मुखवटा भाग ३

A Story Of Soldiers.
 कथेचे नाव : मुखवटा. ( भाग ३)
विषय : रहस्यकथा + प्रेमकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.

              मैथिली आता राणावत यांच्या घरात होती. सगळ्यांना तिला कुठे ठेवायचे हा प्रश्न उपस्थित झाला होता. ईतक्या सहजासहजी राणावत कुटुंब तिला त्यांच्या घरी ठेवणार नाहीत याची जाणीव मैथिलीला झाली होती पण पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून ती पुढे बोलु लागली.

" आजी, फक्त काही दिवस मला ईथे राहुद्या, माझी सोय झाली की मी लगेच निघून जाईन इथुन. एक मिनिट सुद्धा थांबणार नाही. "...... मैथिली आशावादी चेह-याने सगळ्यांकडे पाहत म्हणाली.

" सॉरी बाळा, पण आमच्या घराचे काही नियम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते कोणासाठीही बदलणार नाही. आरती हिला पाहुण्यांच्या खोलीत ने आणि तुझे काही कपडे दे तिला आता  आणि उद्यासाठी. अर्जुन उद्या काही कपडे तसेच ईतर काही गरजेच्या वस्तू तु आणि आरती मिळुन मैथिलीसाठी घ्या आणि एखादे चांगले मुलींचे वसतिगृह पाहुन तिला तिथे सोडा. "...... आजी असे म्हणत धीरगंभीर चेह-याने ऊठुनू तिच्या खोलीकडे निघाली.

" अजुन एक, तिच्या नोकरीसाठी प्रकाशला सांग म्हणजे तो तिला लगेच काम मिळवुन देईल. तसेही त्याच्या कंपनीत नेहमी जागा रिकाम्या असतात जॉबसाठी किंवा इतर कुठे असेल तरी तो सांगेल. "... .. असे म्हणत आजोबाही ऊठले व आजीपाठोपाठ गेले. ( प्रकाश आजोबांचे जुने मित्र ज्यांची स्वतःची कंपनी होती).

          सगळेजण आजी व आजोबांच्या बोलण्याला होकार देत तिथुन पांगले पण मैथिली मात्र गोंधळून  तिथेच ऊभी होती.

" काय खतरनाक परिवार आहे यार ? इथेच रहा म्हंटले असते तर काय झाले असते? आता काय करायच? प्रश्न व ऊत्तरे चालु होती तिच्या मनात तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी टॅप केले. तिने पाहिले तर, आरती होती.......

" येतेस ना! "..... आरती म्हणाली व पुन्हा तिच्या खोलीकडे निघाली. आरती सगळ्यांसोबत थोडे पुढे गेली पण तसे तिच्या लक्षात आले की मैथिली तिथेच ऊभी आहे म्हणून ती पुन्हा तिला बोलवायला आली होती.

           मैथिलीने सगळे विचार झटकले व ती आरती बरोबर तिच्या रुममध्ये गेली. आरतीने तिला फ्रेश होण्यासाठी काही कपडे दिले. ती फ्रेश होऊन आली तेव्हा आरतीने तिला पाहुण्यांचा खोली दाखवली आणि काही कपडे उद्यासाठी देत ती तिथुन निघून गेली. मैथिली पुन्हा अचंबित होऊन आरतीला जाताना पाहत होती. आजी व आजोबा सोडुन बाकी कोणीही तिच्याशी साधे बोललेही नव्हते. आजी आणि आजोबा पण कामापुरतेच बोलले होते त्यामुळे आता काहीतरी करुन ईथे कसे राहायचे याचा विचार करतच मैथिलीने दार लावले व ती पलंगावर पहुडली.

        सकाळी पुर्ण राणावत कुटुंब नाश्त्याला जमले होते. मैथिली अजुनही आली नव्हती. नेहमीप्रमाणे शांततेत नाश्ता झाला आणि आजींनी बोलायला सुरुवात केली.

