मुखवटा भाग 2

A Story Of Soldiers
कथेचे नाव : मुखवटा.
विषय : रहस्यकथा + प्रेमकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.


                  सगळीकडे एकाच गोष्टीचा प्रचंड धुमाकूळ माजला होता. एकाच ठिकाणी २० प्रेत सापडल्याने वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे एकाच बातमीने भरुन निघाली होती. पोलिस विभागात आणि सरकारी यंत्रणेमध्ये भयंकर उलथापालथ झाली होती. राजकीय विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांना जनतेच्या टिकेला सामोरे जावे लागत होते त्यामुळे राजकारण्यांकडुन एकमेकांना टीकेची झोड ऊठत होती . ज्या व्यक्तिने हे केले होते त्या व्यक्तीला पाहण्याची आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य जनतेमध्ये प्रचंड वाढली होती. "नेमके कशासाठी" आणि "का? " ही लोक मारली गेली याचा शोध तर चालु होताच पण त्यापलीकडेही अशी हत्या करणे कितपत योग्य आहे यावर चर्चासत्र चालु होते. तो मात्र निवांत त्याच्या ऑफिसमध्ये बसुन हे सर्व ऐकत होता व पाहत होता. त्याने जे केले त्याबद्दलचा पश्चात्ताप किंचितही त्याच्या नजरेत नव्हता उलट पुढे काय करायचे याची आखणी करण्यातच तो व्यस्त होता.

              आज राणावत फॅमिली मधील लोक नेहमी सारखेच आपापल्या कामाला जाण्यासाठी तयार होत होते. नितेश हे एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते तर अर्णव एक पोलिस ऑफिसर होता. अर्जुन एक प्रसिद्ध बिजिनेसमन होता पण तो नेहमी अर्णवला मदत करत असे. अर्णवची बायको अनन्या हवाईदलात " लढाऊ विमानाची पायलट" होती त्यामुळे बर्याच वेळा तिला घरापासून दूर राहावे लागत असे. हवाईदलात महत्त्वाच्या कामगिरीवर असल्याने तिला सुट्टी तशी कमीच असे. सध्या काही दिवसांची सुट्टी घेऊन ती तिच्या कुटुंबाला भेटायला आली होती. यादरम्यानच हा मुलीचा बघायचा कार्यक्रम झाला होता आणि तो प्रसंग पण. हे ज्या कोणी केले होते त्या व्यक्तीला ती चांगली ओळखत होती पण तिने मौन राहायचे ठरवले होते. तिचा त्या व्यक्तीला पुर्ण पाठिंबा होता कारण तिला माहिती होते हे तो कशासाठी करत होता ते! अनन्या तिच्या कामानिमित्त घरी नसे तेव्हा मुलांना कोणीच कधी अनन्याची कमी जाणवू देत नसत. तिच्या कर्तृत्वाची जाणीव तिच्या मुलांना पुरेपूर होती.  तिला घरातील सर्वांचा पुर्ण पाठिंबा होता म्हणुनच ती तिची कामगिरी ऊत्तमरित्या करु शकत असे. सगळ्यांनाच तिच्या कर्तृत्वाचा अभिमान होता त्यामुळेच तिच्याबाबत सगळेच भावनाशिल होते.

           अर्जुनने दोन्ही पिलांना घेऊन अनन्याचा निरोप घेतला. ते सगळे तिला एअरपोर्टवर सोडायला आले होते. आता कमीत कमी ३ ते ४ महिने तरी तिला येता येणे शक्य नव्हते. तिच्यासाठी देशसेवा आधी होते मग कुटुंब. अनन्याला सोडुन अर्जुन, नवी, पार्थ, ( अर्णवची मुले), आरती ( अर्जुन व अर्णवची बहिण) येत होते तेव्हा अचानक रस्त्यावर एक प्रसंग घडला.

        एक मुलगी पळत होती कारण तिच्यामागे पाच ते सहा गुंड लागले होते. दिसण्यावरुन ती मुलगी साध्या घरातील वाटत होती पण ते गुंड बरेच पोचलेले वाटत होते. चांगलेच हट्टेकट्टे होते ते गुंड आणि साधारण तर अजिबात वाटत नव्हते त्यामुळेच त्या मुलीचे असे घाबरुन पळणे रास्त होते. अर्जुनने एकदा आरतीकडे तर एकदा नवी व पार्थकडे पाहिले. तिघांनीही ईशारा केला तसे अर्जुनने गाडी भरधाव वेगाने सोडली. काही कळायच्या आतचं ती मुलगी त्या गुंडांच्या नजरेपासुन दुर झाली होती. ती मुलगी नेमकी कुठे गेली हे काही त्यांना कळले नाही त्यामुळे रिकाम्या हाताने ते तसेच परत गेले.

            अर्जुन घरी पोहोचला. त्याने गाडी पार्किंगला लावली तसे सगळे गाडीतून उतरले. चौघेही थोडे पुढे गेले पण गाडीतून काही हालचाल होईना म्हणून मागे फिरुन सगळे गाडीजवळ आले.

" अग बाई, तुला बाहेर यायला आमंत्रण द्यायचे का? "..... ईति आरती.

     पण ती मुलगी काही जाग्यावरुन हलेना. तिचा चेहरा पुर्ण भांबावलेला दिसत होता जणू असे काही तिने कधी केले नव्हते की कधी पाहिले नव्हते. तिचा चेहरा पाहून सगळ्यांना जरा हसुच आले पण अर्जुन मात्र तिला रोखुन पाहु लागला. शेवटी न राहुन नवीने तिला हलवले तेव्हा कुठे ती भानावर आली.

" मी कुठे आहे? ".... ती मुलगी.

