि त्याहीपेक्षा मानसिक स्थिती सुदृढ आहे का?
 मूल सांभाळणे ,मोठे करणे ही फार मोठी जबाबदारी आहे करिअर व बालसंगोपन दोन्ही तितक्याच समर्थपणे करणे शक्य नाही किंवा अवघड आहे प्रसंगी करिअर कडे दुर्लक्ष करणे आपल्याला जमेल का? आपल्या बाळासाठी आणि इतरही सर्व बाळांसाठी समाजसुधारणेचा थोडा तरी प्रयत्न आपण करतो का? शेवटी एक असेही नमूद करावंस वाटतं की एक तरी मूल होऊ द्या म्हणणार्या आज्यांबरोबरच आणखीन एक असाही वर्ग आहे जो म्हणतो आयुष्यभर मुला-मुलींचे केले आणि आता सुना नातवंडे चे करण्यात वेळ जातो आहे ,स्वतःची आवड ,छंद जपायला समाज कार्य करायला ,वेळच मिळाला नाही. तेव्हा सर्व गोष्टींचा साधक-बाधक विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा एवढेच करता हा लेखप्रपंच

© -मोनाली मंगेश पाटील.