" ती नवीन पोरगी आली नाही का अजुन? ".... आजी

        आजी म्हणजे एक कडक शिस्तीचे व्यक्तिमत्त्व. मुलांना तसेच नातवांना घडवण्यात यांचा मोठा हात होता. आपला नवरा आर्मी ऑफिसर आहे त्यामुळे आपणही तसेच राहिले पाहिजे हे माहित होते आजींना. अर्जुनचे वडीलही आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून होते तर अर्णवला आर्मी काही जमली नाही म्हणून तो पोलिस मध्ये भरती झाला. आजींना कोण काय करते व कोणाला कसा सपोर्ट करायचा हे चांगलेच ठाऊक होते.

" ठीक आहे, अर्जुन आजच ती या घरातुन बाहेर जायला पाहिजे. तिचे बोलणे, तिच्या चेह-यावरचे हावभाव व डोळ्यांतील भाव यात तफावत आहे. गुंड मागे लागले म्हणून ती घाबरली होती हे खर आहे पण ते कृत्रिम वाटले मला. अशी व्यक्ती घरासाठी व आपल्यासाठी घातक आहे त्यामुळे तिला बाहेर काढणे हा एकमेव उपाय आहे."...... आजी.

" बरोबर बोलत आहे आई. त्या मुलीच्या डोळ्यात मी सुद्धा वेगळेपण टिपले जरा. "...... नितेश ( अर्जुनचे वडिल म्हणाले).

" आजोबा, ती जर इनोसंट असेल तर! काय हरकत आहे तिला ईथे ठेवायला. ती खुप सुंदर आहे, आम्ही तिला चाची बनवु".... पार्थ.

" हो, मला पण ती आवडली "... नवी.

" बाळांनो, जगरहाटी समजायला तुम्ही अजुन लहान आहात आणि त्या मुलीविषयी काहीच माहीती नसताना तुम्ही तिला चक्क काकी बवनुन टाकलतं.".... अर्णव.

" सॉरी, डॅडी! "..... नवी व पार्थ म्हणाले तसा इतका वेळ त्यांना रागात पाहणारा त्यांचा लाडका चाचु अर्जुन शांत झाला होता.

       हे सर्व बोलणे मैथिली जिन्यात उभी राहुन ऐकत होती. तिला या गोष्टीचा राग येत होता. काहीही करुन तिला तिथे राहायचच होते. ती तिथे राहिली तरच काही गोष्टी करु शकत होती अन्यथा तिला पुढे समस्या निर्माण झाली असती. मैथिलीने थोडा विचार केला आणि ती गालात कुत्सितपणे हसली.

" पाहतेच मी असे कसे मला घराच्या बाहेर काढता ते तुम्ही? ".... असे म्हणत मैथिली जोरात ओरडली जेणेकरून सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे जाईल आणि ती जिन्यावरुन खाली पडली.

        पहिल्या दोन ते तीन पाय-या सोडुन ती पडली होती. साधारण २० ते २५ पाय-या असतील. ती चांगलीच घरंगळत आली होती खाली आणि शेवटच्या पायरीवर येताच तिचे डोके आपटले आणि ती बेशुद्ध झाली.

         मैथिलीच्या ओरडण्याचा आवाज आला तसे सगळे मागे वळून पाहु लागले पण तिला जिन्यावरुन पडताना पाहून सगळेच घाबरले. अर्जुन तर तडक ऊठुन पळाला. बेशुद्ध पडलेल्या मैथिलीला ऊचलुन त्याने सोफ्यावर झोपवले व पटकन नोकरांना प्रथमोपचार पेटी आणायला सांगितले तोपर्यंत बाकीचेही तिच्याभोवती गोळा झाले होते. अर्जुनने प्रथमोपचार केले तिच्यावर आणि पुन्हा तिला ऊचलुन तिच्या रुममध्ये नेले. अर्णवने डॉक्टरांना फोन केला होता एव्हाना.


क्रमशः
कोण आहे मौथिली? काय हेतु असेल तिचा राणावत फॅमिलीत येण्यासाठी? राणावत फॅमिलीला कळेल का याबाबत? जाणुन घेऊया पुढील भागात. तोपर्यंत वाचत रहा व लाईक करत रहा.


लेखिका - विशाखा शिगवण.

टीम पुणे
  


     

🎭 Series Post

View all