" आंटी, तुम्ही आमच्या गाडीत आहात? "...... नवी.

" आणि आता गाडीतुन ऊतरलात तर आमच्या घरातही याल! "...... पार्थ.

" काय? "..... ती मुलगी झटका लागल्यासारखी गाडीतुन ऊतरली आणि त्या चौघांसमोर जाऊन ऊभी राहिली.

" अस कोण खेचतं का कोणाला? मी घाबरले ना! मला वाटले आता मी किडनॅप होते की काय? ".... ती मुलगी मोठे मोठे डोळे करत म्हणाली.

" लुक, दादुने तुला ओढले म्हणून तु आता वाचली आहेस नाहीतर तुझ्या सोबत काय झाले असते याची कल्पनाही तु केली नसशील? "...... आरती.

" हो, मला मान्य आहे; मी अडकले होते त्या गुंडांसोबत. तुम्ही लोकांनी वाचवले नसते तर , हा विचार करुनच माझ्या अंगावर काटा येत आहे. "...... ती मुलगी.

" ठीक आहे, आत चल थोड तुझ्याबद्दल सांग म्हणजे आम्हाला तुझ्या घरच्यांना शोधता येईल. ".... आरती

              आरती असे म्हणत वळली तसे नवी व पार्थही वळाले पण अर्जुन अजुनही तिच्याकडे संशयाने पाहत होता. तिच्याकडे पाहून त्याला अस वाटत होत की नक्कीच तिच्याबाबतीत काहीतरी गुढ आहे  पण सध्या त्याने तिची नंतर चौकशी करु हा विचार केला. सगळे निघाले तरी ती मुलगी तिथेच भेदरून ऊभी होती आणि अर्जुन एकटक तिला रोखुन पाहत होता. गेटमधून अर्णवच्या गाडीचा आवाज आला तेव्हा कुठे अर्जुनने तिच्यावरून लक्ष हटवले. अर्णव गाडी पार्क करुन आला तो या सगळ्यांना दरवाजाजवळ पाहुन थोडा आश्चर्यचकित झाला. थोडा पुढे आल्यावर त्याला एक मुलगी पाठमोरी दिसली तसा तो लगबगीने पुढे आला. तो समोर आला तसे नवी व पार्थ जाऊन त्याला बिलगले. त्यानेही पुढे होत दोघांना कवेत घेतले.

" कोण आहे ही मुलगी? "...... अर्णव अर्जुनकडे पाहत म्हणाला.

" भाई, हिच्या मागे गुंड लागले होते म्हणून आम्ही तिला वाचवले आणि.....! ".... आरती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला तोडत अर्णवच पुढे म्हणाला.

" आणि!...... तुम्ही तिला घरी आणलं! "...... अर्णव.

" सॉरी भाई, पण त्यावेळी आम्हाला काही सुचले नाही. ती  उद्या जाईल तिच्या घरी आजची रात्र राहुदेत आपल्याकडे. "..... आरती.

" ठीक आहे, चला आत! "..... अर्णव असे बोलुन मुलांना घेऊन आत निघून गेला. आरतीने त्या मुलीच्या हाताला धरले अन् तीही आत गेली. अर्जुन मात्र कोणालातरी फोन करत बाहेरच थांबला.

           रात्री ऊशीर झाल्याने आरतीने त्या मुलीला डायरेक्ट तिच्या रुममध्ये नेले. सकाळी जेव्हा सगळे नाश्त्याला जमले तेव्हा आरती त्या मुलीला घेऊन आली. घरच्यांना वाटले ती आरतीची मैत्रिण असेल पण नंतर आरतीने जे सांगितले ते ऐकुन सगळेच अचंबित झाले.

" बापरे! किती भयानक आहे हे? "...... नीता ( अर्णवची आई)

" बाळा, तिला वाचवले ते ठीक आहे पण तुम्ही हिला घरी नव्हते आणायला पाहिजे होते. "..... आजोबा.

" आजोबा, माझे या शहरात कोणीच नाही. मी नोकरीसाठी आजच ईथे आली. मी रेल्वे स्टेशनवर उतरले खरे पण आता कुठे जायचे हा प्रश्न होता माझ्यापुढे. माझी मैत्रिण म्हणाली होती, ती माझी सोय करेल पण तिने माझा फोनही उचलला नाही. मी घाबरले होते, तशीच बाहेर थोडे अंतर पुढे चालत आले  तर त्या गुंडांनी मला घेरले. सगळे सामान टाकुन कशीबशी मी तिथुन पळाले. माझ्याकडे माझे कपडे, महत्त्वाची कागदपत्रे काहीही नाही आहेत. मी कसे करु? मी कुठे जाऊ? ".... असे म्हणत ती मुलगी रडायला लागली.

" हे बघ बाळा, आम्हाला तुझी परिस्थिती समजत आहे पण तुला ईथे ठेवणे आम्हाला जमणार नाही. तु काळजी करु नको आम्ही तुझी चांगल्या प्रकारे सोय करु. "..... आजी.

" आजी, मी पाया पडते तुमच्या. प्लीज काही दिवस फक्त मला ईथे राहुद्या मग मी स्वतःहुन इथुन निघून जाईन."..... ती मुलगी.

" नाव काय ग तुझे? "... आजी तिचे बोलणे दुर्लक्ष करत म्हणाली.

" मैथिली! "..... मैथिली.


क्रमशः

काय वाटते राणावत फॅमिली ठेवेल का मैथिलीला त्यांच्या घरात? वाचत रहा, कमेंट्स करत रहा आणि लाईकही करा.


टीम पुणे
लेखिका - विशाखा शिगवण.

🎭 Series Post

View all