मुग डाळीचे सांडगे
साहित्य:-
२ कप मुगडाळ, २ चमचे जिरे, १ चमचा हिंग, १ चमचा लाल तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाणी (डाळ भिजवण्यासाठी)

कृती :-
मुग डाळ ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवा. डाळीतील पाणी गाळून ती थोडीशी जाडसर वाटून घ्या. (डाळ पाटा वरवंट्यावर वाटली तर ती चांगली वाटली जाते.) तिखट, हळद, जिरे, हिंग आणि मीठ घालून मिक्स करा. उन्हात एक स्वच्छ प्लास्टिकचा कागद पसरवून त्यावर हाताने छोट्या छोट्या वड्या टाका. किंवा मेहंदीचा कोन करतो तसा कोन करून त्यात हे मिश्रण टाकून त्याच्या साहाय्यानेही छोट्या छोट्या वड्या पाडू शकता. कागदाऐवजी मोठ्या परातीत पण हे करू शकता.

हे सांडगे चांगले २-३ दिवस उन्हात वाळवा. सांडगे पूर्ण वाळल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा आयत्यावेळी हे सांडगे तुम्ही करू शकता. हे सांडगे अगदी वर्षभर छान टिकतात.
( तुम्हाला फक्त चणाडाळीचे सांडगे बनवायचे असतील तर ते सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता किंवा मिश्र डाळीचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवता येतात पण मला मुगडाळीचेच आवडतात म्हणून मी मुगडाळीचेच करते)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा