मुखवट्यावर मुखवटा

मुखवट्यावर मुखवटा
कधी खरा तर
कधी असतो खोटा
आज आहे प्रत्येक
चेहऱ्यावर मुखवटा

कधी मित्रांसाठी
कधी घरच्यांसाठी
कधी कार्यदरबारी तर
कधी मांडल्या संसारी

आज एक आवडेल
तर उद्या दुसरा आवडेल
त्याच मुखवट्यावर
पुन्हा मुखवटा चढवेल

डगमगले किती ही
तरी तटस्थ राहावं
लेवून हास्य मुखवटा
रडक मूख लपवाव

मुखवट्याचा रोजच
खेळत असला लपंडाव
कधी भासवी आदर्श तर
कधी दिसे संस्कारभाव

मुखवटा नाही चुकीचा
चुकीच आहे दिखावा
खोट्याचा पुजवून पाट
मुखी अभिमान राखावा

असल्या मुखवट्यावर
कसा ठेवावा भरवसा
आपलं आपलं म्हणत
मागे वागतोय कसा

कधी रीती रिवाज
कधी बदलती मुखवटा
देती घाव मना किती
किती पाळावा दुखवटा

गाडून टाकावे सगळे
निरर्थक असे मुखवटे
हास्य मुखाने करू सामना
असो जागोजागी काटे


©संध्या श्री

🎭 Series Post

View all